हँगिंग गार्डन – नितांतसुंदर बागांची उतरंड

प्रवास

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

आपल्यापैकी अनेकांना घराच्या बाल्कनीत एक ‘हिरवा कोपरा’ असावा असं मनोमन वाटतं. झाडांना ऊन मिळावं म्हणून आपलं घर पूर्व पश्चिम असावं, असा आग्रह असतो. झाडांची निगा राखणं हे महत्वाचं काम अनेक जण आवडीने करतात. खरं सांगायचं तर निसर्गाच्या सान्निध्यात राहून जीवन व्यतीत करावं असं आपल्याला वाटतं, पण नोकरी किंवा व्यवसाय शहरात असल्याने ते सहज शक्य होत नाही.

बॅबिलाॅनचे हँगिंग गार्डन किंवा ‘उतरती बाग’ प्राचीन जगातील सात आश्चर्यांपैकी एक होती आणि इंजिनिअरिंग मधील उल्लेखनीय रचना म्हणून आजही प्रसिद्ध आहे. हँगिंग गार्डनची रचना विटांनी बनविलेल्या उतरत्या पायऱ्यांच्या रचनेमध्ये केलेली होती, ज्यात विविध प्रकारची झाडे, झुडुपे आणि वेलींचा समावेश असलेल्या बागा आहेत, ज्या दुरुन हिरव्या डोंगरासारख्या दिसतात. इराकमधील बबिल प्रांतातील सध्याच्या हिलाह जवळील बॅबिलाॅनच्या प्राचीन शहरात हँगिंग गार्डन बांधल्या गेल्या असे म्हटले जाते.

Hanging garden of Babylon | Gardens of babylon, Fantasy city, Wonders of  the world

काही विद्वानांचा असा दावा आहे की ह्या बागा बॅबिलोनमध्ये नसून प्रत्यक्षात अ‍ॅसिरियन साम्राज्याची राजधानी निनेवे येथे होत्या, तर काही विद्वान पुरातत्वशास्त्राच्या सकारात्मक पुरावा देण्याची प्रतीक्षा करतात. बऱ्याच लोकांचा असा विश्वास आहे की ह्या बागा ही कुणाच्या तरी कल्पनेचा आविष्कार आहे.

खरं सांगायचं तर बॅबिलाॅनच्या हँगिंग गार्डनबद्दल कोणताही कागदोपत्री पुरावा नसल्यामुळे उपलब्ध माहिती किंवा अंदाजानुसार त्यांचे स्थान आणि वर्णन करण्यात येते. हँगिंग गार्डन्सचा उल्लेख करणारे कोणतेही बॅबिलोनियन ग्रंथ नाहीत आणि त्यांच्या स्थानाबद्दल बॅबिलाॅनमध्ये कोणतेही निश्चित पुरातत्व पुरावे सापडलेले नाहीत. समकालीन बॅबिलोनियन कागदपत्रांच्या अभावामुळे हँगिंग गार्डन्स हे खरोखरीचे बांधकाम होते की ती फक्त काव्यात्मक निर्मिती होती हे अस्पष्ट आहे.

travel: About the Hanging Gardens of Babylon

एका आख्यायिकेनुसार, हँगिंग गार्डन हे निओ-बॅबिलोनियन राजा नेबुचदनेझर दुसरा ह्याने त्याची पत्नी राणी एमिटिससाठी, द मार्वल ऑफ मॅनकाइंड म्हणून ओळखल्या जाणार्‍या भव्य राजवाड्याच्या बाजूला बांधले होते, कारण तिला तिच्या हिरवाईने नटलेल्या आपल्या माहेरची आठवण येत होती. हँगिंग गार्डन्सच्या बांधकामाचे श्रेय राणी सेमिरामिस हिला देखील दिले गेले आहे, आणि त्यांना पर्यायी नांव म्हणून सेमिरामिसचे हँगिंग गार्डन म्हटले गेले आहे. नंतर अशा अनेक बागा निर्माण करण्यात आल्या.

अशुर्नसिरपाल नांवाच्या राजाची बाग केवळ तिच्या सुंदरतेसाठीच प्रसिद्ध नव्हती – ती बाग उन्हाळ्याच्या उष्ण वातावरणात वर्षभर हिरवेगार ओॲसिस तर होतीच, पण बागेला सतत टवटवीत ठेवणाऱ्या जल अभियांत्रिकीच्या अद्भुत तंत्रज्ञानासाठी देखील प्रसिद्ध होती. अशा बागेसाठी प्रचंड प्रमाणात पाणी उपलब्ध असणे आवश्यक होते. अश्शूरचा राजा अशुर्नसिरपाल दुसरा, याने डोंगर फोडून कालवे तयार केले.

The Hanging Gardens of Babylon

हे कालवे पर्वतांमध्ये ५० किलोमीटर अंतरापर्यंत पसरलेले आहेत. अशुर्नसिरपाल राजाला त्याने वापरलेल्या तंत्रज्ञानाचा अभिमान होता आणि त्याने त्याच्या शिलालेखांवर त्या तंत्रज्ञानाचे तपशीलवार वर्णन केले आहे. जेरवान येथे वीस लाखांपेक्षा जास्त दगडांचा वापर करुन दरी ओलांडणारी एक प्रचंड जलवाहिनी बांधण्यात आली होती. त्यात दगडी कमानी आणि जलरोधक दगडांचा वापर करण्यात आला.

अशुर्नसिरपाल राजाने फळझाडांच्या बागा लावल्या. तसेच बदामाची झाडे, खजुराची झाडे, अननस, रोझवूड, ऑलिव्ह, ओक, चिंच, अक्रोड, डाळिंब, अंजीर आणि द्राक्षे. दोन्हीही सार्वजनिक प्रदर्शनाकरीता नसली, तरी ब्रिटिश म्युझियमकडे अशा बागेचे चित्र असलेला एक भिंती फलक आणि एक रेखाचित्र आहे. या समकालीन प्रतिमांवर बागांची नमूद केलेली अनेक वैशिष्ट्ये स्पष्ट दिसतात.

हँगिंग गार्डन्स ह्या प्राचीन संस्कृतीचा एक अविभाज्य भाग होत्या आणि आधुनिक युगातील काही बागांची रचना त्याचं धर्तीवर करण्यात आली आहे. अशा बागांना ‘व्हर्टिकल गार्डन’ असं म्हणतात.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा