शेअर मार्केट मधील आयपीओ (IPO) म्हणजे काय?।। IPO मध्ये गुंतवणूक करावी का? याबद्दल महत्वपूर्ण माहिती जाणून घ्या अतिशय सोप्या भाषेत !

अर्थकारण लोकप्रिय शैक्षणिक

IPO म्हणजे काय तर इनिशिअल पब्लिक ऑफेरींग या मध्ये काय होतं? तर वेग वेगळ्या कंपन्या आप आपले शेअर्स बनवतात आणि ते विकता, समजा xyz कंपनी ला शंभर कोटी ची गरज आहे. आणि हे शंभर कोटी मिळवण्यासाठी त्याचे शेअर्स बनवले जातात. आणि हे आपल्याला विकले जातात. कंपनीला १०० कोटी IPO च्या माध्यमाने मिळता.

थोडक्यात कंपनी IPO ऑफर करून भांडवलाची गरज भागवता. आता हे शेअर्स आपण का विकत घ्यायचे? जेव्हा आपण ते शेअर्स विकत घेतो तेव्हा त्याची मालकी हक्क आपल्याला मिळतो या xyz कंपनी चा शेअर्स जेव्हा आपण विकत घेऊ. समजा त्याची किंमत असेल तीनशे रुपये जेव्हा याची किंमत वाढत जाईल तेव्हा आपल्याला त्या मधून फायदा होतो.

आणि जसा या कंपनी चा सुद्धा फायदा होईल प्रॉफिट वाढत जाईल त्या केस मध्ये हि कंपनी आपल्याला डेव्हिडन्ट देते बऱ्याच कंपन्या त्यांच्या प्रॉफिट मधील काही फायदा आपल्याला देत असते. कारण त्या कंपनी चा मालकी हक्क आपण खरेदी केलेला असतो.

मग या कंपन्या IPO का लाँच करतात? या कंपन्याना IPO लाँच करण्याची काय गरज पडते? शेअर्स विकण्याची काय गरज पडते?: सर्वात पहिली गोष्ट शेअर्स विकल्यामुळे फंड रेज करु शकता. आता हा फंड का रेज करता? एक तर त्या कर्ज मुक्त होऊ शकता.

जे काही त्यांचे कर्ज असेल ते कर्ज निल करू शकतात किंवा काही प्रमाणात कमी करू शकतात. दुसरी गोष्ट कंपनी ला जर काही नवीन प्रॉडक्ट लाँच करायचा असेल एखादा नवीन प्रॉडक्ट असेल किंवा सर्व्हिस असेल त्या साठी जो काही फंड लागेल. तो शेअर च्या माध्यमातून उभा केला जातो.

तिसरी गोष्ट जर कंपनीला आपला उद्योग वाढवायचा असेल. वेगवेगळ्या ब्रांचेस ओपन करायचे असतील. तर त्या साठी गरजेचा असतो फंड आणि हा फंड आपल्या कडून शेअरच्या माध्यमातून मिळविला जातो. आता तुम्ही म्हणाल IPO मध्ये दोन प्राइस दाखवल्या जातात.

एक लोअर प्राइस असते आणि एक अप्पर प्राइस असते. समजा उदाहरण पाहू. एक लोअर प्राइस आहे तीनशे रुपयाची आणि अप्पर प्राइस आहे तीनशे पाच रुपयांची जी लोअर प्राइज़ असते त्याला फ्लोअर प्राइज़ म्हटले जाते आणि जी अप्पर प्राइज़ असते त्याला कॅप प्राइज़ म्हटलं जात. या दोन्हीमध्ये काय फरक असतो; ज्या प्राइज़ला तुम्ही बीड कराल त्या प्राइज़ला तुम्हाला तो शेयर मिळतो.

मग तुम्ही बीड केलेली किंमत जर ती ऐक्चुअल किंमत ला मैच झाली म्हणजे बीड प्राइज़ला मॅच झाली तरच तुम्हाला तो स्टॉक मिळतो. आता तुम्ही म्हणाल मला १०, १५, २०, २५, ३० स्टॉक खरेदी करायचे आहेत पण या क्वांन्टिटी मध्ये तुम्ही खरेदी करु शकत नाही. त्यासाठी एक लॉट असतो. याच काय कारण कंपनीने तो लॉट डिसाईड केलेला असतो.

उदरहणार्थ पन्नास स्टॉक चा लॉट. जर तुम्हाला तीनशे रुपय किमतीचा शेअर खरेदी करायचा असेल. तर ते शेअर खरेदी करण्यासाठी टोटल पन्नास शेअरस तुम्हाला खरेदी करावे लागतील. म्हणजेच तीनशे गुणिले पन्नास होईल. जर तुम्हाला शंभर खरेदी करायचे असतील तर दोन लॉट खरेदी करावे लागतील.

पण तुम्हाला १२०, १२५, १३० अशे शेअरस खरेदी करता येत नाही. तुम्हाला लॉट मध्येच खरेदी करावे लागतात. हा IPO टोटल तीन ते दहा दिवस चालतो. पण ऐक्चुअली जर तुम्ही पाहिलं मॅक्सिमम हा तीन दिवसच चालतो. मॅक्सिमम जे आयपीओ लाँच होतात ते तीन दिवसा साठीच लाँच होतात मग आज तुम्ही बेट करु शकतात उद्या करू शकतात किंवा परवा करू शकतात.

या तीन दिवसा मध्ये तुम्ही तो IPO विकत घेऊ शकतात. मग यामध्ये काय होते. जेव्हा IPO लाँच होतो, त्याला प्रायमरी मार्केट म्हणले जाते. IPO मधून शेअर ची खरेदी करणे. याला प्रायमरी मार्केट मधून खरेदी करणे म्हणले जाते. पण जेव्हा हा IPO शेअरच्या स्वरूपात कन्व्हर्ट होतो. एक्सचेंज मध्ये लिस्टेड होतो. तेव्हा त्याला सेकंडरी मार्केट म्हणले जाते.

आता तुम्हाला सिंपल भाषेत सांगतो. IPO मधून खरेदी करता त्याला प्रायमरी मार्केट म्हणले जाते. आणि जेव्हा तुम्ही डिमॅट अकाउंट मध्ये शेअर बाय किंवा सेल करता. तुमच्या डिमॅट अकाउंट मधून ब्रोकर कडून एखाद्या शेअरची खरेदी किंवा विक्री करता. त्याला सेकंडरी मार्केट म्हणले जाते.

जर तुम्हाला IPO ची संपूर्ण माहिती हवी असेल तर ती तुम्हाला ऑनलाईन मिळू शकते. ज्याला रेड हेअरिंग प्रोस्पेक्ट्स म्हणले जाते. यामध्ये पूर्ण IPO ची माहिती लिहिलेली असते. कंपनी बद्दल संपूर्ण माहिती त्यामध्ये मेंशन केलेले असते. IPO दरम्यान तुम्ही अजून एक शब्द ऐकाल असेल.

ओव्हर सबस्क्राईब म्हणजे काय?: जर IPO मध्ये एक लाख शेअर असतील. आणि बेड झालेली असेल दोन लाख शेअर ची एक लाख पेक्षा जास्त शेअर साठी बेडींग झाले असेल. तर त्याला ओव्हर सबस्क्राईब म्हणतात. म्हणजेच काय? पिझ्झा आहे एक आणि खाणारे लोक आहे पंचवीस एवढ्या लोकांना तो पिझ्झा पुरणार आहे का? नाही.

अगदी तसेच एक लाख शेअर साठी मागणी असते दोन लाख शेअर ची मग आता काय केले जाते. जेव्हढे शेअर आहे तेव्हढे शेअर बेडिंग नुसार तेवढयाच लोकांना दिले जातात. समजा एक लाख शेअर आहे. तर एक लाख लोकांनाच ते दिले जातात. मग बाकी लोकांचे काय होते.

त्यांचे पैसे रिफंड केले जातात. सर्वांना या IPO चा फायदा मिळवता येत नाही. मग त्या साठी खूप लोक म्हणतात माझ्याकडे दोन डिमॅट अकाउंट आहेत. चार आहेत, पाच आहेत. मी प्रत्येक डिमॅट अकाउंट वरून अप्लाय करू का? ५ डिमॅट अकाउंट वरून अप्लाय करतो. कदाचित मला एकाच डिमॅट अकाउंट मधून IPO साठी नंबर लावता येईल. एका तरी डिमॅट अकाउंट मधून मला एक तरी लॉट मिळेल.

पण मित्रांनो असे करता येत नाही. जर तुम्ही स्वतःच्या एकाच्या नावाने वेगवेगळे डिमॅट अकाउंट बनवले असतील. आणि एका वेळी तुम्ही एकाच नावाने अनेक डिमॅट अकाउंट मधून अप्लाय केले तर डेफिनेटली तुमचे रजिस्ट्रेशन कॅन्सल केले जाते. ह्यात एक ही डिमॅट अकाउंट साठी शेअर तुम्हाला मिळणार नाहीत. सर्व अप्लिकेशन रेजेक्ट होणार.

पण यामध्ये अजून एक हुशारीने प्ले करू शकता. तुमच्या घरातील ज्या काही व्यक्ती असतील. जेवढे डिमॅट अकाउंट असतील तेवढ्या सर्व डिमॅट अकाउंट वरून अप्लाय करू शकता. मग तुमचा मित्र असेल, भाऊ असेल, बहीण असेल, पत्नी असेल, आई असेल किंवा वडील असेल. कोणी ही असेल कोणाच्याही डिमॅट अकाउंट वरून तुम्ही अप्लाय करु शकता. आणि ज्याचा नंबर लागेल. त्याचे सोन होईल.

पण IPO मध्ये इंवेस्ट करताना. थोडीशी सावधगिरी असणे खूप गरजेचं असत. जेव्हा तुम्ही IPO साठी अप्लाय करता. तेव्हा खूप काही गोष्टी बघणे गरजेचं असतात. यातून तुमचा फायदा होऊ शकतो. आणि नुकसान सुद्धा होऊ शकत. फायदा कसा? आणि नुकसान कसा? समजा तीनशे रुपयाला तुम्ही IPO साठी बीड केले होते.

तीनशे रुपयाला तुम्हाला च्या शेअरच्या क्वांटिटी मिळाल्या पन्नास असतील शंभर असतील. जर त्याची किंमत साडे तीनशे झाली चारशे झाली तीनशे दहा झाली तर मात्र तुमचा फायदा होतो. पण जेव्हा त्याची किंमत कमी होते तेव्हा मात्र नुकसान होण्याची शक्यता असते. दोन गोष्टी घडतात.

एकतर IPO नंतर जेव्हा तो स्टॉक लिस्ट होतो. स्टॉक एक्सचेंज मध्ये येतो तेव्हा त्याची किंमत एकतर वाढते. किंवा अचानक कमी होते. अश्या केसेस मध्ये एकतर अचानक तुमचा फायदा होईल किंवा अचानक तुमच नुकसान होईल त्यामुळे सावधान असणं खूप गरजेचं असतं.