केके यांच्या गाण्यांप्रमाणेच रोमॅंटिक आहे त्यांची लव्ह स्टोरी. पहा कशी सुरू झाली के.के. ची लव्ह स्टोरी.

मनोरंजन

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

बॉलिवूडचे प्रसिद्ध गायक केके आता आपल्यात नाहीत. काल कोलकाता येथे लाइव्ह शो दरम्यान त्यांची प्रकृती खालावली, त्यानंतर त्यांना CMRI रुग्णालयात नेण्यात आले. रुग्णालयात तपासणी केल्यानंतर डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. त्यांच्या जाण्याने संपूर्ण भारतीय संगीत क्षेत्रातच नव्हे तर संपूर्ण देशात शोककळा पसरली आहे. आपल्या लाडक्या केकेच्या जाण्याने संगीत प्रेमी खूप ‘शॉक’ झाले आहेत.

हिंदी चित्रपटसृष्टीचे हे असे नुकसान आहे जे कधीही भरून निघणार नाही. केके यांच्या मागे पत्नी ज्योती आणि दोन मुले आहेत. कृष्णकुमार कुन्नाथ म्हणजेच केके यांनी नेहमीच त्यांचे वैयक्तिक आयुष्य प्रसिद्धीपासून दूर ठेवले. अशा परिस्थितीत त्याच्या प्रेमकहाणीबद्दल (KK’s Love Story) फार कमी लोकांना माहिती आहे.

लहानपणीचे प्रेम : गायक केकेने त्याची बालपणीची मैत्रीण ज्योतीशी लग्न केले. सहावीत असताना दोघेही पहिल्यांदा भेटले होते. आधी त्यांची मैत्री झाली आणि नंतर केके ज्योतीच्या प्रेमात पडला. ज्योती त्याच्या बालपणीचे प्रेम होते, जिच्याशी केकेने 1991 मध्ये लग्न केले होते. याचा उल्लेख त्याने ‘द कपिल शर्मा शो’मध्ये केला होता.

लग्नासाठी केके ने केली होती ही नौकरी : केकेने ज्योतीशी लग्न करण्याचा निर्णय घेतला तेव्हा तो बेरोजगार होता. त्यामुळे ज्योतीशी लग्न करण्यापूर्वी त्यांनी सेल्समनची नोकरी स्वीकारली होती. लग्नासाठी नोकरी असणे गरजेचे होते. पण हे काम त्याने काही महिनेच केले. यानंतर, पत्नी आणि वडिलांच्या पाठिंब्याने, त्याने आपल्या गायनात करियर करण्याचा निर्णय घेतला आणि बाकी सर्व काही इतिहास आहे.

आयुष्यात फक्त एकाच मुलीला केले डेट : आपणास माहीतच आहे आज-कालच्या काळात डेटिंग ही एक सामान्य बाब झाली आहे. बॉलीवूड मध्ये तर महिन्याला नवीन बॉयफ्रेंड-गर्लफ्रेंड बदलण्याचे जणू काही कल्चर सुरू आहे. अश्यावातावरणात राहून केके मात्र या सर्व गोष्टींपासून दूर राहिला. केकेने एका मुलाखतीत सांगितले होते की, त्याने आयुष्यात फक्त एकाच मुलीला डेट केले आहे, ती म्हणजे त्याची पत्नी ज्योती. पण त्याच्या लाजाळू स्वभावामुळे त्याला नीट डेटही करता आले नाही. कधी-कधी केके ची मुलं या गोष्टीवरून त्याची मजा सुद्धा घेत असे.

बयकोचा पाठिंबा : केकेचे लग्न झाले तेव्हा तो दिल्लीत राहत होता आणि जाहिरातींसाठी जिंगल्स आणि गाणी बनवत असे. तेंव्हा त्याचे गायक होण्याचे स्वप्न अजूनही अपूर्ण होते. त्यानंतर पत्नीने त्यांना मुंबईला जाण्यासाठी राजी केले. पत्नीने केकेला समजावून सांगितले की तिथे जाऊनच तो आपले स्वप्न पूर्ण करू शकतो. पत्नीच्या सांगण्यावरूनच केके मुंबईत आला. 1994 मध्ये त्यांना संगीताच्या जगात पहिला ब्रेक मिळाला.

केके चा परिवार : केके यांच्या पश्चात पत्नी ज्योती आणि दोन मुले असा परिवार आहे. त्यांच्या मुलाचे नाव नकुल कृष्ण कुन्नथ आणि मुलीचे नाव तमारा कुन्नथ आहे. त्यांची पत्नी चित्रकार आहे. त्यांची एक वेबसाइटही आहे. तिच्या मुलीचे इंस्टाग्राम अकाउंट पाहता तिलाही गायिका बनायचे आहे हे कळते.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे. या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा