नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.
जगातील सर्वात श्रीमंत लोकांचे 40 प्रेरणादायी विचार :जगातील यशस्वी प्रसिद्ध आणि श्रीमंत लोक हे जन्मापासूनच यशस्वी नसतात, ते मेहनत घेतात आणि यश मिळवतात त्यांचे लक्ष नेहमी त्यांच्या ध्येयावर असते, त्यांचे प्रत्येक पाऊल योजना करून उचलले जाते, त्याच्याकडे प्रत्येक मिनिटाचा प्लॅन असतो, ते रिस्क घ्यायला घाबरत नाहीत. अपयश, टीका, संकटे, अडथळे या सर्व गोष्टींना सामोरे जाऊन ते यशस्वी होतात. अशा सर्व गोष्टींच्या भट्टीत टाकून प्रकाशित झालेल्या जगातील सर्वात श्रीमंत आणि यशस्वी लोकांचे 40 प्रेरणादायी विचार या लेखामध्ये आपण बघणार आहोत.
जेफ बेझोस: एक अमेरिकन इंटरनेट आणि एअर होस्टेस उद्योजक, तसेच इन्वेस्टर आहेत. ते संस्थापक मुख्य कार्यकारी अधिकारी आणि Amazon चे अध्यक्ष आहेत, ते आधुनिक इतिहासातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत, जेफ बेझोस त्यांचे प्रेरणादायी विचार बघूया.
यांचे प्रेरणादायी विचार आपण आता बघुयात: मला माहित होते की मी जर अपयशी झालो तर मला पश्चाताप होणार नाही. पण मी जर प्रयत्नच केला नाही तर मला पश्चाताप होईल. जर तुम्हाला संशोधक व्हायचे असेल तर अपयशी व्हायला तयार राहा. तुम्ही प्रत्येक वर्षी दुप्पट प्रयत्न कराल तर तुमचे यश देखील दुप्पट होईल.
बिल गेस्ट: मायक्रोसॉफ्टचे संस्थापक आहेत अनेक वर्षे ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तींच्या यादीत पहिल्या स्थानावर होते. 2007 मध्ये त्यांनी 40 अरब डॉलर दान केले होते. यांचे प्रेरणादायी विचार आपण आता बघुयात: स्वतःची तुलना कधीच कोणाशी करू नका. जर तुम्ही असे करत असाल, तर तुम्ही स्वतःचा अपमान करत आहात.
जेव्हा तुमच्या हातात पैसा असतो तेव्हा फक्त तुम्ही विसरता की तुम्ही कोण आहात पण जेव्हा तुमचे हात रिकामे असतात तेव्हा संपूर्ण जग विसरते की तुम्ही कोण आहात. जर तुम्ही गरीब म्हणून जन्मले तर यात तुमची चूक नाही. पण गरीब म्हणूनच जर तुमचा मृत्यू झाला तर ही मात्र तुमची चूक असेल. मी कठीण काम करण्यासाठी आळशी व्यक्तीची निवड करेल कारण आळशी व्यक्ती ते काम सोप्या पद्धतीने करण्याचा मार्ग शोधून काढेल.
इलॉन मस्क: हे दिग्गज बिझनेस मॅन इन्व्हेंटर आणि इंजिनियर आहेत ते स्पेस एक्स चे फाउंडर आणि CEO मुख्य डिजाइनर तसेच टेसला कंपनीचे फाउंडर आणि सीईओ आहे आणि असेच आणखीन काही कंपनीचे सीईओ आणि फाउंडर आहे. यांचे प्रेरणादायी विचार आपण आता बघुयात: जर तुम्हाला काही करून दाखवायचे असेल तर तुम्हाला खूप मोटिवेट राहावे लागेल नाहीतर तुम्ही नेहमी स्वतःला दुखी करत राहाल. जर तुमच्यासाठी एखादी गोष्ट अत्यंत महत्त्वाची असेल तर परिस्थिती तुमच्याविरुद्ध असतानाही तुम्ही ती गोष्ट करायला पाहिजे. खूप जास्त वेळेसाठी दुःखी राहायला जीवन खुप छोटे आहे.
