किसान पेंशन योजना मिळवा दर महा 3000 रु पेंशन ।। या योजनेसाठी कुठल्या प्रकारचे शेतकरी पात्र आहे? ।। या योजनेचे फायदे काय आहेत? ।। या योजनेमध्ये कसे सहभागी व्हायचे? या बद्दल सविस्तर माहिती जाणून घेऊया !

बातम्या मनोरंजन लोकप्रिय शेती

मित्रांनो जशाप्रकारे शासकीय कर्मचार्‍यांना त्यांची सेवा निवृत्त झाल्यानंतर पेन्शनची योजना आहे आणि पेन्शनच्या योजनेच्या आधारावर शासकीय कर्मचाऱ्यांचा वृध्द काळ हा आर्थिक संकट न येता ते जगू शकतात. अशा प्रकारची पेन्शनची स्कीम भारतातील सर्व शेतकऱ्यांसाठी केंद्र शासनाने सुरू केलेली आहे.

आणि प्रती महिना साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्या शेतकऱ्याला प्रतिमहिना तीन हजार रुपये पेन्शन त्यांच्या बँक खात्यामध्ये ऑनलाईन जमा होणार आहे. याच योजनेविषयी पेन्शन योजना विषयीची माहिती सविस्तर आपण पाहणार आहोत. मित्रांनो या योजनेची सविस्तर माहिती पाहण्यासाठी आपण या योजनेच्या ऑफिशिअल वेबसाईट वरती अधिकृत संकेतस्थळावर जाणार आहे.

त्यासाठी आपल्याला गुगलच्या सर्च बार मध्ये टाईप करायचा आहे pmkmy.go.in आणि हि वेबसाईट सर्च करायचे आहे. ही वेबसाइट सर्च केल्यानंतर आपण या योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर आलेलो आहोत. कृषी एवं किसान कल्याण मंत्रालय, भारत सरकार या साईट वरती आपण आलेले आहोत.

या योजनेमध्ये आतापर्यंत भारतातील जवळपास वीस लाख चैरेचाळीस हजार शेतकऱ्यांनी आपला सहभाग नोंदविला आहे आणि या योजनेची पात्रता जर आपण पाहिले तर अल्पभूधारक शेतकरी ज्यांची क्षेत्र हे दोन हेक्टरपेक्षा मोठे म्हणजे पाच एकर पेक्षा कमी आहे, ते सर्व शेतकरी यासाठी पात्र आहेत आणि कमीत कमी वय १८ आणि जास्तीत जास्त ४० वर्षे वय असणारे शेतकरी या योजनेमध्ये सहभाग नोंदवू शकतात.

या योजनेमध्ये सहभाग नोंदवल्यानंतर वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्यांना तीन हजार रुपये प्रति महिना पेन्शन मिळणार आहे. या विषयावरची अधीक माहिती पाहण्यासाठी आपण याच वेबसाईटवरील डिटेल्स या टॅबवर क्लिक करणार आहोत. डिटेल्स या टॅबवर वरती क्लिक केल्यानंतर पेज आपणासमोर ओपन झालेले आहे.

मित्रांनो डिटेल्समध्ये अशी माहिती दिली आहे की कमीत कमी अठरा आणि जास्तीत जास्त चाळीस वय असणारा अल्पभूधारक कोणताही भारतातील शेतकरी या योजनेसाठी पात्र आहे. तसेच मित्रांनो साठ वर्षे वयाची पूर्ण झाल्यानंतर त्याला तीन हजार रुपये पर मंथ पेन्शन सुद्धा मिळणार आहे.

तर पुढील माहिती दिली आहे की या मध्ये कुठल्या प्रकारचे शेतकरी पात्र आहे? ही माहिती आपण पाहिले आहे. आता अपात्र शेतकरी कोणते? मित्रांनो ज्यांची जमीन अकृषिक आहे. म्हणजेच शेतीसाठी उपयोगी नसणाऱ्या जमिनीचे मालक. तसेच सरकारी कर्मचारी, आमदार-खासदार, तसेच मित्रांनो जे शेतकरी इन्कम टॅक्स भरतात असे शेतकरी सुद्धा यामध्ये अपात्र आहेत.

तसेच केंद्र शासनाच्या चार प्रकारच्या पेन्शन योजना आहे, तर इतर तीन पेन्शन योजनेमध्ये सहभागी असणारा शेतकरी या योजनेसाठी अपात्र असणार आहे. मित्रांनो या योजनेसाठी आपणाकडे काय कागदपत्रे असावी लागणार आहे? तर एक म्हणजे आपले आधार कार्ड आणि कुठल्याही राष्ट्रीयकृत बँकेमध्ये सेविंग बँक अकाउंट म्हणजे बचत खाते असणे आवश्यक आहे.

तर आता पाहुयात मित्रांनो या योजनेचे फायदे काय आहेत? तर मित्रांनो या योजनेमध्ये जो शेतकरी सहभागी होणार आहे त्याच्या वयाची साठ वर्षे पूर्ण झाल्यानंतर त्याला या योजनेअंतर्गत प्रति महिना तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे आणि जो शेतकरी साठ वर्षानंतर पेन्शन त्याला मिळत होती आणि पेन्शन मिळत असताना त्याचा मृत्यू झाला, तर त्याच्या पश्चात त्याच्या पत्नीला दीड हजार रुपये म्हणजे पन्नास टक्के पेंशन हे त्याच्या पत्नीला मिळणार आहे.

आणि मित्रांना पुढे कंडिशन पाहूयात. आपण जर साठ वर्षाच्या आत एखाद्या शेतकऱ्याचा मृत्यू झाला, जो या योजनेमध्ये सहभागी होतात. तर त्याचे पुढील हप्ते त्याची पत्नी भरू शकते आणि साठ वर्षानंतर कंटिन्यू तिने असे हप्ते भरल्यानंतर तिला सुद्धा साठ वर्षानंतर तीन हजार रुपये पेन्शन मिळणार आहे.

जर ती पत्नी जर हे हप्ते भरण्यास अक्षम असेल. तिने जर हप्ते भरले नाही तर ती सर्व रक्कम जी तिच्या पतीने या योजनेमध्ये जमा केली होती ती व्याजासह तिला परत दिली जाणार आहे. आणि मित्रांनो एखाद्या शेतकऱ्याला जर जिवंत असताना जर त्याला साठ वर्षाच्या आतच या योजनेला जर सोडायचे असेल, या योजनेतून बाहेर पडायचे असेल, तर त्याने जमा केलेली सर्व रक्कम त्याला व्याजासह परत दिली जाणार आहे.

तर मित्रांनो अशा प्रकारच्या या योजनेमध्ये स्कीम आहेत, बेनिफिट्स आहे. तर आता मित्रांना पाहुयात मंथली किती आपल्याला पैसे जमा करावे लागणार आहेत या योजनेमध्ये सहभागी झाल्यानंतर. सशुल्क योजनेत जर आपल्याला सहभागी व्हायचे असेल तर आपल्या वयानुसार आपल्याला प्रतिमहिना बँकेमध्ये या पेन्शन च्या खात्यामध्ये पैसे जमा करावे लागणार आहेत.

जर आपले वय १८ वर्षे असेल तर प्रति महिना आपल्याला ५५ रुपये भरावे लागणार आहेत आणि तेवढीच रक्कम म्हणजेच ५५ रुपये शासन आपल्या पेन्शन खात्यामध्ये जमा करणार आहे म्हणजे प्रति महिना ११० रुपये आपल्या पेन्शन खात्यामध्ये जमा होणार आहे. जशी जशी तुमची वय वाढत जाईल तसतसा हा पेन्शन चा हप्ता सुद्धा वाढत जाणार आहे.

जर एखाद्या शेतकऱ्याची वय ३५ वर्षे असेल तर त्याला प्रतिमहिना दिडशे रुपये भरावे लागतील. आणि शासन सुद्धा दीडशे रुपये भरणार आहेत आणि एकूण तीनशे रुपये त्याच्या पेन्शन खात्यामध्ये जमा होणार आहे. अशा प्रकारे या योजनेत जर सशुल्क सहभागी व्हायचे असेल तर स्वतः आपल्याला ५० टक्के रक्कम भरावी लागणार आहे आणि शासन त्यांच्या हिष्याची ५० टक्के रक्कम भरून अशा प्रकारे आपली पेन्शन स्कीम चालू सुरु होणार आहे.

आणि मित्रांनो जर आपल्याला निशुल्क म्हणजे मोफत या योजनेमध्ये सहभागी व्हायचे असेल, तर अट अशी आहे की आपण पी एम किसान योजनेचे लाभार्थी असणे आवश्यक आहे. म्हणजे केंद्र शासनतर्फे जे प्रती वर्षाला सहा हजार रुपये शेतकऱ्यांना देण्यात येतात, त्या पी एम किसान योजनेचे जर तुम्ही लाभधारक असाल तर ते पैसे येणारे पी एम किसान चे सहा हजार रुपये तुम्ही या योजनेमध्ये ऑनलाईन ट्रान्सफर करू शकता.

ऑटो डेबिट लेव्हल वरती ते पैसे या योजनेमध्ये वर्ग केले जातील आणि त्यामुळे तेच पैसे तुमचा हप्ता म्हणून समजले जातील. तुम्हाला स्वतंत्र स्वतः हफ्ते भरायची आवश्यकता असणार नाही. म्हणजे मित्रांनो जे शेतकरी पी एम किसान योजनेचे लाभार्थी आहेत आणि प्रति वर्षाला त्यांना सहा हजार रुपये त्यांच्या बँक खात्यामध्ये जमा होतात.

यात बचत खात्यामध्ये तुम्हाला किसान पेन्शन योजनेचे अकाउंट ओपन करावे लागेल. आणि अशा प्रकारे तुम्ही मोफत या योजनेमध्ये सहभागी होऊ शकता. आता पाहुयात शेवटची माहिती. हाऊ टू अप्लाय या योजनेमध्ये कसे सहभागी व्हायचे? तर यासाठी तुम्हाला तुमच्या जवळच्या कॉमन सर्विस सेंटर म्हणजेच सीएससी सेंटर मध्ये जायचं आहे.

तिथे सेंटर वर गेल्यानंतर तुम्हाला एक आधार कार्ड आणि सेविंग बँक अकाउंट ची पास बूक. म्हणजे बचत खात्याचे खाते क्रमांक आणि पासबुक त्या ठिकाणी सादर करायचा आहे. त्यानंतर सीएससी सेंटर धारक तुमचे पेन्शन अकाउंट ओपन करेल. ऑनलाइन फॉर्म तिथे भरणार आहे.

आणि या योजनेचा पहिला हप्ता आहे मित्रांनो तुम्ही सशुल्क भरत असाल किंवा निशुल्क दोन्ही योजनेअंतर्गत, पहिल्या जो हफ्ता आहे, तो तुम्हाला स्वतः नग्दी द्यावा लागणार आहे. इतर जे हफ्ते आहे ते तुमची बचत खात्यामधून आटो डेबीट लेवल वर कपात होणार आहेत. या योजनेअंतर्गत सीएससी सेंटर धारकाने तुमचा ऑनलाईन अर्ज केल्यानंतर ज्या प्रकारची एटीएम कार्ड किसान क्रेडिट कार्ड असते, त्याच प्रकारचे कार्ड तुम्हाला मिळणार आहे.

ज्या कार्ड वर नाव असणार आहे किसान पेन्शन योजना आणि प्रति महिना तीन हजार रुपये तुम्हाला मिळणार आहेत. आणि या योजनेचा पेन्शन स्कीम चा एक स्वतंत्र अकाउंट नंबर खाते क्रमांक सुद्धा तुम्हाला मिळणार आहे. तर अशाप्रकारे जवळच्या सीएससी सेंटर वर जाऊन तुम्ही जर शेतकरी असाल तर आजच जवळच्या सीएससी सेंटर वर जाऊन या योजनेमध्ये आपला सहभाग नोंदवावा.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.