तुमच्या लाडक्या पाळीव प्राण्याचे हे संकेत वेळीच ओळखा

लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

पाळीव प्राणी अनेक घरांचा जीव की प्राण असतात. घरातील एका सदस्याप्रमाणेच पाळीव प्राण्यांचीही काळजी घेतली जाते. पाळीव प्राणी अनेकदा मानसिक ताण कमी करण्यास मदत होतात. घरातील मुक्या जनावरांच्या निर्भेळ प्रेमाने अनेकदा मन:शांती मिळण्यास मदत होते.

घरात असलेल्या या मुक्या सदस्याचं जीवापाड कौतुक होतानाही दिसतं. सेलिब्रिटींच्या पाळीव प्राण्यांचे सोशल मिडिया हॅण्डलही आहे. तर अनेक प्राणी सोशल मिडिया स्टारही झाले आहेत. पण तुम्हाला माहिती आहे का, तुमच्या आमच्या प्रमाणेच मुक्या प्राण्यांनाही मानसिक ताण येतात.

अनेकदा जिव्हाळ्याच्या माणसाशी संबंध तुटल्याने अनेकदा प्राण्यांना नैराश्य येतं. किंवा जीवलगाच्या दुराव्याची भिती त्यांनाही सतावत असते. यामुळे अनेकदा त्यांच्या वागण्यात बदल होतो. हे घडू नये म्हणून काय काळजी घ्यावी हे आम्ही तुम्हाला सांगतो आहोत.

पळून जाण्याचा प्रयत्न – अनेकदा पाळीव प्राणी विचित्र वागू लागतात. बांधलेले असताना बंध तोडून पळून जाणे हे करु लागतात. अशावेळी पहिल्या मालकाकडे जाण्याचा प्रयत्न करताना दिसतात. अशा वेळी वेटची मदत घेतली जाऊ शकते. अनेकदा नव्या घरात शिफ्ट झाल्यानंतरही असा प्रॉब्लेम येण्याची शक्यता असते.

नेहमीपेक्षा अधिक लघुशंका – अनेकदा प्राण्यांच्या मनात भिती बसते. अशावेळी ते नेहमीपेक्षा अधिक वेळा लघुशंका करतात. किंवा घरातही अनेक ठिकाणी लघुशंका करु लागतात. अशा वेळी अ‍ॅनिमल कम्युनिकेटरशी संपर्क साधावा.

शक्यतो बदल टाळा- नेहमीच्या व्यक्ती, नेहमीच्या वस्तू प्राण्यांसाठी खास कंफर्ट झोन बनलेले असतात. आपल्याप्रमाणे ते नव्या वातावरणात लगेच रुळत नाहीत. अशा वेळी त्यांच्या मनात असुरक्षिततेची भावना निर्माण होऊ शकते. यामुळे कोणताही बदल करायचा असेल तर तो अचानक न करता. सावकाश करावा.

सतत वस्तू चावणे – अनेकदा प्राणी घरातील वस्तू दाताने चावत सुटतात. समोर जी वस्तू दिसेल ती चावायला सुरु करतात. अशा वेळी त्यांना टीथर्ससारख्या वस्तू द्याव्यात जेणेकरुन चावायची इच्छा कमी होईल. लहान पेट दात सळसळताना असं करतात. पण मोठ्या वयाचे पेटस असे करु लागले तर अनेकदा कोणत्यातरी त्रासाचा सामना करत आहेत हे समजू शकते. अनेकदा प्राणी कॅल्शिअमची कमतरता असेल तरी असं करतात.

कोप्रोफ्रेजिया – अनेकदा जनावरं स्वत:ची विष्ठा खातात. अशा वेळी कोणतीतरी असुरक्षितता त्यांना सतावत असते. अशा वेळी त्यांच्याशी प्रेमाने संवाद साधणं गरजेचं आहे.
पाळीव प्राण्यांना केवळ प्रेमाची आणि सद्भावनेची गरज असते. वेळोवेळी त्यांना डॉक्टरकडे नेऊन आणणं. त्यांची काळजी घेणं अत्यंत गरजेचं आहे.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.