कमीत कमी गुंतवणुकीत जास्त फायदा देणारे हे ५ बिझनेस ।। फक्त ५ ते १० हजार गुंतवून प्रतिमहिना दुप्पट नफा कमवू शकता ।। जाणून घ्या अशा व्यवसायांची माहिती !

अर्थकारण लोकप्रिय शैक्षणिक

तुम्हाला कमी खर्चात यशस्वी बिझनेस स्टार्ट करायचा आहे व तो बिझनेस वाढवायचा आहे तर ही माहिती 100% तुम्हाला उपयुक्त ठरणार आहे. लॉकडाऊन मध्ये अनेक जणांनी बिझनेस स्टार्ट केले आहे. आणि त्यांचे बिझनेस यशस्वी देखील झाले आहेत. ते कोणकोणते बिझनेस आहेत हे आपण पाहुयात. हे बिझनेस 100% कमी भांडवल किंवा कमी खर्चात म्हणजेच 1000 ते 5000 रुपयांमध्ये आपण हे बिझनेस स्टार्ट करू शकतो आणि आपला बिझनेस व्यवस्थित यशस्वी करू शकतो.

फ्रूट सेलिंग (फळ विक्री) – या बिझनेस मध्ये काही जास्त इंवेस्टमेंट नाहीये. तुम्हाला तुमच्या जवळच्या मार्केट यार्ड मध्ये जायचं आहे, आणि तिथे होलसेल जे व्यापारी असतात त्यांचे कॉन्टॅक्ट काढायचे आहे. कारण जे पण फळ विक्रेते आहेत ते तुम्हाला एकदम होलसेल मध्ये माल देतील आणि त्या मालाची तुम्हाला विक्री करायची आहे.

उदाहरणार्थ, होलसेल मध्ये जर आपल्याला सफरचंद 150 रुपये ला मिळतात आणि ते तुम्ही 200 ते 220 रुपये पर्यंत विकू शकतात. आता ते फळांच्या क्वालिटी वर देखील असते जसं की जास्त चांगली क्वालिटी असेल तर 220 रुपये पर्यंत आणि साधे जे असेल ते 180 ते 200 रुपये पर्यंत आपण विकू शकतो.

एका किलो मागे तुम्हाला जवळपास 40 ते 50 रुपयांचा नफा (प्रॉफिट) होतो. म्हणजेच तुम्ही दिवसभरात 5 किलो जरी विकले तरी तुम्हाला 250 रुपये मिळतात. त्यासोबत तुम्ही इतर फळे जसं की केळी, बोरं, जी काय सीझनेबल फळ असतात ती जरी विकले तरी तुमचा फायदा होतो. तसेच श्रावणात किंवा इतर उपवासाच्या दिवशी अनेक जण हे फळे खरेदी करतात.

याप्रकारे तुम्ही हा बिझनेस उत्तम प्रकारे करू शकता. एक गृहस्थ आहेत त्यांनी लॉकडाऊन मध्ये हा बिझनेस चालू केला होता. पण ते होम डिलिवरी देतात. पूर्ण सॅनिटायझर करून सेफ अशी त्यांची होम डिलिवरी असते. आणि त्यांची रोजची इन्कम सर्व खर्च जावून जवळपास दिवसाला 700 ते 1000 रुपये इतकी असते.

हा अतिशय चांगला असा बिझनेस आहे, फक्त तुम्हाला तुमच्या फ्रूटची क्वालिटी चांगली ठेवायची आहे. कस्टमर सोबतचे बोलणे चांगले ठेवायचे आहे. तुमचा हा बिझनेस 100% वाढेल. जर सुरवातीला तुम्ही 1000 ते 2000 रुपयांचे फळ घेवून नंतर जसा तुमचा बिझनेस वाढतोय, तुमच्या ऑर्डर वाढतील त्यानुसार तुम्ही इंवेस्ट करू शकता व तुम्ही भरपूर पैसे कमवू शकता.

