शेत जमीन खरेदी-विक्री।। नियम आणि कायदे ।। सर्वांना उपयुक्त अशी माहिती अवश्य वाचा

लोकप्रिय शैक्षणिक

शेती विषयक माहती » खरेदीच्या नोंदी: जमीनीची खरेदी व विक्री हा दोन पक्षकारांमधील साधासरळ व्यवहार न राहता अनके वेळा तो विविध कायदेशीर तरतुदींमुळे किंवा लोकांच्या प्रवृत्तीमुळे सरळ व्यवहार ठरत नाही. किंबहुना शेतकऱ्यांमधील दाव्यामुळे सरळपणे न झालेल्या खरेदी – विक्री  व्यवहारांचे प्रमाण फार मोठे आहे. उदा. एखादा शेतकरी मुलीच्या लग्नासाठी दुसऱ्याकडून हातउसने पसै घतो. पीक आल्यानंतर पैसे फेडायची बोली असते.  

काहीतरी अडचण यते किंवा पिकाची अपेक्षित किंमत येत नाही आणि त्यामुळे दिलेला शब्द मोडला जातो. मग दुसरा शेतकरी तुमच्याने पैसे फिरायचे नाहीत असे म्हणतो. गावातील प्रतिष्ठितांसोबत बैठका होतात उधार दिलेले पैसे वेळेत परत येत नाहीत असे लक्षात आल्यावर जमीन लिहून घेण्याचे ठरते आणि इच्छा नसताना देखील पैसे घेतलेल्या शेतकऱ्याला खरेदी खत किंवा साठे खत करून द्यावे लागते.

नंतर नोंद होताना मात्र नोंदणी विरोधात तक्रार केली जाते किंवा ताबा देताना भांडणे सुरु होतात. अशा प्रकरणात खरोखर व मनापासून खरेदीखत झालेले नसते. परंतु कायदेशीररित्या जमिनीचा व्यवहार पूर्ण झालेला असतो. प्रत्येक वेळी हेच कारण असेल असेही नाही. कधी कधी राजकीय किंवा सामाजिक कारणावरून जमिनीचे व्यवहार नोंदविताना अडवणूक केली जाते.

खरेदी – विक्री व्यवहारामध्ये मूलतः खालील ४ घटक महत्वाचे असतात: १. जमीन विक्री करणारा जमीनीचा मालक. २. जमीन खरेदी घेणारा खरेददार इसम. ३. जमीनीमधील जमीनीची ठरलली किंमत. ४. जमिनीच्या खरेदीबद्दल प्रत्यक्षरित्या होणार रजिस्टर व्यवहार एवढया चारच महत्वाच्या व ठळक पैलू असणाऱ्या या खरेदी विक्री व्यवहारामधून मात्र असंख्य प्रकारचे दवे उभे राहताना आपण पाहतो. या सर्व दाव्यांमागे खरेपणा नसणारा माणूस उभा आहे हे निर्विवादपणे लक्षात घेतले पाहिजे.

उदा. जमीन ज्यांच्या नावावर आहे तो खरेदीदार स्वतःला मालक म्हणवतो व मालक म्हणूनच दुसऱ्याला खरेदीखत करून देतो व त्यानंतर त्याचा भाऊ किंवा नातेवाईक या जमिनीत हिस्सा आहे व मलाही या जमिनीचा मोबदला रक्कम मिळायला पाहिजे असा दावा करून दिवाणी न्यायालयात जातो व मनाई मागतो. या उदाहरणात कागदावरचा जमीन मालक एक व त्याच्यामागे दडलेले व दावा करणारे असंख्य जमीन मालक हा एक पैलू आहे.त्यामुळे खरेदी विक्री करताना खालील प्रत्येक टप्प्यावर योग्य ती दक्षता घेतली पाहिजे.

जमीन खरेदी करण्यापूर्वी घ्यावयाची काळजी: वास्तविक जमिनीचे व्यवहार करण्यापूर्वी जमिनीच्या संदर्भात खरेदीदाराने खालील मुद्यांवर खात्री केली पाहिजे. १. जमिनीचा चालू ७/१२ उतारा २. ७/१२ प्रमाणे प्रत्यक्ष जमीन मालकाचे नाव. ३. ३० वर्षांपासूनच्या सर्व फेरफार नोंदी तपासून किंवा त्यामागेही जाऊन साधारण १९४७-४८ चे ७/१२ उतारे पाहून हि जमीन या माणसाच्या नावावर कशी झाली याबाबतची खात्री.

४. जमिनीमध्ये नाव न नोंदवलेले मात्र जमिनीत हिस्सा मागू शकतील असे काही कायदेशीर हिस्सेदार आहेत का याची खात्री. ५. जमिनीच्या इतर हक्कांमध्ये बँकेचा किंवा अन्य वित्तिय संस्थेचा भार आहे का? ६. जमीन प्रत्यक्ष मालकाच्याच वहिवाटीच्या आहे का? ७. मालकाच्या वहिवाटीच्या नसल्यास प्रत्यक्ष वहिवाट करणाऱ्या किंवा जमीन ताब्यात असणाऱ्या व्यक्तीच्या हक्कांचे स्वरूप. ८. इतर हक्कांमध्ये कुल किंवा अन्य व्यक्तींचे हक्क.

९. जमिनीच्या नावावर असलेले क्षेत्र आणि प्रत्यक्ष ताब्यातील क्षेत्र. १०. ७/१२ वर किंवा तोंडी सांगितल्या जात असलेल्या विहिरी व झाडे इत्यादी तपशिलाची प्रत्यक्ष खात्री ११. सर्वसाधारणपणे गावामध्ये अशा प्रकारच्या जमिनीचे चालू असलेले बाजारभाव १२. संभाव्य जमीन व्यवहारामुळे प्रस्थापित असलेल्या वत्याही कायद्याचा भंग होतो का? याची खात्री केली गेली पाहिजे. तुकडेबंदी कायदा, पुनर्वसन कायदा,भूसंपादन कायदा,नागरिकमल जमीन धारण कायदा इत्यादींचा समावेश होतो.

जमीन खरेदी व्यवहार नोंदविताना घ्यावयाची काळजी: जमिनीचे व्यवहार एकदा तोंडी किंवा चर्चेने ठरल्यानंतर खालील बाबतीत काळजी घेतली पाहिजे. १. जमिनीची नोंदणी रजिस्टर पद्धतीनेच केली पाहिजे. ५ रु . १० रु किंवा अन्य प्रकारच्या स्टॅम्प पेपर वर सह्या घेऊन व्यवहार पूर्ण होत नाही. भारतीय नोंदणी कायद्यानुसार १०० रुपयेपेक्षा जास्त किंमत असलेल्या मिळकतीच्या बाबतीत व्यवहार हा रजिस्टर असला पाहिजे.

२. खरेदीखताच्या प्रत्यक्ष लिहिण्याच्या मजकुराचे स्वरूप: माहितीगार व्यक्तीकडून किंवा वकिलामार्फत व्यवहाराचे स्वरूप लिहिले गेले पाहिजे. यामध्ये पुढील अनेक वर्षाचा विचार करून खरेदीखतात कोणकोणत्या बाबींचा उल्लेख केला गेला आहे व विषेशतः पुन्हा वाद निर्माण होऊ शकतील का अशा बाबी आहेत का हे तपासले पाहिजे. उदा. सामायिक विहिरीतील हिस्सा, पाण्याच्या पाळ्या, फळझाडामधील हिस्से, बांधावरील झाडे व जमिनीवरील झाडे यांचा स्पष्ट उल्लेख, शेत किंवा घराच्या किमतीचा स्पष्ट उल्लख असला पाहिजे.

३. प्रत्यक्ष जमिनीची रक्कम कशा पद्धतीने दिली जाणार आहे हे ठरवूनत्याप्रमाणे व्यवहार केला पाहिजे आणि त्याचा उल्लेख खरेदीखतात असला पाहिजे. ४. रजिष्ट्रेशन च्या वेळी साक्षीदार हे प्रतिष्ठित व आपला शब्द न बदलणारे असले पाहिजे. ५. रजिष्ट्रेशनसाठी आवश्यक असणारे व शासनाच्या नियमानुसार द्येय असणारी स्टॅम्प ड्युटी व रजिष्ट्रेशन फी याची खात्री केली पाहिजे. ६. आवश्यक असेल तेव्हा आयकर खात्याचे प्रमाणपत्र घेतले पाहिजे.

