सात बारा उताऱ्याचा जन्माची गोष्ट ।। ७/१२ उतारा अस्तित्वात कसा आला ? ।। जाणून घ्या महत्वाची माहिती या लेखातून !

शेती

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

खरंतर सातबारा उतारा हे दोन शब्द नाहीत तर महाराष्ट्रातल्या तमाम शेतकरी बांधवांसाठी जीव की प्राण आहे. वंशपरंपरेने आलेली एक एकर जमीन असो किंवा स्वतः कष्ट करून पाच एकर ते दहा एकर किंवा दहाची 20 एकर केलेली असो तर या जमिनीची नोंद ही या सातबारा उताऱ्यावर केलेली असते.

सातबारा उतारा म्हणजे थोडक्यात सांगायचं म्हटलं तर, आपल्या जमिनीवर आपला हक्क सांगणारा सरकारी कागद. अनेक जणांना सातबारा उतारा म्हणजे काय? त्याची आख्यायिका काय? त्याकाळी अख्यायिकेच्या पाठीमागे नेमकं वास्तव काय? आणि सातबारा उता-या चा जन्म नेमका कसा झाला? या सर्वांची माहिती इथे मिळेल.

सातबारा उताराच्या जन्मासंबंधी अनेक आख्यायिका प्रसिद्ध आहेत :

त्यातील एक आख्यायिका म्हणजे “अहिल्याबाई होळकर ” यांच्याशी संबंधित आहे. असं सांगितलं  जात की अहिल्याबाईंनी सरकारी खर्चातून गरीब माणसाच्या दारात बारा फळझाडे लावली होती. त्यातून सात झाडे ही त्या माणसाच्या मालकीची आणि उरलेली सरकारच्या मालकीची. मग आता जेव्हा त्या फळझाडांना फळे येतील तीमती फळ्यावर गरीब माणसांना मिळेल

आणि उरलेल्या पाच झाडांची फळ ही सरकारला मिळतील आणि ती फळं सरकार गरीबांमध्ये वाटू शकेल. मग या फळझाडांच्या नोंदणीसाठी स्वतंत्र नोंद निर्माण करण्यात आली. आणि पुढे जाऊन या फळांच्या नोंदणीसाठी चा उतारा उतारा आहे त्याला सातबारा उतारा म्हणण्याचा प्रघात पडला. जो आजपर्यंत चालू आहे.

आता सातबारा उतारा च्या जन्माची दुसरी आख्यायिका आहे ती म्हणजे एक कायदा आहे कलम 7 आणि कलम 12 यामध्ये जमिनीच्या मालकी हक्कासंदर्भात उल्लेख केला आहे. त्यामुळे म्हणून मग या कलम सात आणि कलम बाराव्या कलमामुळे जमीन मालकी च्या कागदाला सातबारा असे म्हणतात अस या अख्यायिकेमध्ये नमूद केलेल आहे.

यासंबंधी महसूल अधिकाऱ्यांकडून अजून माहिती मिळते ती म्हणजे, त्यांचं असं म्हणणं आहे की सातबारा उतारा गाव नमुना सात आणि गाव नमुना बारा एकाच पत्रकात असल्यामुळे त्याला सातबारा उतारा म्हटलं जातं. यापलिकडे दुसरं काहीही नाहीये असं परभणीचे उपजिल्हाधिकारी डॉक्टर संजय कुंडेटकर यांनी सांगितला आहे .

तर अहमदनगर जिल्ह्यातल्या राहता तालुक्यामधील महसूल अधिकारी सांगतात की, महाराष्ट्र जमीन महसूल अधिनियम 1966 च्या खंड 4 नुसार तलाठी दप्तरात गाव नमुना 1 ते गाव नमुना 21 हे नमुने तयार झाले आहेत. त्यामध्ये सात आणि 12 नंबरचा नमुना हा जमिनीशी संबंधित असल्यामुळे तो एकत्रित केल्यामुळे त्याला सातबारा म्हणतात. बाकी त्याच्या नावाची 7 कलम आणि बारा कलम असा काही संबंध नाही.

सातबारा उताराचा प्रवास 1910 साली  बंदोबस्त योजना आली या योजनेअंतर्गत जमिनीची मोजणी करून अधिकार बिल तयार करण्यात आले. आता जमिनीची मोजणी करताना प्रत्येक शेतकऱ्याला एक नंबर दिला गेला त्याला सर्वे नंबर म्हणतात आणि या योजनेनंतर जमिनीची जे काही अधिकार बिल तयार झाले त्याला कडे पत्रक असे संबोधलं गेलं.

सातबारा उतारा येण्यापूर्वी याकडे पत्रकात जमिनीच्या अधिकाराचा उल्लेख केला जात होता म्हणजे जमिनीची माहिती दिली जात होती. 1930 साली इंग्रजांनी जमा बंदी केली म्हणजेच महसूल बसवण्यात आला व आकारणी करण्यात आली यातूनच एक नवीन खाते पुस्तिका तयार झाली. आणि मग या खाते पुस्तक की मधूनच 1930 साली पहिल्यांदा सातबारा उतारा चा नवीन नमुना जन्मास आला.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा