आज एका नवीन उद्योगा विषयावर चर्चा करणार आहोत. लाकडी घाण्यावरील तेल निर्मिती उद्योग. लाकडी घाण्यावरील तेल निर्मिती याविषयी बोलताना सगळ्यात महत्त्वाची गोष्ट आहे कि तेल ही आपली जीवनावश्यक वस्तू आहे. आता पर्यंत वर्षानुवर्ष आपण प्युरीफाईड तेलाचा, रिफाईन्ड तेलाचा वापर एवढ्या प्रमाणात करायला शिकलो. की आता जुन्या काळी आपण घाण्यावरचं तेल वापरायचो.
ही मुळातच संकल्पना लोकांच्या डोक्यातून पूर्ण बाजूला पडली. मग आता घाण्यावरचं तेल आता कसं पुढे आले. किंवा अचानक लोकांना का वाटायला लागलं की आता घाण्यावरचं तेल घ्यावे. किंवा याचं खरोखरच बिझनेस म्हणून मार्केट आहे का? या सगळ्या प्रश्नांची उत्तरे आज आपण येथे चर्चा करणार आहोत.
लाकडी घाण्यावरील तेल निर्मिती उद्योग करताना सध्या तरी प्रामुख्याने सेंटर फोकस किंवा सेंटर ऑफ अट्रॅक्शन आहे. खरं तर शहरांमध्ये लोकं जे आता स्वतःच्या हेल्थ बदल जागरुक होत चालली आहे. स्वतःच्या आरोग्यासाठी हवी तेवढी रक्कम खर्च करायला तयार आहे.
त्याच लोकांसाठी आजचा हा बिझनेस की लाकडी घाण्यावरील तेल निर्मिती उद्योग सुरु आहे.पण मग शहरा पुर्ताच हा बिझनेस आहे का? की ग्रामीण भागातही चालेल. तर हो नक्कीच ग्रामीण भागात मला अस वाटतं किंबहुना या पेक्षा जास्त गरज सुद्धा आहे.
म्हणजे शहरी आणि ग्रामीण अशा दोन्ही मध्ये याचं एकत्रित वर्क आऊट होऊ शकतं. लाकडी घाण्याचा उद्योग करताना प्रामुख्याने तीन महत्त्वाच्या गोष्टी आपण लक्षात घेतले पाहिजे. पहिला, एक ईन्वेस्टमेंट खूप कमी आहे. बिझनेस ऍंगल ने जर विचार केला तर ईन्वेस्टमेंट खूप कमी आहे. दुसरे, कोणीही करू शकतं. म्हणजे अगदी सामान्य शेतकरी करू शकतो. एखादं उद्योजक म्हणून जर एखादी महिला तयार होणार असेल. तर ती सुद्धा करू शकते.
तिसरी गोष्ट महत्वाची, एखाद्या नोकरदार आहे. एखादा बिझनेस मेन आहे. आणि साईड बिझनेस म्हणून करू शकतो. तर हा बिझनेस. तर हा मुळातच हेल्थ ओरिएंटेड आहे. आरोग्य सोबत निगडित आहे. आणि आपल्या रोजच्या गरजेशी निगडित आहे. म्हणजे मुख्य दोन्ही फोकस केले जातात. क्रमांक एक. तुमचं डेली नीड बिझनेस. म्हणजे याला स्टॉप होण्याची संकल्पना नाही. क्रमांक दोन. याची मुख्य कन्सेप्ट आहे की मार्केट मध्ये.
आरोग्य या सोबत निगडित असल्याने आता याची मागणी प्रचंड स्वरुपात वाढते. महत्वाचं मेन फेज आहे. प्रोडक्शन करनं त्या तुलनेत सोपं आहे. मार्केटिंग साठी थोडेसे स्कील पाहिजे, महत्वाचं हेच आहे. याला उद्योग म्हणून उभं करताना एक प्लॅटफॉर्म आहे. कारण इथं दोन कन्सेप्ट आहे. एक जिथं तुम्ही प्रोडक्शन करत आहे, तिथं तुमचं सेल आहे.
जिथं प्रोडक्शन आणि तिथं सेल असेल तर त्याला काउंटर सेल आपण म्हणू. डेफिनेटली त्याचा फायदा चांगला होतो. क्रमांक दोन. काउंटर सेल च्या वाईज किंवा काऊंटर एका ठिकाणी असतील. किंवा मल्टिपल काऊंटर असतील आणि तुमचं प्रोडक्शन एका ठिकाणी असेल. तिथुन तुम्ही वेगवेगळ्या भागात सेल करू शकता. असं सुध्दा हा बिझनेस होऊ शकतो. त्यामुळे या उद्योगाला विचार करताना दोन्ही बाजुंनी विचार करा.
