आपल्या आयुष्यात आपण जे काही करतो ते आपल्या बोलण्यावर अवलंबून असतो, आणि आपण जे काही बोलतो ते आपल्या विचार करण्यावर अवलंबून असतो. जर आपण सतत पॉझिटिव्ह बोलत असू तर आपले विचार देखील नेहमी पॉझिटिव्ह असतात, आणि जर नेहमी निगेटिव बोलत असू तर आपले विचारही निगेटिव्ह असतात. बऱ्याचदा आपण जे बोलतो, जे विचार करतो तेच आपल्या आयुष्यात घडत असतं. या लेखाद्वारे आज 5 अशे वाक्य जाणून घेऊ, जे आपण चुकूनही बोलले नाही पाहिजे. असे कोणते वाक्य आहेत जे तुमच्या आयुष्यात निगेटिव्हिटी आणत असतात? जर तुम्ही ते बोलायचे बंद केले तर तुमच्या आयुष्यात नक्कीच बदल घडेल. याची गॅरंटी आहे.
5) मला कोणाची गरज नाही :- ”हं…मला कोणाची गरज नाही.” तुम्हालाही अस बोलायची सवय आहे? व्यवसायात किंवा आयुष्यात कधी-ना-कधी कोणाची तरी गरज ही लागतच असते हे त्रिकालवादी सत्य आहे. त्यामुळे, मला कोणाची गरज नाहीये असं बोलण्याची सवय जर तुम्हाला असेल तर ही चुकीची सवय आहे. हे वाक्य सतत बोलल्याने आपल्यात अहंकार वधू लागतो. या गोष्टीमुळे आपण चांगल्या व्यक्तीला भेटण्याची संधी गमावून बसतो. ती संधी आयुष्याच्या दृष्टीने असो किंवा व्यवसायाच्या. कदाचित तो व्यक्ती तुमचा चांगला मित्र होऊ शकला असता किंवा तुम्हाला एखाद्या व्यवसायाची व पैसे कमवण्याची मोठी संधी देऊ शकला असता. पण त्या एका वाक्याने तुम्ही त्या संधी गमावू शकता. त्यामुळे आजच हे वाक्य वाक्य बोलण्याचे बंद करा.
4) मी (ट्राय) प्रयत्न करेल :- हे वाक्य बोलल्याने काम पूर्ण होण्याची शक्यता फक्त 50% इतकीच राहते, तर काम न होण्याचे शक्यता देखील 50% असते. समोरचा जेव्हा मी ट्राय करेल असे म्हणतो, तेव्हा आपल्याला समजून येते की हा व्यक्ती कॉन्फिडन्ट नाहीये. आपल्याला ‘तो व्यक्ती हे काम पूर्ण करू शकतो का?’ याबद्दल शंका वाटू लागते. त्यामुळे मी प्रयत्न करो एवजी जर तुम्हाला ते काम जमणार असेल तर लगेच करायला घ्या. परंतु जर ते काम नसेल जमणार तर त्याचा एखादा पर्याय द्या. पण मी प्रयत्न करेल म्हणून समोरच्याला आशेवर ठेवू नका.
3) यात माझी काहीच चूक नाही :- प्रत्येकाला नेहमी असं वाटत असतं की आपण जे पण काम करतो ते एकदम बरोबर आहे, योग्य आहे. पण जेव्हा त्यात काही चूक निघते तेव्हा आपण दुसर्याच्या चुका शोधत बसतो, आणि यात माझी काही चूक नाही असं बोलून आपले हात झटकून देतो. आयुष्यात तेच लोक पुढे जाताच जे आपण केलेल्या किंवा आपल्याकडून नकळत झालेल्या चुका मान्य करतात. कारण या चुकांमधून धडा घेऊन ते स्वतःमध्ये सुधारणा करतात. तुम्ही जर खरेच चुकले असेल तर लगेच मान्य करा आणि चुकले नसाल तर पुराव्यासहित समोरच्या व्यक्तिला ती गोष्ट सिद्ध करून दाखवा. परंतु डायरेक्ट असं म्हणू नका की, यात माझी काही चूक नाहीये.
2) मला हे जमणार नाही :- मला जमणार नाही हे निगेटिव्ह लोकांचं आवडतं वाक्य आहे. हे वाक्य बोलणारे लोक हरलेल्या विचारांचे असतात. जर तुम्हाला हे वाक्य बोलायची सवय असेल तर ती सवय तत्काळ मोडा. कारण तुम्ही जेव्हा हे वाक्य बोलत असतात तेव्हा तुमच्या मेंदूला हा सिग्नल जातो की हे काम मुळातच अवघड आहे आणि ते मला जमणार नाही. शेवटी ते काम कधी जमतच नाही. आपल्याकडून ते पूर्ण देखील होत नाही.
1) मला हे आधीच माहिती होतं :- खूप लोकांना एखादी गोष्ट ऐकल्यानंतर ‘मला हे आधीच माहिती होतं’ असं बोलण्याची सवय असते. या गोष्टीमुळे समोरच्या व्यक्तिला असे वाटू लागते की या व्यक्तीला ऐकून घेण्यात किंवा नवीन गोष्टी शिकण्यात काही इंटरेस्ट नाही. पण दुसऱ्या वेळेस जेव्हा एखादी नवीन गोष्ट सांगायचे असते तर तो व्यक्ती विचार करते की त्याला सांगायची काहीच गरज नाहीये याला तर सगळं आधीच माहीत असतं. त्यामुळे तुम्ही नवनवीन गोष्टी शिकण्याची संधी गमावून बसता. अश्या संधी ज्या तुमच्या आयुष्यात, व्यवसाय आणि करिअरमध्ये खूप उपयोगी ठरल्या असत्य. तर हे होते ते पाच वाक्य तुम्ही आजच बोलायचे बंद केले पाहिजे. आणि तुमच्या आयुष्यातील यशाचा मार्ग हा मोकळा केला पाहिजे.