जमिनीच्या मालकी हक्कात बदल कोण कोणत्या गोष्टीमुळे होऊ शकतो? आपली जमीन कोणी तरी हडपणार तर नाही?

शेती शैक्षणिक

कधी कधी तुमच्या मनामध्ये अशी शंका येते का, की तुमची जमीन किंवा संपत्ती धोक्याने कुणीतरी तिसरा व्यक्ती हाडपेल किंवा मग तुमच्या मनामध्ये अशी शंका येते की कुणीतरी तिसरा व्यक्ती गुपचूप परस्पर तुमची जमीन किंवा संपत्ती त्यांच्या नावे करून घेईल तर ज्या वेळी आपापसात नातेवाईक किंवा भाऊबंद किंवा वारसदार यांच्यात जमीनीच्या मालकी हक्का वरून भांडण चालू असते किंवा मग आपापसात जमिनी संदर्भात काही वाद असतात.

अशा वेळेस किंवा मग एखादी व्यक्ती हे आपले मूळ गाव सोडून शहरांमध्ये नोकरीसाठी किंवा धंद्यासाठी स्थाईक होते आणि त्या व्यक्तीची वडिलोपार्जित जमीन किंवा मग अशी व्यक्ती जर समजा स्वतः जमिन मूळगावी विकत घेत असेल अशी व्यक्ती आपल्या संपत्ती पासून दूर राहते मग सहाजिकच जर समजा अशा व्यक्तीच्या मनामध्ये अशी शंका येत असेल की आपली जमीन कोणी तरी हडपणार तर नाही?

किंवा मग तिसरा कोणी व्यक्ती गुपचूप परस्पर तुमची जमीन आपल्या नावे करणार तर नाही? असा प्रश्न जर मनात उत्पन्न होत असेल तर हा लेख शेवट पर्यंत वाचा कारण की जमिनीच्या मालकी हक्कात बदल कोण कोणत्या गोष्टीमुळे होऊ शकतो याबद्दलची सविस्तर माहिती आपण घेणार आहोत. तर जमिनीच्या मालकी हक्कांत तीन गोष्टीमुळे बदल होऊ शकतो.

1.नोंदणीकृत दस्ताने

2.वारस तरतुदी द्वारे

3.न्यायालयाच्या किंवा सक्षम अधिकाऱ्यांच्या आदेशाने

1.नोंदणीकृत दस्ताने: जर समजा एखाद्या जमिनीचा खरेदी-विक्रीचा व्यवहार होतो त्या वेळेस त्या जमिनीच्या मालकी हस्तांतरण करण्या साठी खरेदी खत तयार करणे गरजेचे असते.असे खरेदीखत नोंदणीकृत असावेत.अशा प्रकारे नोंदणीकृत दास्ताने जमीनीच्या मालकी हक्कात बदल होउ शकतो.

त्याचप्रकारे समजा एखाद्या व्यक्तीला संपत्ती ही बक्षीस पत्राद्वारे मिळत असेल तर अशा नोंदणीकृत बक्षीस पत्राद्वारे देखील मालकी हक्कात बदल होऊ शकतो त्याच प्रमाणे जर समजा वारसदारांमध्ये जमिनीचे वाटप जर दुय्यम निबंधका समोर नोंदणीकृत दस्ताने झाले तर अशा नोंदणीकृत दस्ता वरून देखील जमिनीच्या मालकी हक्कात बदल होऊ शकतो.

आपणा सर्वांना एक गोष्ट माहिती असणे गरजेचे आहे ती म्हणजे भारतीय नोंदणी कायदा कलम 17 नुसार रूपये 100 पेक्षा जास्त किमतीच्या मालमत्तेचा व्यवहार हा नोंदणीकृतच असणे बंधनकारक आहे. तर अशा पद्धतीने अशा प्रकारच्या नोंदणीकृत दस्ताने जमिनीच्या किंवा संपत्तीच्या मालकीहक्कत बदला होऊ शकतो.

2.वारस तरतुदी द्वारे जमिनीच्या किंवा संपत्तीच्या मालकी हक्कात बदल होऊ शकतो तर या संदर्भातल्या तरतुदी या हिंदू वारसा हक्क कायदा 1956 मध्ये नमूद केलेले आहे. 2005 मध्ये हिंदू वारसा हक्क कायदा यामध्ये काही सुधारणा करण्यात आल्या आणि त्या सुधारणा नुसार स्त्रियांनाही पुरुषांप्रमाणे जमीन किंवा संपत्ती मध्ये वारसाहक्काने समसमान हिस्सा हा मिळतो.

आता ज्या वेळेस घरातील प्रमुख व्यक्ती, प्रमुख व्यक्ती म्हणजे अशी व्यक्ती ज्या व्यक्तीच्या नावे संपूर्ण जमीन किंवा संपत्ती असते अशा व्यक्तीच्या मृत्युपश्चात तिच्या वारसांनी वारस नोंद करणे हे अपेक्षित असते. या ठिकाणीं एक गोष्ट लक्षात घ्या मयत झालेल्या व्यक्तिला मिळालेली संपत्ती जर वडलोपार्जित असेल तर वारस नोंद हे हिंदू वारसा कायदा 1956 अन्वये होईल.

जर समजा व्यक्तीकडे असलेली संपत्ती ही त्या व्यक्तीने स्वतः कमावलेली असेल, स्वकष्टाने जर कमावलेली असेल आणि अशा संपत्तीचे जर समजा त्या व्यक्तीने मृत्यूपूर्वी जर मृत्यूपत्र करून ठेवलेले असेल तर असे मृत्युपत्र ज्या व्यक्तीच्या लाभात त्या व्यक्तीने बनवलेली असेल अशा व्यक्तीला त्या मयत व्यक्तीची स्वतः कमावलेली प्रॉपर्टी ही त्या मृत्युपत्रा मुळे मिळते. परंतू जर समजा त्या मयत व्यक्तीनी स्वतः कमवलेल्या प्रॉपर्टी संदर्भात मृत्युपत्र बनवून ठेवलेले नसेल तर मात्र अशा जमिनीची वाटणी हिंदू वारसा कायदा 1956 होते.

यानंतर आणखी एक गोष्ट महत्त्वाची आहे ती म्हणजे की हिंदू वारसा हक्क कायद्यान्वये प्रथम 16 कायदेशीर वारस असतात अशा सोळा कायदेशीर वारसांना कायद्याने वारस नोंद होतांना प्रथम प्राधान्य मिळते. वारस नोंद झाल्यानंतर वारसदारमध्ये जमिनीचे वाटप करून जमिनीच्या मालकी हक्कात बदल होऊ शकतो. या ठिकाणी वारसदार मध्ये जमिनीचे वाटप हे करण्यात येते.

3.न्यायालयाच्या किंवा सक्षम अधिकाऱ्यांच्या आदेशाने जमिनीच्या किंवा संपत्तीच्या मालकी हक्कात बदल हा कश्या पद्धतीने घडतो तर जमिनीसंदर्भात जर वाद असेल आणि त्याबाबत न्यायालयामध्ये मध्ये जर दावा चालू असेल तर त्या बाबतचा निकाल लागल्यानंतर न्यायालयाच्या किंवा मग सक्षम अधिकाऱ्यांच्या आदेशाने जमिनीच्या मालकी हक्क स्थापित केला जातो.

आणि त्यानुसार त्या आदेशान्वये जमिनीच्या मालकी हक्क बदल हा होऊ शकतो. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे अन्य कुठल्याही प्रकारे किंवा अनोंदणीकृत दस्त किंवा अर्जाद्वारे जमिनीच्या मालकी हक्कात बदल होत नाही. मला आशा आहे तुम्हाला लक्षात आले असेल की जमिनीच्या किंवा संपत्तीच्या मालकी हक्कात कुठल्या कुठल्या कायद्या अंतर्गत बदल होऊ शकतो..

6 thoughts on “जमिनीच्या मालकी हक्कात बदल कोण कोणत्या गोष्टीमुळे होऊ शकतो? आपली जमीन कोणी तरी हडपणार तर नाही?

  1. Amchi Sheti mazya vadilani adiwasi vyakti kadun kharedi Keli Hoti tyache sale deed registered sudhahote parantu ti Sheti ATA duarycha navane hastatan karnyatali age karita span mala mahiti dyal

  2. माझे आजोबा ची जमिन त्यांचे मरणोत्रर माझे चुलते व वडिलांचे नावे झाली होती नंतर चुलते नी आम्ही बाहेर गावी नोकरीला असलेने गुपचूप वडीलांचे नाव बनावट अर्जाने कमी केले असून स्वताचे 2 मुलाच्या नावे खरेदी दिली व शेतात गट पाडले,व चुलते व त्यांच्या 2 मुलांचे नावे केली असून मी न्यायालयात तक्रार केली असून मला मार्ग दर्शन करावे

  3. माझे आजोबा ची जमिन त्यांचे मरणोत्रर माझे चुलते व वडिलांचे नावे झाली होती नंतर चुलते नी आम्ही बाहेर गावी नोकरीला असलेने गुपचूप वडीलांचे नाव बनावट अर्जाने कमी केले असून स्वताचे 2 मुलाच्या नावे खरेदी दिली व शेतात गट पाडले,व चुलते व त्यांच्या 2 मुलांचे नावे केली असून मी न्यायालयात तक्रार केली असून मला मार्ग दर्शन करावे

  4. माझ्या आजोबा ची जमीन याद च्यार चुलते दोन आत्या माझे वडिल मोठ हे सव दिवगत आहे त्या त माझाछोटा भाव कोटा तुन अपिल करून सव जमिनीवर ताबा घतोय मला योग्य सला ध्या

  5. My father had purchased agriculture land in 1990. Now, after 28 years my uncle take up court case as a agriculture land purchased when combined family.
    Please suggest me.

Leave a Reply

Your email address will not be published.