ज्यांना खुप लार्ज स्केल वर करायचं आहे, त्यांनी दुसरी कन्सेप्ट करा. की प्रोडक्शन एका ठिकाणी असेल. मॉन्युफॉक्चरिंग एका ठिकाणी असेल. आणि भरपूर युनीट असतील. ज्यांना छोट्या स्केलवर करायचं आहे. जे शहरात आहेत. ते मग प्रामुख्याने काय करू शकतात? एक छोटासा गाळा घेऊन.
किंवा एक छोटंसं शॉप घेऊन. मागच्या भागात प्रोडक्शन युनीट असेल. आणि समोरच तुमचं सेलींग युनिट असेल. मात्र याचं प्रमोशन आणि पब्लिशिंग खुप प्रमाणात करावं लागेल. हे सुद्धा तुमच्या ध्यानात असू द्या. लाकडी घाण्यावरील तेल उद्योगाचं हे जे मार्केटिंग स्किल आहे. हे जर एकदा वर्काऊट झाले. किंवा तुमचं एक बेसिक फॉर्म्युला जर तयार झाले. की तुम्हाला नक्की कसं पुढे जायचं आहे? तर डेफिनेटली याला उद्योग म्हणून बघता येईल.
इथं महत्वाचे एक लक्षात घ्या. हा क्वॉन्टम बिझनेस आहे. B2C जे प्रोडक्ट ओरिएंटेड असतात, ते क्वॉन्टम मध्ये चालतात. तुम्ही जर म्हणलं सध्या मी दोन लिटर तेल विकतोय. पाच लिटर तेल विकतोय. मग हा बिझनेस होन शक्य नाही. मार्जीन बर्या पैकी चांगले असते. त्यामुळे महत्वाचे काय? आपल्याला क्वॉन्टम मध्ये सेल करायचं आहे. क्वॉन्टम मध्ये बिझनेस सेल झाले. कारण तेलाचं गरज प्रत्येक घरात आहे.
फक्त तुमचं प्रोडक्ट प्रत्येक घरात पोहोचलं पाहिजे. हे सगळ्यात महत्त्वाचं लक्षात ठेवा. जेव्हा तुम्ही लाकडी घाण्याचं तेल उद्योग सुरु करता. लाकडी घाण्यावरील युनीट जर सुरू करता. ते युनिट सुरू करायच्या वेळी माझं एक वाक्य असतं. ” जेवढं खर्च लग्नात करता, तेवढं खर्च या युनिट च्या ओपनिंग च्या दिवशी करुन दाखवायचं. तेवढे लोकं बोलवून दाखवायचे. मी गॉरेंटी देतो की हा बिझनेस खूप चांगला सेटल होऊ शकेल.
कारण जिथं तुम्ही राहतात. जिथं तुमच्या जवळची लोक आहेत. त्या भागात जर याचं मार्केटिंग झाले. तर डेफिनेटली त्याचा खूप चांगला फायदा होईल. भांडवल: अंदाजे खर्च २-३ लाख रुपये हे मशिनरी साठी येतो. जागेभाडे, मजुरी, तेलबिया इत्यादी १ लाख रुपये.
तेल प्रक्रिया कशी होते: जुन्या काळात साधारण १ पायलीचा घाणा असायचा म्हणजे त्यात ४ किलो धान्य असते त्यातून तेल काढण्यासाठी साधारण ४ तास लागायचे तेच आता साधारण १३ किलोचा घाणा असतो त्यासाठी १ तास वेळ लागतो. साधारण १३किलो शेंगदाण्याच्या घाण्यापासून सुमारे ५ ते ५.५ किलो तेल मिळते.
तेच खोबरे चा घाणा असतो जो २२ किलोचा असतो त्यातून जवळपास ५० टक्के तेल निघते म्हणजे १० ते ११ किलो तेल यातून निघते. जेव्हा तेल निघते तेव्हा ते मोठ्या टाक्यामध्ये स्टोअर करतात ज्यामध्ये sedimentation म्हणजेच तेलात असणारे कण हे खाली स्थिर होतात.
ज्याच्या द्वारे चांगले असणारे तेल आपल्याला वरील साईडला मिळते. घाणा तेल आणि रिफाइन तेलात खूप फरक असतो रिफाईन तेलात जवळपास १२ ते १३ प्रकारची केमिकल्स वापरली जातात आरोग्याच्या द्रुष्टीने चांगले नसते त्यामुळे कोलेस्ट्रॉल चे प्रमाण वाढते. घाण्या तेलात चांगल्या कोलेस्ट्रॉल च प्रमाण जास्त असते त्यामुळे आपल्याला नुकसान नसते.
सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.