नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.
व्हर्च्युअल रिअल इस्टेट, ज्याला मेटाव्हर्स म्हणतात, त्यामध्ये लाखो डाॅलर्सची गुंतवणूक केली जात आहे. अर्थात अशा आभासी जमिनीमध्ये गुंतवणूक करण्यात अमेरिकन लोक आघाडीवर आहेत.
रियल इस्टेट क्षेत्राबद्दल आपल्या सर्वांना माहीत आहे, परंतु व्हर्च्युअल म्हणजे आभासी रिअल इस्टेट ही संकल्पना आपल्यासाठी नवीन आहे.
वर्च्युअल रिअल इस्टेट किंवा आभासी जमीन म्हणजे नक्की आहे तरी काय?
अधिक अचूकपणे सांगायचं झालं, तर व्हर्च्युअल रिअल इस्टेट म्हणजे आभासी जमीन किंवा इमारती, ज्यांची ऑनलाइन डिजिटल गेममध्ये खरेदी किंवा विक्री केली जाऊ शकते, आणि ज्या जमीन किंवा इमारतीला निर्दिष्ट स्थान, वेब मधील पत्ता, ॲप-मधील पत्ता किंवा आयडी, किंवा भौगोलिक संदर्भ असतो.
आभासी जगात मालमत्ता खरेदी करण्यासाठी, तुम्हांला डीसेंन्ट्रललॅंड, दी सॅंडबाॅक्स, ॲक्सी इन्फिनिटी अशा काही मेटाव्हर्स प्लॅटफॉर्म वर साइन अप करणे आवश्यक आहे. तुम्हांला मेटाव्हर्समध्ये व्यवहार करण्यासाठी फक्त एक डिजिटल वॉलेट आवश्यक आहे. तुम्ही तुमचे डॉलर्स, क्रिप्टोकरन्सी, तुम्ही ज्या मेटाव्हर्सचा व्यवहार करत आहात त्या तुमच्या डिजिटल वॉलेटमध्ये साठवू शकता.
रिअल इस्टेटचे भाव गगनाला भिडत आहेत हे काही गुपित उरलेले नाही. रिअल इस्टेटच्या मार्केटने जेवढ्या प्रमाणात उसळी मारायला हवी होती, तितक्या प्रमाणात त्याला खरेदीदारांचे प्रोत्साहन मिळत नसल्यामुळे असेल, किंवा कोविडमुळे पैशाची आवक कमी झाल्याचा परिणाम असेल, पण आभासी जमिनीतील गुंतवणूकदार वाढत आहेत हेदेखील गुपित उरलेले नाही. खरंच, काही गुंतवणूकदार जमिनीच्या भूखंडांसाठी लाखो रुपयांची गुंतवणूक करत आहेत — न्यूयॉर्क किंवा बेव्हरली हिल्समध्ये नाही, तर काॅम्प्युटर ग्राफिक्सने बनविलेल्या भूखंडांमध्ये. खरं तर, असे भूखंड भौतिकदृष्ट्या पृथ्वीवर अस्तित्वातच नाहीत.
योगायोग म्हणा किंवा आणखी काही, पण जेव्हांपासून फेसबुकने आपल्या कंपनीचं नांव बदलून ‘मेटा’ केलं, आणि व्हर्च्युअल रिॲलिटीमध्ये मोठी गुंतवणूक करण्याची घोषणा केली, तेव्हांपासून अचानकपणे आभासी रिअल इस्टेटच्या किमतींमध्ये ५००% इतकी प्रचंड वाढ झाली आहे.
भविष्यात हे क्षेत्र १ ट्रिलियन डाॅलर इतका व्यवसाय करेल असा अंदाज आहे. ह्या जगात केवळ घरं आणि जमीन उपलब्ध नाही, तर विविध प्रकारची मनोरंजनाची साधने देखील उपलब्ध आहेत. तुम्ही सिनेमाला जाऊ शकता, संगीत मैफिलीचा आनंद घेऊ शकता, समुद्र किनाऱ्यावर जाऊ शकता, किंवा शाॅपिंग करू शकता; अर्थात सगळं आभासी पद्धतीने.
या आभासी जगात, वास्तविक लोक कार्टून सारखी पात्रे बनून संवाद साधतात ज्यांना रिअल-टाइम मल्टीप्लेअर व्हिडिओ गेम प्रमाणेच ‘अवतार’ म्हणतात. जस्टिन बीबर, एरियाना ग्रांडे आणि डीजे मार्शमेलो यांसारखे सुप्रसिद्ध गायक मेटाव्हर्समध्ये तुम्हांला सापडतील; अर्थात त्यांचे स्वतःचे अवतार म्हणून.
अगदी पॅरिस हिल्टन हिने तिच्या स्वत:च्या आभासी बेटावर नवीन वर्षाची संध्याकाळची पार्टी आयोजित केली होती. आज, लोक संगणकाच्या स्क्रीनद्वारे या जगामध्ये प्रवेश करू शकतात.
परंतु मेटा आणि इतर कंपन्यांकडे ३६० डिग्री इमर्सिव्ह जग तयार करण्याचा दीर्घकालीन दृष्टीकोन आहे, ज्यामध्ये लोक आभासी वास्तविक जगात गॉगलद्वारे प्रवेश करतील.
डिजिटल जग काहींसाठी वास्तविक जगाइतकेच महत्त्वाचे आहे. मेटाव्हर्स तुम्ही आणि मी कशावर विश्वास ठेवतो याबद्दल नाही, तर भविष्यात काय घडू शकते याबद्दल आहे.
वास्तविक जगातील प्रत्यक्ष अस्तित्वात असलेल्या मालमत्तेप्रमाणेच, मेटाव्हर्स तीन गोष्टींबद्दल आहे: लोकेशन, लोकेशन आणि लोकेशन. ज्या लोकेशन मध्ये अनेक लोक आहेत, काही ना काही कार्यक्रम सुरू आहे, असे लोकेशन लोकप्रिय आहेत. तुमचा शेजारी कोण आहे हे सगळ्यात जास्त महत्त्वाचे आहे.
परंतु आभासी रियल इस्टेटचे समर्थक देखील गुंतवणूकदारांना इशारा देत आहेत की हा धोकादायक व्यवसाय आहे.
कारण शेवटी काहीही झालं तरी तुमच्या मालकीची जमीन आभासी आहे, प्रत्यक्षात ती अस्तित्वात नाही आणि दिसत देखील नाही. त्यामुळे तुम्ही नक्की कसले किंवा कोणत्या जमिनीचे मालक आहात ते प्रत्यक्षात बघायला उपलब्ध नाही.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा