इनाम आणि वतन जमिनींची सविस्तर माहिती ।। इनाम जमीन वर्ग-१, वर्ग-२, वर्ग-३, वर्ग-४, वर्ग-५, वर्ग-६अ, वर्ग-६ब, वर्ग-७, इनामदार, वतनदार, पाटीलकी, कुलकर्णी वतन, महार वतन ।।

शेती शैक्षणिक

आज आपण इनाम जमिनी आणि वतन जमिनी ज्या असतात त्या विषयी आज आपण माहिती घेणार आहोत. इनाम जमिनी या अनेक वर्षा पासून परंपरेने चालत आलेले आहेत. इनाम जमिनी ह्या अगदी ब्रिटिश काळा पासून सुरू झालेल्या आहेत. हे आज इनाम जमिनी होत्या किंवा हीच वतन होती या वतनांचा उद्देश होता की, ब्रिटिश सरकारला राज्य कारभार करण्या साठी, सोपे जाण्या साठी हा ईनाम आणि वतन जमिनीची पद्धत जी आहे ती सुरू करण्यात आली आहे.

आणि जी काही संस्थाने होती ती खालसा करण्यात आली होती. आणि त्यांना वतन आणि इनाम अशी नावे दिली होती. त्यामुळे ब्रिटिश सरकारचा फायदा व्हायचा आणि महसूल गोळा करावा लागायचा तो प्रत्यक्ष असा महसूल गोळा न करता अशा प्रकारचे जे संस्थानिक असायचे किंवा ते वतनदार असायचे त्यांच्या मार्फत शेत सारा आणि जमीन महसूल गोळा केला जात असायचा.

सरकारांने जी जनता होती, यांच्या मध्ये हे इनामदार वतनदार हा एक राज्य कारभार अशा पद्धतीचा होता तर तीच पुढे पद्धत सरकारने सुरू केली. इनाम जमिनी या अंशतः किंवा पूर्णतः पद्धतीने इनामदार यांना वतनदारांना वसूल करता यायचा. इनामदार आणि वतनदार म्हणजे ज्या व्यक्तीला जमीन महसूल आहे तो पूर्णतः किंवा अंशतः गोळा करण्याची किंवा वसूल करण्याचे जो अधिकार असायचा.

किंवा जो हक्क असायचा त्याला इनामदारी किंवा वतनदारी असे म्हटले जात असे. अठराशे साठ ते अठराशे 62 साला मध्ये इनाम कमिशनने याची चौकशी करून ज्या काही गोष्टी ठरवण्यात आल्या तर त्या वेळी बारा बलुतेदार ईनामाची सनद होती ती प्रदान करण्यात आली होती. आणि त्या सनद कोणत्या आहेत त्याबद्दल आज आपण येथे सविस्तर माहिती घेणार आहोत.

पहिले जे होते ते पाटील. त्यानंतर कुलकर्णी, त्यानंतर सुतार, त्यानंतर लोहार, त्यानंतर चांभार, कुंभार, नाव्ही, पारिट, जोशी त्यालाच ब्राह्मण म्हणतात. गुरव जे पुजारी वगैरे असतात तर ते असायचे. त्यानंतर सोनार आणि शेवटी महार. आज महार वतन चे सुद्धा मोठ्या प्रमाणावर ज्या अडचणी निर्माण होत आहेत किंवा ज्या जमिनी खरेदी विक्रीचे काम केलं जातं त्या विषयी सुद्धा जाणून घेणार आहोत आपण.

ब्रिटिश जे सरकार होतं, यांच्या मध्ये वतनाचे किंवा जी इनामदारी दिली जायची की ती तीन वर्गामध्ये विभागली जायची।. पहिली होती ती सरकाराच्या उपयोगाला येणार वतन असयचं तर ते एक नंबरला असायचं. यामध्ये राव असतील खोत असतील पाटील असतील नाइक असतील, गावकरी असतील कुलकर्णी असतील पांड्या करणी एक चौगुला अशा प्रकारची वतने दिली होती.

सरकार उपयोगी वतने असे म्हणतात. त्यानंतर रयत उपयोगी म्हणजेच जनतेच्या उपयोगाला येणारे वतने किंवा इनामदारी म्हणतात. यामध्ये जंगम काझी गुरव सुतार जोशी लोहार चांभार अशा प्रकारची जीवने असायची तर त्याला रयत उपयोगी असे म्हंटले जात असत. त्यानंतर सरकार व रयत यांना जी उपयोगाची नसायचे, निरुपयोगी वतने म्हणतात. तर ती वतने कोणती होती?

ती बघा कासार तांबोळी शिंपी गवंडी माळी सोनार अशा प्रकारची जीव वतन होती तर ती निरुपयोगी वतन असायचे. ब्रिटिश सरकारने वतनाची असे तीन वर्ग पाडलेली होती. त्या नंतर सात प्रकारची इनाम अस्तित्वात होती इनाम वर्ग1 इनाम वर्ग 2 इनाम वर्ग 3 इनाम वर्ग 4 नाम वर्ग 5 इनाम वर्ग 6 अ इनाम वर्ग 6 ब इनाम वर्ग 7. अशा प्रकारची वतने होते.

इनाम वर्ग 1 जे आहे ते जहांगीर आणि सर जमदार व इतर तत्सम राजकीय कामाच्या मोबदल्यात म्हणून जी जमीन दिलेली असायची तर त्याला इनाम वर्ग एक असे म्हटले जाते. नंतर इनाम वर्ग 2 या मध्ये एखाद्या व्यक्तीने केलेल्या चांगल्या कामगिरी बद्दल दिलेली जमीन म्हणजे इनाम वर्ग 2 असे म्हटले जाते.

नंतर इनाम वर्ग 3 यामध्ये देव, देव स्थान असतील धार्मिक देव स्थान असतील याला देवस्थान इनाम असे म्हटले जाते. विश्वस्त संस्था यांच्यासाठी जी व्यवस्था केली जाते यासाठी जमीन दिलेली असते तर त्याला देवस्थान इनाम जमीन किंवा इनाम वर्ग 3 असे म्हटले जाते. नंतर इनाम वर्ग चार यामध्ये कुलकर्णी देशमुख देशपांडे इनाम असे सुद्धा म्हटले जाते.

नंतर इनाम वर्ग पाच यामध्ये गावची जमा मध्ये किंवा परगाना वसूल हिशोब शासकीय कामकाज पाहण्याची जी व्यवस्था कामगिरीचा पहन्याचा जो मोबदला दिला जायचा तर त्याला इनाम वर्ग पाच असे म्हटले जाते. नंतर इनाम वर्ग 6 अ रयतेच्या सेवेचा मोबदला म्हणून दिली इनाम जमीन याला इनाम वर्ग 6 अ असे म्हटले जाते. नंतर इनाम वर्ग 6 ब यामध्ये महार रामोशी इनाम वर्ग असेसुद्धा म्हटले जाते. सरकार उपयोगाची जि सेवा असते तिला मोबदला म्हणून अशा प्रकारची जमीन दिली जाते.

आता जी वतन जमीन आहे ते वतन जमीन काय असते कशी असते ती आपण बघणार आहोत. शासनाची किंवा राज्याची केलेल्या नोकरी / चाकरी केलेल्या त्या बदल्यात मूळ किंमत आहे ती तशीच ठेवून दिलेली जमीन म्हणजे वतन जमीन असे म्हणतात. अशा जमिनीचा उपभोग परंपरेने घ्यावा परंतु तू ही जमीन विकता येणार नव्हती अशी अपेक्षा होती.

वतन कायद्यातील नियमांना अधीन राहून वतन जमिनी वंश-परंपरा उप भोगण्याचा हक्क होता. वतनदार हा सरकारच्या जागी काम करायचा. जमिनीचा संपूर्ण शेत सारा त्याला घेण्याचा अधिकार होता. जमिनीला दुमाला जमीन सुद्धा असे म्हटले जाते. जमीन महसूल अधि नियम कलम 22 दुमाला जमीन म्हणजे ज्या जमिनीचा महसूल वसूल करण्याचा शासनाचा अधिकार.

पूर्णतः किंवा अंशतः दुसऱ्या एखाद्या व्यक्तीला राजा असतील, संस्था असतील वतनदार असतील, किंवा इनामदार असतील यांना मालकी हक्काने हस्तांतरित केला जातो अशा जमिनीला दुमाला इनाम जमिनी असे म्हटले जाते. या दुमाला जमीन ची नोंद तलाठी यांच्याकडे गाव नमुना नंबर 3 मध्ये नमूद केलेल्या असतात. याच्या मध्ये आता जी वतन खालसा केलेले आहेत ती खालसा केलेले वतनात आपण बघू.

