पावलांच्या काळजीकडे नको दुर्लक्ष, वापरा हा पर्याय

लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

पायावर उभं राहणं हे वाक्य आपण येता जाता सतत ऐकत असतो. मुळात या वाक्याचा अर्थ स्वावलंबी होण्याशी घेतला जातो. पण पावलं आणि वेदनारहित पायांवर उभं राहण्यात वेगळं सुख असतं. अनेकदा पावलांमुळे आपल्याला थंडीच्या दिवसात वेदनांचा सामना करावा लागतो.

विशेषत: थंडीच्या दिवसात पावलं चिरणं, टाचांमधून रक्त येणं वेदना होणं अशा अनेक त्रासांना सामोरं जावं लागतं. पण हे सगळ केवळ काही महिन्यांच्या थंडीमुळे नाही तर वर्षानुवर्षं पावलांकडे होत असलेल्या दुर्लक्षांमुळेही होत असतं. पावलं हा शरीराचा सगळ्यात दुर्लक्षिलेला जाणारा प्रकार आहे.

Foot care tips to follow for healthy feet - Times of India

आपण पावलांकड म्हणावं तिकडं लक्ष दिलं जात नाही. टाचा आणि पावलांना पुरेश हायड्रेट ठेवणं, योग्य प्रकारे स्वच्छता करणं तितकंच महत्त्वाचं आहे. या दिवसात पावलांची काळजी कशी हे घ्यावी हे आम्ही तुम्हाला सांगणार आहोत.

हायड्रेशन : पावलं धुळ, उन, पाणी, हवा या सगळ्यांना पावलं तोंड देत असतात. त्यामुळे पावलांना सतत हायड्रेट ठेवण्यासाठी पुरेपूर प्रयत्न करा. यामध्ये धुळीच्या संपर्कात कमीत यावेत असा प्रयत्न करा.

फुट क्रीम : रात्री झोपण्यापुर्वी पायाला फुट क्रीम लावा. अगदीच फुटक्रीम शक्य नसेल तर पेट्रोलिअम जेली लावून झोपण्यापुर्वी थोडी मालिश करा.

फुट मास्क : मास्क की संकल्पना फक्त चेह-यांसाठी नाही तर पावलांसाठीही आहे. घरच्या घरी हा मास्क बनवणं शक्य आहे. पिकलेल्या केळ्यात खोबरेल तेल मिक्स करुन पावलांना मसाज करावा. 10 मिनिटं मसाज केल्यानंतर कोमट पाण्याने पाय धुवून टाकावेत. यानंतर फुटक्रीम लावण्यास हरकत नाही.

Foot Care Tips for Diabetics - Health and Style Medical Center

 

ग्लिसरीन : कोमट पाण्यात ग्लिसरिन टाकून पाण्यात पाय ठेवून काहीवेळ ठेवा. यामुळे पावलांचा शिरांना आराम मिळतोच. शिवाय ग्लिसरीनमुळे पावलांचा कोरडेपणा निघून जाण्यास मदत होते.

स्क्रब : मृत त्वचा काढण्याचं काम स्क्रब उत्तम प्रकारे करते. पावलांना स्क्रब करण्यासाठी तुम्ही बाजारात उपलब्ध असलेले स्क्रब वापरु शकता. किंवा फुट स्क्रब घरीच करता येणं शक्य आहे. साखरेमध्ये थोडं तिळ तेल मिसळून पायाला मसाज करावा. यामुळे पाऊल आणि टाचेवरची डेड स्कीन निघून जाण्यास मदत होते. स्क्रबसाठी साखरेऐवजी कॉफीचा उपयोगही लाभदायक ठरु शकतो.

योग्य पादत्राण आणि सॉक्सचा वापर : योग्य पादत्राणं पावलांचं ब-याच अंशी संरक्षण करु शकतात. चांगल्या दर्जाच्या फॅब्रिकचे सॉक्स पावलांना कोरडेपणापासून वाचवतात.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.