नमस्कार मित्रांनो आज आपण पाहणार आहोत की कोणत्या गु’न्ह्यासाठी कोणते क’लम लागतात. महाराष्ट्र मध्ये किंवा भारतामध्ये जेव्हा हा’णामारी होते भां’डण होतं तेव्हा बहुतांश वेळा आपल्याला चर्चा होताना दिसते की क’लम कोणते लागणार? किंवा एखाद्याला जर मारलं असेल,
त्याला जबर दुखापत झाली असेल तर त्यालाही कळत नाही की मी आता नक्की कोणता गुन्हा दाखल करू? तर याच बद्दल आज आपण पाहणार आहोत की कोणत्या प्रकारच्या मारामारीला कोणते कलम लागतात? तर मित्रांनो आपण सुरुवात करूया भारतीय दंड आचारसंहिते पासून. हे जे भारतीय दंड आचारसंहिता आहे ते 1860 साली भारताला मिळाला.
भारतीय दंड आचारसंहिता म्हणजे काय तर जेवढे भारतामध्ये घडतील त्या गुन्ह्यांना लागू होणारा कायदा म्हणजे भारतीय दंड आचारसंहिता. कलम 323: इच्छापूर्वक दु’खापत पोचवल्याबद्दल शिक्षा: अगदी किरकोळ मा’रहाण, शि’विगाळ हाताने केलेली मारहाण किंवा ध’क्काबु’क्की, यावेळेस कलम 323 वापरले जाते.
हा गु’न्हा दाखल होत नाही तर एनसीआर दाखल होतो म्हणजेच अदखलपात्र गु’न्हा दाखल होतो. या कलमानुसार एक वर्षाचा कारावास आणि एक हजार रुपये दंड किंवा दोन्ही हे शिक्षा होऊ शकते. हा दखलपात्र गु’न्हा दाखल करणे देखील महत्त्वाचं असतं कारण की मित्रांनो पुढे जाऊन जर मोठे भांडण झाले किंवा आणखी काही झाले तर आपण या दखलपात्र गु’न्हा च्या आधारे दाखवू शकतो की या आधी देखील मी या व्यक्तीवर मारहाण केल्याबद्दल रिपोर्ट दिला आहे.
कलम 324:- घातक ह’त्यारांनी किंवा साधनांनी इच्छापूर्वक दु’खापत पोहोचणे: जेव्हा एखादा घातक हत्यारांनी मारहाण केली असेल परंतु किरकोळ दुखापत झाली असेल त्यावेळेस हा कलम लागू होतो. कलम 324 ला जामीन मिळतो म्हणजेच हा जा’मीनपात्र असणारा गुन्हा आहे परंतु हा अ’दखलपात्र गुन्हा मध्ये मोडत नाही तर गु’न्ह्यांमध्ये मोडतो या गु’न्ह्यासाठी तीन वर्षाचा कारावास होऊ शकतो हा गु’न्हामध्ये मोडला जाणारा सर्वात पहिला कलम आहे.
कलम 325:- इच्छापूर्वक व जबर दुखापत पोचवल्याबद्दल शिक्षा: यामध्ये असलेली दुखापत ही जबरदस्त दुखापत असते. परंतु यामध्ये मृ’त्यू होऊ शकेल अशा ह’त्याराने मारलेल नसतं किंवा अशा हेतूने मारलेलं नसतं म्हणून हा कलम 325 लागतो याला सात वर्षांपर्यंत कारावासाची शिक्षा होऊ शकते. या गुन्ह्याला देखील जामीन मिळू शकतो.
कलम 326:- घातक हत्याराने किंवा साधनांनी इच्छापूर्वक जबर दुखापत पोहोचवणे: एखाद्या व्यक्तीकडून जर घातक हत्याराने किंवा साधनाने जबर दुखापत झाली असेल ज्यामुळे मृत्यू होऊ शकतो तर अशा वेळेस जो कलम लागतो तो आहे कलम 326. या 326 च्या गुन्ह्याला लगेच जामीन मिळत नाही, तसेच या गुन्ह्याला दहा वर्षांची शिक्षा आहे, तरीदेखील हा गुन्हा तालुका कोर्टात चालतो ह्या गुन्हासाठी जिल्हा न्यायालयात जावे लागत नाही.
आणि आता जामीन देखील तालुका न्यायालयातच मिळण्याबाबत हालचाल चालू आहे. असे म्हणता येणार नाही की या गुन्ह्याच्या कारवाई साठी जिल्हा न्यायालयालातच जावं लागतं पण कधीकधी मात्र या गुन्ह्याचे न्यायासाठी जिल्हा न्यायालयात जावे लागू शकते. अपवादात्मक स्थितीमध्ये तालुका न्यायालयात जामीन न झाल्यास तुम्हाला जिल्हा न्यायालयात जावे लागू शकते.
मित्रांनो, आजकालच्या या परिस्थितीमध्ये आपण अनेकदा पाहिला आहे कि ऍ’सिड हल्ले झालेले आहेत तरी असे ह’ल्ल्यांसाठी एक वेगळा कलम बनवण्यात आला आहे तो आहे कलम 326 अ. कलम 326 अ:- ऍ’सिड चा वापर करून इच्छापूर्वक जबर दुखापत करणे: या केस मध्ये दहा वर्षाचा कारावास किंवा आजीवन कारावास देखील होऊ शकतो. तसेच पीडित व्यक्तीच्या उपचारांसाठी लागणारा खर्च देखील द्रव्य दंड म्हणून वसूल केला जाऊ शकतो. ऍ’सिड हल्ला हा एक क्रूर हल्ला म्हणून धरला जातो.
आता मित्रांनो महाराष्ट्र मध्ये नियमित पणे घडलेल्या एका गुन्ह्याबद्दल आपण बोलूयात. कलम 327:- मालमत्ता जबरीने घेण्यासाठी किंवा अवैध्य कृती करण्यास जबरीने भाग पाडण्यासाठी इच्छा पूर्वक दुखापत पोहोचवणे: हा कलम, जर एखाद्याने एखाद्याची मिळकत ताब्यात घेण्यासाठी जबर दुखापत पोहोचवली असेल तर त्यासाठी लागू होतो. या गुन्ह्याला देखील दहा वर्षांच्या कारावासाची शिक्षा आहे.
तसेच, हा दखलपात्र गुन्हा असल्यामुळे याला जामिन मिळत नाही. अनेक वेळा जमीन विकत घेण्यासाठी मारण्याचे प्रकार घडतात परंतु पोलिस स्टेशनमध्ये आपण फक्त मारहाण झाल्याचे सांगतो. त्यामुळे कलम 327 लागू होत नाही तर असे न करता जर तुम्हाला मिळकतीसाठी कोणी मारहाण केली असेल तर पोलिसांना सांगताना त्यामागचं खरं कारण सांगायला विसरू नका.
आणखी एक गुन्हा जो की आपल्याकडे जास्त प्रमाणात होतो आणि ज्यामध्ये माणसांना दुखापत होत नाही मात्र तरीही हा जास्त खतरनाक आहे तो आहे अपघात करण्याच्या उद्देशाने विष देणे. कलम 328:- जीवे मारण्याच्या उद्देशाने विष इत्यादींच्या सहाय्याने दुखापत पोहोचवणे: एखाद्याने जर एखादाला विष पाजुन मारण्याचा प्रयत्न केला
तर किंवा एखाद्याला विष पाजुन त्याला दुखापत करण्याचा प्रयत्न केला किंवा आधी बेशुद्ध करून मग मारणे अशा प्रकारे जर एखाद्याने प्रयत्न केला तर त्यावर कलम 328 लागू होतो. या गुन्ह्याला देखील जामीन मिळत नाही तसेच या गुन्ह्याला देखील दहा वर्षांची शिक्षा आहे. परंतु या कलमाबद्दल अनेकांना माहीत नसल्यामुळे लावले जात नाहीत.
यानंतर पाहुयात एक असा कलम जो की अतिशय साधा आहे. त्याला शिक्षा फारफार एक महिना दिलेली आहे पण तरीही हा गुन्हा मोठा ठरतो कारण कि यात गुन्हा पासून सुरुवात होऊन आणि पुढे मोठ्या गुन्ह्यांना देखील हे कारणीभूत ठरले आहे. कलम 341:- एखाद्याची वाट अडवणे, एखाद्याचा रस्ता अडवणे: एखाद्याची वाट अडवणे, गाडी अडविणे, तू इथे का आला आहे? असे विचारणे अशा प्रकारच्या गुन्ह्यासाठी कलम 341 लागतो. हा गुन्हा अगदी छोटा वाटत असला तरी याच गुन्हयामुळे पुढे जाऊन मोठे वाद निर्माण होतात.
