टेलीस्कोप (दुर्बीण)ने आणले दुरस्थ ग्रह तारे तुमच्या नजरेच्या टप्प्यात ।। दुर्बिणीबद्दलची महत्वाची माहिती जाणून घ्या या लेखातून !

लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

रात्रीच्या निरभ्र आकाशात लुकलुकणारे तारे पहाण्याचा छंद लहानपणी आपल्या सर्वांना होता. काही जण हा छंद आजही जोपासत असतील. अगदी लहान असताना आपल्याला सूर्य आणि चंद्र, ह्या दोघांबद्दल ठळकपणे माहित होतं, पण आपल्या सूर्यमालेत आणखी असे काही ग्रह तारे आहेत, ह्याबद्दल तितकीशी माहिती नव्हती. आणि शालेय पुस्तकांत जी काही जुजबी माहिती होती, त्यापेक्षा अधिक माहिती मिळविण्याची तशी गरजही वाटली नाही.

सूर्याच्या पाठीमागील बाजूस चंद्र असतो, असा आपला समज होता हे आठवून आपल्याला आजही हसू येतं. हे सगळे ग्रह तारे ज्यामुळे आपल्या अगदी जवळ येऊ शकले ते उपकरण म्हणजे टेलिस्कोप.

बहुतेक सगळ्या टेलिस्कोपमध्ये वक्र आरसे बसविलेले असतात, जे आकाशातील उपलब्ध प्रकाशाच्या आधारे कार्य करतात. आरसे किंवा लेन्स जितके मोठे असतील तितका जास्त प्रकाश टेलिस्कोप जमा करू शकतो. नंतर आरशांच्या आकारामुळे प्रकाश केंद्रित होतो, आणि टेलिस्कोपमध्ये डोकावल्यावर तोच प्रकाश आपल्याला दिसतो.

१७ व्या शतकात पहिल्यांदा पेटंट मिळाल्यापासून टेलिस्कोपमध्ये प्रचंड सुधारणा झाल्या आहेत. हॅन्स लिपरशे, गॅलिलिओ गॅलीली, सर आयझॅक न्यूटन, एडविन हबल आणि इतर अनेक संशोधकांनी या प्रगत, वैज्ञानिक उपकरणाच्या विकासासाठी योगदान दिले.

टेलिस्कोपचा शोध कोणी लावला हे सांगणं कठीण आहे, परंतु डच चष्मा विक्रेता हॅन्स लिपरशे हे १६०८ मध्ये दुर्बिणीचे पेटंट घेणारी पहिली व्यक्ती होती. त्याचे उपकरण, ज्याला इंग्रजीत “लूकर” असे म्हणतात, ते हॅन्स लिपरशेच्या मते प्रतिमा तीन वेळा मोठी करण्यासाठी सक्षम होते.

अनेक इतिहासकार लिपरशे यांना पहिल्या टेलिस्कोपचा शोधकर्ता म्हणून ओळखतात, कारण त्यांनी पेटंटसाठी अर्ज केला होता. लिपरशेला त्याच्या टेलिस्कोपचे उत्पादन करण्यासाठी परवानगी देण्यात आली. त्याने बनविलेले टेलिस्कोप युरोपमधील उच्चभ्रू नागरिकांना विकण्यात आले. फ्रान्सचा राजा चौथा हेन्री ह्याने देखील एक टेलिस्कोप विकत घेतला होता.

ह्या टेलिस्कोपच्या शोधाबद्दल पॅरिसच्या जॅक बोवेडेर ह्याला समजलं आणि त्याने या शोधाची माहिती कुणाला दिली असेल? तर इटलीतील जगप्रसिद्ध तत्वज्ञ, भौतिकशास्त्रज्ञ आणि गणितज्ञ गॅलिलिओ गॅलीली यांना! त्यांनी त्वरित स्वतःचा टेलिस्कोप बनविण्यास सुरुवात केली. खरं तर त्यांनी लिपरशे ह्याने बनविलेला टेलिस्कोप प्रत्यक्ष बघितला देखील नव्हता. पण गॅलिलिओ गॅलीली उपजतच हुशार, केवळ मिळालेल्या माहितीनुसार त्यांनी स्वतःचा टेलिस्कोप बनविला सुद्धां!

