पहिला प्रश्न म्हणजे एखाद्या व्यक्तीने समजा त्याच्या मालमत्तेमध्ये नोमीनेषण करून ठेवले असेल तर त्या द्वारे इतर वारसांचा हक्क संपूष्टात येतो का?: आता एक लक्षात घेतले पाहिजे ते म्हणजे नोमीनेषण ही काही विशिष्ट मालमत्तांच्या मालकांना उपलब्ध असलेली एक सुविधा आहे. ज्या सुविधा द्वारे समजा त्या मालकांचं निधन झाले तर ती मालमत्ता कोणाकडे द्यावी त्या व्यक्तीचे नॉमिनेट किंवा नामनिर्देशित करता येते.
मात्र एक लक्षात घेतले पाहिजे की नोमीनेषण म्हणजे मालमत्तेचे हस्थांतरण नाही. किंवा नोमीनेषण म्हणजे इतर वारसांचा हक्क नाकार सुद्धा नव्हे. समजा एखाद्या व्यक्तीने त्याच्या काही मालमत्तां संदर्भात असलेल्या वारसांपैकी एखाद्या वारसाचं नाव नोमीनेट केले असेल आणि जर ती व्यक्ती कोणतही मृत्यूपत्र न करता जर निधन पावली तर केवळ त्या एकाच वारसाचे नोमीनेषण आहे
म्हणून त्या मालमत्ते मधला इतर वारसांचा हक्क कधीही संपुष्टात येत नाही. इतर वारसांनी त्या नोमीनेषण हरकत नाही घेतली तर त्या वारसाला मालमत्ता निश्चितपणे मिळते. मात्र एखाद्या वारसाचं नोमीनेषण केलेले आहे . त्याला इतर वारस हरकत घेऊच शकत नाही असे अजिबात नाही.
जर इतर वारसांनी मयत व्यक्तीने केलेल्या नोमीनेषण ला हरकत घेतली आणि वारसपत्रानुसार किंवा वारस कायद्यायानुसार जर त्या मालमत्तेमध्ये हक्क मागितला तर त्यांना निश्चितपणे असा हक्क मिळू शकतो. नोमीनेषण केलं म्हणजे वारसा हक्कानुसार मिळणारे फायदे किंवा अधिकार संपुष्टात आले असे अजिबात नाही.
कोणतीही व्यक्ती कोणत्याही व्यक्तींना नोमीनेट जरी करत असेल तरी सुद्धा त्या व्यक्तीचे इतर वारसदेखील त्या व्यक्तीच्या निधनानंतर त्यांच्या मालमत्तेमध्ये वारसा हक्कानुसार स्वतःचा हक्क आणि अधिकार निश्चितपणे मागू शकतात. थोडक्यात काय तर केवळ नोमीनेषण केले आहे म्हणून त्या नोमीनेट केलेल्या वारसालाच सगळं मिळेल असंही नाही आणि केवळ नोमीनेषण केलेलं आहे म्हणजे इतर वारसांचा हक्क संपुष्टात आला असेही नाही.
पुढचा प्रश्न आहे बायको समजा स्वतंत्र राहत असेल, तर नवऱ्याला दुसरं लग्न करता येते का?: याचे उत्तर नाही असे आहे. कारण एक लक्षात घेतले पाहिजे आपल्याकडे ज्या धर्मामधे बहुपत्नीत्व कायद्याने मान्य नाही आहे, त्या लोकांना एकाच वेळी एकापेक्षा अधिक विवाह करता येत नाही.