याच कलमांबरोबर कलम 504 आणि 506 बद्दल बोलणे महत्त्वाचे आहे. कारण की कलम 504 आणि 506 आहे हे या सर्व गुन्ह्यांबरोबरच आलेले असतात. कलम 504:- शांतता भंग करणे: एखादा सार्वजनिक ठिकाणची शांतता भंग करणे किंवा एखाद्याला उकासवसणे, अशा पद्धतीचा गुन्हा कलम 504 मध्ये येतो.
कलम 506:- धमकी देणे: एखाद्याला जबरदस्त मारण्याची किंवा जीवे मारण्याची धमकी देणे अशा गुन्ह्यांचा समावेश यात होतो. तर अशाप्रकारे हे कलम आहेत मित्रांनो, आपण बरेचदा पोलीस स्टेशनमध्ये जाऊन रिपोर्ट देण्याची टाळतो परंतु असे करू नका. तुम्हाला कोणत्याही प्रकारे कसलाही त्रास होत असल्यास पोलीस स्टेशन मध्ये जाऊन वरील कलमांच्या आधारे रिपोर्ट नक्की द्या.
आता अशा प्रकारचे काही कलम पाहू ज्याच्यामध्ये किमान दहा वर्षांची शिक्षा आहे आणि जे फक्त जिल्हा न्यायालयात चालतात. कलम 306:- आ’त्महत्या चिथावणी देणे: मित्रांनो, आता आपण बघतो की सासर्यांच्या जाचाला कंटाळून सुनेने आ’त्महत्या केली किंवा सावकाराच्या कर्जाला कंटाळून शेतकऱ्यांनी आत्महत्या केली तर अशा प्रकारचे गुन्हे असतात ते कलम 306 मध्ये येतात. त्यामध्ये एखाद्या व्यक्तीमुळे जर एक दुसरी व्यक्ती आ”त्महत्या करण्यास प्रवृत्त होत असेल त्यावर हा कलम लागतो. यामध्ये किमान दहा वर्षाची शिक्षा होते.
यानंतर सर्वात महत्त्वाचा कलम आहे कलम 307. कलम 307:- खु’नाचा प्रयत्न करणे: एखाद्याच्या खुनाचा प्रयत्न करणे किंवा त्याचा मृत्यू होईल असे दुष्कृत्य करणे. या कलमाला जामीन मिळत नाही तसेच आजीवन कारावासाची शिक्षा मिळते. एखाद्याला घातक श’स्त्राने मारहाण करणे, किंवा पो’टात त’लवार खुपसणे किंवा आणखी कशाने मारले ज्यामुळे त्या व्यक्तीचा मृ’त्यू होऊ शकतो. एखाद्याचा मृ’त्यू होण्याचे त्याला मारून टाकण्याची आणि जर मारलं असेल तर कलम 307 लागतो.
आणि आता सर्वात महत्त्वाचा आणि आपल्या सर्वांना माहीत असलेला कलम म्हणजे कलम 302. कलम 302:-खु’नास शिक्षा: एखाद्याचा कखून करणे किंवा खू’न करण्यासाठी कारणीभुत ठरणे याच्यासाठी हा कलम लागतो या गुन्हात मृ’त्यूची म्हणजे फा’शीची शिक्षा किंवा आजीवन कारावासाची शिक्षा होते. तर अशाप्रकारे हे कलम आहेत जे आपण पाहिले. कोणत्या गु’न्ह्यांमध्ये जामीन मिळतो आणि कोणत्या गु’न्ह्यामध्ये जामीन मिळत नाही.तसेच हा’णामारी पासून तर खु’णापर्यंतचे गुन्हे आणि त्यांना होणारी शिक्षा आपण पाहिली.
सूचना- कायदे हे वेळोवेळी बदलत असतात, कित्येक वेळा न्यायालये ते रद्दही करत असतात, वर नमूद माहिती ही राज्य शासनाच्या वेबसाईटवरील माहितीचा अभ्यास करून जाहीर करण्यात आली आहे त्यात नवीन सुधारणा होत असतात, परिणामी याबाबत कोणतेही कायदेशीर कारवाई करण्यापूर्वी कायदेतज्ञांशी सल्ला घ्यावा व अद्ययावत माहिती घ्यावी, अन्यथा केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
Very nice and informative, like it. Knowledge gained, thank you so much. Would you please like to share with us the information regarding FEMA Foreign Exchange Management Act, and Foreign Exchange Regulation Act, ? This would be very precious for us especially for NRI citizens.