घेतलेले कर्ज लवकरात लवकर कसे फेडायचे? ।। कर्जातून लवकर आणि स्वस्तात मुक्त होण्यासाठीच्या काही युक्त्या जाणून घ्या या लेखातून !

अर्थकारण लोकप्रिय शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

लवकरात लवकर कर्ज कसे फेडायचे? हा प्रश्न अनेक वेळा आपल्याला पडलेला आहे. कोरोणा आणि लॉकडाउन मुळे अनेक लोकांच्या नोकर्‍या गेल्या. अनेकांचे व्यवसाय बंद पडले. अशामध्ये कर्जाचे हप्ते भरणे कठीण झाले आहे. पण आता जीवन पूर्ववत होत आहे. आज आपण 4 युक्त्या पाहणार आहोत,

त्याचा वापर करून तुम्ही तुमचे कर्ज लवकरात लवकर फेडू शकता. सगळे युक्त्या एकदम प्रॅक्टिकल आहेत. कर्ज म्हणजे लोन हे वेगवेगळ्या प्रकारची असते. जसे की होम लोन, पर्सनल लोन, क्रेडिट कार्ड लोन, कंजूमर लोन, जे वस्तू विकत घेण्यासाठी घेतले जाते. जसे की लॅपटॉप, मोबाईल, एसी, फ्रीज, वगैरे. कार लोन आणि अनेक इतर वस्तूसाठी.

1. जास्त इंटरेस्ट म्हणजे व्याजदर असलेल्या लोनला आधी प्राधान्य द्या : समजा तुम्ही अनेक लोन घेतले असतील जसे की, क्रेडिट कार्ड लोन, होमलोन, कन्सुमर लोन, कार लोन, प्रत्येक लोनचा इंटरेस्ट हा वेगवेगळा असतो. काही लोनचे व्याज जास्त असतात तर काही लोनचे कमी असते. ज्या लोनचा जास्त व्याज आहे सर्वात आधी आपल्याला त्याला प्राधान्य द्यायचे आहे.

समजा क्रेडिट कार्डचे व्याजदर आहे 18 टक्के आणि होम लोन व्याजदर आहे 8 टक्के. तर क्रेडिट कार्ड चे लोन कसे लवकर संपवता येईल याला तुम्ही प्राधान्य दिले पाहिजे. क्रेडिट कार्ड आणि पर्सनल लोन व्याजदर सहसा जास्त असतात. जेव्हा तुम्ही जास्त व्याजदर असलेले कर्ज फेडायला सुरुवात करता तेव्हा तुमच्या हातात जास्त पैसे राहायला लागतात.

2.जे सहज फेडता येईल असे कर्ज लवकर फेडून टाका : आता हा मार्ग पहिल्या मार्गाच्या एकदम विरुद्ध आहे. पण खूपच प्रभावी आहे. जे कर्ज तुम्हाला सहज फेडता येईल ते लवकरात लवकर फेडून मोकळे व्हा. समजा तुम्ही दोन लाख पर्सनल लोन घेतले आहे आणि साठ हजाराचे क्रेडिट कार्ड लोन आहे. इथे पर्सनल लोन पेक्षा क्रेडिट कार्डचे लोन फेडणे सोपे आहे. अशा वेळेस क्रेडिट कार्डचे लोन फेडून मोकळे व्हा. असे एकेके लोन फेडल्याने तुमचा आत्मविश्वास वाढतो. आणि बाकीचे लोन लवकर फेडायला तुम्हाला प्रोत्साहन मिळते.

3.तुमचे होम लोन दुसऱ्या बँकेत ट्रान्सफर करा किंवा तुमच्या बँकेला व्याजदर कमी करायला सांगा :  ज्या बँकेकडून आपण होम लोन म्हणजे घर कर्ज घेतो ते तुमचे व्याजदर तुम्हाला काहीही न सांगता वाढवू शकतात. त्यासाठी तुम्हाला सातत्याने तुमच्या होमलोन चे व्याजदर काय चालू आहे त्यावर लक्ष ठेवावे लागेल.

होमलोन मध्ये 2 प्रकारचे इंटरेस्ट असतात. 1. फिक्स्ड इंटरेस्ट 2. फ्लोटिंग इंटरेस्ट. फ्लोटिंग इंटरेस्ट मध्ये व्याजदर वरखाली होत असतो. याचा फायदा कधीकधी बँक घेतात. नवीन कस्टमरला ते कमी इंटरेस्ट लावतात मात्र तुमचे इंटरेस्ट वाढवतात. अशावेळेस तुम्ही बँकेला विनंती करू शकता. तुमचे व्याजदर कमी करणेसाठी.

तिथे तुम्हाला छोटी फी भरावी लागते. पण असे केल्याने तुमचे लाखो रुपये वाचतात. समजा बँक एकत नसेल तर तुम्ही तुमचे होमलोन दुसऱ्या बँकेत ट्रान्स्फर करू शकता. जिथे कमी व्याजदर आहे. या प्रक्रियेमध्ये आपला थोडा वेळ जातो पण अशाने आपले लाखो रुपये वाचतात.

4. कमी व्याजदराच्या लोनवर टॉपअप करून बाकीची कर्ज फेडा : ही युक्ती एकदम जबरदस्त आहे. समजा तुमच्याकडे जास्त व्याजदर असलेले लोन्स आहेत. जसे की, पर्सनल लोन, कन्सुमर लोन, कार लोन, क्रेडिट कार्ड लोन. आणि तुमच्याकडे कमी व्याजदर असलेले लोन आहे. जसेकी होमलोन.

इथे तुम्हाला काय करायचे कमी व्याजदर असलेले लोनवर टॉपअप लोन घ्यायचे आहे. आणि ती रक्कम बाकीचे जास्त व्याजदर असलेले कर्ज फेडण्यासाठी वापरायची आहे. समजा तुम्ही 8% नी होमलोन घेतल आहे. आणि 18% ने पर्सनल लोन इथे तुम्ही होमलोन वर टॉपअप लोन घेवून तुमचे पर्सनल लोन फेडू शकता. अशाने तुमचा व्याजदर कमी होईल आणि तुमच्या हातात जास्त पैसे राहायला मदत होईल.

तर अशाप्रकारे आपण आपले कर्ज लवकर फेडून कर्जाच्या जाळ्यातून लवकर सुटू शकतो. तुमच्याकडे देखील असे काही उपाय असतील तर ते कमेंट मध्ये नक्की कळवा जेणेकरून आपण अजून जास्त लोकांना याचा फायदा मिळवून देऊ शकू. तुम्हाला आजचा लेख कसा वाटला हे नक्की कळवा. धन्यवाद !

वरील माहिती www.youtube.com/c/ShahanPan या चॅनल वरून संकलीत व शंब्दांकित केलेली आहे.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

1 thought on “घेतलेले कर्ज लवकरात लवकर कसे फेडायचे? ।। कर्जातून लवकर आणि स्वस्तात मुक्त होण्यासाठीच्या काही युक्त्या जाणून घ्या या लेखातून !

Comments are closed.