जमिनीचा गट नकाशा ।। प्लॉट चा नकाशा ।। गाव नकाशा पहा तुमच्या मोबाईलवर ।। जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया !

लोकप्रिय शेती शैक्षणिक

मित्रांनो गट नकाशा काढणे, गाव नकाशा काढणे, जमिनीचा आणि तुमच्या प्लॉटचे नकाशे काढणे याची सुविधा ऑनलाइन सुरु झाली आहे. ऑनलाइन आपण जमिनीचा, प्लॉटचा नकाशा कसं काढू शकतो याबद्दल माहिती आपण आज करुन घेऊया. मित्रांनो आपल्या गावाचा,

जमिनीचा किंवा प्लॉटचा नकाशा पाहण्यासाठी सगळ्यात आधी मोबाइलमध्ये गूगल(google) सुरु करा आणी त्यात टाइप करा, https://mahabhumi.gov.in/Mahabhumilink/ आणि ही वेबसाईट सुरु करा. डावी बाजुला वर तुम्हाला भाषा बदली करण्याची सोय आहे, इंग्लिश किंवा मराठी.

-वेबसाईट मध्ये सशुल्क सेवा आपल्या दिसून येईल, त्याच्यामध्ये डिजिटल स्वाक्षरीचा 7/12 ही आपण पाहू शकतो. – वेबसाईट वर आपण सशुल्क सेवाच्या खाली ई- रेकॉर्ड (संग्रहित दस्तावेज) म्हणजेच जून 1955 पासूनचे 7/12, फेरफार ही दस्तावेज मिळतील.

– वेबसाईट वर आपण निशुल्क सेवेच्या खाली ई- हक्क म्हणजेच फेरफारसाठी आपण स्वतः अर्ज दाखल करू शकतो. -वेबसाईट वर आपण निशुल्क सेवेच्या खाली आपली चावडी या भागातून गावातील सुरू असलेल्या व्यवहाराचे, चावडी वरती कुणी जमीन विकली आहे,

किंवा कुणाच्या जमिनीवरती बोझा आहे, किती चढलेला आहे, ह्या सर्व गोष्टी आपण इथून पाहू शकतो. त्याच बरोबर आपला 7/12 म्हणजेच भू-लेख, किंवा ऑनलाईन भरलेला 7/12 सुद्धा आपण पाहू शकतो. आता मित्रांनो आपण मुद्द्यावर येऊया, सशुल्क सेवेच्या खाली महा-भू-नकाशा (गाव भूमापन नकाशा) या बटन वर क्लिक करायच आहे.

त्याच्यावर क्लिक केल्यावर लगेच एक नवीन लिंक सुरू होईल, तिथून आपण दुसर्‍या वेबसाईट वर जाऊया. लक्षात घ्या मित्रांनो की ही वेबसाईट भरपूर हळू चालते. डाव्या बाजूला सगळ्यात वरती ऑनलाईन विसीटरचा क्रमांक दिसेल. तर आपण सहज रात्रीच्या वेळेस, जेव्हा कमी लोक ऑनलाईन असतिल तेव्हा वेबसाईटवर काम करा नाहीतर आपल नेट भरपूर फास्ट पाहिजे की आपल्याला त्रासदायक ठरणार नाही.

– मित्रांनो डाव्या बाजूला आपल्याला स्टेट दिसून येईल, तिथे महाराष्ट्र असू द्यावे, नसेल तर महाराष्ट्र सिलेक्ट करावे. – त्यानंतर आपण ग्रामीण भागातील गावचा नकाशा पाहत असलो तर रुरल(Rural) हा ऑप्शन निवडा, आणि जर आपण शहरी भागाचा नकाशा बघत असलो तर अर्बन(Urban) ऑप्शन निवडा.

-त्यानंतर आपण जिल्हा निवडायचा आहे, जिल्ह्यातून स्पष्ट निवड करण्यासाठी जिल्हा कोड पण पाहू शकतो. – त्यानंतर आपल्याला तालुका निवडायचा आहे, आपण निवडलेल्या जिल्ह्यात कुठला तालुका आहे. – त्यानंतर आपल्याला गाव किंवा क्षेत्र निवडायचा आहे,

भरपूर गाव असल्यामुळे योग्य गाव निवडायचा आहे. नाव वर क्लिक केल्यावर आपल्याला गावाचा नकाशा दिसून येईल. जर आपण मोबाईलचा वापर करतोय तर होमच्या बाजूला एक त्रिकोण एरो दिसेल, त्यावर क्लिक केल्यावर आपल्याला नकाशा दिसून येईल.

