नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.
मोबाईल आता चैनीची गोष्ट नसून गरजेचं साधन झालं आहे. पण मोठ्यांची गरज आता त्यांच्याच डोकेदुखीचं कारण बनली आहे. कारण मोठ्यांचा मोबाईलचा लहानग्यांकडून होत असलेला अतिवापर. आधी केवळ काही वेळापुरताच हातात असलेला मोबाईल आता ऑनलाईन शाळेमुळे बराच वेळ मुलांच्या हातात असतो. अनेकदा मुलांना यातूनच गेमिंगचं व्यसन लागायला सुरुवात होते. मुलांच्या मोबाईलच्या सवयीचं व्यसनात रुपांतर होऊ नये म्हणून काय काळजी घ्यावी हे आम्ही तुम्हाला पुढील शब्दात सुचवतो-
मुलं अनुकरणप्रिय असतात-
मुलांना आपल्या मोठ्यांचं अनुकरण करायला खुप आवडत असतं. आपल्याला नेहमीच मोबाईलवर पाहिल्यावर त्यांना वाटतं की ही सर्वात जास्त मनोरंजन करणारी वस्तू आहे. मग पालकांप्रमाणेच ते ही मोबाईल वापरण्याची मनीषा बाळगतात. त्यामुळेच मुलांसमोर मोबाईल वापरणं कमी केलं तर आपसूक त्यांच्या वापरावरही बंधनं येतील.
मोबाईलची लालूच देऊ नका –
अनेकदा पालकच मुलांना मोबाईलची सवय लावण्यास कारणीभूत असतात. एखादी बाब ऐकण्यासाठी, अमुक एक गोष्ट केल्यानंतर मोबाईल मिळेल ही लालूच अनेकदा पालकांकडून मुलांना दिली जाते. मुलांना मोबाईलची सवय लागायची ही पहिली पायरीच असते. त्यामुळे अशी आमिषं देण्यापुर्वी जरुर विचार करा.
निर्णयावर ठाम रहा –
मुलांनी थोडा हट्ट केला, रडले तर पालक मुलांना लगेच मोबाईल हातात देतात. याउलट पालक मुलांसमोर मोबाईल देणार नाही या मतावर ठाम राहिले तर अनेकदा मुलांनाही अप्रत्यक्षरित्या समज मिळते. त्यामुळे मुलांनी कितीही हट्ट केला तरी त्याचं लक्ष दुसरीकडे वळवावं जेणेकरुन त्यांना मोबाईलचा विसर पडेल.
क्रिएटिव्हिटीला वाव द्या -
मुलांचं मोबाईलकडे असलेलं आकर्षण कमी व्हावं यासाठी त्यांच्या क्रिएटिव्हीटीला जास्तीत जास्त वाव देण्याचा प्रयत्न करावा. त्यांना एखाद्या अॅक्टीव्हीटीमध्ये गुंतवा जेणेकरुन ते सतत त्यात राहून क्रिएटिव्हीटीला वाव मिळेल. याशिवाय त्यांचं मोबाईलबाबत असलेलं आकर्षण कमी होईल.
हिसकावून घेऊ नका –
अनेकदा मुलांनी फोन हातात घेतला रे घेतला की पालक तो हिसकावून घेण्याच्या प्रयत्नात असतात. अशा वेळी मुलं आणखी अॅग्रेसिव्ह होतात. अनेकदा रागाच्या भरात मोबाईल हातातून फेकून देणे, किंवा आरडाओरडा करणे अशी प्रतिक्रिया ते देताना दिसतात. मुल जर सतत मोबाईल हातात घेताना दिसलं तर गोड बोलून काही वेळाने मोबाईल परत देण्याबाबत समजावून सांगाव. जेणेकरुन मुलं शांतपणं रिअॅक्ट करतील.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.