कर्जासाठी जामीनदार होताय तर सावध राहा ।। हा लेख तुमच्यासाठी अतिशय महत्वाचा आहे ।। जाणून घ्या आपण काय काळजी घेऊ शकतो आपल्यावर ह्याचा काय प्रभाव पडू शकतो?

Uncategorized

नमस्कार मित्रांनो, मित्रांनो हिंदी मध्ये एक म्हण आहे, खाया पिया कुच नही, गिलास तोडा बाराना. आता तुम्ही विचार करत असाल की, या म्हणीचा इथे का उपयोग केला, तर आपला हा विषयच तसा आहे जर तुम्ही दुसऱ्याच्या कर्जासाठी जामीन राहत असाल तर सावधान.

कारण की कधी कधी या म्हणी सारखी परिस्थिती निर्माण होऊ शकते. असे नाही की प्रत्येका सोबत असे होतेच, पण याचा अर्थ असाही नाही की तुम्ही कोणाला जामीन राहू नये, फक्त काही गोष्टींची जर काळजी जामीन होताना घेतली तर मात्र फुकट चा मनस्ताप आपण टाळू शकतो.

मित्रांनो, याबद्दलची ही सविस्तर माहिती आहे. मित्रांनो वित्त पुरवठा करणाऱ्या अनेक बँका ,संस्थामध्ये जामीनदार अनिवार्य असून कर्ज घेणारे खातेदार आपले नातेवाईक किंवा मित्र यांना जामीनदार म्हणून सादर करताना दिसतात. अनेकदा आपण एखाद्या मित्राचे, शेजाऱ्याचे किंवा ओळखीच्या व्यक्तीच्या कर्जाचे जामीनदार राहतो.

जोपर्यंत कर्जदार व्यक्ती त्याच्या कर्जाचे हप्ते नियमित फेडत असतो,तोपर्यंत तुम्हाला कसलीही तसदी नसते. अर्जदार नियमित परतफेड करत असेल तर बहुतेक वेळा आपण विसरूनही जातो की आपण या कर्जाचे जामीनदार होतो. पण जर कर्जदाराने कर्ज फेडण्यात कसूर केली तर पहिली वीज कोसळते ती जमीन दारावरच.

आणि मित्रांनो, इं’डियन कॉ’न्ट्रॅक्ट ॲ’क्ट नुसार जामीनदार या कर्जाचा पर्यायी देणे दार नसून तो कर्जाचा भागीदार अस धरण्यात येतो. म्हणून कर्ज फेडण्याची जबाबदारी जेवढी कर्जदाराची आहे तेवढीच ती जामीनदाराची सुद्धा आहे. असे हा कायदा सांगतो.

तुम्ही जेव्हा एखाद्या कर्जाची जामीन असता तेव्हा त्यात तीन पक्ष संबंधित असतात. कर्ज घेणारा, बँक आणि जामीनदार. परिणामी जमीनदाराची जोखीम थोडीही कमी होत नाही तो एक प्रकारे सहकर्जदार असतो. आज जामीनदार राहताना अनेक लोक म्हणतात.

“तेवढे काय त्यात सही तर करायची आहे. पुढे कर्जदार व बँक बघून घेतील” पण जामीन राहणे हे कधीकधी अतिशय अवघड गोष्ट होऊन बसते. त्यामुळे सही करण्याआधी एक वेळ विचार करा, कारण एक चूक तुम्हाला आयुष्यभर भोगावी लागू शकते.

दुसरा आणि सर्वात महत्त्वाचा फरक पडतो तो तुमच्या “सिबिल ” च्या अहवालात सिबिल म्हणजे क्रेडिट इन्फॉर्मेशन ब्युरो( इंडिया) लिमिटेड भारतातील जवळपास सर्व छोट्या मोठ्या बँका या संस्थेला त्याच्या थकीत कर्जदाराच्या याद्या पुरवीत असतात. त्यामुळे कर्जबुडयाची पूर्ण माहिती अन्य बँकांनाही होऊ शकते.

पुढे कुठलेही कर्ज देताना कुठलीही बँक तुमचा हा सिबिल अहवाल तपासूनच तुम्हाला कर्ज देत असते. अगदी नियमित आणि अनियमित कर्ज फेडणार यांची सुद्धा पूर्ण कुंडली येथे असते. त्यामुळे जेव्हा कधी तुम्ही जामीनदार असलेली व्यक्ती कर्जाचे हप्ते बरोबर फेडत नाही तेव्हा त्याचे नाव या काळया यादीत जातेच.

पण त्याच्याबरोबर जामीन दाराचे ही नाव तेथे नमूद होते. कारण कायद्यानुसार जामीनदार हा त्याचा सह कर्जदार असतो. त्यामुळे तुम्हाला गरज भासली आणि तुमच्या गरजेसाठी कर्ज घेण्यास जाता, तेव्हा तुम्ही काहीही न करता तुमचे सिबिल रिपोर्ट खराब असल्यामुळे कर्ज मिळण्यास अडचणी येऊ शकतात.

तुम्ही तुमच्या भविष्यासाठी योजलेल्या योजनांना अचानक सुरूंग लागतो कारण कर्जदार जेव्हा ते पूर्ण कर्ज फेडेल किंवा तितक्या तोलामोलाचा दुसरा जामीनदार आणेल व बँक परवानगी देईल तरच तुमची या प्रकरणातून सुटका शक्य असते. पण तीन पक्ष गुंतवून असल्यामुळे अतिशय किचकट व वेळ काढू प्रक्रिया आहे.

म्हणून मित्रांनो, जामीनदार म्हणून राहताना तुम्ही कोणती काळजी घ्याल?: १.साधारणतः गॅरंटी आणि परिचय नसलेल्या व्यक्तींचे अजिबात जामीनदार राहू नका. २.कर्जदाराने पुरेशी मालमत्ता तारण ठेवली आहे का ते तपासून घ्या. अपुऱ्या तारण कर्जाचे जामीन राहण्यास शक्यतो टाळा.

३.त्या कर्जाचा इन्शुरन्स काढता येतो का ते पहा आणि तो काढण्याचा आग्रह धरा, जेणेकरून तुमची जोखीम कमी होईल. ४.मुख्य म्हणजे नाही म्हणायला शिका. शाश्वती वाटत नसतानासुद्धा फक्त मानसिक दडपणाखाली हो म्हणू नका. विचार करून निर्णय घ्या. तर मित्रांनो जामीनदार होण्यापूर्वी कोणती खबरदारी घ्यायला पाहिजे आणि जामीनदार म्हणजे नेमके काय आहे, याबद्दलची ही माहिती.

सूचना- कायदे हे वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळा न्यायालये ते रद्दही करत असतात, वर नमूद माहिती ही राज्य शासनाच्या वेबसाईटवरील माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी याबाबत कोणतेही कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी कायदेतज्ञांशी सल्ला घ्यावा व अद्ययावत माहिती घ्यावी,

अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.