जमीन खरेदीनंतर खातेदाराने घ्यावयाची काळजी:
१. ज्या महिन्यात जमिनीचा व्यवहार नोंदविला गेला आहे त्या पुढील महिन्याच्या ५ तारखेपर्यंत अशा व्यवहारांची यादी सब रजिस्ट्रार कार्यालयातून तहसीलदारामार्फत तलाठ्याकडे पाठविली जाते. त्यामुळे साधारणपणे पुढील महिन्याच्या १० तारखेनंतर या व्यवहाराची सूची तलाठ्याकडे प्राप्त होते. त्या दरम्यान तलाठ्याकडे सूची-२ ची माहिती आली आहेका याची खात्री करावी. अन्यथा वर्दी अर्ज व त्यासोबत रजिस्टर खरेदीखताची प्रत जोडूनि तलाठ्याकडे अर्ज द्यावा.

२. जमीन खरेदी करणाऱ्या सर्व जमीन मालकांचे पत्ते एका कोऱ्या कागदावर लिहून ते वर्दी अर्जासोबत जोडावेत. त्याचप्रमाणे खरेदी घेतलेल्या जमिनीचे ७/१२ व ८-अ चे उतारे जोडावेत.३. वर्दी अर्ज किंवा सूचीवरून फेरफार नोंद गावी दप्तरी लिहिली जाते व त्यांनतर फेरफाराची नोटीस संबंधितांना दिली जाते. खरेदीदाराने स्वतःहून हि नोटीस प्राप्त करून घेणे त्याच्या हिताचे आहे. ४. मुर्तीचा १५ दिवसाच्या आत हितसंबंधी व्यक्ती या फेरफार नोंदीबद्दल हरकत घेऊ शकता. अशा काळात मूळ जमीन मालकाने नोंद करण्यास हरकत नसल्याचे पात्र पाठविले आहे कि नाही याची खात्री केली पाहिजे.

५. फेरफार नोंदीची नोटीस मिळाल्यानंतर या नोटिसीमध्ये प्रत्येक तपशील बरोबर आहे कि नाही याची खात्री करून घ्यावी. विशेषतः खरेदीचा दिनांक, दस्त क्रमांक, सर्व व्यक्तींचे नावे, खरेदी केलेल्या जमिनीचे गट नंबर, त्याचे क्षेत्र, आकार, यांचा अचूक उल्लेख हे सर्व तपासून घ्यावे. ६. अशा प्रकारे फेरफार नोंद लिहून त्यानंतर किमान १५ दिवसाची नोटीस देऊन झाल्यांनतर व कोणाचीही हरकत आली नाहीतर मंडळ अधिकारी हि नोंद प्रमाणित करतात.

नोंद प्रमाणित केल्याबद्दल दोन ओळींचा स्पष्ट आदेश फेरफार नोंदीच्या शेवटच्या रकान्यात केला जातो. त्यामध्ये साधारणपणे खालील प्रकारचा मजकूर असतो. उदा. अ. नोंदणीकृत खरेदीखतावरून पडताळून लिहिले. संबंधितांना नोटीस रुजू हरकत नोंद प्रमाणित. आ. संबंधितांना नोटीस बजावली. या व्यवहारामुळे पुनर्वसन कायद्याचा भंग होतो त्यामुळे नोंद रद्द करण्यात येत आहे. ७. फेरफार नोंद प्रमाणित केल्यानंतर लगेचच ७/१२ वर या नोंदीचा अंमल दिला जातो व ७/१२ वरील नवे दुरुस्त केली जातात. त्यांनतर दुरुस्त झालेले ७/१२ व ८-अ चे उतारे प्राप्त करून घेऊन खरेदीदार व्यक्तीने आपल्या संग्रही ठेवले पाहिजे.

हे लक्षात ठेवा:
१. खरेदीच्या नोंदीमध्ये वाद झाला तर तो महसूल अधिकाऱ्यापुढे चालतो परंतु मुळातच जमिनीचा मालकी हक्क आहे किंवा नाही असा वाद निर्माण झाल्यास असा वाद दिवाणी न्यायालयापुढे चालतो. २. शक्यतो थेट जमीन मालकाशी व्यवहार करावेत. ३. मध्यस्थांमार्फत मुखत्यारपत्राच्या आधारे व्यवहार होत असतील तर मूळ जमीन मालकाकडे देखील विचारणा करून खात्री केली पाहिजे व मुखत्यारपत्र अस्तित्वात असल्याबाबत सुद्धा खात्री केली पाहिजे. ४. जमीन ताब्यात जरी लगेच मिळाली असली तरी खरेदीची नोंद सुद्धा लगेचच होईल असे पहिले पाहिजे. उशिरा नोंदी झाल्यामुळे प्रकरणाची गुंतागुंत वाढू शकते. ५. अर्धवट व्यवहार करणे टाळले पाहिजे व एकाच वेळी पूर्ण व्यवहार करून तो नोंदविला गेला पाहिजे.

