रतन टाटा यांच्या सोबत नेहमी दिसणारा हा मुलगा आहे तरी कोण? ।। अशी कोणती गोष्ट घडली कि या तरुणाला रतन टाटा यांनी त्यांच्या सर्वात जवळची व्यक्ती बनवलं ? ।। जाणून घ्या महत्वाची माहिती जाणून घ्या या लेखातून !

लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

मोठ्या लोकांचे सोहळे आणि वाढदिवस हे नेहमी चर्चेचे विषय असतात. कोणत्या हिरोने किती किलोचा केक कापला, कोण कोण हजर होत, कुठे सोहळा पार पडला असे हजार प्रश्न सगळ्यांच्या मनात येत असतात. पण काही मोठी माणस साध्याच्या गोष्टीमध्ये जास्त रमतात आणि म्हणूनच ते जास्त मोठी माणसं असतात.

त्यापैकीच एक म्हणजे ज्येष्ठ उद्योजक रतन टाटा.नुकताच त्याचा 84 वा वाढदिवस पार पडला आणि छोटासा कप केक कापून एका तरुणासोबत सेलिब्रेशन करतानाचा व्हिडीओ आता सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.अनेक लोकांना हा प्रश्न पडला आहे की हा तरुण मुलगा नेमका कोण आहे आणि त्याच रतन टाटा यांच्याशी नात काय आहे? टाटांसोबत वाढदिवस साजरा करणाऱ्या,थेट टाटांचा खांद्यावर हात ठेवणाऱ्या या कार्यकर्त्याच नाव आहे शंतनू आणि हा आहे पुण्याचा.

या शंतनुच्या चार पिढ्या रतनजी टाटा यांच्या कंपनीत काम करायच्या पण त्यांच्या आजोबांना, वडिलांना किंवा त्यांच्या नातेवाईकांना टाटा यांना पाहण्याचही भाग्य लाभल नाही. शंतनु ही टाटा कंपनी मध्येच काम करायचा. रोज पुण्यातील ट्रॅफिक संपवून घरी यायचा. 2014 साली तो टाटा कंपनी ऑटोमोबाईल डिझाईन इंजिनिअर म्हणून जॉबला लागला होता.

यादरम्यान तो विमान नगर हायवे वरून घरी यायचा आणि अनेकदा ऑफिस वरून घरी यायला त्याला रात्रीचे बारा वाजायचे. त्याला रात्रीचे रस्त्यावर मरून पडलेले कुत्रे दिसायचे. रोज कुठल्या गाडीने कुठल्यातरी कुत्र्याला उडवलेला असायच. इतकच नाही तर अनेकदा कुत्र्यांना चुकवण्याच्या नादात एक्सीडेंटसुद्धा झालेले असायचे यावर काहीतरी जालीम उपाय शोधण्याचा निर्धार शंतनूने केला.

ज्या लोकांच्या गाडी खाली कुत्री आली होती किंवा ज्यांचा एक्सीडेंट कुत्र्यांंमुळे झाला होता अशा लोकांना त्याने भेटायला सुरवात केली. तो त्यांच्या मुलाखती साठवून ठेवू लागला. तेव्हा त्याच्या लक्षात आलं की माणस काही हौस म्हणुन कुत्र्यांच्या अंगावर गाड्या घालत नाहीत.समोर कुत्रा चालला आहे हे लक्षात न आल्याने आणि कुत्र अचानक वाटेत आल्याने एक्सीडेंट होत आहेत.

मात्र त्याने यावर काय उपाय करता येईल यावर विचार करू लागला.तेव्हा त्याला रेडियमची कॉलर बनवता येईल असा विचार आला.त्याने आपल्या मित्रांना एकत्र केलं आणि मोटो पोज नावाने कॉलर तयार करून भटक्या कुत्र्यांना लावण्यास सुरुवात केली. त्याने त्याच्या कामाबद्दल रतन टाटा यांना पत्र लिहून कळवाव अस त्याच्या वडिलांना वाटलं, मग शंतनुने सुद्धा लगेच पत्र लिहिलं.

आपण करत असणारं काम क्रिया त्याने पत्रात लिहून त्यांना कळवली.तेव्हा त्याचं वय होत 23 वर्ष.  रतन टाटांच उत्तर येणं अपेक्षित होतं पण तसं झालं नाही.मग त्यांनी उत्तराची वाट बघत न बसता डायरेक्ट कामाला सुरुवात केली.जॉब मधून वेळ काढून तो कॉलरच काम पुढे नेऊ लागला.अशातच त्याला एक दिवस रतन टाटांचा कॉल आला, टाटांनी त्याला मुंबईला भेटायला बोलावलं पहिल्या भेटीतच टाटांना त्याची आयडिया खूप आवडली.

आणि तुमच्या स्टार्ट अप मध्ये मी काही मदत करू शकतो का असं त्याला विचारलं. तेव्हा शंतनु टाटांना म्हणाला की,आम्ही विद्यार्थीच आहोत एका एनजीओ प्रमाणे सर्व गोष्टी करतो.तेव्हा रतन टाटांनी त्यांच्या स्टार्ट अप साठी काही ठराविक रक्कम दिली. रतन टाटांनी मोटो कंपनीला पैसे लावल्या कारणाने ही कंपनी वेगवेगळ्या 11 देशांमध्ये काम करू लागली.

कुत्र्यांसोबत गाई म्हशी यांना रेडियमची कॉलर लावायच काम मोठ्या प्रमाणावर सुरू झालं.इथेच टाटा आणि शंतनुमधील बोलणं थांबलं नाही.रतन टाटा शंतनुला फोन करत असत त्याच्याकडून माहिती घेत असत.फोनवर वारंवार बोलणं होऊन एमबीए करायचं आहे अस सांगितल. शंतनु कॉर्निवलमध्ये एमबीए करण्यासाठी गेला आणि तिथून एमबीए झाल्यावर टाटा ट्रस्ट मध्येच काम करण्याचा त्याचा ध्यास होता.

त्यासाठीच स्टार्ट अप आणि गुंतवणुक या बद्दलची सामाजिक काम याची माहिती घेत होता.2018 साली शंतनु एमबीए करून परतला. तेव्हा त्याला टाटा पेट प्रोजेक्ट नावाने जनावरं संबंधित काम करणार असल्याची माहिती मिळाली. त्यांनी ठरवलेल की टाटा पेट प्रोजेक्टमध्ये इंटरंशिप करायची पण झालं वेगळंच.

तो परतल्यानंतर त्याला रतन टाटांच्या ऑफीस मधून फोन आला आणि त्याला थेट रतन टाटांच ऑफिस जॉईन करण्यास सांगण्यात आलं.रतन टाटांना स्टार्ट अपमध्ये मदत करण्यासाठी एक्झिक्युटिव्ह डायरेक्टर म्हणून पाहिजे होते या क्षेत्रातला अनुभव असणाऱ्या व्यक्तीला रतन टाटांनी प्राधान्य द्यायला हवं होत पण सारासार विचार करून रतन टाटांनी या पदावर 28 वर्षांच्या शंतनुला संधी दिली. आणि शंतनुने कधी मागे वळून पहिले नाही. रतन टाटांनी स्टार्ट अप मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तो मदत करतो आणि टाटा आपले दोस्त असल्याचे अभिमानाने सांगतो.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा