IPO घ्यायच्या आधी ह्या ३ गोष्टी तपासून बघा।। कोणत्या आयपीओला नक्की अप्लाय करायचे? सगळेच आयपीओ प्रॉफिट कमवून देतात का? कोणत्या आयपीओ अप्लाय केल्यावर आपल्याला हमखास प्रॉफिट होईल? या सर्व प्रश्नांची उत्तरे जाणून घ्या आजच्या लेखातून !

अर्थकारण लोकप्रिय शैक्षणिक

सध्या शेअर मार्केट मध्ये आयपीओ चा अक्षरशः पाऊस पडत आहे. यामध्ये आपल्याला प्रश्न पडतो, कोणत्या आयपीओला नक्की अप्लाय करायचे? सगळेच आयपीओ प्रॉफिट कमवून देतात का? कोणत्या आयपीओ अप्लाय केल्यावर आपल्याला हमखास प्रॉफिट होईल? या सर्व प्रश्नांची उत्तरे आपण आज पाहणार आहोत.

आयआरसीटीसी(IRCTC) या कंपनीची आयपीओची प्राइस ₹320 इतकी होती. पण जेव्हा ती शेअर मार्केट मध्ये लिस्ट झाली तेव्हा तिची किंमत ₹644 झाली. म्हणजे 10 दिवसात 101% प्रॉफिट. बर्गर किंग कंपनीची आयपीओ इश्यू प्राईस ₹60 होती. जेव्हा ती शेअर मार्केट मध्ये लिस्ट झाली तेव्हा तिची किंमत ₹115 झाली. इथे सुद्धा 10 दिवसात 92% प्रॉफिट.

नुकत्याच आलेल्या झोमॅटो या कंपनीची आयपीओ इश्यू किंमत ₹76 होती. पण जेव्हा जी कंपनी लिस्ट झाली तेव्हा तिची किंमत ₹115 झाली. म्हणजे इथे सुद्धा 10 दिवसात 51% प्रॉफिट. ही तीन उदाहरणे पाहून आपल्याला वाटेल की सर्वच आयपीओ प्रॉफिट कमवून देतात, पण ही समजूत चुकीची आहे.

जसेकी एसबीआय कार्ड्स या कंपनीची इश्यू किंमत ₹ 755 होती, पण जेव्हा ही कंपनी मार्केट मध्ये लिस्ट झाली तेव्हा तिची किंमत होती ₹658, म्हणजे 15% लॉस. कल्याण ज्वेलर्सया कंपनीची आयपीओ इश्यू किंमत ₹87 होती, पण जेव्हा ही कंपनी लिस्ट झाली तेव्हा तिची किंमत होती ₹70.85,

म्हणजे 23% लॉस. त्यामुळे सगळेच आयपीओ प्रॉफिट कमवून देतील असे नाही. आयपीओ विकत घेताना आपण काही गोष्टी तपासून घेतल्या पाहिजेत. आपण आज 3 चेक पॉइंट पाहणार आहोत, जे तुम्हाला चांगला आयपीओ मिळविण्यासाठी मदत करतील.

1.आयपीओ नेहमी 3 ऱ्यादिवशी अप्लाय करा:– कोणताही आयपीओ हा फक्त 3 दिवसांसाठी विकत घेण्यासाठी ओपन असतो. मग तो 7 ते 10 दिवसांनंतर शेअर मार्केट मध्ये लिस्ट होतो. त्यामुळे ह्या तीन दिवसांपैकी पहिले 2 दिवस आयपीओ साठी अप्लाय करू नका, थोडी प्रतीक्षा करा.

तिसऱ्या दिवशी ते आयपीओ 10 पेक्षा जास्त पटीने सबस्क्राईब झाले असेल तरच ते आयपीओ चांगले आहे असे आपण म्हणू शकतो. आयपीओ जेवढ्या जास्त पटीने सबस्क्राईब होतो, तेवढे तेचे लिस्टिंग गेनस् जास्त मिळण्याची शक्यता असते. लिस्टिंग गेनस् म्हणजे कंपनीची मार्केट मध्ये लिस्ट झालेली शेअर प्राईस, वजा आयपीओ इश्यू प्राईस. जी आपल्याला शेअर ज्या दिवशी लिस्ट होतो तेव्हा मिळते.

