बिटकॉइन म्हणजे काय ? ।। क्रिप्टो करंसीबद्दलची महत्वाची माहिती जाणून घ्या या लेखातून !

अर्थकारण

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

नमस्कार मित्रांनो जर तुम्ही अकरा वर्षांपूर्वी म्हणजेच 2010 मध्ये फक्त शंभर रुपये इन्व्हेस्ट केले असते तर त्याचे आज एक ते दोन करोड रुपये बनले असते. विश्वास बसत नाही ना पण असं झालेलं आहे.मित्रांनो मी बोलत आहे बिट कॉइन बद्दल .जी एक खूपच विवादित किंवा नेहमीच चर्चेत असलेली क्रिप्टो करेंसी आहे.

मित्रांनो आज आपण या बिटकॉइन बद्दल सर्व काही जाणून घेणार आहोत. मित्रांनो तुम्ही हे ऐकून आश्चर्य चकित व्हाल साल 2010 मध्ये एका बिटकॉइन ची किंमत पाच ते सहा रुपये होते आणि आज जानेवारी 2019 मध्ये एका बिटकॉइन ची किंमत तब्बल 25 ते 26 लाख रुपये किती आहे. पण मित्रांनो बिटकॉइन नेमका आहे तरी काय?

बिटकॉइन एक क्रिप्टो करन्सी आहे म्हणजेच आभासी चलन. बिटकॉइन ला डिजिटल करन्सी किंवा व्हर्च्युअल करन्सी सुद्धा म्हटले जाते बिटकॉइन ला आपण टच करू शकत नाही किंवा फिजिकली स्टोअर करू शकत नाही. ती फक्त इलेक्ट्रॉनिकली ऑनलाईन स्टोअर होऊ शकते. मित्रांनो आश्चर्याची गोष्ट म्हणजे बिटकॉइनचा आविष्कार कोणी केला आहे अजूनही कोणाला माहित नाही.

परंतु 2008 साली इंटरनेटवर bitcoin.org  हे डोमेन रजिस्टर  झाले होते आणि बीट कॉईनबद्दल एक डॉक्युमेंट सुद्धा  पब्लिश करण्यात आले होते. जेव्हा सातोषी नाकामोटो यांच्या नावाने. यामध्ये त्यांनी लिहिले होते की बिटकॉइन हे एक इलेक्ट्रॉनिक कॅश आहे  हे सर्व आर्थिक व्यवहारासाठी वापरू शकता आणि तेही कोणत्याही सेंट्रल अथॉरिटी च्या  मदतीशिवाय यामुळे बीटकॉइनच्या आविष्काराचे श्रेय सातोषी नाकामोटो यांच्या नावे मांडण्यात आले आहेत.

परंतु अजूनही सातोषी नाकामोटो यांची ओळख कोणालाच माहिती नाही. मित्रांनो बिटकॉइन एक Decentralization करन्सी आहे  म्हणजेच या करन्सी वर कोणाचे कंट्रोल नाही . उदाहरणार्थ जसे आपल्या आर्थिक व्यवहारावर बँकेचा कंट्रोल असतो आणि  बँकेवरील रिझर्व्ह बॅंक ऑफ इंडियाचा कंट्रोल असतो. परंतु बिटकॉइन वर कोणत्याही अथोरिटी चा कंट्रोल नाही.

बिटकॉइन पियर टू  पियर (Peer to peer)चालणारी करन्सी आहे. म्हणजेच या व्यवहारात सेंडर आणि रिसिवरच असतो आणि सेंडर आणि रिसिवर करे कडे स्वतःचा  युनिक आय पी ऍड्रेस  IP address असतो. त्याद्वारेच त्यांचा व्यवहार केला जातो. बिटकॉइन ॲक्सेस करण्यासाठी स्वतःची युनिक प्रायव्हेट की सुद्धा असते मित्रांनो बिटकॉइन चे व्यवहार व्हेरिफाय करण्याचे काम मायनरस करतो.

यासाठी मायनर हाय पावर चेकम्प्युटर वापरून मॅथेमॅटिकल अल्गोरिदम सोडतात हे सर्व ऑटोमॅटिक प्रोग्रामद्वारे काही सेकंदात केले जाते जेव्हा हि मायनिंग प्रक्रिया यशस्वी होते तेव्हा मायनरस रिवर म्हणून बीट कॉइन दिला जातो. मित्रांनो बिटकॉइन ची सर्व रेकॉर्ड ऑनलाइन ब्लॉक मध्ये साठवले जातात.

एकदा का हा ब्लॉक फुल झाला नवीन ब्लॉक जोडून रेकॉर्ड साठवले जातात या प्रोसेस ला ब्लॉक चॅन सिस्टीम सुद्धा म्हटले जाते मित्रांनो जगात हजारपेक्षा वेगवेगळ्या प्रकारच्या करन्सी आहेत जसे की Litecoin, Dogecoin, Ethereum, Ripple आणि फेसबुक सुद्धा ह्यावर्षी लिब्रा Libra ही करन्सी लॉन्च करणार आहे. मित्रांनो बऱ्याच देशांनी क्रिप्टो करन्सी ला रोजच्या व्यवहारात वापरण्यासाठी मान्यता दिली आहे यामध्ये अमेरिका, जपान ,जर्मनी, फ्रान्स, हे मोठ्या देश सुद्धा आहेत भारताने सुद्धा मागच्या वर्षी 2020 मध्ये क्रिप्टो  करन्सी  व्यवहाराला मान्यता दिली आहे.

जगातील पहिले बिटकॉइन वापरून  केलेले ट्रांजेक्शन laszlo Hanyecz यांच्या नावे आहे यांनी दहा हजार बिटकॉइन देऊन पिझ्झा घेतला होता. बिटकॉइन ची वाढती किंमत ओळखून गुंतवणूकदार शेअर मार्केट स्टॉकप्रमाणे बिटकॉइन विकत घेतात आणि ओल्ड करतात आणि योग्य किंमत आली की विकून टाकतात.

मित्रांनो जर आपल्या बँकेचा यूपीआय पीन व पासवर्ड हरवला असेल तर तो आपण बँकेत जाऊन रिकव्हर करतो परंतु बीटकॉइनच्या बाबतीत असे करता येत नाही कारण बिटकॉइन वरती कोणाचाही कंट्रोल नसल्यामुळे जर एकदा का प्रायव्हेट की हरवली तर आपण परत रिकव्हर करू शकत नाही  आणि आपण आपलेच बिटकॉइन ॲक्सेस करू शकत नाही.

याचे उदाहरण म्हणजे जर्मन प्रोग्रामर स्टीफन थॉमस यांच्याकडे सात हजार पेक्षा जास्त बिटकॉइन होते परंतू यांनी प्रायव्हेट की हरवल्यामुळे हे कधीच स्वतःच्या बिटकॉइन ऍक्सेस करू शकले नाहीत. मित्रांनो आज यांच्या बिटकॉइन ची किंमत 18 अबजो इतकी झाली असती. मित्रांनो बिटकॉइन वर कोणाचेच कंट्रोल नसल्यामुळे  बिटकॉइन ला  ट्रॅक करणे खूपच अवघड आहे  आणि यामुळेच डार्क वेब वरती इलिगल व्यवहारासाठी वापरले जात आहे आणि आत्तापर्यंत 25% बिटकॉइन इंटरनेटवर हरवले आहे. मित्रांनो म्हणूनच बिटकॉइन चा  व्यवहार करताना आधीच सर्व माहिती मिळवा असे तज्ञांकडून सांगितले जाते.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा