लाकडी घाण्यावर काढलेल्या तेलाला इतक महत्व का आहे? कोणत्या खास गोष्टी लाकडी घाण्यावरील तेलाला आरोग्यासाठी सर्वोत्तम बनवतात ? जाणून घ्या महत्वाची माहिती !

शेती शैक्षणिक

खाद्यतेलाला खूप मोठा इतिहास आहे. चीन आणि जपान येथे इसवी सन पूर्व २००० वर्षांपूर्वी खाद्यतेल वापरायला सुरुवात झाली. सुरुवातीला भुईमुग आणि सूर्यफुलाच्या बिया भाजून –कुटून त्या उकळत्या पाण्यात टाकून त्यापासून पहिल्या वहिल्या तेलाची निर्मिती झाली. त्यानंतर पाम,नारळ यापासूनही तेल काढले जाऊ लागले.

मग त्यापुढे तेलक्रांती झाल्याप्रमाणे सर्वच तेलबियांपासून तेल काढण्याची चढाओढ सुरु झाली .जशी जशी औद्योगिक क्रांती होत गेली तसतसे निरनिराळ्या तंत्राद्यानाचा वापर करून तेलाचे उत्पादन घेतले जाऊ लागले. सद्यस्थितीत खाद्यतेलाबरोबर कॉलेस्टोल सारख्या संज्ञा जोडल्या जाऊ लागल्या.

आमच्याच कंपनीचे तेल सर्वोत्तम कसे हे दाखवण्यासाठी चढाओढ सुरु झाली. वैद्यकीय क्षेत्रात प्रगती आणि आधुनिक जीवनशैली यामुळे तेल आपल्या आरोग्यास घातक कसे याचाही पर्यायाने शोध लागला. मग हेल्थी ओईल, हृदयासाठी वेगळे तेल, मधुमेहींसाठी वेगेळे तेल असे नाना प्रकारचे तेल बाजारात येऊ लागले.

तेलाचा व्यापार वाढीस लागला त्याचबरोबर जास्त नफा मिळवण्यासाठी तेलामध्ये भेसळ आणि रसायनांचा वापर होऊ लागला. इथूनच सुरुवात झाली ती आपल्या आरोग्याच्या काळजीची. माझे वैयक्तित मत विचारलं तर मी लाकडी घाण्यावर काढलेल्या तेलाला पहिली पसंती देणार.

आधुनिक यंत्राद्वारे जेव्हा तेलनिर्मिती प्रकिया केली जाते तेव्हा त्यामध्ये अनेक रसायने जसे फॉस्पेरिक ऍसिड, कॉस्टिक सोडा, हायड्रोजन वापरली जातात जेणे करून तेल अधिक चमकदार ,पारदर्शक आणि पातळ व्हावे. एकप्रकारे तेलाचे ब्लिचिंग केले जाते त्यामुळे तेल अधिकाधिक स्वच्छ दिसू लागते. परंतु हीच रसायने आपल्या शरीराला हानिकारक ठरतात.

हे तेल तयार करतांना हल्ली खूपच फसवेगिरी केली जात आहे. तेलाच्या रिफायनरी मध्ये टँकर भरून कच्चे तेल आणले जाते, हे कच्चे तेल म्हणजे सर्व प्रकारच्या खाण्या योग्य आणि अयोग्य अश्या तेलबियांचे अशुद्ध असे तेल असते. त्याच तेलावर प्रक्रिया करून हवे ते फ्लेवर्स मिसळून वेगवेगळे तेल बनवले जाते.

म्हणजे तेल एकच ते सुद्धा अशुद्ध आणि त्यात चक्क रासायनिक फ्लेवर मिसळून हवे ते तेल पॅकिंग करून दिले जाते. यंत्राद्वारे तेल काढण्याची प्रक्रिया खूप वेगवान आणि उष्णता निर्माण करणारी असते त्यामुळे तेल तयार होताना उष्णतेमुळे तेलाचा नैसर्गिक पोत, रंग आणि परिणामी चवही बदलते त्याच बरोबर उष्णता आणि रसायने यांचा एकत्रित परिणाम होऊन तेलामध्ये बदल घडून येतात आणि असे तेल खाण्यास अपायकारक ठरते.

लाकडी घाण्यावर तेल काढतांना अगदी नगण्य अशी उष्णता निर्माण होते. त्यामुळे तेलातील नैसर्गिक तत्व जपले जातात. जेणेकरून आपल्याला स्वच्छ आणि पोषक घटकांनी परिपूर्ण असे तेल मिळू शकेल. त्याचबरोबर लाकडी घाण्यावरील तेल हे स्वच्छ तेलबिया वापरून काढले जाते.

अशा तेलाला स्वतःचा सुगंध व रंग असतो हे तेल घट्ट असते व याचा जेवनामधील वापर देखील कमी लागतो. हे तेल आरोग्याच्या दृष्टीने खूप चांगले असते. लाकडी घाणा म्हणजे ज्या घाण्यामध्ये तेल काढताना फक्त लाकडाचा वापर होतो ज्यामुळे तेल निघण्याची क्रिया ही अतिशय कमी तापमानात होते म्हणून याला कोल्ड प्रेस ऑइल अस सुद्धा म्हणतात.

लाकडी घाण्यावरील तेलाचे आरोग्यदायी फायदे: या तेलाला स्वतः चा सुगंध असतो व घट्टपणा असतो. हे तेल जेवणात वापरतांना कमी प्रमाणात लागत असल्यामुळे शरीरात अतिरिक्त तेल जात नाही .रोगप्रतिकारक शक्ती वाढविण्यास उपयुक्त असते.

ओमेगा फॅटी ऍसिड व mufa आणि pufa आपल्या शरीरातील कोलेस्टेरॉल नियंत्रित करण्यासाठी मदत करतात. लाकडी घाण्यावरील तेल मसाज साठी खासकरून वापरले जाते शुद्ध तेलाच्या वापराने सांधेदुखी मध्ये आराम मिळतो आणि मालिश केल्याने रक्ताभिसरण सुरळीत होऊन कान्तीही तेजवान होते. हृदय रोगाचा धोका बऱ्याच प्रमाणत कमी होऊन आपली हाडेही मजबूत होतात.

सर्वात शेवटी सामान्य माणूस विचार करतो ते लाकडी घाण्याचे तेल खिशाला परवडेल कि नाही याचा. तर माझं म्हणण एकच असेल केमिकल युक्त असे तेल खाण्यापेक्षा नैसर्गिक आणि शुद्ध अश्या तेलाला २ पैसे जास्त लागले तर काय हरकत आहे.आणि तसेही लाकडी घाण्याच्या तेलाच्या किमती इतर तेलांच्या तुलनेत सामान्यजनांना परवडतील अशाच आहेत.

सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.