कोण बनेगा करोडपती मधून पाच करोड जिंकल्यानंतर माझ्या आयुष्यातला सर्वात वाईट काळ चालू झाला !

लोकप्रिय शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

कोण बनेगा करोडपती मधून पाच करोड जिंकल्यानंतर माझ्या आयुष्यातला सर्वात वाईट काळ चालू झाला असे म्हणणे आहे सुशिलकुमार याचे. ज्याने 2011साली केबीसी मधून एक नाही, दोन नाही तर तब्बल पाच करोड रुपये जिंकले होते. एवढे पैसे जिंकून सुद्धा आज दहा वर्षानंतर सुशीलकुमार अठरा हजार पगारावर नोकरी करत आहे.

त्याच्या मागची कारणे आपण बघणार आहोत. पण अजून एक उदाहरण बघुया, 2002 साली अमेरिकेमध्ये जॅक व्हाइटटेकर या व्यक्तीने 315 मिलियन डॉलरची लॉटरी जिंकली होती. म्हणजे भारतीय पैशा प्रमाणे होतात बाविशे करोड रुपये. जॅक व्हाइटटेकर एका इंटरव्ह्यूमध्ये म्हणाला होता काश मला लॉटरी लागल्या नंतर मी ते तिकीट फाढून का नाही टाकले.

कारण त्याच्या मुलीचा आणि नातीचा ड्रग्स जास्त घेतल्यामुळे मृत्यु झाला. आणि लॉटरी जिंकल्यानंतर अजून बरेच त्रासाला त्याला सामोरे जावे लागले.आकडेवारी सांगते लॉटरी जिंकल्यानंतर 70 टक्के लोक पुढच्या तीन ते पाच वर्षात पूर्वी होती त्याच स्थितीमध्ये येऊन थांबतात. काय कारण असावं? पैसा वाईट आहे का? श्रीमंती वाईट आहे का?

तर पैसा अजिबात वाईट नाहीये. या लोकांकडे फायनान्शियल एज्युकेशनचा म्हणजे आर्थिक साक्षरतेचा आभास होता. पैसे तर आले पण यांना मॅनेज कसे करायचे हेच लोकांना माहिती नव्हते. सुशिलकुमार आणि बाकीचे लॉटरी जिंकणारे परत भिकेला का लागते तर यात 3 महत्वाची कारणे आहेत ती आपण पाहुयात.

1. एसेट आणि लायबिलिटी माहीत नसणे : Rich dad poor dad या पुस्तकाने अनेकांचे आयुष्य सुधारलेले आहे. कारण या पुस्तकातून asset आणि लियाबिलिटी ची खरी व्याख्या आपल्याला समजेल. असे या पुस्तकाने माझे आयुष्यच बदलले आहे तर या पुस्तकांमधून आणि लायब्ररी त्याची खरी व्याख्या म्हणजे काय या गोष्टी तुम्हाला पैसे कमवून देतात जसे की बिझनेस रिअल इस्टेटमध्ये गुंतवणूक, पुस्तक लिहिणे, ऑनलाइन कोर्सेस, स्टॉक्स, बोनस, वगैरे वगैरे.

आणि लियाबीलिटी म्हणजे काय अशा गोष्टी या तुमच्या खिशातून पैसे काढून घेतात. जसे की, कार, महागडे कपडे, महागडे मोबाईल, गरज नसताना कर्जावर घेतलेल्या वस्तू, वगैरे वगैरे. श्रीमंत लोक जास्तीत जास्त असेट बनवण्यावर भर देतात. आणि गरीब मिडल क्लास लोक लियाबिलिटी मध्ये आपले पैसे खर्च करतात.

सुशीलकुमार कडे पैसे आल्यानंतर त्याने असेट तयार करण्यावर भरच दिला नाही. त्याने सर्वात आधी स्वतः साठी 3 मजले बिल्डिंग बांधली. इथ पर्यंत ठीक आहे पण तो त्याच्या भावांना अशा बिझनेस मध्ये मदत करत सुटला. ज्याच्या बद्दल त्याला ज्ञान नव्हते. नंतर ते सर्व व्यवसाय बंद पडले. नंतर स्वतः त्याने कॅबचा व्यवसाय केला. तिथेही त्याला अपयश आले. सांगायचं मुद्दा त्याने असेट बनविण्यावर भर दिला नाही.

2. खर्च करण्याआधी गुंतवणूक केली नाही : सामान्यपणे लोक पगार झाला किंवा त्यांच्याकडे पैसे आले की आधी ते खर्च करतात. आणि उरलेल्या पैशातून बचत करतात. जी अत्यंत चुकीची पद्धत आहे. तुमच्याकडे कितीही पैसे येवुद्या त्या पैशातून तुम्ही 10 ते 20 % बचत करा. आणि मग उरलेल्या पैशातून खर्च करा. ही सोपी पद्धत तुम्हाला आर्थिक दृष्ट्या समृध्द करू शकते. सुशीलकुमार कडे पैसे आलेनंतर त्याने बचतीचा कधी विचारच केला नाही. तो फक्त पैसे खर्च करत राहिला आणि त्याचे कडचे सर्व पैसे कधी संपले हे त्याला कळलेच नाही.

3. चुकीची संगत : सुशीलकुमार ला 5 करोड रुपये मिळाले, टॅक्स वैगरे कट होवून त्याला 3.6 करोड रुपये आले होते. सुशील ने सुरुवातीला दानधर्म करायला सुरुवात केली. त्याने चारीटी मध्ये खूप पैसे वाटले. नंतर त्याला समजले दानधर्माच्या नावाखाली लोकांनी त्याला फसवले त्यामुळे त्याची बायको त्याला सोडून माहेरी निघून गेली.

नंतर सुशील दिल्लीला गेला. तिथे त्याने काही मित्रा बरोबर कॅब चा व्यवसाय सुरू केला. त्या मित्रांमुळे त्याला दारूचे व्यसन लागले तो खूप दारू पिऊ लागला. त्यामुळे त्याने चालू केलेला व्यवसाय बंद पडला व त्याचे पैसे सुद्धा वाया गेले. शेवटी सुशील कुमार परत आपल्या गावी गेला. सांगायचा मुद्दा म्हणजे की तो सुशील कुमार ला संगत चांगली मिळाली नाही.

आणि त्यामध्ये तो वाहत गेला. डोळे झाकून लोकांवर विश्वास ठेवल्यामुळे त्याची फसवणूक झाली. चुकीच्या लोकांचे सल्ले घेवून अनेक व्यवसाय चालू केला. पण ते सर्व व्यवसाय बंद पडले. आणि काही वर्षातच सुशील कडचे सर्व पैसे संपले. आता सुशीलकुमार शिक्षकाची नोकरी करत आहे. त्याची सर्व व्यसने सुटली आहे. आणि तो एक आनंदी आयुष्य जगण्याचा प्रयत्न करत आहे.

वरील माहिती www.youtube.com/c/ShahanPan या चॅनल वरून संकलीत व शंब्दांकित केलेली आहे.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.