24 thoughts on “शेत जमीन खरेदी-विक्री।। नियम आणि कायदे ।। सर्वांना उपयुक्त अशी माहिती अवश्य वाचा

 1. जमीन खरेदी व विक्री करताना मुळ कागदपत्रे 6ड वरील सामाईक रस्ते असताना मालकी हक्काचा केला गटविभाजन झालेले नाही नोटीस पण नाही मिळाली आहे व मोजणी झालेली नाही फेरफार ला हरकत घेतली ऑनलाईन होती मंडळआधिकारी यांचे कडे तारीख होती हया नोंदणी केली व खरेदी दाराचे नाव उपविभागीय आधिकारी यांचे कडे आपिलात तारीख चालु आहे

 2. मला आपलीं माहिती आवडली आमचीही ४४एकर जमीन एका मंत्र्याने घेतली आहे.वीस वर्षांपूर्वी त्यांनी खोटे कागदपत्र तयार करून त्याचं नाव ७/१२ वर लावलं आहे.. खरेदीखत वैगरे त्यांनी आम्हाला विचारले सुध्दा नाही.. आता आम्ही काय करू शकतो…
  मला मार्गदर्शन करावे ही विनंती..माझा मोबाईल नंबर.८२०८६५३७७३..सुनिल उमाकांत बेडे..

  1. उपयुक्त माहिती दिलीत त्याबद्दल धन्यवाद 🙏
   माझ्या आईला 3मुली असल्यामुळे म्हातारपणाचा आधार म्हणुन तिच्या आजीने अडीच एकर तिच्या नावावर करून दिली.पण दिल्यापासून दिल्यापासून 27 वर्षे झाली तरीही माझी मामी करुन खाते. त्यातील माझ्या आईला नावावर असून सुद्धा इतक्या वर्ष काहीच नाही दिले. आता तिघिंची पण लग्न झाली आहेत. आता त्यांना त्या जमिनीची खरंच खुप गरज आहे. माझ्या आईला ताबा द्यायला ते टाळंमटाळ करतात.
   माझ्या आईला ती जमीन विकायची आहे तर ती विकु शकते का?
   कृपया मार्गदर्शन करावे 🙏
   Swapnali bhoite 8149938553

  2. ऊपयुक्त माहिती आहे आभार

   1. नमस्कार, मी शरद उपाध्ये
    आपली शेत जमीन विकायची आहे. ती विकताना शेजारील शेतकऱ्याची ज्याच्याकडून ती जमीन खरेदी केली त्याच्या संमतीची आवश्यकता आहे का?
    जमीन विकत घेण्याचा पहिला अधिकार शेजारील शेतकऱ्याचा असतो का?
    जमिनीचा गट नंबर तोच आहे.

 3. ज्यांच्या कडे स्वत:ची शेती नाही जय शेती घ्यायची असेल तर शेती घेऊ शकतो का क्रिपया मार्गदर्शन करावे

  1. नमस्कार
   हे सर्व नियम मोडून वयवहार झालेले आहे हे कागदपत्र कोण बघायला पाहिजे रजिस्टर ऑफीसमध्ये कागदपत्रे असे बघीतले नाही आणी हे करताना वरील गोष्टी प्रमाणे एक ही पुर्ण नसताना वयवहार झाला हरकत घेतली तरी पण पैसे पुढे काय आता दंडेलशाही करतो न मोजणी करता गटविभाजन झालेले नोटीस पण नाही हा व्यवहार कसा नयाय कायद्याच्या चौकटीत राहुन हे व्यवहार होत नाही व सामान्य शेतकरी भरडला जात आहे

