राज्यातील आणखी १२ जिल्ह्यांचा समावेश ।। जुने शेत जमिनीचे फेरफार डायरी उतारा ऑनलाईन कसे मिळवायचे?।।१८८०पासूनचे शेत जमिनीवरील फेरफार/ डायरी उतारे कसे पाहायचे?

शेती शैक्षणिक

जमिनीशी संबंधित कोणताही व्यवहार करायचा असल्यास काय महत्वाचं असतं तर त्या जमिनीचा इतिहास माहिती असणे अत्यंत आवश्यक आहे आता हा इतिहास म्हणजे नेमकं काय तर ती जमीन मूळची कोणाच्या नावावर होती आणि दिवसेंदिवस त्या जमिनीचा अधिकार अभिलेखात काय बदल होत गेले याची सविस्तर माहिती असणे आवश्यक असतं.

राज्यातील 19 जिल्ह्यांचा समावेश: अहमदनगर, अकोला, अमरावती, औरंगाबाद, चंद्रपूर, धुळे, गडचिरोली, गोंदिया, जळगाव, लातूर, मुंबई उपनगर, नंदूरबार, नाशिक, पालघर, रायगड, सिंधुदुर्ग, ठाणे, वाशिम, यवतमाळ या जिल्ह्यांचा समावेश आहे.

आता आपल्याकडे ही माहिती कुठे असते तर ती तहसील कार्यालय किंवा भूमिअभिलेख कार्यालय सातबारा उतारा खाते उतारा फेरफार या परिपत्रकांमध्ये ही माहिती नमूद केलेली असते आता ही माहिती महाराष्ट्र सरकारने ऑनलाइन देण्याचे सुरू केली आहे महाराष्ट्र सरकारने ई-अभिलेख या प्रकल्पांतर्गत किंवा या कार्यक्रमाद्वारे राज्यभरातील सगळ्या जिल्ह्यामधल्या तीस कोटी अभिलेख उताऱ्यांचे संगणकीकरण करण्याचा निर्णय घेतला आहे. आणि हे उतारे आता सरकार ऑनलाइन उपलब्ध करून देत आहे पण हे उतारे ऑनलाईन कसे पाहायचे याची माहिती आपण आता घेणार आहोत.

जुन अभिलेख कसे पाहायचे?: जुन्या अभिलेख काढण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला aapleabhilekh.mahabhumi.gov.in असे सर्च करावे लागेल. त्यानंतर तुमच्यासमोर महाराष्ट्र सरकारच्या महसूल विभागाची वेबसाईट ओपन होईल. या पेजवरील ई रेकॉर्ड यावर क्लिक करायचे आहे. त्यानंतर एक नवीन पेज तुमच्यासमोर ओपन होईल. उजवीकडील भाषा या पर्यायावर क्लिक करून तुम्ही मराठी भाषा निवडू शकता.

तुम्ही जर आधीच या वेबसाईटवर नोंदणी केली असेल तर तुमचा लॉग इन आयडी व पासवर्ड वापरून तुम्ही या सेवांचा लाभ घेऊ शकता. जर तुम्ही पहिल्यांदाच या वेबसाइटवर आला असाल तर सगळ्यात अगोदर तुम्हाला नवीन वापर करता नोंदणी या पर्यायावर क्लिक करायचा आहे एकदा का तुम्ही त्यावर ती क्लिक केलं की एक नवीन फॉर्म तुमच्यासमोर ओपन होईल.

या फॉर्ममध्ये तुम्हाला सुरुवातीला वैयक्तिक माहिती भरायची आहे. यामुळे तुमचे नाव, मधले नाव, आडनाव, राष्ट्रीयत्व, मोबाईल नंबर, व्यवसाय, ईमेल आयडी, जन्मतारीख इत्यादी गोष्टी ची नोंद करायचे आहे. एकदा काय वैयक्तिक माहिती भरून झाली की तुम्हाला तुमच्या पत्त्या विषयीची माहिती द्यायची आहे.

यामध्ये घर क्रमांक, मजला क्रमांक, इमारतीचे नाव पिनकोड, स्थान, शहर, जिल्हा, राज्य इत्यादींची माहिती द्यायची असते. हे भरून झाल्यानंतर तुम्हाला एक लॉगिन आयडी क्रीएट करायचा आहे. यानंतर तुमच्या समोर वापर करता नोंदणी यशस्वीरीत्या पूर्ण केली आहे असा मेसेज येईल त्यानंतर लॉग इन आयडी आणि पासवर्ड टाकून लॉगिन करायचा आहे.

आता आपण जुना फेरफार उतारा कसा पाहायचा ते पाहू. जुना फेरफार उतारा पाहण्यासाठी सगळ्यात अगोदर तुम्हाला तुमच्या जिल्ह्याचे नाव निवदायचे आहे, पण इथे तुम्ही एक गोष्ट लक्षात ठेवायची सध्या महाराष्ट्र सरकारने ही सुविधा फक्त सात जिल्ह्यासाठीच उपलब्ध करून दिली आहे. पण लवकरच ही सुविधा राज्यभरातील सगळ्या जिल्ह्यांना उपलब्ध करून देण्याचा सरकारचा विचार आहेत. पुढे तालुका, गावाचे नाव आणि अभिलेख प्रकार निवडायचा आहे.

यात तुम्हाला कोणता अभिलेख उतारा हवा आहे तो तुम्हाला निवडायचा आहे. आता मी फेरफार उतारा निवडलेला आहे. जर तुम्हाला सातबारा हवा असेल तर सातबारा आठ अ उतारा हवा असेल तर 8 अ हा पर्याय निवडायचा. असे एकूण 58 अभिलेखांचे प्रकार येथे उपलब्ध आहेत. त्यानंतर गट क्रमांक टाकून शोध करायचा आहे त्यानंतर शोध निकाल या पेज वरती टाकलेल्या गट क्रमांकाच्या संबंधित फेरफाराची माहिती पाहू शकता.

तुम्ही स्क्रीनवर पाहू शकता की तिस-या गट क्रमांकाच्या संबंधित जमिनीच्या आधिकार अभिलेखात 1982 , 1984, 1994 बदल झालेले आहेत आणि त्यांचा फेरफार क्रमांक अनुक्रमे 39, 120 आणि 547 हा आहे. जर मला 1982 सालचा फेरफार पाहायचा असेल. तर त्या समोरील कार्ड मध्ये ठेवा हा पर्याय यावर क्लिक केला आहे.

आता समजा आपण पेज क्रमांक एक वरील माहिती पाहत आहोत त्याच्या समोरील वर्षांचे फेरफार उतारे तुम्हाला पाहायचे असल्यास तर तुम्ही पेज 2 , तीन वर क्लिक करुन ही माहिती पाहू शकता. त्यानंतर तुम्हाला पुनरावलोकन कार्ड या वरती क्लिक करायचे आहे. त्यानंतर तुमचे कार्ड तुमच्यासमोर ओपन होईल.

त्याखाली असलेल्या पुढे जा या पर्यायावर क्लिक केलं की डाउनलोड सध्याची फाईल अशी ओपन होईल आणि सद्यस्थिती उपलब्ध आहे. त्या समोरील फाईल पहा. यावर क्लिक केलं की, तुमच्या समोर येतं 1982 फेरफार पत्र ओपन होईल. या पत्रकारावरील खाली बान असलेल्या चिन्हावर जर तुम्ही क्लिक केलं तर ते डाऊनलोड होईल आता तुम्ही स्क्रीन वर 1982 सालचा फेरफार उतारा पाहू शकता. या जमिनीचा अधिकार अभिलेखात काय बदल झाले,

नेमका जमिनीचा व्यवहार कोणा – कोणा मध्ये झाला आणि तो कधी झाला याची सविस्तर माहिती दिलेली आहे. याच पद्धतीने तुम्ही सातबारा उतारा आणि आठ अ इत्यादी अभिलेखांची माहिती पाहू शकता. आम्ही दिलेली माहिती आपल्याला कशी वाटली आम्हाला कमेंट मध्ये कळवा माहिती आवडल्यास इतर शेतकऱ्यांना देखील शेअर करा !

सूचना-नोंदणी प्रक्रिया ह्या वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळासिस्टीम अपडेट मध्ये त्यात बदल घडतात, वर नमूद माहिती ही सध्या उपलब्ध असलेल्या माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी आपणास भविष्यात जर बदल घडला तर अद्ययावत माहिती घ्यावी,

अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

12 thoughts on “राज्यातील आणखी १२ जिल्ह्यांचा समावेश ।। जुने शेत जमिनीचे फेरफार डायरी उतारा ऑनलाईन कसे मिळवायचे?।।१८८०पासूनचे शेत जमिनीवरील फेरफार/ डायरी उतारे कसे पाहायचे?

  1. महार वतन मिळालेल्या जमिनी विकल्या असल्यास पुन्हा कशा मिल्वाव्या.

Comments are closed.