वॉरन बफे: अमेरिकन इन्वेस्टर आणि उद्योजक आहेत त्यांना जगातील सर्वोत्कृष्ट गुंतवणूकदार मानण्यात येते 2008 साली ते जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती होते. यांचे प्रेरणादायी विचार आपण आता बघुयात: जर तुम्ही अशा वस्तू खरेदी करत असाल ज्यांची तुम्हाला गरज नाही. तर तुम्हाला लवकरच त्या गोष्टी विकाव्या लागतील त्या तुमच्यासाठी गरजेच्या आहेत.
प्रतिष्ठा निर्माण करण्यासाठी वीस वर्षे लागतात आणि गमावण्यासाठी फक्त पाच मिनिटे लागतात. जर तुम्ही याबद्दल विचार केला तर तुम्ही वेगळ्या पद्धतीने काम कराल. खर्च करुन उरलेल्या पैशांची बचत करण्यापेक्षा बचत करून उरलेले पैसे खर्च करा. जर आज कोणी झाडाच्या सावलीत बसलेले असेल तर ते यामुळे कि खूप वर्षाआधी कोणीतरी ते झाड लावलेले असेल.
मुकेश अंबानी: हे उद्योगपती रिलायन्स इंडस्ट्रीजचे अध्यक्ष, सर्वात मोठे शेअर होल्डर आहेत ते भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती आहेत. यांचे प्रेरणादायी विचार आपण आता बघुयात: आपण सर्व प्रत्येक वेळी संघर्ष करत राहतो, कारण आपल्याला जे पाहिजे ते आपल्याला मिळाले नाही. महत्त्वाची गोष्ट जी मी शिकलो ती ही कधीच हार मानायची नाही, कारण आपण पहिल्या प्रयत्नात यशस्वी होत नाही.
रातोरात कोणीही यशस्वी होत नाही हे लक्षात ठेवणे आवश्यक आहे तुम्हाला एकाग्र व्हावे लागेल आणि समर्पित व्हावे लागेल कठोर मेहनतीला पर्याय नाही. जीवनामध्ये रिस्क घ्या कारण तो रिस्क घेणारच असतो जो इतिहास बदलतो. प्रत्येक पाऊल योग्य नसते पण धोका पत्करून त्यातून जे शिकत जातात ते ध्येय नक्कीच गाठतात.
रतन टाटा: भारतीय उद्योजक व टाटा समूहाचे संचालक मंडळाचे पदाधिकारी आहेत. यांचे प्रेरणादायी विचार आपण आता बघुयात: आयुष्यात चढ- उतार असणारच दवाखान्यातील ईसीजी सुद्धा जर सरळ रेषेत आला तर तुम्ही जिवंत नसाल. योग्य निर्णय घेण्यावर माझा कधीच विश्वास नाही माझा विश्वास घेतलेला निर्णय योग्य सिद्ध करण्यावर आहे. आपल्या खराब सवयीबद्दल गंभीरतेने विचार करा त्यांना बदला.
जेवढी गरज आहे तेवढेच घ्यायची सवय लावा. आपण यशस्वी लोकांकडून प्रेरणा घेतली पाहिजे की जर ते यशस्वी होऊ शकतात तर मग आपण यशस्वी का होऊ शकत नाही ? पण प्रेरणा घेताना आपण आपले डोळे उघडे ठेवले पाहिजे. प्रत्येकाला माहित आहे की प्रत्येकाकडे समान पात्रता नसते परंतु आपल्यात आपली कौशल्य विकसित करण्याची समान संधी असते.
रॉबर्ट कियोसाकी : अमेरिकन बिझनेस मॅन आणि लेखक आहेत. ते रिच ग्लोबल एलएलसी आणि रिचडॅड खाजगी शिक्षण कंपनीचे फाउंडर आहेत त्यांचे Rich Dad & poor dad हे पुस्तक बेस्ट सेलर बुक आहे. यांचे प्रेरणादायी विचार आपण आता बघुयात: कधीच म्हणू नका तुम्हाला शक्य नाही, ही एका पराभूत व्यक्तीची मानसिकता आहे. शाळेमध्ये आपल्याला शिकवले जाते
की चूक करणे वाईट असते आणि चूक केल्यास आपल्याला शिक्षा मिळते पण तुम्ही जर बघितले की मानवाला कसे शिकण्यासाठी डिझाईन केले आहे तर तुम्हाला समजेल की आपण चुका करूनच शकतो. आपण पडल्यावरच चालायला शकतो जर आपण पडलोच नाही तर कधीच चालणे शिकणार नाही. जिंकणारे लोक हरायला घाबरत नाहीत अपयशी लोक घाबरतात अपयश यशस्वी होण्याच्या प्रक्रियेचा एक भाग आहे. जे लोक आपल्या पासून दूर राहतात ते यशापासूनही दूर राहतात.