30/4/1956 साली मुंबई पर गाना व कुलकर्णी वतन निरास कायदा 1950. 31/3/1959 रोजी मुंबई नोकर इनामे, चाकर इनामे लोक उपयोगी नस्ट कायदा 1953. 31/7/1965 रोजी मुंबई विलीन किरकोळ इनामी नष्ट करण्याचा कायदा आहे 1955. 30/7/1969 रोजी मुम्बई कनिष्ठा गांव नोकर वतने निर्मूलन कायदा 1958. 31/7/1969 रोजी महाराष्ट्र मुल्की पाटिल किवा पद निरस्त कायदा 1962.

इनाम वर्ग सात या विषयी माहिती घेणार आहोत. आपण सार्वजनिक कामासाठी महसूल जो कायदा आहे त्याच्यातील जे तरतुदी आहेत, त्यामध्ये विशेष अट असायचे. सारा माफी ने कब्जा करणे किंमत न घेता दिलेली जमीन उदाहरणार्थ शाळा महाविद्यालय क्रिडांगण दवाखाने प्राथमिक शाळा इत्यादींना काही अटींवर जमीन दिलेली असायची.

अशा प्रकारची जमीन आहे गाव नमुना नंबर दोन आणि तीन मध्ये नोंद केलेली असायची. या जमिनींना वर्ग 7 असे म्हटले जातात. संकीर्ण इनाम म्हणून दिलेल्या जमिनीची तपासणी महसूल अधिकारी यांनी जरूर करावे लागते. शर्त भंग असल्यास तलाठी यांना त्याच्या त्याचा अहवाल आहे, वरिष्ठ अधिकाऱ्यांना दाखवावा लागतो.

आणि त्याची नोंद गाव नमुना नंबर 3 मधील रखना क्रमांक सोहळा मध्ये घ्यावे लागत. संकीर्ण ईनाम म्हणून प्रदान केलेल्या जमिनीच्या वापरा बाबत शर्त भंग झाल्यास अशी जमीन काढुन घेतली जाऊ शकते जप्त केली जाऊ शकते. देवस्थान इनाम वर्ग 3. देवस्थान इनाम फक्त पश्चिम महाराष्ट्रात आहे कुठेही अस्तित्वात नाही.

सरंजाम इनाम नाम नंबर एक फक्त सातारा जिल्ह्यात अस्तित्वात आहे. आणि अशा प्रकारचे महाराष्ट्रात कुठेही अशी जमीन पाहायला मिळणार नाही. देवस्थान इनाम वर्ग 3. काही जमिनी मंदिरांना देवस्थान विश्वस्त संस्था यांना बक्षीस म्हणून दिलेले असतात, यामध्ये दोन प्रकार असतात. सरकारी देवस्थान हे वर्ग 3 चे इनाम म्हणून गाव दप्तरी दाखल असते. गाव नमुना नंबर 3 मध्ये नोंद केलेली असते.

महाराष्ट्र जमीन अधिनियम 1966 चे कलम 75 अन्वय जिल्हा किंवा तालुक्यात असलेल्या गाव नमुना नंबर वरून पडताळणी करता येते आणि आता दुसरं खाजगी देवस्थान. महसूल दप्तराची संबंध नसल्याने याची नोंद गाव नमुना नंबर 3 मध्ये केलेली नसते. देवस्थान इनाम जमिनी तून येणाऱ्या उत्पन्ना तून दिवाबत्ती, पूजा संबंधित मंदिरांना केलेली व्यवस्था असते.

मंदिराचा जो काही खर्च आहे तो खर्च भागवण्या साठी साफ सफाई करण्या साठी सर्व प्रकारचा खर्च जो असतो तो भागवण्या साठी अशा प्रकारच्या जमीन देवस्थान जमिनी म्हणून दिलेले असतात. याचे हस्तां तरण विक्री किंवा वाटप करता येत नाही परंतु अशी जमीन सरकार जमा होऊ शकते. माहिती आवडली तर सर्व शेतकऱयांना माहिती शेअर करा. धन्यवाद !

1 thought on “इनाम आणि वतन जमिनींची सविस्तर माहिती ।। इनाम जमीन वर्ग-१, वर्ग-२, वर्ग-३, वर्ग-४, वर्ग-५, वर्ग-६अ, वर्ग-६ब, वर्ग-७, इनामदार, वतनदार, पाटीलकी, कुलकर्णी वतन, महार वतन ।।

Comments are closed.