लहान मुलांसाठी जी महत्त्वाची कायदेविषयक कागदपत्रे असतात ती नेमकी कुठली कुठली असतात? आणि ती आपण कशा पद्धतीने काढू शकतो? याविषयी महत्वाची माहिती जाणून घ्या !

लोकप्रिय शैक्षणिक

मित्रांनो आजचा आपला विषय आहे, की लहान मुलांसाठी, जी महत्त्वाची कायदेविषयक कागदपत्रे असतात, ती नेमकी कुठली कुठली असतात? आणि ती आपण कशा पद्धतीने काढू शकतो? याबद्दल ची सविस्तर माहिती मित्रांनो मी साध्या-सरळ आणि सोप्या भाषेत दिली आहे. मित्रांनो जी कायदेशीर कागदपत्रे असतात. अशा कायदेशीर कागदपत्रांची, प्रत्येक व्यक्तीच्या सबंध आयुष्यामध्ये अनन्यसाधारण असे महत्त्व असते.

कारण ही कायदेशीर कागदपत्रे पदोपदी उपयोगात पडत असतात. म्हणूनच ही कायदेशीर कागदपत्रे प्रत्येकाच्या आयुष्यातील एक अविभाज्य घटक आहेत. अगदी ज्या वेळेस व्यक्ती चा जन्म होतो. जन्म झाल्यानंतर जन्माचा दाखला मिळतो. त्या जन्माच्या दाखल्यापासून ते मृत्यूनंतर जो मृत्यू दाखला मिळतो.

तो मृत्यू दाखला मिळेपर्यंत, हा कागद पत्रांचा सिलसिला चालू असतो. परंतु बऱ्याच वेळा आपल्याला असं दिसतं ज्यावेळेस लहान मुलांची जन्म दाखला किंवा आधार कार्ड बनवले जाते त्या जन्मदाखल्यावर ती किंवा आधार कार्ड वरती मुलांच्या नावांमध्ये, नावाच्या स्पेलिंग मध्ये, मिस्टेक झालेली आपल्याला दिसते. किंवा मग जन्म दाखला असतो, त्या दाखल्या वर अगदी जन्म तारीख आपल्याला कधी कधी चुकीची असते.

तर या ज्या चुका होतात, त्या लहान मुलांच्या पालकांकडून कळत न कळतपणे घडत असतात. आणि अशी जर चूक झाली, तर मग ती कशा पद्धतीने सुधारायची? ती सुधारण्यासाठी कुठल्या प्रकारचे कायदेशीर प्रोसेस आहे? त्याच प्रमाणे ही जी कागदपत्रे आहे, या कागदपत्रे यांचं नेमकं महत्व काय आहे? यामध्ये आता सर्वांत पहिले जो डिस्कस करणार आहे, तो म्हणजे जन्म दाखला. या बद्दल माहिती थोड्या फार प्रमाणात तुम्हाला असेल.

परंतु मित्रांनो मी या ठिकाणी एक डीप मध्ये माहिती देण्याचा प्रयत्न केला आहे. जो जन्म असतो मित्रांनो, त्या जन्म दाखल्यावर बाळाचं नाव, आईचे नाव, बाळाचं लींग, बाळाची जन्म तारीख, जन्म ठिकाण, या सर्व गोष्टींची नोंद ही केली असते. जन्म दाखला ही माणसाच्या आयुष्यातील सर्वात पहिले व सर्वात महत्त्वाचे कागदपत्र आहे‌.

का मित्रांनो? तर या जन्मात दाखल्याचा शाळेचा प्रवेश असो, आधार कार्ड नोंदणी असो, पासपोर्ट असो, बँक अकाउंट ओपनिंग असो, इत्यादी सर्व ठिकाणी जन्मदाखले याचा उपयोग हा मित्रांनो होत असतो. आता याची नोंदणी कशा पद्धतीने करायचे असते? तर मित्रानो ज्यावेळेस बाळाचा जन्म होतो, बाळाच्या जन्मानंतर एकवीस दिवसांच्या आत हॉस्पिटल, संस्था अथवा कुटुंबातील सदस्यांकडून, जन्म-मृत्यू कार्यालयात बाळाच्या जन्माची नोंदणी करणे अनिवार्य असते.

मित्रांनो जर एकवीस दिवसांच्या आत जर बाळाच्या, जन्माची नोंद झाली नाही. तर काय होईल? तर मित्रांनो त्यासाठी मग कायदेशीर पद्धत जी आहे, ती मित्रांनो फार गुंतागुंतीचे आहे. याबद्दल आपण पुढे डिस्कस करणार आहोत. ज्या गावात किंवा शहरात बाळाचा जन्म झालेला असेल. त्या गावातील किंवा शहरातील जन्म-मृत्यू कार्यालयातच बाळाच्या जन्माची नोंदणी करणे हे आवश्यक आणि अनिवार्य आहे.

इतर कुठल्याही ठिकाणी नोंदणी करता येत नाही. ही अत्यंत महत्त्वाची गोष्ट आहे. ज्या ठिकाणी बाळाचा जन्म झालेला आहे, मग तो गावात असो व शहरात असो. तर त्या गावातील किंवा शहरातील संबंधित जन्म मृत्यू कार्यालयातच बाळाच्या जन्माची नोंद ही करणे अनिवार्य असते. बाळाच्या जन्माच्या तपशिलांविषयी चे पत्र जे असते, ते हॉस्पिटल मार्फत जारी केले जाते. म्हणजे जर समजा बाळाचा जन्म हा जर हॉस्पिटल मध्ये झाला असेल.

तर हॉस्पिटल जे असतं ते बाळाचं जन्म कोणत्या टाइमिंग वर झाला आहे? आणि कोण वारी आणि कुठल्या तारखेला झालेला आहे. या बद्दलचा जो तपशील असणारे कागदपत्र हे हॉस्पिटल मार्फत जारी केले जाते. आणि त्या पत्रकाद्वारे मित्रांनो बाळाची जन्माची नोंद ही संबंधित कार्यालयात केली जाते. आता समजा मुलगा दत्तक घेतलेला असेल, तर तो दत्तक मुलाचा जन्म दाखल्यासाठी कायद्यांमध्ये वेगळी तरतूद केली आहे.

त्या तरतुदींनुसार दत्तक मुलाचा जन्म दाखला मिळत असतो. जन्म प्रमाणपत्र नोंदणी नंतर जन्म मृत्यू कार्यालयात रजिस्ट्रारकडे अर्ज केल्यावर मिळते. आता बाळाच्या जन्माची नोंदणी करताना जन्म ठिकाणानुसार जन्म पत्र मिळण्याचे कार्यालय ठरते. जसं जर बाळाचा जन्म गावा मध्ये झाला असेल, तर जन्म प्रमाणपत्र हे ग्रामपंचायत किंवा मग स्थानिक संस्था यांच्या मार्फत मिळते. तर शहरांमध्ये जर बाळाचा जन्म झाला असेल. तर नगरपरिषदे मार्फत मिळते.

त्याचप्रमाणे महानगरांमध्ये जर बाळाचा जन्म झालेला असेल, तर महानगरपालिके मार्फत जन्म प्रमाणपत्र मिळते. आता जन्म दाखल्याची प्रत असते, ती फक्त पहिली जी प्रत असते, तीच मोफत मिळते. त्यासाठी कुठल्याही प्रकारचा चार्ज मित्रांनो द्यावा लागत नाही. परंतु जर एकापेक्षा जास्त जन्मदाखला च्या प्रती जर आपल्याला हवी असतील, तर मात्र जो ठरलेला चार्ज असतो. तो मित्रांनो घ्यावा लागतो.

