नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.
दिवाळ निघलं असं आपण सहज म्हणतो, म्हणजेच काय त्या व्यक्तीचा असलेला व्यवसाय बंद होतो. तो व्यक्ती आर्थिकदृष्ट्या कमजोर होऊन जातो याला आपण दिवाळखोरी म्हणतो. दिवाळखोरी फक्त व्यक्तीची नसते तर ती देशांची देखील असते.
लॅटिन अमेरिकेतील देश अर्जीटिना २००० ते २०२० या दरम्यान दोन वेळा डिफॉलटर बनला आहे. २०१२ मध्ये ग्रीस डिफॉलटर बनला १९९८ मध्ये रशिया २००३ मध्ये उरूग्वे २००५ मध्ये डोमिनिक रिपब्लिक आणि २००१ मध्ये इक्काडोर आता लवकरच श्रीलंका देखील लकवरच दिवाळ खोर होणार आहे. श्रीलंकेसोबत आता पाकिस्तान देखील लकवरच दिवाळ खोर होणार आहे, असे म्हटले जाते.
सर्वात प्रथम आपण दिवाळ खोरी म्हणजे काय? हे जाणून घेणार आहोत. जेव्हा एखादा व्यक्ती त्यांनी घेतलेल्या सामानाच्या बिलांची रक्कम देऊ शकत नाही, तेव्हा तुम्ही ज्यांच्याकडून हे सामान घेतले आहे त्यांच्याकडून तुम्हाला पैशांसाठी त्रास दिला जातो.पैशांसाठी धमक्याची पत्रं येतात, आणि त्यानंतर तुमच्या इतर मालमत्तेवर कब्जा करण्याचा प्रयत्न केला जातो. यालाचं दिवाळखोरी म्हणतात.वेळेवर कर्ज न फेडणाऱ्याला डिफॉलटर म्हणतात.
अनेकदा अनेक देश असेच डिफॉलटर होतात. ही बाब काही देशांसाठी सामान्य असते. अनेक देशांच्या हे देखील लक्षात येत नाही की आपण कर्जबाजारी झालो आहोत. काही देश कर्ज फेडत राहतात पण त्यांच्यावरील कर्जाचा बोजा मात्र अधिकच असतो. ज्या प्रमाणे एखाद्या व्यक्तीवर खूप कर्ज असेल तर तो काही रक्कम फेडून त्यांचा व्यवसाय सुरू ठेवतो अगदी त्या प्रमाणे देश देखील करतात.
जसे की शेजारील किंवा इतर देशासोबत देवाण-घेवाण चालू ठेवण्यासाठी काहीना काही पैसे देऊन व्यवसाय चालू ठेवतो. जेव्हा देश दिवाळखोरीच्या मार्गावर असतो तेव्हा त्या देशांचे अर्थमंत्री हे जाहीर करून टाकतात की त्यांचा देश कर्जबाजारी झाला आहे. ही गोष्ट जाहीर करणे फार अवघड असते. जेव्हा एखादा देश डिफॉलटर आहे हे जाहीर करतो तेव्हा ही एक मोठी घटना असते. काही देश डिफॉलटर असतात पण ते जाहीर करत नाहीत मात्र काही देश हे जाहीर करून मोकळे होतात.
जसे की श्रीलंका मागील वर्षीच्या डिसेंबरमध्ये त्यांच्याकडे तीन आठवडे देता येतील इतकेच पैसे शिल्लक होते पण त्यांनी ते जाहीर केले नाही. पाकिस्तानची देखील अवस्था वाईट आहे पण त्यांनी देखील अजून जाहीर केले नाही. चीन आणि सौदीअरेबिया त्यांना अजून मदत करत आहेत. जेव्हा हे देखील देश मदत थांबवतील तेव्हा मात्र या देशांना ते दिवाळखोर झाले आहेत हे जाहीर करावे लागेल. 1991 मध्ये भारत कर्जबाजारी देश झाला होता.
जून 1991 मध्ये भारताच्या परकीय चलनाचा साठा जवळपास संपला होता. एक अब्ज डॉलरपेक्षा कमी शिल्लक होती.केवळ 20 दिवसांचा इंधन आणि तेलसाठा होता. अन्नधान्याची कित्येक बिलं थकीत होती. जगातील कोणत्याच देशांशी व्यवहार करता येईल इतंक परकीय चलन उपलब्ध नव्हतं. भारताचं विदेशी कर्ज 72 अब्ज डॉलर इतंक झालं होतं. भारत हा तिसरा कर्ज बाजारी देश झाला होता. देशांची अर्थव्यवस्था पार कोलमडली होती. लोकांचा सरकारवरचा विश्वास पार उडाला होता. महागाई प्रचंड वाढली होती.1990 मध्ये देशांवर ही वेळ येण्याची राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीय कारणे देखील आहेत.
1990 मध्ये जे आखाती युद्ध झाले होते त्यांचा थेट परिणाम भारतावर झाला आहे. जागतिक स्तरावर जेव्हा युद्ध होते तेव्हा सर्वात मोठा परिणाम तेलाच्या किंमतीवर होतो. पेट्रोल,डिझेल आणि कच्चे तेल यांच्या किंमती वाढतात. 1991 मध्ये तसेच झाले, युद्ध झाले आणि अचानक कच्चा तेलाच्या किंमती आकाशाला जाऊन भिडल्या आणि भारताचं आर्थिक गणित कोलमडलं. म्हणजेच काय 2 अब्जचं बिल थेट 5.7 अब्ज डॉलर झालं.
महागाई वाढली, जनता अस्थिर झाली त्यामुळे राजकीय अस्थिरता देखील वाढली. त्या दरम्यानच राजीव गांधी यांची हत्या झाली. भारताची आर्थिक अवस्था प्रचंड बिकट झाली होती, त्यावेळी निर्यात दारांना तर असं वाटतं होतं की भारत कर्ज फेटू शकेल की नाही. बँकांचे व्याजदर देखील वाढले. आयएमएफ यांनी भारताला 1.27 अब्ज डॉलर कर्ज दिलं पण भारताची अवस्था आणखी बिकट होती.त्यावेळी चंद्रशेखर सरकार सत्तेत होतं.
भारताला तब्बल 20 टन सोनं देखील गहाण ठेवावं लागलं होतं. पी. व्ही.नरसिंह राव 21 जून 1991 ला पंतप्रधान झाले आणि सर्वांना वाटलं आता भारत ठरलेल्या तारखेला विदेशी कर्ज फेडू शकणार नाही. भारताला आता डिफॉल्टर म्हणून घोषित व्हावे लागेल पण अर्थमंत्री मनमोहन सिंग आले आणि त्यांनी काही आर्थिक सुधारणा केल्या आणि परिस्थिति नियंत्रणात आली.
आपण दिवाळखोर जाहीर होता होता वाचलो. दिवाळ खोरी म्हणजे काय तर क्रेडिट रेटिंग हे खराब होणे.कर्ज वाढत जाणे आणि ते फेडण्यात अयशस्वी होणे म्हणजे दिवाळखोरी होयं. कर्ज हे प्रत्येक देशांवर आहे पण तुमची फेडण्याची जी क्षमता असते ती कमी होणे म्हणजे दिवाळखोरी होयं.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.
अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.