गावांच्या नावा नंतर असलेले खुर्द, बुद्रुक, कसबा याचा अर्थ काय? ।। गावठाण म्हणजे काय ? जाणून घ्या महत्वाची माहिती या लेखातून !

लोकप्रिय शेती शैक्षणिक

तुम्ही काही गावांच्या नावा नंतर खुर्द अथवा बुद्रुक लिहिलेलं बऱ्याच वेळा पाहिला असेल. तसेच गावा संबंधित असलेले मौजे कसबा व गावठाण शब्द सुद्धा बऱ्याच वेळा ऐकले असेल. तर आज आपण जाणून घेणार आहोत बुद्रुक, मौजे, कसबा व गावठाण यांचा अर्थ काय आहे.

1)तर सुरुवातीला गाव हा शब्द कुठून आला हे जाणून घेऊ: गाव हा शब्द गाय व गो या शब्दापासून जन्माला आला आहे. याची सुरुवात अश्मयुगापासून होते. पूर्वी माणूस जंगलात भटकत असे. त्यानंतर हळूहळू शेतीचा शोध लागला माणूस एका ठिकाणी समूहाने राहू लागला.

माणूस शेतीसाठी म्हैस, बैल व गाय पळू लागला. पूर्वी ज्या क्षेत्रात गायी चारायला जात ते क्षेत्र गायीचे क्षेत्र म्हणून ओळखले जायचे. त्यावरून च गावचे क्षेत्र समजले जाऊ लागले. गाय या शब्दाच्या अपभ्रंशातून गाव हा शब्द तयार झाल्याचे सांगितले जाते.

2) बुद्रुक व खुर्द म्हणजे काय ते जाणून घेऊ: काही गावांच्या नावा नंतर खुर्द लिहिले जाते. तर काही गावांच्या नावा नंतर बुद्रुक लिहिले जाते. उदाहरणात शिरोली खुर्द व शिरोली बुद्रुक असे बरीच गावे तुम्हाला बघायला मिळतील. अशी गावे जुळी असतात. तसेच त्यांच्यामध्ये जास्त अंतर देखील नसते.

काही गावांमधून छोटीशी नदी ओढा एखादा रस्ता जातो तेव्हा ते गाव दोन भागात विभागले जाते. त्यातील एक गाव खुर्द व दुसरे गाव बुद्रुक नावाने ओळखले जाते. यापैकी ज्या गावाच्या नावानंतर बुद्रुक लावले जाते ते गाव मोठे असते. बुद्रुक हा शब्द बुजुर्ग या फारशी शब्दाचा अपभ्रंश आहे. बुजुर्ग म्हणजे मोठा किंवा थोरला.

तसेच ज्या गावाच्या नावानंतर खुर्द लावले जाते ते गाव छोटे असते. खुर्द हा शब्दसुद्धा फारसी भाषेतून आला आहे. खुर्दचा संस्कृत मध्ये अर्थ होतो क्षुद्र. म्हणजे लहान किंवा किरकोळ.आशा प्रकारे जुळ्या गावांमध्ये मोठ्या गावा नंतर बुद्रुक व छोट्या गावानंतर खुर्द शब्द लावला जातो.

3) मौजे म्हणजे काय : काही छोट्या गावांचा पुढे मौजे शब्द लावला जातो. तर मौजे हा शब्द अरबी भाषेतून आला आहे. मौजअ अथवा मौझा या अरबी शब्दातून हा शब्द भारतात आला आहे. मौजे या शब्दाचा अर्थ गाव असा होतो. जे गाव छोटी आहे किंवा ज्या गावाला कमी वाडी-वस्ती आहेत त्या गावापुढे मौजे शब्द लावतात.

4) कसबा म्हणजे काय : हा शब्द उत्तर अमेरिकेतील Quasha या शब्दापासून आला आहे. कसबा या शब्दाचा अर्थ होतो बाजारपेठेचे ठिकाण. याचा दुसरा अर्थ मुळगाव किंवा जुनागाव असा देखील होतो. ‘कसबा’ म्हणजे कसबी किंवा विशेष कौशल्य असणारे लोक जिथे राहतात, अशा लोकांचे गाव.

व्यापार, हुन्नर तसेच कसबी मजुरी करणारे लोक मौज्यापेक्षा कसब्यात अधिक असत. कसब्याचे गाव मौज्यापेक्षा जास्त विस्तृत, रोजगारी व संपन्न असे. गावगाड्यात कसब्याच्या आसपासच्या गावातील लोक आपल्या दैनंदिन गरजेच्या आणि उपयोगाच्या वस्तूंची खरेदी करण्यासाठी कसब्याच्या ठिकाणी येत असत.

येथे बाजारपेठ असल्याने कारागीर लोक आपल्या वस्तूंची ग्राहकांना विक्री करण्यासाठी कसब्याच्या ठिकाणाला येत असत. ज्याठिकाणी हे खरेदी-विक्रीचे व्यवहार होत असत, अशा ठिकाणाला पेठ म्हटले जाई. पेठ म्हणजे बाजार किंवा दुकानांनी व्यापलेला गावचा भाग. पूर्वी ‘कसबा’ हे ग्रामीण भागातील व्यावसायिकांचे मुख्य केंद्र होते.

5) गावठाण म्हणजे काय : गावामध्ये रहिवासी वस्ती असलेला भाग म्हणजे गावठाण. प्रत्यक्ष जास्त घरे व जास्त लोकसंख्या असणारे गावातील जागा म्हणजे गावठाण होय. गावठाणाची जागा जिल्हाधिकाऱ्यांनी निश्चित करावयाची आहे. तसेच कोणकोणत्या जमिनी गावठाणात मोडतात याची खात्रीही त्यांनी करायची आहे. गावठाणात समाविष्ट होणाऱ्या जमिनीच्या हद्दी कायम करणे आणि या जागेमध्ये योग्य ते फेरफार म्हणजे कमीजास्त करण्याचे अधिकारही जिल्हाधिकाऱ्यांना आहेत. (म. ज. म. संहिता, कलम १२).

गावठाणातील शेतीसाठी न वापरल्या जाणाऱ्या जमिनीवर जमीन महसूल आकारता येत नाही. म्हणजेच या जमिनींना महसूल माफ आहे. थोडक्यात, गावठाणातील शेतीसाठी वापरल्या न जाणाऱ्या म्हणजे निवासासाठी वापरल्या जाणाऱ्या जागांना आकारणी नाही. ती माफ केलेली आहे. (म. ज. म. संहिता, कलम १२३).

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.