कुठल्याही आयपीओ चे सबस्क्रिप्शन स्टेटस कडे पहायचे हे आपण पाहुयात, तर सर्वात प्रथम गूगल ओपन करायचं आहे. नंतर त्या आयपीओ चे नाव आणि पुढे सबस्क्रिप्शन स्टेटस अस टाकायचे आहे. जसे की, झोमॅटो आयपीओ सबस्क्रिप्शन स्टेटस. त्यानंतर जी पहिली लिंक येईल त्यावर आपल्याला क्लिक करायचे आहे. त्यावर क्लिक केले नंतर आपल्याला स्क्रोल केलेवर एक सेक्शन दिसेल,

झोमॅटो स्टेटस लाईव्ह. त्या सेक्शन मध्ये जे टोटल आपल्याला दिलेली आहे ती पहायची आहे. ही टोटल म्हणजे हा आयपीओ किती पटीने सबस्क्राईब झालेला आहे. हा आकडा 10 पेक्षा जास्त पाहिजे. तरच हा आयपीओ घेण्यासारखा आहे. अस आपण समजू शकतो.

2. ब्रोकर रिपोर्ट तपासून पाहा:- ब्रोकर म्हणजे आपण जे डिमॅट अकाउंट शेअर विकत घेण्यासाठी वापरतो. त्या डिमॅटच्या कंपनीला ब्रोकर असे म्हणतात. जसे की एंजल ब्रोकिंग, झेरोधा, अपटॉक्स, शेरखान, इत्यादी. ह्या ब्रोकर कंपन्यांमध्ये असलेले ब्रोकर प्रत्येक आयपीओ चा खोल अभ्यास करतात.

कारण त्यांना त्यांच्या कस्टमर ला सुचवायचे असते की आयपीओ विकत घ्यावा की नाही. हे सर्व ब्रोकर चा रिपोर्ट पाहून आपण तो आयपीओ घ्यावा की नाही हे ठरवता येईल. हे सर्व ब्रोकर रिपोर्ट कोठे पहायचे हे लक्षात घेवूयात. तर सर्वात पाहिले आपल्याला गूगल ओपन करून, तेथे आपल्याला आयपीओ चे नाव टाकायचे आहे आणि सबस्क्रिप्शन स्टेटस. त्यानंतर आपल्याला विंडो ओपन झाल्यावर पाहिली लिंक ओपन करायची आहे.

विंडो ओपन झालेवर तिथे एक टॅब दिसेल आयपीओ डिटेल्स तिथे क्लिक करायचे आहे. त्यांनतर विंडो स्क्रोल केलेवर आयआरसीटीसी (IRCTC) आयपीओ रिव्ह्यू आणि रेटिंग. या टेबल मध्ये जेवढे जास्तीत जास्त अप्लाय आणि कमीतकमी अवॉर्ड असे स्टेटस असेल तर समजून जा हा आयपीओ घेण्यासाठी चांगला आहे. त्यामुळे हा शेअर लिस्ट होताना खूप छान छान प्राईस लिस्ट होताना दिसतो.

3. रेड हेरींग प्रॉस्पेक्ट्सचा चांगला अभ्यास करा:- जेव्हा आपण एखाद्या कंपनीचा आयपीओ विकत घेतो. तेव्हा आपण त्या कंपनीचे एक प्रकारे हिस्सेदारी झालेले असतो. त्यामुळे आपल्याला कंपनीची सक्षम माहिती असणे अत्यंत आवश्यक असत. तर कंपनीची माहिती मिळवायची कशी? तर त्यासाठी रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट्स हे डॉक्युमेंट आपल्याला मदत करते.

जेव्हा कंपनीला आयपीओ मार्केट मध्ये आणायचा असतो. तेव्हा ती कंपनी सेबी कडे रेड हेरिंग प्रॉस्पेक्ट्स डॉक्युमेंट सबमिट करते. ज्यामध्ये कंपनीचा पूर्ण बॅक ग्राउंड असतो. कंपनीतल्या प्रमोटरची सर्व माहिती असते. कंपनी पब्लिक का होते याचे कारण असते. कंपनीमध्ये काय काय रिस्क आहे याची माहिती असते.

याशिवाय आयपीओ तून मिळालेल्या पैशातून कंपनी काय करणार आहे, हे सुध्दा दिलेले असते. त्यामुळे आयपीओ निवडण्यासाठी हे डॉक्युमेंट अत्यंत महत्वाचे आहेत. तुम्हाला हे डॉक्युमेंट कंपनीच्या वेबसाईट वर मिळू शकतील, किंवा स्टॉक एक्सचेंजच्या वेबसाईट वर मिळू शकते, सेबीच्या वेबसाईट वर मिळू शकते. किंवा वर्तमानपत्रे, मॅगझिन मध्ये मिळू शकते. त्यामुळे कोणतेही आयपीओ घेण्याआधी हे 3 चेक पॉइंट नक्की पडताळून पाहा.

वरील माहिती www.youtube.com/c/ShahanPan या चॅनल वरून संकलीत व शंब्दांकित केलेली आहे.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.