बांगड्या विकण्याचा व्यवसाय करुन मुलाला बनवलं क्लास वन अधिकारी………..वाचा

लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

असे म्हणतात ना तुमचा निश्चय पक्का असेल तर परिस्थितीशी झगडून त्यावर मात करण्यासाठी येणारे कितीही अडचणी या शुल्लक वाटू लागतात, कारण आपल्या विचारात आणि प्रयत्नात परिस्थितीशी पूर्णपणे बदलण्याचे सामर्थ्य आहे. सोशल मीडियावर गेल्या काही दिवसांपासून आयएएस रमेश घोलप यांची कथा व्हायरल होत आहे. झारखंडच्या सराईकेला खरवसांचे उपयुक्त रमेश घोलप आहेत.

आयएएस पर्यंतचा त्यांचा प्रवास हा अक्षरशः फार खडतर आणि प्रेरणादायी आहे. 2012 च्या बॅचचे रमेश घोलप आयएएस अधिकारी असून ते सराईकेला जिल्ह्याचे उपयुक्त आहेत. ते या आधी खुंटीमध्ये एसडीएम म्हणून कार्यरत होते.रमेश यांनी आपल्या कार्यकुशलतेने प्रत्येक ठिकाणी आपले छाप सोडले आहेत.केवळ मनमिळावू अधिकारी नसून लोकांचे दुःख जाणून घेऊन त्या दूर करण्यासाठी रमेश प्रयत्न देखील करतात,असे लोक म्हणत असल्यामुळे लोकांमध्ये पेन्शन मिळवून देणारे प्रसिध्द अधिकारी आहेत. रमेश घोलप यांचा जन्म सोलापूर जिल्ह्यातील महागाव येथे झाला.

रमेश घोलप (Ramesh Gholap IAS Success Story)

अतिशय दारिद्र्यात रमेश यांचे आयुष्य गेले. त्यांचे वडील गोरभ घोलप यांचे सायकलचे दुकान होते.दारूचे प्रचंड व्यसन असलेल्या त्यांच्या वडिलांची संपूर्ण कमाई दारू पिण्यातच वाया जात होती. वडिलांच्या अशा वागण्याने चार जणांच्या कुटुंबाचा सांभाळ करण्याची जबाबदारी त्यांच्या आई विमल घोलप यांच्यावर पडली. व्यसनग्रस्त वडिलांच्या गरीबी आणि योग्य उपचार करण्याचे क्षमते अभावी काही दिवसांनी त्यांचे निधन झाले.आईने वडिलांच्या पश्चात काबाडकष्ट करून दोन मुलांचे पालनपोषण आणि शिक्षण केले.

शारीरिक व्याधी असतानादेखील परिस्तिथीशी जाण असलेले रमेश आईला कामात मदत करायचे शेतात काम करणारी त्यांची आई बांगड्या विकण्याचा व्यवसाय देखील करत असे.वडिलांच्या मृत्यूनंतर शिक्षणाचे महत्त्व समजावून घेत 2005 मध्ये आईने रमेशला बारावीच्या परीक्षेला पाठवले.

तिने रमेशच्या बालमनावर परिस्थिती बदलायची असेल तर शिक्षणाला पर्याय नसल्याचे बिंबविले.याला शिक्षकांनी देखील समजावून सांगितले रमेशने खूप अभ्यास करून बारावीच्या परीक्षेत 88.5% गुण मिळवून यश संपादन केले. नंतर 2009 मध्ये शिक्षण पूर्ण करून कुटुंबाची जबाबदारी पार पाडण्यासाठी त्यांनी शिक्षकाची नोकरी पत्करली ,पण त्यांचे ध्येय निराळेच होते.

Ramesh Gholap,IAS officer: మాది నిరుపేద కుటుంబం.. పొట్ట కూటి కోసం  గ్రామాల్లో గాజులు అమ్మి.. | Sakshi Education

2010 मध्ये नोकरीतून सहा महिन्याची सुट्टी घेऊन प्रशासकीय अधिकारी होण्याचे ध्येय बाळगणाऱ्या रमेश यांनी युपीएससीची परीक्षा दिली. पण अपयशाचा सामना त्यांना करावा लागला. त्यांना गावातील काही लोकांकडून पैसा जमा करून आईने पुन्हा अभ्यासासाठी प्रोत्साहित केले.त्यानंतर पुण्यात राहून त्यांनी खूप अभ्यास केला. त्यांनी 2012 मध्ये युपीएससी परीक्षेत यश मिळवून 287 स्थान प्राप्त केले. रमेश घोलप यांनी आपल्या आई सोबत बांगड्या विकून हा प्रेरणादायी प्रवास गाठला.

Leave a Reply

Your email address will not be published.