 4. आम्ही ४६सभासदानी ९०.० आर जमीन नामदेव भैरु कासार चिफप्रमोटर अवधूत सहकारी गृहनिर्माण संस्था गारगोटी यांचे नांवे १५-१२-८४ रोजी रजिस्टर दस्ताने खरेदी केली.संसथेचे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या गारगोटी शाखेत ₹ ३८२५/- भरून खाते उघडले.सभासददांचे कडून प्लॉटसाठी घेतलेली अनामत रक्कम बॅंक खात्यात जमा न करता स्वतः वापरली.बीगरशेती लेआऊट नकाशामध्ये बदल करुन आणि राखीव जागेवर प्लॉट पाडले.१९८६अखेर संस्था रजिस्टर झाली नसताना कासार यांनी १५-१६ सभासदांना आणि ५-६ बीगर सभासद व्यक्तीना रजिस्टर खरेदीखत करून देताना नामदेव भैरु कासार विद्यमान चेअरमन अवधूत सहकारी गृहनिर्माण संस्था गारगोटी रजिस्टर नंबर केपीआर/—-/स्थापना दिनांक २३-११-१९८३ अशी नोंद करून खरेदीखत करून दिली.सहा.निबंधक भुदरगड गारगोटी यांनी केलेल्या तक्रार अर्जाची दखल घेतली नाही
  १५-१०-१९८७ रोजी सहा निबंधक सहकारी संस्था गारगोटी यांनी बॅंक खात्यातील रक्कम काढून सर्व सभासदांना समान प्रमाणात वाटप करण्यात यावी म्हणून लेखी आदेश दिला, येथुन पुढे संस्थेच्या नावाचा, शिक्याचा वापर करता येणार नाही असे कळविले होते पण कासार यांनी सर्व सभासदांना समान प्रमाणात वाटप न करता फक्त प्रमोटर कमिटीच्या सदस्यांना बेरर चेकने वाटप केली.मी प्रमोद कमिटीचा सदस्य नात्याने चेक स्विकारला नाही.१२-२-१९९० रोजी तलाठी गारगोटी आणि मंडळ अधिकारी यांनी संस्थेच्या ७/१२ आणि डायरी वर नामदेव भैरु कासार चेअरमन अवधूत सहकारी गृहनिर्माण संस्था गारगोटी अशी खोटी नोंद करून दिली.१९९० नंतर कासार यांनी ७/१२ आणि डायरी वर नामदेव भैरु कासार चेअरमन अवधूत सहकारी गृहनिर्माण संस्था गारगोटी अशी नोंद असताना सभासदांना आणि बीगर सभासद व्यक्तीना आपण “खातेदार”(जागेचा मालक) म्हणून जादा रक्कम घेऊन रजिस्टर खरेदीखत करून दिली.या खोट्या नोंदी मंजूर करून दिल्या बद्दल मा.उपविभागिय अधिकारी राधानगरी यांना तक्रार अर्ज फेब्रुवारी २०१० मध्ये दाखल केला.तहसिलदार भुदरगड यांनी ४-५चौकशी अहवाल सादर केले पण कारवाई केली नाही, कासार यांना चौकशीसाठी बोलावले गेले नाही.बीगरशेती कायद्याचे ऊलंघन केले गेले, चुकीच्या पध्दतीने ७/१२ आणि डायरी मंजूर केल्या गेल्या आहेत याची चौकशी केली नाही. उलट मला दिवाणी न्यायालयात दावा दाखल करण्याचा सल्ला दिला.
  नामदेव भैरु कासार आणि तलाठी गारगोटी आणि मंडळ अधिकारी गारगोटी यांनी केलेल्या खोट्या नोंदी आणि गैरव्यवहारा बाबत सहा.निबंधक, भुदरगड आणि मा.तहसिलदार, भुदरगड किंवा मा.उपविभागिय अधिकारी आजरा-भुदरगड यांना चौकशी करून कायदेशीर कारवाई करण्याचे अधिकार नाहीत कां?
  उपनिबंधक, भुदरगड यांनी नियम, निकष, अटींचे उल्लंघन करून बीगरशेती लेआऊट, सभासद यादी, प्लॉट नंबर, क्षेत्रफळ, राखीव जागा,रस्ते जागेचा ७/१२, डायरी वरील नोंद, संस्था रजिस्टर नसताना विद्यमान चेअरमन अवधूत सहकारी गृहनिर्माण संस्था गारगोटी अशी खोटी नोंद करून खरेदीखत करून दिली आहेत.हे मुद्रांक शुल्क कायद्याचे ऊलंघन होत नाही कां? या बाबत मी मा.जिल्हाधिकारी, कोल्हापूर,मा.उपनिबंधक, सहकारी संस्था कोल्हापूर,मा.सह निबंधक मुद्रांक शुल्क, कोल्हापूर यांना ई-मेल द्वारे पाठविलेल्या कोणत्याही तक्रार अर्जाची चौकशी करून कारवाई केली नाही.
  या बाबत योग्य ते मार्गदर्शन करावे ही विनंती.
  आपला,
  रणदिवे नारायण शंकरराव (जेष्ठ नागरिक)
  अवधूत कॉलनी गारगोटी, कोल्हापूर.
  ०९९६०६३६६५५.

 5. विजय सारभुकन,माझा गट न. ३३.६ गुंठे पैकी २९.४ गुंठे (३ खातेदारांची) भातशेत जमीनी चा खरेदीचा व्यवहार झाला आहे, रजिस्टर साठेखत झाले आहे. खरेदी नंतर सदर शेत जमीनीस तुकडा बंदी कायदा लागू होइल का? सात बारावर ४ खातेदार आहेत.एका खातेदारांची ४.२ गुंठे सोडून हा व्यवहार ठरला आहे. यातील ४ खातेदार पैकीं १खातेदार मयत आहे परंतु त्यांचे वारस यांना हिस्सा देणे आहे. क्रुपया मार्गदर्शन करावे.

 6. आम्ही उंद्री पुणे येथे 2 गुंठा प्लॉट घेत आहोत. पण पुण्यातील जागेचे अग्रीमेंट बंद आहेत असे सांगण्यात येत आहे. हे खरे आहे का ?

 7. मी जमीन खरेदी केली घरचं चार जनांनी तिघांचं फेर लागलं सातबारावर आणि एक नोंद नामंजूर केली मंडळ अधिकारी यांनी खरेदी असताना चूक कोणाची आहे..

 8. शेतजमीन खरेदी करताना जे क्षेत्र खरेदी खतामध्ये लिहिले आहे ते सातबारा उतार्या प्रमाणे बरोबर आहे परंतु प्रत्यक्षात क्षेत्र ताबा कमी आहे त्या बाबतीत न्यायालयात दाद किती दिवसात मागू शकतो

 9. एखादा खरेदी व्यवहार झाला असेल तर त्या बद्दल किती दिवसात तक्रार केली तर ग्राह्य असते

 10. मी आमचे नातेवाईक यांच्या कडून शेत घेतले आहे पूर्ण पणे रजिस्टर ऑफिस चे नियमात पण आत्ता त्यांचे नातेवाईक शेत परत मागत आहे मी शेत पूर्ण पण खरेदी केले आहे ते पण नियमा प्रमाणे

  कृपया काही सल्ला सांगा
  8007646280

 11. माझ्या जमिनीचा 7/12 माडबागायत व भेट जमीन असा आहे। पैकी 10 गुंठे माडबागायत प्रतिज्ञा पत्र करून योग्य स्टॅम्प ड्युटी भरून विकले आहे। सब रजिस्ट्रार माड बागायती चा भागाचा निराळा 7/12 केल्याशिवाय रागिद्तर्शन करत नाही। निराळा 7१२ करण्यासाठी 6 महिने जातील । या पूर्वी मी आधी माड बागायत जमीन विकली होती व त्याचे रजीस्ट्रेशनही झाले होते । 6 महिन्या नंतर रिफंड मिळणार नाही तर काय करावे ।

 12. 1500sqft cha plot 2003 madhe Nagpur mauja Bokara yethe ghetla purn rakam dili Shree Chandu Kale yahi rgestri band aahe mahnun notry Karun dili registry Suru zalya barobar Karun gheu ase mahnale parantu aata kalle ki plot metro Road madhe Gela Kay karave

 13. आम्ही शेतीची जागा विकली त्याने पैसे अर्धे दिले आणि बाकीचे द्यायचे आहे 2 वर्ष त्याला मुडत दिली पण त्याने पैसे नहीं दिले तर आता आम्ही काय करावं please सांगा rules पण सांगा

  1. माझ्या वडिलाची जमिन 1968नंतर एकत्रिकरणात परगावात आसनार्या वडिलांच्या चुलत्याच्या नावे फसवनूकिने केलीय त्यावेळी माझे वडिल अज्ञानी (वय 17)होते आता आमची जमिन परत मिळवण्या साठि काय करावे

 14. 3वर्षांपूर्वी आईने स्वतः खरेदी केलेली जमीन मुलाच्या नावे खरेदी करून दिली. आता पुन्हा आई व दोन बहिणी दावा दाखल करून खरेदी फिरवू शकतात का?

Comments are closed.