गर्भवती असताना उपवास करताय ? हे जरुर वाचा

लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

आई होणं प्रत्येक स्त्रीसाठी खास असतं. या दिवसात तिचं सगळं आयुष्य बदलून जातं. शारिरीक बदलांसोबतच मानसिक बदलदेखील होत जातात. अशा स्थित्यंतरातून जाताना गरज असते ती संपुर्ण पोषणाची. गर्भवती स्त्रिच्या गर्भाला तिने खाल्लेल्या आहारातूनच पोषण मिळत असते.

अशा वेळी योग्य वेळी आणि समतोल आहार गर्भवतीने घेणं अतिशय गरजेचं असतं. पण अनेकदा येणा-या खास दिवसांसाठी उपवासाचं प्रयोजन असतं. अनेकदा श्रद्धा म्हणून गर्भावस्थेतही उपवास केले जातात. अनेकदा डॉक्टर गर्भावस्थेत उपवास न करण्याचा सल्ला देतात. पण योग्य काळजी घेऊन उपवास केला जाणं शक्य आहे. यासाठी पुढील टिप्स जरूर पाळा.

जर तुम्ही अ‍ॅनिमिक असाल किंवा ब्लड प्रेशरशी संबधित कोणताही त्रास तुम्हाला गर्भावस्थेदरम्यान होत असेल तर उपवास करणं शक्यतो टाळावं. पण जर तुम्ही गर्भावस्थेच्या पहिल्या तिमाहीत असाल तर उपवास टाळणं कधीही योग्य उपवास करताना शक्यतो निर्जळी उपवास करणं टाळावं.

खर तर गर्भावस्थेत दिवसभरात हायड्रेट राहणं गरजेचं असतं. त्यामुळे गर्भावस्थेत उपवास करणार असाल तर पाणी प्यायला हवच. पण याशिवाय नारळ पाणी, दुध आणि ज्युस देखील अध्येमध्ये घ्यायला हवं. त्यामुळे शरीरातील साखर नियंत्रणात राहते. उपाशीपोटी चहा- कॉफीचं सेवन टाळा. रिकाम्यापोटी चहा किंवा कॉफीचं सेवन शक्यतो करु नये. कारण यामुळे गॅसेस, अ‍ॅसिडीटी होण्याची शक्यता नाकारता येत नाही.

उपवासाचा अर्थ रिकाम्या पोटी राहणं असा असला तरी गर्भावस्थेत हे टाळावं. त्यामुळे उपवास असला तरी दर दोन तासांनी काही तरी खात राहणं गरजेचं आहे. यामध्ये तुम्ही फळं, ड्रायफ्रुट्स, दुध हे पदार्थ घेऊ शकता. याशिवाय गुळ – शेंगदाणे हे खाऊ शकता. यामुळे तुम्हाला आयर्न मिळेल.

उपवास सोडतानाही एकदम हेवी जेवण करु नका. शक्य असल्यास गोड खाऊन किंवा ज्युस पिऊन उपवास सोडावा. उपवासाच्या दिवशी तेलकट किंवा अरबट चरबट खाणं टाळावं. सगळ्यात महत्त्वाचं गर्भावस्थेत उपवास करणार असाल तर दगदग करणं आवर्जुन टाळा.

कारण यामुळे अशक्तपणा आणि चक्कर येण्याची शक्यता आहे. त्यामुळे हा दिवस आराम करण्याचा प्रयत्न करा. त्यानंतर जेवण करावं. दिवसभरात गर्भाच्या हालचालीवर लक्ष ठेवा. यादरम्यान थोडासा जरी बदल झाला तरी डॉक्टरांचा सल्ला घ्या.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा