कुळाच्या जमिनीची विक्री ।। महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 बद्दल माहिती !

शेती शैक्षणिक

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

मित्रांनो आज आपण कुळाच्या जमिनीच्या विक्री बाबत माहिती जाणून घेऊ. कुळाची जमीन म्हणजे काय हे देखील आपण जाणून घेऊ. कुळाच्या जमिनीची माहिती खूप विस्तृत असल्याने आपण ठराविक आणि थोडक्यात ही माहिती जाणून घेऊ.

कुळाच्या जमिनीची विक्री: महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८, कलम ४३. (हैदराबाद कुळ कायदा, कलम ५०-ब; विदर्भ कूळ कायदा, कलम ५७)अन्वये कुळाला खरेदी हक्काने मिळालेल्या शर्तीची मतितार्थ असा की, कुळ कायद्याच्या तरतूदीअन्वये कुळाला खरेदी हक्काने मिळालेल्या जमिनीचे हस्तांतरण, देणगी, अदलाबदल, गहाण, भाडेपट्टा त्याला सक्षम अधिकाऱ्याच्या परवानगी शिवाय करता येणार नाही.

अशी अट विहित करण्यामागे ,कुळाच्या अज्ञानाचा गैरफायदा घेऊन कोणी कुळाची फसवणूक करू नये हा कायद्याच्या उद्देश होता. उपरोक्त तरतुदी चे उल्लंघन करून केलेले जमिनीचे कोणतेही हस्तांतरण, देणगी, अदलाबदल, गहाण, भाडेपट्टा विधिअग्राह्य म्हणजेच अवैध असेल. सन२०१२-१३ च्या सुमारास शासनाने उपरोक्त तरतुदीत सुधारणा करून,

कुळ कायद्याच्या तरतुदिन्वये कुळाला खरेदी हक्काने मिळलेल्या जमिनीच्या खरेदी च्या दिनाकंपासून 10 वर्ष पूर्ण झालेल्या जमिनीची खरेदी-विक्री/देणगी/अदलाबदल/गहाण/पट्ट्याने देणे/हस्तांतरण करणे या साठी सक्षम अधिकाऱ्यांच्या पूर्वपरवानगी च्या आवश्यकतेचि अट काही किरकोळ अटी समाविष्ट करून शिथिल केली.

तथापि, कुळाला खरेदी हक्काने मिळालेल्या जमिनीच्या खरेदीच्या दिनाकंपासून 10 वर्ष पूर्ण न झालेल्या जमिनींसाठी उपरोक्त मूळ अट अद्यापही कायम आहे. खरेदीच्या दिनाकंपासून 10 वर्ष पूर्ण न झालेल्या जमिनींचे अवैध हस्तांतरण झाल्यास, अशी जमीन महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८, कलम ८४ क

(हैदराबाद कुळ कायदा, कलम ९८-क; विदर्भ कूळ कायदा, कलम १२२) अन्वये शासनाकडे निहित होऊन विल्हेवाट लावण्यास पात्र ठरते. सर्वसाधारणपणे प्रश्न असा निर्माण होतो की, कुळाला खरेदी हक्काने मिळालेल्या जमिनीच्या खरेदी च्या दिनाकंपासून 10 वर्ष पूर्ण न झालेल्या जमिनीची विनापरवानगी विक्री झाली असल्यास काय करावे?

किंवा एखाद्या जमिनीच्या कुळाने न्यायाधिकरणाच्या आदेशशिवाय परस्पर जमीन मालकाकडून जमीन खरेदी केली असेल तर काय करावे? तर ते खालील प्रमाणे: जमीन मालक आणि कुळ यांच्यात झालेला व्यवहार: महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८, कलम ८४ब (१)अन्वये, एखाद्या जमिनीच्या कुळाने न्यायाधिकारणाच्या आदेशशिवाय परस्पर जमीन मालकाकडून जमीन खरेदी केली असेल

तर अश्या हस्तांतरणाच्या पासून तीन महिन्याच्या आत या कलमात नमूद केलेल्या अटींच्या अधीन राहून आणि दंड वसूल करून कुळाने न्यायाधिकारणाच्या आदेशशिवाय परस्पर जमीन मालकाकडून जमीन खरेदी केली असेल तर असे हस्तांतरण नियमनानुकूल करण्याचे तरतूद आहे. कलम ८४अन्वये ,नेमलेला दिवस म्हणजे १५ जून १९५५ आणि सुधारणा अधिनियम १९५५,

अमंलात आला तो दिवस म्हणजे १ ऑगस्ट १९५६, म्हणजेच १५जून १९५५ ते १ ऑगस्ट १९५६ या कालावधी मध्ये या अधिनियमाचे तरतुदी चे उल्लंघन करून जमीन चे हस्तांतरण झाले आहे असे ठरवून दिलेल्या नमुन्यात जमीन हस्तांतरण बेकायदेशीर का ठरू नये. असे कारण विचारणा करणारी नोटीस तहसीलदाराने संबंधितांना द्यावी.

दोन्ही पक्षकारांना बाजू मांडण्याची संधी देऊन व चौकशी करून तहसीलदार ने निर्णय घ्यावा. जमीन मालकाने जमिनीचे हस्तांतरण कुळाला केले आहे असा निष्कर्ष निघाल्यास आणि जमीन कमाल क्षेत्रापेक्षा जास्त नाही हे सिद्ध झाल्यास कुळाला दंड करून तो दंड 3 महिन्यात भरून घ्यावा. जमिनीची किंमत म्हणून जमीन मालकास मिळालेली कलम ६३ अन्वये निर्धारित करण्यात आलेल्या किमती इतकी किंवा तिच्यापेक्षा कमी असेल

आणि कुळाने दंड दिला असेल तर तहसीलदार असे हस्तांतरण विधी अग्राह्य आहे असे घोषित करणार नाही. आणि जर जमिनीची किंमत म्हणून जमीन मालकास मिळालेली रक्कम कलम ६३ अन्वये निर्धारित करण्यात आलेल्या वाजवी किमतीपेक्षा जास्त असेल. आणि कुळ आणि जमीन मालकाने राज्य शासनाला, तहसीलदार निर्धारित करेल त्या कालावधीत, वाजवी किमतीच्या एक दशांश इतकी, प्रत्येकी शास्ती दिली असेल तर,

तहसीलदार असे हस्तांतरण विधी अग्राह्य आहे असे घोषित करणार नाही. तथापि, ही तरतूद फक्त कुळ आणि जमीन मालका दरम्यान झालेल्या हस्तांतरणासाठीच लागू आहे, त्याव्यतिरिक्त इतर पद्धतीने बेकायदेशीर हस्तांतरण झाले असल्यास कलम ८४ क ची नवीन सुधारणा लागू होईल. जमीन मालक किंवा कुळ

आणि त्रयस्थ व्यक्ती यांच्यात झालेला विनापरावनगी व्यवहार: जमीन मालक किंवा कुळ आणि त्रयस्थ यांच्यात झालेला विना परवानगी हस्तांतरणाचा व्यवहार दिनांक ७-५-२०१६ पूर्वी झाले असतील तर, तहसीलदार, महाराष्ट्र, कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८, कलम ८४क (२)अनव्ये. असा विनापरवाना झालेला हस्तांतरणाचा व्यवहार विधिअग्राह्य /अवैध आहे असे घोषित करेल,

आणि असे घोषित केल्यानंतर सदर जमीन तिच्यावर कायदेशीररित्या आलेल्या बोजांपासून मुक्त होऊन राज्य शासनाकडे निहित झाली आहे असे मानण्यात येईल आणि तिची विल्हेवाट कलम ८४क(४) मध्ये नमूद केलेल्या पद्धतीने लावण्यात येईल. जमिनीच्या खरेदीच्या किमतीतून कायदेशीर बोजांबद्दल रकमा देण्याविषयी कलम ३२ -क्यू मध्ये ज्या रितीची तरतूद करण्यात आली असेल

त्या रीतीने अश्या बोजांबद्दल च्या रकमा भोगवटा मूल्याच्या रकमेतून देण्यात येतील, परंतु अशा बोजाधारकास आपल्या हक्काची कोणत्याही इतर रीतीने अमंलबजावणी करण्यास दायी असलेल्या व्यक्ती विरुद्ध कारवाई करण्याचा जो कोणताही हक्क असेल त्यास बाधा येणार नाही. हस्तांतरकास जमिनीची किंमत म्हणून जी कोणतीही रक्कम मिळाली असेल तिचे राज्य शासनाकडे समपहरण करण्यात आले आहे असे मानण्यात येईल

आणि ती जमीन महसुलाची थकबाकी असल्याप्रमाणे वसूल करता येईल, आणि तहसीलदार कलम ६३ अ च्या तरतुदी नुसार अश्या जमिनीची सन २०१६ च्या अधिनियम क्र.२०दि.७-५-२०१६ अन्वये सुधारणानीची वाजवी किंमत निर्धारित करेल. अशी वाजवी निर्धारित केल्यानंतर, तहसीलदार अशी जमीन, नवीन व अविभाज्य शर्तींवर प्राध्यानक्रमानुसार देईल.