हेनरी फोर्ड: फोर्ड मोटर कंपनीचे संस्थापक होते तसेच ते महान इन्व्हेंटर देखील होते. त्यांनी स्वतःची खूप संपत्ती फाऊंडेशनच्या नावे केली. यांचे प्रेरणादायी विचार आपण आता बघुयात: एकत्र येणे ही सुरुवात आहे एकत्र ठेवणे प्रगती आहे एकत्र काम करणे हे यश आहे. जो कोणी शिकत नाही तो वृद्ध आहे, मग तो वीस वर्षाचा असो किंवा 80 वर्षाचा. जो शिकत राहतो तो तरुण राहतो आयुष्यात सर्वात मोठी गोष्ट म्हणजे आपले मन तरुण ठेवणे आहे.
दोष शोधू नका उपाय शोधा जास्तीत जास्त लोक समस्येचा उपाय शोधण्याऐवजी स्वतःचा वेळ आणि ऊर्जा त्या समस्येच्या आजूबाजूलाच वाया घालवतात. अशा स्पर्धकाला घाबरायला पाहिजे जो आपल्यामुळे कधीच परेशान होत नाही त्याऐवजी आपला सर्व वेळ स्वतःचा व्यवसाय आणखी चांगला बनवण्यासाठी लावतो.
मार्क झुकरबर्ग: अमेरिकन बिझनेस मॅन आहेत आणि फेसबुक या सोशल नेटवर्किंग साईटचे फाउंडर आहेत. यांचे प्रेरणादायी विचार आपण आता बघुयात: लोक याची पर्वा करत नाही की तुम्ही काय म्हणता, काय बोलता, लोक याची पर्वा करतात की तुम्ही काय बनवता. तुम्ही प्रयत्न करावा, अपयशी व्हावे आणि त्यापासून काहीतरी शिकावे, हे काहीच न करण्यापेक्षा चांगले आहे. बिझनेसचा एक सोपा नियम आहे, जर तुम्ही सोप्या गोष्टी सर्वात आधी केल्या तर तुम्ही खूप जास्त प्रगती करू शकता. प्रश्न हा नाही की आपल्याला लोकांविषयी काय माहित करायचे आहे, प्रश्न आहे की लोकांना त्यांच्याविषयी काय सांगायचे आहे.
जॅक मा : हे चीनमधील सर्वात श्रीमंत व्यक्ती आशियातील दुसरे श्रीमंत व्यक्ती आणि इन्वेस्टर राजकारणी तसेच समाजसेवक आहेत आणि ते अली बाबा चे फाऊंडर आहेत. यांचे प्रेरणादायी विचार आपण आता बघुयात: कधीही हार मानू नका आजचा दिवस खडतर आहे उद्याचा दिवस आणखीनच अवघड होईल पण परवा आशेचा किरण भेटेल.
जर आपण कधी प्रयत्न केला नसेल, तर संधी आहे हे तुम्हाला कसे समजेल? आयुष्य खूप लहान आहे, सुंदर आहे. कामाबद्दल इतके गंभीर होऊ नका, जीवनाचा आनंद घ्या. आपण जर हार नाही मानली तर आपल्याकडे आणखी एक संधी असते पराभव स्वीकारणे हेच सर्वात मोठे अपयश आहे.
तर मित्रांनो जगातील सर्वात श्रीमंत व्यक्तीचे हे शक्तिशाली विचार तुम्हाला नक्कीच आवडले असतील. तुम्हाला सर्वात जास्त आवडलेला विचार कमेंट करा, पोस्ट लाईक करा आणि आपल्या मित्रांसोबत लेख शेअर करा.
सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.