जुलै महिना सुरू होतोय मात्र नव्या महिन्याच्या पहिल्या तारखेपासून आपल्या दैनंदिन आयुष्यातील अनेक महत्त्वाच्या गोष्टींमध्ये मोठे बदल होत आहेत, याची माहिती असणे आवश्यक आहे. त्यामुळे 1 जुलैपासून नेमके कोणते बदल होणार आहेत ते पाहूयात.
१. एसबीआय च्या सेविंग खातधारकांसाठी चार व्यवहारांच्या मर्यादेनंतर प्रत्येक व्यवहारावर 15 रुपये अधिक जीएसटी असा नवीन दर आकारला जाणार आहे. तसेच दहा पानांचे चेकबुकवर 40 रुपये प्लस जीएसटी असा नवीन दर आकारला जाणार आहे. एसबीआय च्या ग्राहकांसाठी हे महत्त्वाचे बदल आहेत.
तर 25 पानांच्या चेकबुकवर 75 रुपये प्लस जीएसटी असा नवीन दर आकारला जाणार आहे. दहा पानांच्या इमरजन्सी चेकबुकवर 50 रुपये प्लस जीएसटी असा नवीन दर आकारला जाणारा आहे. SBI ग्राहकांसाठी महत्त्वाचे बदल सविस्तरपणे बघूया.
कॅश विड्रॉलवर शुल्क– एसबीआय (State Bank of India) बेसिक सेव्हिंग्ज बँक डिपॉझिट खातेधारकांना दरमहा चार वेळा मोफत पैसे काढता येतील. ज्यात एटीएम आणि बँक शाखांचा समावेश आहे. मोफत मर्यादेनंतर बँक प्रत्येक व्यवहारावर 15 रुपये अधिक जीएसटी घेईल. पैसे काढण्यावर शुल्क होम ब्रँच, एटीएम आणि गैर एसबीआय एटीएममधून पैसे काढण्यावर लागू होईल.
SBI चेकबुक शुल्क- -SBI BSBD खातेधारकांना एका फायनान्शिअल इयरमध्ये 10 चेकची कॉपी मिळते. आता 10 चेकच्या चेकबुकवर चार्जेस द्यावे लागतील. 10 चेकच्या पानांसाठी बँक 40 रुपये आणि जीएसटी शुल्क आकारेल. 25 चेक लीवसाठी बँक 75 रुपये आणि जीएसटी चार्ज करेल. इमर्जन्सी चेकबुकवर 10 पानांसाठी 50 रुपये अधिक जीएसटी द्यावा लागेल.
ज्येष्ठ नागरिकांना चेकबुकवर नवीन सेवा शुल्कातून सूट दिली जाईल. बेसिक सेविंग्स बँक डिपॉजिट BSBD खातेधारकांना वर्षभरत केवळ एक चेकबूक मोफत देण्यात येईल. यामध्ये 10 चेकचा समवेश असेल. यानंतर जर त्यांना चेकबुक हवे असेल, तर अतिरिक्त शुल्क भरावे लागेल.
तसेच आपत्कालीन परिस्थितीत चेकबुक हवे असल्यास तुम्हाला सामान्य स्थितीपेक्षा अधिक शुल्क भरावे लागेल. सीनियर सिटीजन असलेल्या नागरिकांना चेकबुकसाठी पैसे द्वयावे लागणार नाही. बेसिक सेविंग्स बँक डिपॉजिट BSBD खातेधारक एसबीआय SBI किंवा इतर बँकेतून रोख पैशांशिवाय व्यवहार करत असेल. तर त्यासाठी तुमच्याकडून कोणत्याही प्रकारचे शुल्क आकारण्यात येणार नाही. मग ते (NEFT) एनईएफटी द्वारे केलेला व्यवाहार असो किंवा (RTGS) आरटीजीएस द्वारे केलेला व्यवहार.
२. SMS चार्जेस मध्ये वाढ : अक्सिस बँक ग्राहकांसाठी सुद्धा महत्वाचे बदल आहेत एसएमएस अलर्ट शुल्कामध्ये वाढ करण्यात आली आहे, प्रत्येक एसएमएस अलर्ट साठी 20 पैसे (महिन्यातून ज्यास्तीत ज्यास्त 25 रुपये)आकारले जातील. प्रत्येक व्यवहाराला तुम्हाला मिळणाऱ्या SMS चे नवीन दर असे असणार आहेत.
आक्सिस (AXIS) बँकेच्या ग्राहकांसाठी असतील हे बदल, देशातील खाजगी क्षेत्रातील महत्त्वाची बँक असणाऱ्या आक्सिस बँकेने एसएमएस अलर्ट शुल्क वाढवण्याचा निर्णय घेतला आहे. दर महिन्याला निश्चित 5 रुपये शुल्क घेण्याऐवजी बँक आता प्रत्येक एसएमएस अलर्ट (Axis Bank SMS Alert) साठी 25 पैसे (महिन्यातून जास्तीत जास्त 25 रुपये) आकारण्याचा निर्णय घेतला आहे. दरम्यान प्रमोशनल टेक्स्ट किंवा ओटीपी मेसेजसाठी हे शुल्क लागू असणार नाही.
३. IFSC कोड मध्ये बदल : कॅनरा बँक, बँक ऑफ बडोदाच्या आयएफएससी कोड मध्ये बदल करण्यात आलेले आहेत. नवीन कोड १ जुलै पासून लागू होतील. सिंडिकेट बँकेच्या शाखांचा IFSC कोड बदलणार, आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँकेचं यूनियन बँक ऑफ इंडियामध्ये विलिनीकरण झालं आहे.
अशावेळी यूनियन बँकेने दोन्ही बँकांच्या ग्राहकांना नवीन चेकबुक घेण्यास सांगितलं आहे, तुमचं आधीच चेकबुक आता अवैध असेल. सिंडिकेट बँकेचं 1 एप्रिल 2020 पासून कॅनरा बँकेत (Canara Bank) विलीनीकरण झालं आहे. त्यामुळे आता 1 जुलैपासून बँकेचा IFSC कोड बदलणार आहे. सिंडिकेट बँकेचा सध्याचा IFSC कोड 30 जून 2021 पर्यंतच सुरू राहील.
त्यानंतर 1 जुलै 2021 पासून बँकेचा नवा IFSC कोड लागू होईल. सिंडिकेट बँकेच्या ग्राहकांना आता नवा IFSC कोड घ्यावा लागेल. तसंच जुनं चेकबुकही वापरता येणार नाही. एनईएफटी/ आरटीजीएस/ आयएमपीएस मधून फंड ट्रान्सफर करण्यासाठी या ग्राहकांना कॅनरा बँकेच्या आयएफएससी कोडचा वापर करावा लागेल.
सिंडिकेट बँकेचे ग्राहक IFSC आणि MICR कोडबाबत माहितीसाठी कॅनरा बँकेच्या http://www.canarabank.com/ वेबसाईटवर माहिती घेऊ शकतात. इथे ‘What’s New’ वर क्लिक करुन ‘KIND ATTN eSYNDIATE CUSTOMERS: KNOW YOUR NEW IFSC’ वर क्लिक करा. त्याशिवाय ग्राहक 18004250018 या क्रमांकावरही संपर्क करू शकतात. तसेच या दोन बँकांच्या खातेधारकांना मिळेल नवीन चेकबुक, आंध्रा बँक आणि कॉर्पोरेशन बँकेचं यूनियन बँक ऑफ इंडियामध्ये विलिनीकरण झालं आहे. अशावेळी यूनियन बँकेने दोन्ही बँकांच्या ग्राहकांना नवीन चेकबुक घेण्यास सांगितलं आहे, तुमचं आधीच चेकबुक आता अवैध असेल.
४.टीडीएस आणि टीसीएस करामध्ये वाढ करण्यात आली आहे. गेल्या आर्थिक वर्षासाठी आयटी रिटर्न न भरणाऱ्यांना जादा टीडीएस टीसीएस भरावा लागणार आहे. ५.घरगुती सिलिंडरच्या दरात वाढ होण्याची शक्यता आहे. त्यामुळे नवीन महिन्यांमध्ये अनेक बदल होताना पाहायला मिळतात. ६.अल्पबचत योजनांचे जे व्याजदर आहे, त्यामध्ये कपात होण्याची शक्यता आहे.
७.GST मध्ये बदल: केंद्र सरकारने रुग्णवाहिकांवरील जीएसटी दरांबाबत एक महत्त्वाचं पाऊल उचललंय. आता रुग्णवाहिकेवर केवळ १२ टक्के जीएसटी (GST on Ambulance) लागेल. यापूर्वी रुग्णवाहिकेच्या खरेदीसाठी २८ टक्के जीएसटी भरावा लागत होता. केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांच्या अध्यक्षतेखाली झालेल्या ४४ व्या जीएसटी परिषदेच्या बैठकीत करोना महामारीशी संबंधित मदत आणि व्यवस्थापनासाठी ज्या कोणत्याही बाबींचा वापर होत असेल त्यावरील जीएसटी दर कमी करण्याचा निर्णय घेण्यात आलाय.
आतापर्यंत रुग्णवाहिकांचा लग्जरी वस्तूंमध्ये समावेश होत होता, त्यामुळे नवीन रुग्णवाहिका खरेदी करताना २८ टक्के जीएसटी द्यावा लागायचा. पण, आता करोनाच्या दुसऱ्या लाटेदरम्यान रुग्णवाहिकांना लग्जरी वस्तूंच्या यादीतून हटवण्यात आलं आहे. याचा थेट फायदा होणार असून नवीन रुग्णवाहिका खरेदी करताना आता २८ ऐवजी फक्त १२ टक्के जीएसटी भरावा लागेल. ३० सप्टेंबर २०२१ पर्यंत रुग्णवाहिकांचा समावेश १२ टक्के जीएसटीच्या कक्षेत असेल असा निर्णय घेण्यात आला आहे.
एकूण 400 वस्तू आणि 80 सेवांवर जीएसटीचे दर कमी करण्यात आले आहेत. जीएसटीपूर्व कारकीर्दीत, केंद्र व राज्ये यांचे एकत्रित दर बहुतेक वस्तूंवर ३१% पेक्षा जास्त होते. आता ते १८% करण्यात आले आहे. ही कपात करदात्यासाठी महत्त्वपूर्ण दिलासा देणारी असणार आहे. जीएसटीपूर्व काळातील हेअर ऑईल, टूथपेस्ट आणि साबण यासारख्या सामान्य वस्तूंनी त्यांचे कर दर २९% वरून १८% पर्यंत खाली आले आहे.
सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.