सन २०१६ च्या अधिनियम क्र.२०दि.७-५-२०१६ अन्वये सुधारणा: या सुधारणेनव्ये कुळकायद्याच्या तरतुदी नुसार झालेली विधिअग्राह्य हस्तांतरणे नियमाकुल करणेबाबत तरतूद अधिनियमात करण्यात आली आहे. त्यानुसार खालील बाबींची पूर्तता होत असल्यास असे विधिअग्राह्य हस्तांतरण नियमाकुल करता येईल.

महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ ,कलम ८४क(६)(हैदराबाद कुळ कायदा ,कलम ९८क(६);विदर्भ कुळ कायदा १२२(६)अन्वये, १.महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम १९४८ ,कलम ४३(हैदराबाद कुळ कायदा ,कलम ५०-ब;विदर्भ कुळ कायदा कलम ५७)च्या शर्तीस आधीन असलेल्या जमिनीचे सक्षम अधिकाऱ्यांच्या परवानगीशिवाय हस्तांतरण झालेल्या प्रकरणी, महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम कलम ८४ क अनव्ययेचे आदेश तहसीलदार यांनी दिनांक ७-५-२०१६ पूर्वी पारित केलेले नसतील.

२.जर जमीन खरेदी करणारी व्यक्ती शेतकरी असेल आणि तिने धारण केलेल्या सर्व शेतजमिनीचे क्षेत्र महाराष्ट्र शेतजमीन अधिनियम ,१९६१अन्वये अनुद्येय असलेल्या जमीन धारणेच्या कमाल क्षेत्रातून अधिक होत नसेल. ३.जमीन खरेदी करणारी व्यक्ती अशा संपादित केलेल्या जमिनीचा उपयोग केवळ शेतीविषयक प्रयोजनासाठीच करीत असेल.

४.अशा जमीन खरेदी करणारी व्यक्तींकडून वार्षिक दर विवरणपत्रानुसार ,अशा जमिनीच्या बाजार मूल्याच्या पन्नास टक्के एवढी रक्कम वसूल केली गेली असेल; किंवा ४-अ.जमीन खरेदी करणारी व्यक्ती अशा संपादित केलेल्या जमिनीचा उपयोग शेतीविषयक प्रयोजनांव्यतिरिक्त अन्य कोणत्याही प्रयोजनासाठी करीत असेल तर, अशा ,जमीन खरेदी करणारी व्यक्तींकडून वार्षिक दर विवरण.

पत्रानुसार अन्य कोणत्याही प्रयोजनासाठी करीत असेल तर,अशा, जमीन खरेदी करणारी व्यक्तींकडून वार्षिक दर विवरणपत्रानुसार,अशा जमिनीच्या बाजार मूल्याच्या 75%एवढी रक्कम वसूल केली गेली असेल तर, तहसीलदार अशा कोणत्याही जमिनीचे हस्तांतरण किंवा संपादन विधिअग्राह्य आहे असे घोषित करणार नाही आणि असे विनापरावनगी हस्तांतरण नियमानुकूल करण्यात येईल.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.

7 thoughts on “कुळाच्या जमिनीची विक्री ।। महाराष्ट्र कुळ वहिवाट व शेतजमीन अधिनियम 1948 बद्दल माहिती !

  1. साहेब माझ्या आजोबांची कुळ कायदा अंतर्गत 175 ऐकर जमीन नावावर होती . नोटीस आहे 1970 त्यासंदर्भात बोलावणे होते पण तसेच गाव खरेदी खत सुद्धा आहे, रजिस्टर 1932 त्यासाठी काय करावे लागेल

  2. mazya aajobancya kulkayda jaminiche aajoba nantar mothya chultyache nav lagle,tyanche nav lagle tevha kulkayda nuktach laglela. tyamule tyanchech naav lagle. tyani swatani jamin kharedi keli ase sangtat. aata te etar bhavanche naav naslyamule sarva jamin ektyanech hadap karayla baghtat.

  3. Sir plz mala help havi ahe
    Pach bolavun ek gavatil माणसाने कुल लावले आहे तर काय करावे

  4. मला घर बांधण्यासाठी कुल हककाने मिलालेली जमीन घ्यायची आहे। सदर जमीन सहा महिण्यापूर्वी कुल हक्कदार मालकास कुलकायधयाने विक्री झालेली आहे। ती जमीन खरेदी करण्यास मला काय करावे लागेल

Comments are closed.