आणि हे पती आणि पत्नी या दोघांकरीता लागू आहे. केवळ पती आणि पत्नी विभक्त झालेले आहेत किंवा स्वतंत्र राहत आहेत म्हणून त्यांच्यापैकी कोणालाही म्हणजे पतीला किंवा पत्नीला दुसरे लग्न करता येणार नाही. जोवर पत्नी किंवा पतीचं पहिलं लग्न कायह्याशीररीत्या संपुष्टात येत नाही तोवर त्यांना कायह्याने दुसरे लग्न करायला मनाई आहे
सहाजीकच जर पती पत्नी विभक्त राहत असतील, तर त्या एका कारणाबद्दल किंवा त्यांच्या इतर कारणाबद्दल ते आपसात संमतीने सुद्धा घटस्फोट घेऊ शकतात किंवा एखादा जोडीदार दुसऱ्या जोडीदाराला सोडून राहत असेल तर त्या कारणावरून जो जोडीदार सोडून गेलेला आहे,
त्याच्या विरोधात घटस्फोटाचा दावा हा निश्चितपणे दाखल करता येतो आणि जर असा घटस्फोटाचा दावा मंजूर झाला तर त्या दोघांनाही पुन्हा दुसरं लग्न करण्याची मोकळीक मिळते. मात्र केवळ पती आणि पत्नी यांच्यापैकी कोणीतरी एक विभक्त राहत आहे. त्या एकाच कारणानी त्यांच्यातलं लग्न संपुष्टात येत नाही आणि सहाजिकच जोवर त्यांचं कायह्याशीर लग्न कायम आहे, तोवर त्यांना दुसरं लग्न करायला देखील कायध्याने परवानगी मिळत नाही.
पुढचा प्रश्न आहे इतर अधिकारात नाव असलेली व्यक्ती ही मालक असते का?: आता सगळ्यात पहिले एक लक्षात घेतले पाहिजे जेव्हा आपण मालक हे सौग्ण्य वापरतो तेव्हा ती महसूल अभिलेका संदर्भात वापरताना फार काळजीपूर्वक वापरली पाहिजे. कारण मी हे अनेकदा सांगितलेलं आहे की अनेकदा विविध न्यायालयांनी विविध निकालांद्वारे हे वारंवार स्पष्ट केलेलं आहे की महसूल अभिलेखातील नोंदी असणे हा मालकीचा पुरावा नाही.
कोणाचीही कोणत्याही मालमत्ते संदर्भातली मालकी ही महसूल अभिलेखाच्या नावानी किंवा नोंदीद्वारे सिद्ध होऊ शकत नाही. आता राहता राहिला इतर अधिकारमधील नावाचा प्रश्न तर लौकिक अर्थाने जो भौगवटादार असतो त्याला त्या जागेचे मालक मान्यात येते आणि भौगवटादार आणि गोळ यांच्या व्यतीरिक्त जर कोणाचे अधिकार त्या मालमत्तेमध्ये असतील तर त्यांची नावं इतर अधिकारामध्ये लिहिण्यात येते.
मात्र काही काही वेळेला असे देखील होऊ शकते की एखादा भोगवटादार त्याचं निधन झालं की त्याच्यानंतर त्याच्या मुलांची नावं भौगवटादार सदरात लिहिण्यात येतात आणि मुलींची नावं ही इतर अधिकारांमध्ये लिहिली असतात. असं जर असेल म्हणजे केवळ मुली असल्यामुळे त्यांचं नाव जर इतर अधिकारांमध्ये लिहिलेलं असेल तर लौकिक अर्थानी त्यांना त्या मालमत्तेमध्ये मालकीचा हक्क हा वारसा हक्कानुसार निश्चितपणे आहे.
पण हा अपवाद जर वगळला तर इतर अधिकारातली व्यक्ती तिला आपण मालक गृहित धरू शकत नाही. त्या व्यक्तीचे त्या मालमत्तेमध्ये काही ना काही अधिकार आहेत. हे निश्चित आहे काहीवेळेला त्या अधिकार्यांच भविष्यात मालकीमध्ये रूपांतर होऊ देखील शकतं. उदा:- एखादी जमीन समजा एखाद्याने गहाण ठेवली असेल
आणि ज्याच्याकडे गहाण आहे त्याचं नाव इतर अधिकारात असेल आणि जर त्या कर्जाची परतफेड नाही झाली. तर त्या गहाण ज्याने जमीन ठेऊन घेतलेली आहे. त्याला जर त्या जागेची मालकी मिळण्याची अट किंवा शर्त त्या करारात असेल तर त्यानुसार ती व्यक्ती त्या जागेची मालक होऊ शकते. पण हे सगळं बऱ्याच गोष्टींवर अवलंबून असते . केवळ इतर अधिकारात नाव आहे, म्हणून ती व्यक्ती मालक आहे असे आपण गृहित धरू शकत नाही.