इतकंच नव्हे, तर त्यांनी आपल्या टेलिस्कोपच्या कार्यक्षमतेत लक्षणीय सुधारणा केली, आणि सुमारे २० पट मोठी प्रतिमा दिसण्याची मजल गाठली. स्वतःच्या निर्मितीवर खूश होऊन त्यांनी तो टेलिस्कोप व्हेनेशियन सिनेटला सादर केला, ज्यांनी त्याला पडुआ विद्यापीठात आजीवन व्याख्याता बनवून सन्मानित केले.

अवकाश निरीक्षणामुळे त्यांना शनिची कडी, सूर्यावरील ज्वलंत ठिपके, गुरूचे चार चंद्र, तसेच आकाशात पसरलेल्या धूसर प्रकाशाच्या कमानीची झलक शोधण्यातही यश प्राप्त झाले, जी नंतर आकाशगंगा म्हणून ओळखली गेली. पृथ्वी सूर्याभोवती फिरते असा दावा केल्याबद्दल, गॅलिलिओला कॅथोलिक चर्चने धर्मविरोधी मानले होते.

टेलिस्कोपचे तीन मुख्य प्रकार आहेत. रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप, न्यूटोनियन टेलिस्कोप आणि श्मिट-कॅसेग्रेन टेलिस्कोप.

रिफ्रॅक्टिंग टेलिस्कोप प्रकाश एकत्र करुन एका विशिष्ट बिंदूवर केंद्रित करण्यासाठी लेन्स वापरतात. १७ व्या शतकाच्या सुरुवातीला ह्या प्रकारचा टेलिस्कोप बनविण्यात आलेला होता, ज्याचा उपयोग गॅलिलिओने अवकाश निरीक्षण आणि खगोलशास्त्रासाठी केला होता.

न्यूटोनियन टेलिस्कोप रिफ्लेक्टर किंवा परावर्तक असतात. दूरच्या वस्तूंवरील प्रकाशावर लक्ष केंद्रित करण्यासाठी ते लेन्सऐवजी आरसा वापरतात. परावर्तक टेलिस्कोपचा शोध सर आयझॅक न्यूटनने रीफ्रॅक्टर्समध्ये आढळणाऱ्या रंगांच्या दुभंगपणाच्या समस्या टाळण्यासाठी लावला होता. अशा प्रकारच्या टेलिस्कोपमध्ये दुसऱ्या सपाट आरशावर प्रकाश केंद्रित करण्यासाठी वक्र आरशाचा उपयोग केला जातो, ज्यामधून प्रकाश डोळ्यावर निर्देशित होतो.

श्मिट-कॅसेग्रेन टेलिस्कोपचा सर्वात महत्वाचा फायदा म्हणजे ते इतर प्रकारच्या टेलिस्कोपहून खूपच लहान असतात, कारण ते प्रकाश मार्ग केंद्रित करण्यासाठी आरशांची मालिका वापरतात. सर्व व्यावसायिक टेलिस्कोप आतां श्मिट-कॅसेग्रेन रचनेवर आधारित आहेत.

जगातील सर्वात मोठा आणि सर्वात शक्तिशाली अंतराळ टेलिस्कोप म्हणजे नासाचा जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप. इतर सगळे टेलिस्कोप जमिनीवर स्थिर असतात; जेम्स वेब स्पेस टेलिस्कोप मात्र केवळ टेलिस्कोप नव्हे, तर अवकाशात तरंगणारी वेधशाळाच! जेम्स वेब स्पेस टेलिस्कोपने १.६ दशलक्ष किलोमीटर दूर – किंवा चंद्राच्या पुढे चारपट जास्त – त्याच्या गंतव्यस्थानाकडे झेप घेतलेली आहे. तिथपर्यंत पोहचण्यासाठी त्याला एक महिना लागेल आणि त्याच्या इन्फ्रारेड डोळ्यांना कॉसमॉस स्कॅनिंग सुरु करण्यासाठी आणखी पाच महिने लागतील.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.