जमिनीची सनद म्हणजे नक्की काय, त्याच्यात काय माहिती असते, ती कशी मिळते ती कोण देते, आणि जर ती सहद हरवली किंवा नष्ट झाली तर काय करता येतं? याची थोडक्यात आणि महत्त्वाची माहिती या लेखातून जाणून घ्या !

लोकप्रिय शेती शैक्षणिक

नमस्कार, जमिनीची सनद हा शब्द आपल्यापैकी अनेकांनी ऐकलेला असेल. आपल्यापैकी काही लोकांनी ही जमिनीची सनंद पाहिली सुद्धा असेल, तर ही जमिनीची सनद म्हणजे नक्की काय, त्याच्यात काय माहिती असते, ती कशी मिळते ती कोण देते, आणि दुर्दैवाने जर ती सहद हरवली किंवा नष्ट झाली तर काय करता येतं? याची थोडक्यात आणि महत्त्वाची माहिती घेऊया.

सर्वसाधारणतः राज्य शासना द्वारे विविध ठिकाणच्या जमिनींची आणि गावांची भूमापनाची कामे हाती घेण्यात येतात. आता भूमापनची काम हाती घेण्यात तेव्हा ज्या भागात हे काम चालू आहे तिथल्या सगळ्या जमिनीची, जमिनीच्या तुकड्याची, इमारतींची, बांधकामांची या सगळ्याची माहिती संकलित करण्यात येते.

आणि या संकलित केलेल्या माहितीच्या आधारे नकाशे आणि नोंदवहया तयार करण्यात येतात. जे पुढे रेकॉर्ड म्हणून कामाला येत. आता काही वेळेला समजा एखाद्या गावामध्ये भूमापनाचा असं काम चालू आहे आणि एखाद्या ग्रामपंचायतीने त्या ग्रामपंचायतीच्या अधिकारक्षेत्रात ज्या काही जमिनी आहे किंवा बांधकाम वगैरे आहे

त्याचं भूमापन करून नकाशे बनवण्याची जर विनंती केली आणि त्याच्या करता येणारा खर्च सोसायची तयारी ग्रामपंचायतीने दाखवली तर राज्य शासना द्वारे असं काम करण्यात येतो आणि त्यानुसार नकाशे वगैरे बनवण्यात येतात. आता जेव्हा ग्रामपंचायतीच्या विनंतीनुसार त्या ग्रामपंचायतीच्या क्षेत्रफळ असलेले किंवा अधिकार क्षेत्रातले जमिनीचे,

बांधकामाचे तुकडे किंवा सगळ्या नोंदी वगैरे तयार करण्यात येतात तेव्हा त्याच्या करता स्वतंत्र नकाशे आणि नोंदवह्या करण्यात येतात. काही वेळेला ही नोंदणी एकदा सगळी पूर्ण झाली की त्या नोंदीनुसार आणि नकाशानुसार सशुल्क सनद उपलब्ध नसते, आणि काही वेळेला अशी सनद निशुल्क उपलब्ध असते.

अर्थात जिथे सनदी करता शुल्क आकारलं जात नाही तीथे नाममात्र एक रुपया एवढा शुल्क आकारण्यात येते आणि शासनाकडून त्यांची सनद देण्यात येते. आता जेव्हा एखाद्या तुकडे धारकाला किंवा जमीन धारकांना जेव्हा सनद देण्यात येते तेव्हा त्यात नक्की काय असतं तर त्या सनदी मध्ये त्याने धारण केलेला जो काही तुकडा आहे

मग तो जमिनीचा तुकडा असेल किंवा बांधकाम असेल या संदर्भात नकाशा, त्याची व्याप्ती त्याची भौगोलिक स्थिती, त्याच्या चतूर्सिमा हे सगळं दर्शवणारा नकाशा आणि त्याच्या सोबत ही सनद देण्यात येते. जेव्हा अशीच सनद एखाद्या व्यक्तीला देण्यात येते तेव्हा त्या मालमत्तेचा अधिकारा संदर्भात तो एक अत्यंत महत्त्वाचा अभिलेख किंवा रेकॉर्ड हा निश्चितपणे तयार होतो.

आणि जेव्हा कोणत्याही वाद-विवाद वगैरे जर उद्दभवले तर अशा वेळेला या संबंधांचा आपले हक्क किंवा अधिकार सिद्ध करायला निश्चितपणे चांगला उपयोग होतो. ही सनद जी असते ती सरकारी कागद असतो, त्याचे फार चांगला नसतो मग समजा कालओघा मध्ये एखाद्या ची सनद जर हरवली किंवा कुठल्या नैसर्गिक किंवा मानवनिर्मित कारणांमुळे जर नष्ट झाली तर काय करायचं? कारण अशा भागांमध्ये जिथे सनदी दिलेले आहे तिथे

अशा दिलेली सनद हा त्याच्या हक्काचा एक अत्यंत महत्त्वाचा पुरावा असतो. आणि असा पुरावा नष्ट होणं हे अनेक अनेक त्रासांना कारण ठरू शकते म्हणून जेव्हा अशी सनद हरवते किंवा नष्ट होते तर त्याबदल्यात आपल्याला नवीन सनंद सुद्धा मिळू शकते.

त्याकरीता आपण जिल्हाधिकारी कार्यालय मध्ये अर्ज करू शकतो आणि त्या अर्जानुसार आपली जी हरवलेली किंवा नष्ट झालेली जी सनद आहे त्याच्या बदल्यात आपल्याला नवीन सनद निश्चितपणे मिळते, ज्याला समान कायदेशीर महत्त्व असते. आता बऱ्याचदा काय होत, काही सनदा दिल्या नंतर काही जमिनीच्या तुकड्यांमध्ये बांधकामाच्या तुकड्यांमध्ये बदल होतो.

तर म या बदलाचे काय करायचे, तर ज्या धारकाच्या जमिनीच्या किंवा बांधकामाच्या तुकड्यांमध्ये असा बदल झालेला आहे त्यांनी जर तसा अर्ज केला तर आयुक्तांच्या पूर्व मंजुरी मिळाल्यानंतर जिल्हाधिकारी याद्वारे ते बदल नोंदवणारी नवीन सनद किंवा नवीन अभिलेख हे देण्यात येतात.

म्हणजे एकदा सनद मिळाली की त्याच्यात बदल होऊ शकत नाहीत असंही नाही किंवा आपल्याला मिळालेली सनद हरवली तर आपला तर काय हक्क नष्ट झाले असेही नाही. पण जेव्हा जेव्हा आपल्या इथे अस भुमापनचे काम होईल आपल्याला सनदा दिल्या जातील तेव्हा त्या सनदे मधली क्षेत्रफळ आपलं भौगोलिक स्थान चतुर सीमा धारकाचा किंवा भोगवटदाराचे नाव ही सगळी माहिती त्या सनदेत 100% योग्यरीत्या भरलेली आहे ना याची आपण खात्री करून घेणं हे आपल्या फायद्याच्या दृष्टीने अत्यंत महत्त्वाचा आहे.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.