काय सांगता ! सेकंड हँड गाडी घेण्यासाठी देखील कर्ज मिळते, जाणून घ्या महत्वाची माहिती या लेखातून !

लोकप्रिय

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

एक चांगलं घर आणि घरासमोर एक चांगली कार पार्क करण्याचं प्रत्येक सामान्य माणसाचं स्वप्न असत परंतु या एकविसाव्या महागाईच्या शतकात हे काही खिशाला परवडणारे स्वप्न राहिले नाही असेल म्हणले तरी चालेल. त्यामुळे काही लोक नवी कार घेण्याऐवजी जुनी म्हणजेच second hand कार विकत घेण्यास प्राधान्य देतात. त्यातच काही लोक नवीन गाडी शिकण्यासाठी पहिली गाडी घेतात त्यामुळे गाडी जुनी घेतात.

जुनी गाडी घेणे त्यांना गाडी शिकण्यासाठी फायद्याचे पडते व जुनी गाडी सर्वांच्या बजेट मध्येही बसते. कारण नवीन कारच्या तुलनेत second hand कार कमी किमतीत आणि स्वस्त मिळते. सेकंड हँड कार ची किंमत जशी जुनी होत जाते तशी कमी होते. जितकी कार जुनी असते तितकी तिची किंमत कमी असते. त्यामुळे तिला सर्वसामान्य व्यक्ती ही विकत घेऊ शकतात. आपल्या भारत देशात आता लोक मोठ्या प्रमाणावर सेकंड हँड म्हणजे च जुन्या गाड्या विकत घेण्यास प्राधान्य देत आहेत.

Nobody entitled to free parking outside home | Latest News Delhi - Hindustan Times

 

त्यामुळे बँक आणि विविध वित्तीय संस्थांनी ही जुनी गाडी विकत घेऊ इच्छिणाऱ्या लोकांसाठी ही अर्थसहाय्य देण्यास सुरुवात केली आहे. आपल्या देशामध्ये जुन्या म्हणजेच सेकंड हँड कार ची ही मोठी बाजारपेठ उभा राहिली आहे. जुन्या गाड्यांकडे जाणारा लोकांचा ओघ पाहता अनेक कार उत्पादन कंपन्याही ही या सेकंड हँड कार विक्री च्या बाजारपेठेत आपला पाय रोवण्यासाठी सज्ज झाल्या आहे. देशातील विविध ठिकाणी त्यांनी त्या प्रकारे सेवा देण्यास ही सुरुवात केली आहे.

त्यामध्ये टाटा, महिंद्रा, मारुती अशा जवळपास सर्वच कंपन्या ग्राहकांना खात्रीपूर्वक जुन्या गाड्या उपलब्ध करून देत आहेत. ग्राहकांना योग्य किंमतीमध्ये खात्रीपूर्वक उत्तम दर्जाच्या सेकंड हँड गाड्या उपलब्ध करून देत आहेत. कंपनी त्यांच्याकडे विक्रीसाठी येणाऱ्या सेकंद हँड गाड्यांची जाणीवपूर्वक खात्री करूनच ती गाडी ग्राहकांना प्रदान करत आहे. त्यामुळे नवी गाडी घेण्यापेक्षा सर्वसामान्य लोक सेकंड हँड गाडी घेण्यास प्राधान्य देत आहेत.

नवीन कारच्या तुलनेत सेकंड हँड गाडी ग्राहकांना जवळजवळ निम्म्या किंमतीत मिळत आहे. अनेकदा लक्सरी श्रेणीतील कार सुद्धा ग्राहकांना छोट्या कार च्या किमतीत मिळत आहे. त्यामुळे ग्राहकांचा कल सेकंड हँड कार कडे वाढला आहे असे म्हणल्यास काही हरकत नाही. सेकंड हँड कार करिता अर्ज करण्यासाठी लागणारी कागदपत्रे : सेकंड हँड कार साठी अर्ज हा ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही प्रकारे ग्राहक अर्ज करू शकतो.

Types of car loans - New car loan, used car loan and loan against car - CarWale

त्यासाठी दोन पासपोर्ट फोटो, वाहन मूल्यांकन अहवाल, आधार कार्ड, पासपोर्ट, ड्रायव्हिंग लायसन्स, मतदान कार्ड, पॅन कार्ड, LIC पॉलिसी, वीज बिल, वार्षिक उत्पन्नाचा पुरावा म्हणून ऑडिट अहवाल, फॉर्म 16, पगाराची स्लिप, बँक स्टेटमेंट इत्यादी कागदपत्रांची पूर्तता ग्राहकाला यावेळी करावी लागते. व्याजदर : नवीन कार च्या तुलनेत सेकंड हँड कार चा व्याज हा कमी असतो आणि आपल्या परतफेडीसाठी पाच वर्षे ते नवीन कार इतके म्हणजेच सात वर्षे ही मिळू शकतात.

त्यासाठी लागणारा व्याजदर हा 9.75 टक्क्यांपासून अगदी 16 टक्क्यांपर्यंत ही असू शकतो. सेकंड हँड कार साठी काही संस्था 100% पर्यंत कर्ज देतात परंतु गाडीला 3 वर्ष पूर्ण झाले असल्यास काही संस्था कर्ज देत नाहीत. कर्जाचा कालावधी : अनेक बँक आणि वित्तीय संस्था ग्राहकांना 5 वर्षाच्या पुर्ततेच्या हमी वर कर्ज देऊ करतात पण जर ती गाडी खूपच जास्त जुनी असेल तर बँक कर्ज पुर्ततेचा कालावधी कमी ही ठेऊ शकते.

तसेच हा कालावधी गाडीच्या कंडिशन म्हणजे परिस्थितीवर देखील अवलंबून असतो. ग्राहक विकत घेत असलेल्या वाहनाला देखभाल खर्च जर जास्त येणार असेल तरी सुद्धा बँक कर्जाचा कालावधी कमी करू शकते. राष्ट्रीयकृत बँका गाडी 5 वर्षापेक्षा जास्त जुनी असेल तर शक्यतो कार साठी कर्ज देऊ करत नाहीत. कागदपत्रांची तपासणी : ग्राहकाने जुनी कार खरेदी करण्याअगोदर त्या कार ची कागदपत्रे व्यवस्थित तपासून घेणे गरजेचे आहे.

यासाठी गरज पडल्यास नजीकच्या आरटीओ कार्यालयात ही संपर्क करायला हवा. गाडीचा क्रमांक आणि गाडीच्या इंजिन चा क्रमांक व्यवस्थित तपासून घेणे गरजेचे आहे. हे क्रमांक जर बरोबर असतील तरच सर्व कागदपत्रे बँकेकडे पाठवावेत म्हणजेच पुढील कर्जाची प्रक्रिया सुरू करावी.

कार ला एकापेक्षा जास्त जास्त मालक झाले असतील त्यावर ही कार ची किंमत अवलंबून असते. एकापेक्षा जास्त मालक असतील तर कार ची किंमत कमी होते. त्यामुळे कागदपत्रे व्यवस्थित तपासून घेणे गरजेचे आहे. तुम्ही जर कार घेण्यास इच्छुक असाल आणि परिस्थिती अभावी ते तुमच्या खिशाला परवडणारे नसेल तर अजिबात मनामध्ये कचरू नका. लगेचच नजीकच्या बँकेला किंवा वित्तीय संस्थेला भेट द्या. आणि आपल्या सुंदर घरासमोर कार पार्क करण्याचं स्वप्न पूर्ण करा.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे.

अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.