महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत पाच जिल्हे कोणते? जाणून घ्या!!

बातम्या

 

आपले महाराष्ट्र हे राज्य भारतातील प्रमुख राज्यापैकी एक आहे, ज्याची कोकण-पुणे-नाशिक-छत्रपती संभाजीनगर-अमरावती आणि नागपूर अशी सहा प्रशासकीय विभागात विभागणी करण्यात आली आहे. भौगोलिक, आर्थिक, धार्मिक आणि ऐतिहासिक दृष्ट्या परिपूर्ण असणारे महाराष्ट्रात एकूण 36 जिल्हे आणि 358 तालुके आहेत. त्यातील काही जिल्हे इतके श्रीमंत आहेत त्यांचा फायदा आपल्या भारत देशाच्या इकॉनॉमीला होतो, अशातच आज आपण महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत पाच जिल्हे कोणते आहेत? याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत..

◆ नागपूर : महाराष्ट्रातील श्रीमंत जिल्ह्यांची यादीमध्ये नागपूर या जिल्ह्याचा पाचवा क्रमांक लागतो. जो महाराष्ट्र राज्याच्या विदर्भ विभागात मोडतो. महाराष्ट्राची टायगर कॅपिटल म्हणूनही नागपूरकडे पाहिले जाते. या भागातील संत्री खूप प्रसिद्ध आहे. तसेच या जिल्ह्यात संत्र्याची मोठ्या प्रमाणात उत्पादन घेतले जाते, त्यामुळे या संत्र्यांचा जिल्हा म्हणूनही ओळखले जाते. या व्यतिरिक्त औद्योगिक आणि सेवा क्षेत्रामध्ये नागपूरचे खूप मोठे योगदान आहे. नागपूर या जिल्ह्याची एकूण 1 लाख 81 हजार 665 कोटी रुपये इतकी आहे.

◆ नाशिक : महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्ह्यांच्या यादीमध्ये नाशिक जिल्ह्याचा चौथा क्रमांक लागतो. जे महाराष्ट्राच्या उत्तर भागांतील एक महत्त्वाचे शहर आहे. नाशिक जिल्ह्यात मुख्यतः द्राक्ष व कांद्याचे उत्पादन मोठ्या प्रमाणात घेतले जाते. विशिष्ट वाईन निर्मितीसाठी नाशिक संपूर्ण जगभरात प्रसिद्ध आहे. नाशिक हे महाराष्ट्रातील एक महत्त्वाचे तीर्थक्षेत्र मानले जाते, त्यामुळे येथे वर्षभर पर्यटकांची गर्दी आपल्याला पाहायला मिळते. नाशिक या जिल्ह्याचा एकूण 1 लाख 83 हजार 718 कोटी रुपये इतका आहे.

◆ ठाणे : महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्ह्यांच्या यादीमध्ये ठाणे या जिल्ह्याचा तिसरा क्रमांक लागतो. जे महाराष्ट्र राज्याच्या कोकण या प्रशासकीय विभागात येते. येथे जिल्हा सांस्कृतिक इतिहास आणि पर्यटन या दृष्टिकोनातून प्रसिद्ध आहे. त्याचबरोबर ठाणे एक मोठी उपनगर आहे. महाराष्ट्रातील सर्वात वेगाने विकसित होणारे ठिकाण ओळखले जाते. या ठिकाणी मोठ्या प्रमाणात औद्योगिक इंडस्ट्रीज असल्यामुळे या जिल्ह्याचा खूप वेगाने विकास झाला आहे. ठाणे या जिल्ह्याचा एकूण जी टी पी 3 लाख 30 हजार कोटी रुपये इतका आहे.

◆ पुणे : महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्ह्यांच्या यादीमध्ये पुणे या जिल्ह्याचा दुसरा क्रमांक लागतो. जे खासकरून उद्योग आणि माहिती तंत्रज्ञान क्षेत्रामध्ये अग्रेसर आहे. पुण्याला महाराष्ट्राची सांस्कृतिक राजधानी आणि विद्येचे माहेरघर म्हणून ओळखले जाते. उद्योग, माहिती-तंत्रज्ञान, आर्थिक व शैक्षणिक क्षेत्रातील प्रगतीमुळे पुणे हे राज्यात मुंबई नंतर दुसऱ्या क्रमांकाचे शहर आहे. या औद्योगिक कृषी आणि सेवा क्षेत्रामध्ये पुणे जिल्ह्याचे खूप मोठे योगदान आहे. या जिल्ह्यात जीडीपी 3 लाख 68 हजार 478 कोटी रुपये इतका आहे.

◆ मुंबई : महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्ह्यांची यादी मध्ये मुंबईचा पहिला क्रमांक लागतो. भारताची आर्थिक राजधानी म्हणून ओळखली जाते. या शहरांमध्ये बॉम्बे स्टॉक एक्स्चेंज आणि नॅशनल स्टॉक एक्स्चेंज, रिझर्व बँक ऑफ इंडिया आणि बॉलिवुड यासारख्या प्रमुख वित्तीय संस्था आहे. या शहराला मोठ्या प्रमाणात आर्थिक लाभ होतो. मुंबईचा एकूण जीडीपी हा 12 लाख कोटी रुपये आहे.

तर मित्रांनो आज आपण महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत पाच जिल्हे कोणते आहेत? याबद्दल माहिती जाणून घेतलेली आहे. महाराष्ट्रातील तुमचा जिल्हा कोणता आणि तो कशाप्रकारे महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत जिल्ह्यामध्ये येईल? ते आम्हाला कमेंट करून नक्की कळवा..