कर्ज फेडल्यानंतर बँकेकडुन हि कागदपत्रे अवश्य घ्या ।। नाहितर होऊ शकते आर्थिक नुकसान ।। सामान्य व्यक्तीला माहित नसलेली महत्वपूर्ण माहिती !

शेती शैक्षणिक

बँकेकडुन कर्ज घेणे हे आता बऱ्याच जणांना नित्याचे झालेले आहे, कर्ज मिळविण्याची प्रक्रिया हि सर्वांनाच माहित असते व कर्जाची परतफेड सुध्दा, मात्र घेतलेले बँकेकडील कर्ज संपुर्ण परतफेड केल्यानंतर सुध्दा बँकेकडुन आपल्याला काहि कागदपत्रे मिळणे गरजेचे असते, बँकेने त्या कागदपत्रांची पुर्तता करायलाच हवी, बँकेचे ग्राहक म्हणुन तो तुमचा अधिकारच आहे.

आपल्याला बँकेकडुन घर घ्यायचे असेल, गाडी घ्यायची असेल, किंवा व्ययक्तिक कारणासाठी आपण कर्ज घेतो तसेच शेतकरी असाल तर शेतीसाठी पीक कर्ज घेत असतो व बँकेच्या नियमानुसार ते बँकेला परतफेड सुध्दा करतो. मात्र बँकेच्या कर्जाची परतफेड केल्यानंतर आपली आता मुक्तता झाली आहे असा बऱ्याच जणांना गैरसमज होतो,

कर्जाची रक्कम पुर्ण फेडुनही आपली जबाबदारी संपली असे नाहि, फेडलेल्या कर्जाबाबतीत बँकेकडुन “No Dues Certificate” म्हणजेच “ना देय प्रमाणपत्र” घेणे खुप आवश्यक आहे, बँकेकडुन “No Dues Certificate” आपण न घेतल्यास परत आपल्याला त्याच बँकेकडुन अथवा दुसऱ्या बँकेकडुन कर्ज घ्यावयाचे असल्यास आपल्याला अडचण निर्माण होऊ शकते,

बऱ्याच वेळा तात्काळ कर्जाची आवश्यकता असल्यास अश्या वेळेस आपल्याला परत मागच्या कर्जाचे “नो ड्युज प्रमाणपत्र” काढण्यात वेळ खर्च करावा लागु शकतो त्या शिवाय नविण कर्ज आपल्याला मिळणार नाहि.

ना देय प्रमाणपत्र (No Dues Certificate) : संपुर्ण कर्जाची परतफेड केल्यानंतर “No Dues Certificate” बँकेकडुन संबधीत ग्राहकाला दिले जाते, तसेच बँकेव्यतिरीक्त खाजगी नोंदणीकृत सावकाराकडुन जरी कर्ज घेतलेले असेल व त्या कर्जाची संपुर्ण परतफेड केली असेल तर अश्या नोंदणीकृत सावकाराकडुन सुध्दा “No Dues Certificate” घेणे खुप गरजेचे आहे.

No Dues Certificate ला मराठीत “ना देय प्रमाणपत्र” असे म्हणतात, त्याचा शॉर्ट फॉर्म NDC प्रमाणपत्र असा सुध्दा आहे. NDC प्रमाणपत्रालाच Closure Letter सुध्दा म्हणतात. प्रक्रियेनुसार व नियमाच्या अनुषंगाने आपण एकरकमी, नगदी अथवा हप्त्याने अथवा चेकने कर्जांची पुर्ण परतफेड केत्यानंतर बँक कर्जदाराला एक पत्र पाठवुन कर्ज घेत्यावेळी

ग्राहकाने सादर केलेली मुळ प्रमाणत्रे व कागदपत्रे बँकेकडुन घेवुन जाण्यास सुचवते, मात्र बऱ्याच वेळा ग्राहकाला संपुर्ण कर्जाची रंक्कम परतफेड करूनही बँकेकडुन असले पत्र येत नाहि त्यावेळेस ग्राहकाने स्वत: हुन बँकेशी संपर्क करून सादर केलेली मुळ प्रमाणपत्रे व

“No Dues Certificate” मिळवीण्यासाठी बँकेकडे लेखी अर्ज करावा, खाजगी नोंदणीकृत सावकाराकडुन कर्ज घेतांना सादर केलेली कागदपत्रे परत मिळवीण्यासाठी व त्याच्याकडुन “No Dues Certificate” प्राप्त करण्यासाठी सुध्दा त्याच्याकडे लेखी अर्ज सादर करता येतो.

तारण कर्ज (Mortgage Loan) : Mortgage कर्ज प्रकारामंध्ये कर्ज घेत्यावेळी ग्राहक आपली संपत्ती कर्जाच्या बदल्यात बँकेला अथवा खाजगी नोंदणीकृत सावकाराला लिहुन देतो त्याला आपण तारण असे सुध्दा म्हणतो, लिहुन दिलेल्या मालमंत्तेची मालकी कर्ज घेतल्यानंतर जरी कर्ज घेतलेल्या ग्राहकाची असली

तरी कर्जाच्या अटि व शर्ती नुसार कर्ज परतफेड करण्यास कर्जदार असमर्थ झाल्यास Mortgage असलेल्या मालमंत्तेला जप्त करण्याचा अधिकार बँकेकडे असतो, अशी तारण ठेवुन घेतलेल्या कर्जांची संपुर्ण परतफेड केल्यानंतर बँकेचे “No Dues Certificate” असल्याशिवाय तारण मालमंत्ता विकता अथवा हस्तांतरीत करता येत नाहि.

वाहन कर्ज (Vehicle Loan) : वाहन कर्ज घेतलेले असल्यास संबंधित वाहनाचे RC Certificate म्हणजेच प्रादेशीक परिवहन कार्यालय (R.T.O.) कार्यालयातील वाहनाचे नोदणी प्रमाणपत्र बँकेच्या नावे असते, वाहन कर्जांची संपुर्ण परतफेड केल्यानंतर बॅकेकडुन “No Dues Certificate” घेवुन ते R.T.O. कार्यालयात सादर करून ग्राहक वाहन आपल्या नावावर करून घेवु शकतो.

विमा पॉलिसी तारण कर्ज : विमा पॉलिसी तारण ठेवुन सुध्दा बँकेकडुन कर्ज मिळते अश्या वेळी बँक संबधित ग्राहकाची विमा पॉलिसी Assign करून घेते, ग्राहकाने बँकेकडुन घेतलेल्या कर्जाची संपुर्ण परतफेड केल्यानंतर ती विमा पॉलिसी बँकेकडुन “No Dues Certificate” घेवुन संबंधित विमा कंपणीकडुन Re Assign करून घ्यायला हवी.

संपुर्ण कर्जाची परतफेड केल्या नंतर संबंधित बँकेडुन ग्राहकाला Cibil Score तिस दिवसानंतर मिळवता येवु शकतो Cibil Score ची आवश्यकता क्रेडिट कार्ड मिळविण्यापासुन ते इतर कर्ज मिळवीण्यासाठी आवश्यक असते.