एक वेळा गावाचा नकाशा दिसल्यावर आपल्याला सर्वे क्रमांक टाकायचा आहे, लगेच आपण टाकलेला सर्वे क्रमांक असलेला भाग नकाशात जांभळ्या रंगात दिसेल. अधिक माहिती जाणून घेण्यासाठी, किंवा नकाशा डाऊनलोड करण्यासाठी, डाव्या बाजूला प्लॉट इंफो मध्ये Map Report चा ऑप्शन वर क्लिक करायचा आहे.

तुमचा नकाशा डाऊनलोड झाल्यावर, तुमच्या सर्वे क्रमांक सोबत जवळच्या काही सर्वे क्रमांक ही दिसून येईल. त्या बाजूला कुठले कुठले रस्ते आहेत, अश्या सर्व प्रकारच्या गट नकाशा आपल्याला यामधून स्केल सोबत दिसून येईल. मित्रांनो जर आपल्याला जमिनीची जागा आणि त्याबद्दल काही गणित करायचा आहे तर उजवीकडे वरती आपल्याला Coordinates दिसून येईल, ज्याचा उपयोग करून आपण आपल्या जमिनीचा calculation करू शकतो.

हा ऑप्शन झाला गावाचा, किंवा ग्रामीण भागाचा नकाशा कसा बघायचा, आता आपण बघू की शहराचा नकाशा कसा बघायचा. मित्रांनो शहराचा नकाशा पाहण्यासाठी आपल्याला कॅटेगरी मध्ये अर्बन सिलेक्ट करायचे आहे, जेणेकरून आपण शहरी भागाचा नकाशा बघता येईल.

त्यानंतर आपण जिल्हा निवडून घेऊया, आणि मग तालुक्याचे निवड करायचे आहे. त्यानंतर आपण शहराचा नाव निवडून टाइप city map सिलेक्ट करायचा आहे. आपला प्लॉट क्रमांक टाकल्यावर आपल्याला लगेच उजव्या बाजूला आपल्या सर्वे क्रमांकाचा आणि त्या बाजूच्या काही सर्वे क्रमांक चा नकाशा दिसून येइल. मित्रांनो आपण सिलेक्ट केलेल्या प्लॉट चा नकाशा हा जांभळ्या रंगाचा दिसून येईल.

प्लॉट इंफो मध्ये मित्रांनो आपल्याला दोन ऑप्शन दिसतील, 1.Property card 2.Map report. Map report वर क्लिक केल्यावर आपल्याला आपल्या प्लॉट चा संपूर्ण नकाशा बघता येईल. Property card वर क्लिक केल्यावर त्या जमिनीचा/प्लॉटचा संपूर्ण property card आपल्याला दिसून येईल. मित्रांनो अश्या प्रकारे आपण आपल्या जमिनीचा, प्लॉटचा किंवा क्षेत्राचा नकाशा बघु शकतो आणि डाऊनलोड सुद्धा करू शकतो.

सूचना-नोंदणी प्रक्रिया ह्या वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळासिस्टीम अपडेट मध्ये त्यात बदल घडतात, वर नमूद माहिती ही सध्या उपलब्ध असलेल्या माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी आपणास भविष्यात जर बदल घडला तर अद्ययावत माहिती घ्यावी,

अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

6 thoughts on “जमिनीचा गट नकाशा ।। प्लॉट चा नकाशा ।। गाव नकाशा पहा तुमच्या मोबाईलवर ।। जाणून घ्या संपूर्ण प्रक्रिया !

 1. archived documents of following only are available
  Document Availability List/ कागदपत्र उपलब्धता यादी
  Districts / जिल्हा
  1. Akola / अकोला
  2. Amravati / अमरावती
  3. Dhule / धुळे
  4. Mumbai Suburban / मुुंबई उपनगर
  5. Nashik / नाशिक
  6. Palghar / पालघर
  7. Thane / ठाण

 2. In BhuNaksha app,Taluka Palus,Ramanandnagar village is not showing in Picklist??

 3. कामठी कुभारे किलोने चा नकाशा नव्हता रजिस्टर नोंदनि नुसार जमीन मोजली क प्रत मध्ये कसला नं लिहिले पलाट नं कुठे गेला

Comments are closed.