मुलांच्या नावामागे वडिलांच्या नावाऐवजी आईचं नाव लावता येत का ? वाचा सविस्तर !

लोकप्रिय शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

आज आपण माहिती पाहणार आहोत, मुलांच्या नावामागे आईचं नाव लावता येत का ? जसे आपण वडिलांचे नाव लावतो, तसंच आईचे नाव लावता येतं का? याची माहिती पाहणार आहोत.

आई … आई हा आपल्या जिव्हाळ्याचा प्रेमाचा आणि जिवाभावाचा विषय आहे. तिच्या शिवाय आपल्या कोणाचे सुरुवात शक्यच नाही. नऊ महिने हीच आई बाळाला गर्भात वाढवते. पुढं न्हाऊ-माखू करून चालायला, बोलायला, शिकवते. आणि जेव्हा तिचा बाळ शाळेत जायला लागतं तेव्हा शाळेत बाळाच्या नावासमोर तिचा कसलाही उल्लेख नसतो. कधी फक्त गरजेच्या वेळीच आईच नाव लिहायला सांगतात.

अनेकदा असा विचार केला जातो की मुलांच्या नावात आईचे नाव का नसावं? वडिलांचे नाव आणि आडनाव दोन्हीही असताना आईचा काहीच उल्लेख नसतो. हे झालं नाही म्हणून नामोल्लेख नसण. याचसोबत लग्नानंतर तिची पहिली ओळख पूर्णपणे पुसून दुसरी लिहिली जाते. म्हणजे लग्नापूर्वीचे नाव बदलून वडिलांच्या जागी पतीचं आणि माहेरच्या आडनावाचा जागी सासरचे आडनाव तिला लावावं लागतं.

अनेक जण असा प्रश्न विचारतात की खरंच आईला काहीच हक्क नाही का मुलांच्या नावासमोर स्वतःचे नाव लावायचा? अनेक मुलं सुद्धा असा विचार करतात की आम्ही का आईच नाव वापरू शकत नाही? आम्हाला जर वापरायचं असेल तर आम्ही काय करायला हवं. त्यासाठी काय कायदेशीर तरतुदी आहेत आणि अशी बंदी आहे तरी का!!!  तर या सगळ्या प्रश्नांची उत्तर आज आपण जाणून घेऊयात.

1) वडिलांसोबत आईचाही नामोल्लेख : वडिलांसोबत आईचाही नामोल्लेख करायचा असेल तर मुलाच्या नावामागे जर आईच नाव लावायचा असेल तर वेगवेगळ्या परिस्थितीत याचे वेगवेगळे स्वरूप बदलत जातात. जर एखादा मुलगा किंवा मुलगी याला स्वतःच्या वडिलांसोबत आईचे नाव लावायचे असेल तर ते निश्चितपणे लावता येतं. तो अधिकार कोणीही नाकारू शकत नाही. आपल्या देशाचा विचार केला तर उत्तरेकडील काही राज्यांमध्ये आईचं नाव लावलं जातं.

तर दक्षिणेकडील काही राज्यांमध्ये केवळ फक्त नावाचा उल्लेख केला जातो. आपल्याकडे सगळीकडेच वडिलांचे नाव आणि आडनाव लावल जात. पण बदलत्या काळात अनेक जण मधलं नाव जिथे वडिलांचा असतं तिथं सोबतच आईचही नाव लावतात. मात्र असं नाव लावण्याची पद्धत अजूनही मोजक्याच ठिकाणी आहे.

पुढारलेल्या विचारसरणी पुरतीच मर्यादित आहे. अनेक अभिनेत्यांनी, नेत्यांनी असं आईच नाव नावासमोर लावलेला आपण पाहिले असेल. महाराष्ट्रातील अनेक मंत्र्यांनी आणि आमदारांनी मागच्या वेळेस शपथविधीच्या वेळी आपला नामोल्लेख करताना आईच्या नावासह केल्याचं सुद्धा आपण पाहिलं असेल. यात सोबत अनेक पुरोगामी विचारांचे तरुण हल्ली आपल्या नावात आईचाही नामोल्लेख करतात.

मात्र असं असलं तरीसुद्धा कोणतेही सरकारी काम हे कागदपत्रांच्या जुळवणी शिवाय शक्य नसतं. आणि ही सगळी कागदपत्र अचूक असणे गरजेचे असतात. अशावेळी नावात फरक असेल तर पुढील अडचणी वाढत जातात. योजनांचा फायदा घेणे अवघड होऊन बसतं. सर्व कागदपत्रांवर आई आणि वडिलांचा सोबतच नाव लावून घेणे सुद्धा कठीण काम आहे.

म्हणून अनेक जण असं नाव लावन टाळतात. यासोबत बरेचसे अर्ज भरत असताना तिथे आईच्या नावाचा एक पर्याय अलीकडे उपलब्ध करून दिला जातो. पण जर तुमचे आई-वडील सोबत राहत असतील तर तुम्हाला ही दोन्ही नावे एका वेळी वापरता येतात. पण केवळ आईचा उल्लेख करता येत नाही. दोन्ही नाव एकत्रितच करावी लागतात. जर तुमचे आईवडील सोबत राहत असतील तर.

