भारतीय दंड संहितेतील कलम 326 नुसार जो कोणी कोणत्याही व्यक्ती स्वेच्छेने प्राणघातक शस्त्राद्वारे दुखापत करतो, तर असे करणाऱ्या व्यक्तीस 326 नुसार गुन्हा दाखल केला जातो. तसेच अगदी सोप्या भाषेत सांगायचे झाले.
तर कोणत्याही व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीची इच्छापूर्वक शस्त्रद्वारे गंभीर दुखापत करतो. ज्यामुळे त्या व्यक्तीचा मृत्यू होऊ शकतो. तर असे करणाऱ्या व्यक्तीस कलम 326 नुसार गुन्हा दाखल होतो. परंतु भारतीय दंड संहितेतील कलम 326 हे कोणत्या परिस्थितीमध्ये लावल्या जाते.
◆कलम 326 हे खालील परिस्थितीमध्ये लावल्या जाते.
1) जेव्हा एखाद्या व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीवर स्वेच्छेने गोळीबार करून जखमी केली असेल.
2) चाकूने किंवा धारदार शस्त्रद्वारे गंभीर दुखापत केली असेल.
3)एखाद्या मशीनद्वारे गंभीर दुखापत केली असेल. मशीनचा हत्यार म्हणून वापर केला असेल.
4)आग किंवा कोणतेही गरम पदार्थाद्वारे हल्ला केला असेल.
5)स्फोटक पदार्थ किंवा खाण्यासाठी विषारी अन्न दिला असेल.
6)हल्ल्यासाठी धोकादायक प्राणी वापरले असतील, जसे कुत्रा, विषारी साप इत्यादी…
◆कलम 326 कधी दोषी ठरवल्या जाऊ शकते
1) जेव्हा कोणत्याही व्यक्तीने दुसऱ्या व्यक्तीस गंभीर दुखापत व्हावी किंवा गंभीर दुखापत होण्याची शक्यता आहे, असे कृत्य करतो.
2) आरोपींनी फिर्यादीवर केलेला हल्ला किंवा दुखापत ही स्वेच्छेने असावी, ती दबावाखाली किंवा बळजबरीने केलेली नसावी.
3) आरोपींनी फिर्यादीवर प्राणघातक हल्ला करताना कोणत्या हत्यारचा किंवा शस्त्रे किंवा किंवा वस्तू वापरली. ज्यामुळे फिर्यादीला गंभीर दुखापत झाली आणि अशा दुखापतीमुळे स्त्रीचा मृत्यू होण्याची ही शक्यता होती.
उदाहरणार्थ – एक दिवस एक मुलगा प्रीतीला लग्न करण्यासाठी त्रास देत होता. तस तो दररोज प्रीतीला त्रास द्यायचा. एक दिवस प्रीतीला राग आला आणि तिने त्या मुलाला चापट मारली, चापट मारण्यामुळे मुलाला राग आला आणि त्यामुळे त्याने बदला घेण्याची ठरवले.
एक दिवस प्रीति बाजारात जात असताना तू मला नकार का दिलास असे म्हणत प्रीतिवर चाकूने हल्ला केला, त्या हल्ल्यात ती गंभीर जखमी झाली. नंतर मुलींनी पोलिसांना फिर्याद दिल्यानंतर मुलाला धोकादायक शस्त्रद्वारे हल्ल्या केल्याबद्दल अटक केले.
◆कलम 326 मध्ये शिक्षा काय सांगितले आहे का?
आयपीसीच्या कलम 326 मधील शिक्षेच्या तरतुदीनुसार, जर एखाद्या व्यक्तीने स्वेच्छेने गुन्हा केला तर अशा कृतीमुळे समोरच्या व्यक्तीला गंभीर दुखापत होण्याची शक्यता आहे. किंवा तो आपला जीवही गमावू शकतो, तरीही त्याच्यावर धोकादायक शस्त्राने हल्ला करतो. त्यामुळे असा गुन्हा करणाऱ्या व्यक्तीला न्यायालयाकडून दोषी आढळल्यास, गुन्ह्याच्या गंभीरतेनुसार, 10 वर्षापासून ते जन्मठेपेपर्यंतच्या कारावासाची शिक्षा होऊ शकते.
◆कलम 336 मध्ये तरतूद जामीनपात्र आहे की नाही?
आयपीसी कलम 326 चा हा गुन्हा अत्यंत गंभीर श्रेणीचा गुन्हा मानला जातो. या कलमांतर्गत कोणत्याही व्यक्तीविरुद्ध तक्रार नोंदविल्यास. त्यामुळे, दखलपात्र गुन्हा असल्याने पोलीस त्या व्यक्तीला कोणत्याही वॉरंटशिवाय तात्काळ अटक करू शकतात. त्यामुळे हा अजामीनपात्र गुन्हा आहे. ज्यामध्ये अटकेनंतर जामिनासाठी आरोपींना खूप त्रास सहन करावा लागू शकतो.
न्यायालयात हजर केल्यानंतर आरोपीला जामीन मिळू शकतो की नाही, हे प्रथमवर्ग न्यायदंडाधिकारी ठरवतात. अशा प्रकरणांमध्ये, तुम्हाला आशादायी वकिलाची गरज आहे. जे तुमचे सामाजिक वर्तन व इतर पुरावे न्यायालयात सादर करून तुम्हाला जामीन मिळण्यास मदत करेल.