स्मार्टफोनची बॅटरी ब्लास्ट होऊ नये म्हणून कशी काळजी घ्याल?
आज काल आपल्या वृत्तपत्रात तुम्ही नेहमी वाचत असाल किंवा नेहमी नसत पण, कधीतरी महिन्यातून एक-दोन वेळा अशी बातमी येते की ही या स्मार्टफोनची बॅटरी आहे जी ब्लास्ट झालेली आहे.खिशात ठेवलेला फोन ब्लास्ट झालेला आहे, पिशवीत ठेवलेला फोन ब्लास्ट झालेला आहे, या सगळ्या गोष्टी का होतात आणि तुम्ही या गोष्टीपासून कसे वाचू शकता ही गोष्ट तुम्हाला आज मी सांगणार आहे.
स्मार्टफोनच्या बॅटरीचा स्फोट कशामुळे होतो? :
सगळ्यात मोठ कारण म्हणजे तुम्ही तुमचा स्मार्टफोन खूप जास्त थंडीमध्ये किंवा खूप जास्त उन्हामध्ये ठेवला, कधी कधी पंधरा वीस मिनिटे उन्हात किंवा थंडीमध्ये राहिला तर काही होत नाही. पण जर दिवसातून तीन – तीन, चार -चार तास फोन अतिशय थंडीमध्ये राहिला, किंवा जिथे खूप गरम वातावरण आहे पन्नास डिग्री पेक्षा अधिक तर ब्लास्ट होण्याचे प्रमाण अधिक असते.
कारण त्या बॅटरीमध्ये वेगवेगळ्या प्रकारचे केमिकल्स आहेत आणि जास्त जेव्हा हीट असते तेव्हा ते रिॲक्ट होतात. फोन नेहमी नॉर्मल कंडिशनच्या तापमानात ठेवायचा. उदाहरणार्थ मी पुणेपासून बँगलोरला चाललो आहे जवळ जवळ माझा प्रवास आठ तासाचा आहे, मी कार चालवताना जिथे ऊन सरळ आरश्याच्या तिथे येते तिथे मी फोन ठेवला,तिथे हिट शोषली जाते तर फोन खूप जास्त गरम होईल.त्यातली जी बॅटरी आहे त्यांच्यावर तिचा परिणाम होतो.आणि ह्या ज्या गोष्टी आहेत त्या अजिबात करू नका.हे कोणी मुद्दामून करत नाही. ही गोष्ट तुम्ही लक्षात ठेवली पाहिजे.
दुसरी गोष्ट म्हणजे जे नॉर्मल लोक आहेत आरामात दोन,अडीच, तीन, चार वर्ष स्मार्टफोन वापरतात आणि जसं जसं वेळ जाते म्हणजे एक वर्ष झाल्यानंतर ती बॅटरी फुलायला लागले सगळ्यांच्याच फोनमध्ये अस होत नाही,पण काही काही फोनमध्ये तुम्हाला दिसत आणि तर पण दुर्लक्ष करतो.आपण काय करतो एक दीड वर्ष झाल की म्हणतो एक दीड वर्षाच झालं आहे की काही झालेलं नाही.पण जनरली तुम्ही जर फोन ची बॅक हलकीशी फुगते त्यावर दुर्लक्ष करू नका,आणि जेव्हा ती फुगते तेव्हा बॅटरी ब्लास्ट होण्याचे प्रमाण जास्त असते.
स्मार्टफोन ब्लास्ट म्हणजे फक्त बॅटरीचा ब्लास्ट होतो. त्यात मदरबॉर्ड असतात,सेन्सॉर असतात ह्याच्या मध्ये ब्लास्ट होण्यासारखं काही नसत. एक गोष्ट जी सगळ्यात महत्त्वाची असते ती ब्लास्ट होते त्यांची आपण काळजी घेतली पाहिजे. तुमच्या फोनची बॅक जर फुगलेली असेल तर नक्कीच तुम्ही सर्व्हिस सेंटरला जावा आणि बॅटरी चेक करून घ्या. आणि जर प्रॉब्लेम असेल तर बॅटरी बदला.आणि पन्नास टक्के पेक्षा जास्त स्मार्टफोन जे ब्लास्ट होतात ते एक्स्टरनल पंक्चरमुळे होतात.