समजा एखाद्या व्यक्तीला जर जन्म दाखला ची इंग्रजी मधील प्रत जर हवी असेल, तर त्या वेळी जो जन्म दाखल्याचा आपल्या स्थानिक भाषेमध्ये जो दाखला मिळालेला असतो, त्या दाखला बरोबर एक अर्ज हा मित्रांनो वरिष्ठ नोंदणी अधिकाऱ्यांना करावे लागतो. आणि त्या दाखला अन्वये वरीष्ठ नोंदणी अधिकारी जन्मदाखले ची इंग्रजी प्रत ही देतात. जन्मदाखले यातील बदल जर करायचा असेल, तर समजा जन्मदाखला मध्ये नावा मध्ये काही गडबड झालेली असेल.

किंवा स्पेलिंग मिस्टेक झाली असेल. किंवा नावांमध्ये तफावत असेल. किंवा मग जी जन्मतारीख असेल त्या जन्म तारखेमध्ये जर तफावत असेल. आणि अशा वेळेस जर जन्मदाखला मध्ये बदल करून घ्यायचा असेल. तर त्यासाठी कायदेशीर रित्या कोर्ट ऑर्डरची गरज ही असते. आता ही जी कोर्ट ऑर्डर मिळवायची असते. ती मिळवण्यासाठी मित्रांनो संबंधित कार्यालयाशी किंवा जे गॅझेटेड ऑफिसर त्याच्या सोबत संपर्क साधून जन्म दाखला ‌मधे बदल करण्यास संदर्भातील जी कागदपत्रे असतात त्यांची पूर्तता करून, योग्य ते फॉर्म भरून, तो फोर्म भरुन मित्रांनो कोर्टासमोर हा सादर करावा लागतो.

आणि त्यानंतर जी न्यायाधीश असतात त्या न्यायाधीशांसमोर आपल्याला जो जन्मदाखले मध्ये बदल करावयाचा आहे. त्याबद्दल बदल करण्यामागचं नेमके कारण काय आहे? आणि त्या मागचा जो नेमकी हेतू जो आहे, इत्यादी सर्व गोष्टी स्पष्ट रित्या न्यायाधीशांसमोर मांडून, जन्म दाखला या मध्ये बदल करण्यासंदर्भात विनंती ही केली जाते. आणि जर समजा या न्यायाधिशांनी ही विनंती जर मंजूर केली.

तर कोर्टामार्फत जन्म प्रमाणपत्र मध्ये बदल करणे या संदर्भातले एक प्रमाणित ऑर्डर काढली जाते. आणि ही प्रमाणित ऑर्डर घेऊन जे संबंधित कार्यालय आहे. संबंधित कार्यालयाशी संपर्क साधून, कायदेशीर नावा मध्ये किंवा जन्म तारखे मध्ये किंवा अन्य जो बदल आहे, तो मित्रांनो जन्म प्रमाणपत्र वरती केला जातो. आणि नवीन जन्मदाखला मित्रांनो दिला जातो.

आता त्यासाठी जे काही चार्ज असतील तो आपल्याला त्या कार्यालयामध्ये द्यावा लागतो. दत्तक मुलाच्या बाबतीत पालकांचे नाव बदलण्याची प्रक्रिया पार पाडावी लागते. यामध्ये बाळाचे वय जर एक वर्षापेक्षा जर कमी असेल. तर न्यायालयीन प्रक्रियेत शिवाय केवळ आवश्यक ती कागदपत्रे सादर करून ही प्रक्रिया पूर्ण केली जाते.

आता बघू आधार कार्ड. आधार कार्ड हे जन्मदाखला नंतर आवश्यक असणारे दुसरे महत्त्वाचे कागदपत्र आहे. आणि मुलांसाठी असणारे आधार कार्ड हे बाल आधार कार्ड म्हणून ओळखले जाते. आणि ते निळ्या रंगाचे असते. काही हॉस्पिटलने तर बाळाच्या जन्माच्या वेळी आधार कार्ड नोंदणीची प्रक्रिया करण्यास सुरुवात केली आहेत. आणि अशी हॉस्पिटल जन्म प्रमाणपत्र सोबत आधार कार्ड नोंदणीची पावती देखील पालकांना बरोबरच देतात. त्याच प्रमाणे बहुतांश ज्या शाळा आहेत, त्यांनी प्रवेशासाठी आधारकार्ड कंपल्सरी केले आहे.

