ह्या ३ चुका करणारा माणूस, मरे पर्यंत गरीब राहतो ।। जाणून घ्या अशा ३ गोष्टी ज्या शक्य तितक्या कमी वेळेत तुम्ही बदलल्या तर यश तुमच्या दारात येईल !

लोकप्रिय शैक्षणिक

वॉरन बफेट म्हणतात पैसा हा सर्वस्व नाहीये. अशा गोष्टी बोलण्याआधी भरपूर पैसे कमवायला मात्र विसरु नका. असं म्हणतात पैसा हा आयुष्यातल्या सगळ्या समस्या सोडवू शकत नाही पण 80 टक्के समस्या या पैशांवर निर्माण होतात हे सुद्धा तेवढेच खरे आहे.

त्यामुळे आपल्याला पैशाला कमी लेखून चालणार नाही. आजच्या लेखामध्ये आपण तीन महत्त्वाची कारणे किंवा असं म्हणूया तीन अडथळे बघणार आहोत, ज्यामुळे माणूस श्रीमंत होत नाही. हा लेख तुमच्या आयुष्याला कलाटणी देणारा करू शकतो त्यामुळे एकही मुद्दा चुकवू नका.

पहिला आहे मानसिक अडथळा : तुमची पैशाबद्दल मानसिकता काय आहे? तुम्ही पैशांकडे कोणत्या नजरेने बघता? पैशाबद्दल तुमच्या मनात भावना काय आहेत? तुमच्या मनात पैशाबद्दल ज्या प्रकारचे विचार, धारणा, आणि भावना असतील त्या आधारावर तुमची सध्याची आर्थिक स्थिती आहे.

कारण जसा विचार तसा जीवनाला आकार. तुमच्या मनात पैशाबद्दल चुकीच्या धारणा असतील, जसे की पैसा सर्व दुःखाचे मूळ आहे, मी श्रीमंत झालो तर लोक माझा राग राग करतील, श्रीमंत होण्यासाठी दोन नंबरचा धंदा करावा लागतो, लोकांना फसवून खोटे बोलूनच श्रीमंत होता येते, माझी लायकी नाही श्रीमंत होण्याची असले चुकीचे विचार आपल्या प्रगतीच्या आड येतात.

असे विचार घेऊन तुम्ही कितीही कष्ट केले तरी तुमच्याकडे पैसे येणार नाही. आणि आला तर टिकणार नाही त्यामुळे तुम्हाला पैशाबद्दल विचार बदलावे लागतील. ते कसे बदलायचे ह्या विषयावर लेख पाहिजे असेल तर मला सांगा.

दुसरा अडथळा शारीरिक अडथळा : सोप्या भाषेत सांगायचे म्हणजे तुमच्या सवयी, घाणेरडी व्यसन करणे, तासनतास टीव्ही बघत राहणे, तासनतास मोबाईल वर व्हिडिओ गेम्स खेळणे, किंवा गरज नसताना फक्त लोकांना दाखवण्यासाठी महागड्या वस्तू विकत घेणे असल्या सवयी तुम्हाला रसातळाला घेऊन जातात. अशा सवयी असणाऱ्या माणसाने श्रीमंत होण्याचे स्वप्न पाहणे मूर्खपणाचे लक्षण आहे.

कारण आयुष्यात प्रगती करण्यासाठी, श्रीमंत होण्यासाठी त्याग करावा लागतो, कष्ट करावे लागतात, कारण श्रीमंत होणे एवढे सोपे असते तर सगळेच श्रीमंत झाले नसते का? आपण आपल्या सवयीचे गुलाम असतो रोज पाच तास तुम्ही मोबाईलवर घालवत असाल तर त्याच पाच तासात तुमचे पुस्तक वाचून होईल ते तुम्हाला प्रगती करण्यासाठी मदत करेल. म्हणून आपल्या सवयी तपासून बघा.

तिसरा अडथळा सामाजिक अडथळा : म्हणजे तुम्ही कोणत्या लोकांबरोबर राहता, उठता, बसता. असं म्हणतात आपले व्यक्तिमत्व आपण ज्या 5 लोकांबरोबर रहातो त्यांच्या सारखे असते. म्हणजे तुम्ही सातत्याने ज्या 5 लोकांबरोबर राहता, खाता त्या पाच लोकांना एकत्र केलं तर सहावे तुमचे व्यक्तिमत्त्व तयार होते.

कारण आपल्यावर लोकांचा सातत्याने प्रभाव पडत असतो म्हणून असे म्हणतात, जशी संगती तशी आयुष्याला गती. आपल्याबरोबर राहणाऱ्यांचे पैशाबद्दल असलेले विचार, धारणा नकळत आपल्या मनामध्ये रुजतात, त्यामुळे तुमची संगत नकारात्मक लोकांबरोबर असतील जे लोकांची उणीदुणी काढतात, ह्याला त्याला नाव ठेवतात,

फालतू गप्पांमध्ये वेळ वाया घालवतात, अशाने तुमची मानसिकता तशीच होण्याची शक्यता असते. त्यामुळे नेहमी ध्येयवादी आशावादी लोकांची संगत धरायचा प्रयत्न करा. काही लोक म्हणतील लोकडाऊन च्या काळात अशा लोकांना भेटायची कसे? त्याला सुद्धा एक मार्ग आहे मोठ्या लोकांनी लिहिलेली पुस्तकांचे वाचन करा

जेव्हा आपण मोठमोठ्या यशस्वी लोकांचे पुस्तके वाचतो तेव्हा पण त्यांच्या संगती मध्येच असतो. मला वाटते ह्या लेखाने तुम्हाला एक स्पष्टता आली असेल कि मानसिक, शारीरिक किंवा सामाजिक यापैकी कोणताही अडथळा तुमच्या आयुष्यात असेल तर लगेच त्याच्यावर काम करायला सुरुवात करा. जितक्या लवकर तुम्ही या सर्व गोष्टी अमलात आणलं तितकेच लवकर यश तुम्हाला मिळेल.

वरील माहिती www.youtube.com/c/ShahanPan या चॅनल वरून संकलीत व शंब्दांकित केलेली आहे.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.