याला अपवाद फक्त मी जो मगाशी सांगितला की जर केवळ मुली असल्याच्या कारणावरणं त्यांची नावं इतर अधिकारांमध्ये नोंदवली असतील तर त्यांना मात्र त्या मालमत्तेमध्ये जो काही त्यांचा स्वतंत्र अविभाजित हक्क आहे, त्याची मालकी निश्चितपणे मिळेल, पण हा एक अपवाद वगळता इतर अधिकार्यातल्या व्यक्तीला आपण मालक असे गृहित धरू शकत नाही.
पुढचा प्रश्न म्हणजे जमिनीचा सर्वेक्रमांक किंवा गटक्रमांक कसा मिळवावा?: आता कोणत्याही जमिनीचा जेव्हा तुम्हाला सर्वे क्रमांक किंवा गटक्रमांक हवा असेल तर आपण त्या जमिनीचा सातबारा उतारा काढू शकता . त्या सातबाऱ्या उताऱ्यावरती वरच्या कोपऱ्यात डाव्या हाताला सर्वेक्रमांक आणि गटक्रमांक लिहिलेले असतात.
सर्वेक्रमांक म्हणजे जेव्हा त्याची पहिल्यांदा मोजणी होते तेव्हा त्याला सर्वेक्रमांक म्हणतात आणि कालांतराने जेव्हा एकत्रीकरण योजणेनुसार काही जमीन एकत्रित केल्या जातात. तेव्हा त्यांचं गटक्रमांकामध्ये रूपांतर होते. आपण कोणत्याही जमिनीचा सातबारा जर काढलात त्या उतारा सातवर आपल्याला त्याचा सर्वेक्रमांक, हिस्साक्रमांक किंवा गटक्रमांक याची माहिती निश्चितपणे मिळेल.
पुढचा प्रश्न आहे समजा करारा नंतर हरकत आली म्हणजे फेरफार नोंदवण्या करिता हरकत आली तर काय होते?: आता एक लक्षात घेतले पाहिजे कि समजा खरीदी विक्रीचा करार जर झालेला आहे तर खरीदीखतानी त्या मालमत्तेची मालकी कायदेशीर दृष्टया हस्थांतरित झालेली आहे. मात्र त्या व्यवहारीची महसूल अभिलेखात नोंद होण्याकरिता फेरफार होणे आवश्यक आहे.
आणि त्या फेरफाऱ्याच्या कार्यपद्धतीमध्ये ज्या व्यक्तींना त्या मालमत्तेमध्ये हक्क किंवा अधिकार असेल त्या व्यक्तींना फेरफारा संदर्भात नोटीस देऊन त्यांच्या काही हरकती आहेत का हे मागवण्यात येते. आता अशा वेळेलाच जर त्यांनी हरकत नाही घेतली तर प्रश्नच नाही. पण समजा त्यांनी हरकत घेतली तर ते प्रकरण विवादित प्रकरण म्हणून तहसीलदाराकडे पाठवण्यात येते आणि मग महसूली न्यायालयाच्या एकंदर सगळ्या प्रक्रियेनुसार त्यावर कार्यवाही केली जाते.
जर तिथे आपल्याला यश मिळाले तर प्रश्नच नाही. पण जर यश नाही मिळाले तर आपण त्याच्यावर महसूल न्यायालयामध्ये अपील किंवा अर्ज करू शकता. तिथे सुद्धा जर आपल्याला शंका असेल तर आपण ज्या कराराद्वारे एखाद्या जमिनीची खरीदी केलेली आहे , त्याची मालकी सिद्ध होण्याकरिता आपण दिवाणी दावा देखील निश्चितपणे करू शकता.
सूचना- कायदे हे वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळा न्यायालये ते रद्दही करत असतात, वर नमूद माहिती ही राज्य शासनाच्या वेबसाईटवरील माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी याबाबत कोणतेही कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी कायदेतज्ञांशी सल्ला घ्यावा व अद्ययावत माहिती घ्यावी, अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
छान माहीती दिली सर
तुमचा व्हाटसप ग्रृृृप आसेल ज्या व्हाटसप ग्रृृृृृप वर माहीती टाकत आसाल तर मला तुमच्या व्हाटसप ग्रृृृृृप मधे सहभागी करुन घ्या.