मार्च २०१७ मध्ये सरकारने मिड डे मील योजना, याच लाभ घेणाऱ्या मुलांसाठी, आधार कार्ड हे कंपल्सरी केले आहे. मानव संसाधन विकास मंत्रालयाने घोषित केले आहे. की ज्या मुलांचे आधार कार्ड बनवलेले नाही, अशा मुलांना मिड डे मील योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे मित्रांनो आधार कार्ड काढणे हे अत्यंत गरजेच आहे. आणि पालकांचे जर आधार कार्ड नसेल. तर पाल्याची आधार कार्ड ही काढता येत नाही.

हे लक्षात घ्या. जर पालकांचे आधार कार्ड नसेल तर मुलाचे आधार कार्ड हे काढता येत नाही. जर मूल पाच वर्षांपेक्षा लहान असेल, तर त्याच्या पालकांच्या आधार कार्ड याला मुलाचं आधार कार्ड लिंग केले जाते. आता बघू आधार कार्डाची आणण्याची प्रक्रिया कशा पद्धतीने आहे. तर आधार कार्ड काढण्यासाठी आपल्याला आधार कार्ड एनरोलमेंट कार्यालयामध्ये म्हणजे आधार कार्ड बनवण्याचे जे सेंटर आहे.

त्या ठिकाणी जाऊन आधार कार्ड चा संपूर्ण फॉर्म भरावा लागेल. आणि त्या फॉर्म बरोबर मुलाच्या जन्मदाखले ची व आई किंवा वडिलांच्या आधार कार्डची किमान एक एक प्रत, म्हणजे झेरॉक्स कॉपी ही जोडावी लागेल. आणि ज्या वेळेस आधार कार्ड बनवण्यासाठी आधार सेंटर वर जाल, त्यावेळेस मुलाच्या जन्मदाखला, व त्याच प्रमाणे आई किंवा वडिलांच्या आधार कार्ड ची ओरिजनल प्रत आहे.

ती पण मित्रांनो बरोबर ठेवा. मुलाच्या चेहऱ्याचा फोटो, बायोमेट्रिक पडताळणी, बोटांचे ठसे इत्यादी. इतर सर्व गोष्टी एनरोलमेंट सेंटर वर, आधार कार्ड नोंदणीच्या म्हणजे रजिस्ट्रेशन च्या वेळी केल्या जातात. जर मुल पाच वर्षापेक्षा लहान असेल, तर बायोमेट्रिक पडताळणी केली जात नाही. मुल जेव्हा पाच वर्षांचे होईल त्यानंतर मुलांची बायोमेट्रिक पडताळणी करणे हे आवश्यक असते.

त्याचप्रमाणे ज्या वेळेस पंधरा वर्षांच मुल होतो त्यानंतर पुन्हा संपूर्ण प्रक्रिया ही करणे आवश्यक असते. आधार कार्ड ची नोंद केल्यानंतर एनरोलमेंट नंबर हा मिळतो. आणि या एनरोलमेंट नंबर द्वारे आधार कार्ड चे स्टेटस, म्हणजे आधार कार्ड बनले आहे की नाही आहे. त्याचप्रमाणे आधार कार्ड जर बनलेला असेल. तर ते आपल्याला आधार कार्ड सेंटर द्वारे, जे आधार कार्डची मेन ऑफिस आहे.

तिथून आपल्याला डिस्पॅच केले की नाही. याचे स्टेटस आहे ते वेबसाईट वरती आपण तपासू शकतो. आणि जनरली नोंदणी केल्यानंतर नव्वद दिवसांच्या आत, आधार कार्ड पोस्टामार्फत आपल्याला घरी आपल्या पत्त्यावर ती मित्रांनो डिस्पॅच केले जाते. तर अशा पद्धतीने लहान मुलांचं जन्म प्रमाणपत्र आणि आधार कार्ड संदर्भातली माहिती मी माझ्या पद्धतीने तुमच्यापर्यंत मांडण्याचा प्रयत्न केला.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.