Egg सेलिंग (अंडी विक्री) – तुम्हाला माहीतच असेल की अंडी हे संपूर्ण सीझन चालतात. जर तुम्ही जे पौल्ट्री फार्म असतात त्यांसोबत संपर्क केला. किंवा एखादे दुकानदार जे होलसेल मध्ये अंडे विकतात. त्यांच्याशी जर तुम्ही कॉन्टॅक्ट केला तर तुम्ही बिझनेस खूप चांगल्या प्रमाणात चालवू शकता.

तुम्हाला यासाठी काही जास्त इंवेस्टमेंट करायची नाहीये. फक्त एक प्लास्टिकचा टेबल लागतो, एक खुर्ची लागते. आणि सुरुवात तुम्ही 5 ट्रे अंडी पासून करू शकता किंवा एका ट्रे मध्ये 30 अंडी येतात. 5 ट्रे जरी घेतले तरी तुम्ही तिथून हे विकू शकता. जर तुम्ही एखादी जिम त्याबाजुला जरी स्टॉल टाकला तर तुमचे चांगली कमाई होईल. आता लॉकडाऊन संपत आहे तर जिम पुन्हा चालू होणार आहे आणि जिम मधील मुले जवळपास प्रत्येक जण अंडी खातोच.

जे प्रॉपर जिम करतात ते लोक दिवसाला जवळपास 10 ते 15 अंडी घेतातच. आणि एका जिम मध्ये जवळपास 50 ते 100 मुले असतात. एखादे चांगल्या जिम जवळ जर तुम्ही हा तुमचा स्टॉल उभा केला तर नक्कीच तुम्हाला चांगली इन्कम येवू शकते. जर तुम्हाला होलसेल मध्ये जर हे अंडी मिळाली तर त्या होलसेलर कडून जास्त क्वांटिटी मध्ये जर अंडी घेतली, तर तुम्ही देखील तुमच्याकडून घेणारा आहे त्याला जर तुम्ही एका ट्रे मागे 10 रुपये सूट दिली तर ते नक्की तुमच्याकडून घेतील.

कारण दुकानात एक अंड 6 रुपयेला असत तेच तुम्ही होलसेल मधे घेता तर तुम्हाला ते 4.50 रुपयाला मिळत आणि किराणा दुकानात देखील एक रुपया कमी करत नाही तेच जर तुम्ही तुमच्या कडून घेणाऱ्यास एका ट्रे मागे 10 रुपये कमी केल्यास तो तुमच्याकडूनच अंडे घेईल आणि तुमचा सेल खूप चांगला वाढेल.

यासोबत जर तुम्ही ब्राऊन ब्रेड, उकडलेले चणे, यांसारखे जर काही क्वांटिटी ठेवून समोरच्याच्या ऑर्डर नुसार जर त्यांना दिली तर एक्स्ट्रा इन्कम देखील तुम्हाला चालू होईल. यामधे एका ट्रे मागे तुम्ही जवळपास 20 ते 30 रुपये जरी धरले तरी तुम्ही दिवसाचे 300 रुपये आणि ब्रेड वैगरे जर ठेवले तर 500 रुपये रोज तुम्ही आरामात कमवू शकता.

शेअर मार्केट – हा शब्द ऐकला की अनेक जण घाबरतात. पण तुम्हाला जर श्रीमंत होयच असेल तर याशिवाय तुम्हाला पर्यायच नाही. कारण पाहिले कस व्हायचे की डिमॅट अकाउंट खोलायच. सगळे अकाउंट चे डॉक्युमेंट आपल्याला घेवून जावं लागायचं . त्यानंतर 500, 700 रुपये द्यायला लागायचे. आता हे डिमॅट अकाउंट पूर्णपणे फ्री मध्ये ओपन होते म्हणजे शून्य रुपयात. काही कंपन्या आहेत चांगल्या जे शून्य रुपयात ओपन करून देतात.

जसं की एंजेल ब्रोकिंग, तुम्ही अशा ठिकाणी अकाउंट ओपन करू शकता जिथं पूर्णपणे डिजिटल अकाउंट ओपनिंग आहे. तुम्हाला तुमचे आधार कार्ड, पॅन कार्ड, बँकेचे डिटेल्स, मोबाईल नंबर, नाव फक्त तिथे फिल करायचं आहे. यामुळे नक्कीच तुम्ही 200 ते 300 रुपये कमवू शकता. फक्त एकच काळजी घ्यायची आहे तुम्हाला, पैसे लावताना खूप 2000, 5000 अशी नाही लावायची तर 500 रुपये पासून जरी तुम्ही सुरुवात केली तरी चालतंय.

कारण की कधी पण असेच पैसे लावायला पाहिजे की, जर इन्केस आपले नुकसान झाले तरी आपण ते सहन करू शकतो. म्हणजे जे एक्सट्रा पैसे असतात तेच लावायचे. तुम्ही ट्रेडिंग जरी नसला करत तरी इंवेस्टमेंट म्हणून सुद्धा शेअर मार्केट करू शकता. शेअर मार्केट एक चांगला पर्याय आहे. शेअर मार्केटच तुम्हाला नॉलेज मिळवण्यासाठी तुम्हाला स्टडी करावं लागेल.

जस की कोलगेट, शाम्पू, सिम कार्ड, यांच्या जर बातम्या किंवा यांचा प्रॉपर जर स्टडी केला तर तुम्हाला पूर्ण अंदाज येऊन जाईल. तसेच काही पुस्तकं आहेत, यु ट्यूब चॅनेल असतील यांचा देखील तुम्ही उपयोग करू शकता. तसेच गुगल चा वापर करून तुम्ही ट्रेडिंग करू शकता.

तुम्ही जर गृहिणी किंवा विद्यार्थी असाल तर तुम्हाला हे खूप फायद्याचं आहे, कारण तुम्ही पार्ट टाईम हे करू शकता. आणि दिवसाला कमीत कमी 300 ते 400 रुपये कमवू शकता. फक्त एकच लक्षात घा की तुम्हाला जास्त इन्वेटमेंट नाही करायची फक्त 500 रुपये पासून सुरुवात करायची आहे.

केक (केक बिझनेस) – अनेक महिलांना कुकिंग ची आवड असते. असच लॉकडाऊन मध्ये एक गृहस्थ आहे, त्यांनी बिझनेस चालू केला केक बनवायचा. सुरवातीला त्यांना 2, 3 दिवसाला एका केकची ऑर्डर येत होती. पण आज जवळपास 3 ते 4 केक ते एका दिवसाला बनवत आहे. जेवढे पण तुमचे नातेवाईक आहेत, मित्र परिवार आहे, किंवा तुम्ही जिथे राहता तिथून 2 किलोमीटर पर्यंत प्रत्येकाला कळलं पाहिजे की तुम्ही छान केक बनवता.

आणि एकदम क्वालिटीचे केक बनवता. कारण की केक ही अशी गोष्ट आहे की प्रत्येक जण केक हे घेतच. कारण की वाढदिवस हा वर्षातून एकदा येतो त्यामुळे कोणीही 200 किंवा 500 रुपयाकडे पाहत नाही. त्यामुळे तुम्ही क्वालिटी केक बनवत असाल. मस्त डिझायनेबल, कस्टमेबल तर नक्कीच तुमचा बिझनेस वाढतो. तुम्ही मार्केट पेक्षा 10, 20 रुपये कमी घेतले तर लोक नक्कीच तुमच्याकडे येतील आणि तुमचा सेल हा नक्कीच वाढेल.

यासाठी फक्त तुम्हाला केक बनवण्यासाठी ज्या काही वस्तू लागतात त्यासाठीच फक्त इंवेस्टमेंट करावी लागेल. सुरुवातीला 2000 ते जास्तीत जास्त 5000 रुपये टाकून सुद्धा तुम्ही हा बिझनेस चालू करू शकता. यामधे जर तुम्ही लोकांना होम डिलिवरी जरी दिली तर तुमचा बिझनेस मधे आणखी भरभराट होईल. कारण लोकांना घरपोच सुविधा फार आवडतात.

तुम्ही जर तुमच्याकडे अजून कोणी जर सपोर्टला असेल तर तुम्ही बलुन्स वैगरे जे डेकोरेशन जरी तुम्ही कस्टमरला करून दिले तर तुम्हाला तुमच्या बिझनेस मधे बराच प्रॉफिट होईल. कारण सरप्राइज देण, किंवा बर्थ डे पार्टी अरेंज करणे हे आज काल खूप वाढत आहे.

त्यामुळे केक सोबत तुम्ही असे डेकोरेशन अरेंज करण्याचे ऑर्डर घेत असाल, याची सर्व्हिस लोकांना दिली तर तुमचा हा बिझनेस मध्ये नक्कीच यशस्वी होताल. आणि जवळपास 1000 ते 2000 रुपये तुम्ही त्या दिवशी नक्कीच कमवू शकता. आपल्याला फक्त आपल्या केकची क्वालिटी आणि आपली सर्व्हिस चांगली ठेवायची आहे जेणेकरून आपला बिझनेस वाढेल.

दूध विक्री – फक्त 3 ते 5 तास तुम्हाला दूध विकायचं आहे. तर तुम्हाला काय करायचं आहे की तुमच्या जवळपास जो पण गायीचा गोठा असेल किंवा मग जे काही होलसेलर दूधवाले आहेत त्यांना संपर्क करायचा आहे. शहरामध्ये 60 रुपये लिटर दूध चालू आहे. आणि तुम्ही जर होलसेल मध्ये दूध घेतल तर तुम्हाला 45 ते 50 रुपयेला मिळत. आपण 50 रुपयेला जरी धरल तरी एका लिटर मागे 10 रुपये मिळतात.

तुम्ही 20 लिटरची कॅन जरी 3 तासात विकली तरी किती होतात जवळपास 200 रुपये होतात. आणि सोबत तुम्ही गायीचं जरी दूध विकल तर त्याच्यामागे 5 रुपये लिटर जरी धरल तरी 300 रुपये तुमचे 3 तासात होतात. सकाळी आणि संध्याकाळी अशा दोन्ही वेळेस तुम्ही दूध लावल तर 300 आणि 300, 600 रुपये तुम्ही एका दिवसाला कमवू शकता.

जे की तुम्ही जॉब कराल तर 10 तासाचा जॉब केलात तरी 600 रुपये एका दिवसाला आजच्या काळामध्ये मिळणं खूप अवघड आहे . त्यामुळे ही एक एकदम भारी बिझनेस आयडिया आहे. यासाठी तुम्हाला काही इंवेस्टमेंट करायची गरज नाही. तुम्हाला एक पंचपात्री लागेल जे की तुमच्या घरात असू शकते.

त्यांनतर तुम्हाला फक्त ते माप घ्यावं लागेल, एक लिटर, अर्धा लिटर, पावशेर. त्यानंतर पिशव्या सध्या बंद असल्यामुळे तुमचा तो देखील खर्च वाचू शकतो. ह्या 2 ते 3 गोष्टींमध्ये तुम्ही इंवेस्टमेंट केली तर हा बिझनेस तुम्ही आरामात सुरू करू शकता. ह्या ज्या पाच बिझनेस आयडिया होत्या.

ह्या एकदम सोप्या आहेत. कोणी पण हे बिझनेस स्टार्ट करू शकतो. ह्याला काही खूप मोठी अशी इंवेस्टमेंट करावी लागत नाही. तुमच्या बिझनेस साठी जर तुम्हाला ऑनलाईन वेबसाईट बनवायची असेल तर तुम्ही ते देखील करू शकता आणि आपला बिझनेस यशस्वी करू शकता.

वरील माहिती www.youtube.com/c/ShahanPan या चॅनल वरून संकलीत व शंब्दांकित केलेली आहे.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

1 thought on “कमीत कमी गुंतवणुकीत जास्त फायदा देणारे हे ५ बिझनेस ।। फक्त ५ ते १० हजार गुंतवून प्रतिमहिना दुप्पट नफा कमवू शकता ।। जाणून घ्या अशा व्यवसायांची माहिती !

Comments are closed.