समजा फोन जास्त वरून पडला तर ज्या बाजूला पडला आहे आणि काहीतरी टोकदार गोष्टीवर पडला आहे त्यामुळे बॅटरी पंक्चर होते.आणि त्याच्यामुळे शंभर टक्के बॅटरी ब्लास्ट होण्याची शक्यता असते, किंवा फोन वाकडा झाला, कुठे तरी अशा ठिकाणी पडला ज्यामुळे फोन वाकेल असा अशा वेळेला बॅटरी वाकते. त्या बॅटरीला इजा होते त्यामुळे ब्लास्ट होण्याची शक्यता आहे आणि त्यांचं वेळेला होत नाही थोड्या काळानी होते,ते तुम्ही चेक करून घ्या.
खेळता-खेळता कुणाचीतरी दगड लागला,कुणीतरी सुरी खुपसली अस काही होणार नाही,पण आम्ही सांगतोय. अशा वेळेला बॅटरी ब्लास्ट होण्याचे प्रमाण वाढत. कधी तरी मनिफॅक्चरींग डिफेक्ट कुठेतरी असतो आणि होऊ शकतो कारण ते एक बॅटरी आहे.
प्रत्येक बॅटरीमध्ये नाही होत तरी दहा हजार बॅटरीमध्ये एखादी प्रोसेस करताना काहीतरी प्रोब्लेम असेल, डिफेक्ट असू शकतात. आता एका बातमीमध्ये चार पाच दिवस झाले फोन घेऊन,पर्स मध्ये ठेवला होता आणि त्यामुळे ब्लास्ट झाला त्यामध्ये काहीतरी मॅनिफॅक्च्युरिंग प्रॉब्लेम होऊ शकतो.जास्त दिवस वापरलेला फोन नाहीये,नवीन फोन आहे,ब्लास्ट होण्याचे प्रमाण फार कमी आहे इतर गोष्टीमुळे तर अशा वेळेला मॅनिफॅक्च्युरिंग प्रॉब्लेम होऊ शकतो.
तुम्ही तुमचा फोन कसा वाचवू शकता? तुमच्या फोनची बॅटरी ब्लास्ट होऊ नये म्हणून काय काळजी घेऊ शकता?
आज कालचे मॉडर्न फोन असतात ना त्यांना तुम्ही ओव्हर चार्ज केल तर काही प्रॉब्लेम होत नाही. रात्री नऊला चार्जिंग पूर्ण झाल असेल आणि रात्रभर तरी चार्जिंगला ठेवला तरी फोनला काही होणार नाही,पण ते टाळा. दुसरी गोष्ट म्हणजे तुम्ही जेव्हा फोन चार्जिंगला ठेवता ही जे गोष्ट असते ती थोडी भयानक असते.
त्यामुळे काही पण होऊ शकत.त्यामुळे जेव्हा फोन चार्ज करायला ठेवता ते थोड लांब ठेवा. स्वयंपाकघरात तुम्ही फोन चार्जिंगला लावत असाल,किंवा जिथे फोडणी देत असाल तिथे उष्णता खूप जास्त असते. त्या गोष्टी टाळा. फोन चांगल्या ठिकाणी चार्जिंगला ठेवा.
हे महत्त्वाचं आहे या छोटे छोटे गोष्टी असतात त्यामुळे अपघात होऊ शकतात.त्यांची तुम्ही काळजी घेतली पाहिजे.आणि फोन बनवण्याच्या प्रोसेसमध्ये एक एक गोष्ट हजार वेळा तपासलेली असते,आणि त्यानंतर हे फोन बाजारात येतात.त्यामुळे क्वालिटी टेस्टिंग झालेली असते.आपल्या फोनची काळजी घ्या.