2) आई वडील विभक्त असतील तर : आई वडील विभक्त असतील तर आणि अशावेळी जर तुमची कस्टडी आईकडे असेल तर त्या वेळेस काय शिफारस आहे. समाजात अनेक माता अशा आहेत ज्या पतीपासून वेगळे राहतात. त्यांचा घटस्फोट झालेला आहे किंवा त्यांनी दुसरा विवाह केलेला आहे. अशा वेळी पहिल्या पतीपासून आलेल्या मुलांचे नाव हे त्यांच्याच नावाने चालवावे लागतात.

वडील म्हणून त्यांचच नाव असतं म्हणजे प्रामुख्याने पालक म्हणून त्यांचा नामोल्लेख असतो. जरी त्या मुलाची जबाबदारी आईकडे असली तरीही नाव त्याच वडिलांचे राहतं, असा एक वेगळा पेच तेथे निर्माण होतो. अशा वेळी महिलांना असं वाटतं की का आपण आपलं नाव नाही लावू शकत. तिथं ज्याच उत्तरदायित्व संपलेला असतानाही त्या पित्याचं नाव का म्हणून पुढे चालवायचं?

तर याचे उत्तर (उदाहरण) म्हणून आपण दिल्लीतली एक केस पाहूयात. या केसचा जो निकाल आला आहे तो जो निकाल होता. त्या केसची जी पूर्ण पार्श्वभूमी होती तिथे माझी होती आणि ती सेम आपल्या मुद्यानुसार सारखीच होती. ती जर  घेतली तर आपल्याला हे प्रकरण अधिक योग्य प्रकारे लक्षात येते.

ऑगस्ट 2021 मध्ये दिल्लीत एका प्रकरणात उच्च न्यायालयाने एक निर्णय दिला होता आणि त्यात स्पष्ट लिहिलं होतं की आपल्या आईचं नाव लावण्याचा मुलांना पूर्ण अधिकार आहे. विंध्य सक्सेना विरुद्ध पूर्व दिल्ली नगरपरिषदेच्या केस मध्ये आईने मुलीच्या नावासोबत स्वतःचे आडनाव वापरल होत. त्याविरुद्ध मुलीच्या वडिलांनी आक्षेप घेतला होता.

आणि त्यावर न्यायमूर्ती रेखा पल्ली म्हणाल्या होत्या की मुलीला ज्या नावात आनंद आहे ते नाव ती लावू शकते. तो आनंद तुम्ही हिरावून घेऊ शकत नाही. जर मुलगी असमंजस असेल तरीही तिच्या मागे तिच्या नावामागे केवळ वडिलांचेच नाव असायला हवं असं काहीही नाही. प्रत्येक मुलाला त्यांच्या आईचं नाव आणि आडनाव लावण्याचा पूर्ण अधिकार आहे.

विभक्त असलेल्या मुलीच्या आईने मुलीचे नाव बदललं होतं मुलगी अल्पवयीन असून असा निर्णय होऊ शकत नाही. आणि त्यामुळे तिला वडिलांच्या नावाने असलेल्या विमा योजनेचा फायदा घेता येणार नाही. अशी अडचण तिच्या वडिलांनी कोर्टाला सांगितले होते.

परंतु याला थारा न देता न्यायमूर्ती रेखा पल्ली म्हणाले की मुलगी का आपल्या आईच्या नावाचा उल्लेख करू शकत नाही? ही आपली मानसिकता चुकीची आहे हे इथे खेद पूर्वक नमूद कराव लागत आहे. यावरून आपल्याला हे लक्षात येईल की मुलांच्या नावामागे आईचे नाव असू शकतो. आणि आई जर मुलांसह विभक्त राहत असेल तर त्यासाठी ही केस अतिशय मार्गदर्शक आहे. यानंतर प्रश्न येतो की,

3) दत्तक मुलांसाठी आईचे नाव : दत्तक मुलांसाठी आईचे नाव असतं का? जर एखादी एकल स्त्री बाळ दत्तक घेत असेल किंवा सरोगसी पद्धतीने बाळ जन्माला घालत असेल तर त्या बाळाचे पूर्ण अधिकार तिच्याकडेच असतील. त्यामुळे माता आणि पिता म्हणून तिचेच नाव बाळाला लागू होईल. इथ वडिलांचा प्रत्यक्ष अस्तित्वात नसल्यामुळे फक्त आईच नाव वापरला जाऊ शकत.

|| बाई वापश्याची माती… वंश वेल फुलवती… तिच्या विना रुक्ष सार… बाई जगाची निर्माती…||

केवळ आपण आईच्या नावाचा उल्लेख केला तरी आपण निश्चित पणे तिच्या उपकरातून उतराई नाहीच होऊ शकत. तरीही आधुनिक विचारांमध्ये आपण असा पुढारलेला विचार करू शकतो. आणि तो विचार आपण सर्वांनी नक्कीच करावा !

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा