मित्रांनो आपल्यापैकी बर्याच जणांना माहिती असेल की, महाराष्ट्राच्या विधानसभेत एकूण 288 आमदार आहेत. जेव्हापासून महाराष्ट्र विधानसभेची निवडणूक झाली आहे तेव्हापासून आपल्या राज्यातील राजकारणात मोठे राजकीय बदल झाले आहेत. यामध्ये महाविकास आघाडीची स्थापना, एकनाथ शिंदेचे बंड, राष्ट्रवादीची फूट आणि सध्या शिंदे-फडणवीस-पवार यांचे सरकार जनतेला पाहायला मिळत आहे, परंतु जेव्हा जेव्हा राजकारणाचा विषय निघतो त्या वेळेस कित्येक जणांच्या मनामध्ये राज्यातील सर्वात श्रीमंत आमदार कोण? असा प्रश्न निर्माण होतो. अशातच आज आपण महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदार कोणते आहेत? याबद्दल माहिती जाणून घेणार आहोत..
◆ रत्नाकर गठ्ठे : महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदारांच्या यादीमध्ये रत्नाकर गठ्ठे यांचा दहावा क्रमांक लागतो. रत्नाकर गठ्ठे हे परभणीतील गंगाखेड विधानसभा मतदारसंघ राष्ट्रीय समाजवादी पक्षाचे आमदार आहेत. ज्यांना साखर उद्योगपती म्हणूनही ओळखले जाते. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत गंगाखेड विधानसभा मतदारसंघातून राष्ट्रीय समाजवादी पक्षाच्या तिकिटावर निवडणूक लढवून जिकवली होती. रत्नाकर गठ्ठे यांची एकूण संपत्ती 149 कोटी पेक्षा जास्त आहे.
◆समीर मेघे : महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदारांच्या यादीमध्ये समीर मेघे यांचा नववा लागतो. भाजपाचे समीर मेघे हे मागील 7 वर्षांपासून हिंगणा विधानसभेचे प्रतिनिधित्व करणारे आमदार आहे. 2014 मध्ये यावेळी भाजपा नेत्यांनी उमेदवारी घोषित केले होते. यानंतर ही निवडणूक जिंकली होती. आमदार समीर मेघे यांची एकूण संपत्ती 159 कोटीच्या घरात आहे.
◆ प्रशांत ठाकूर: महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदारांच्या यादीमध्ये प्रशांत ठाकरे यांचा आठवा क्रमांक लागतो. प्रशांत ठाकूर हे देखील भाजपचे नेते आहेत, जे पनवेल विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 2019 चा महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीत भारतीय जनता पक्षाचे उमेदवार पनवेल येथून महाराष्ट्र विधानसभेचे निवडून आले होते. आमदार प्रशांत ठाकूर यांची एकूण संपत्ती 183 कोटी पेक्षा जास्त आहे.
◆ राजेश पवार : महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत घरच्या यादीमध्ये राजेश पवार यांचा सातवा क्रमांक लागतो. राजेश पवार विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार आहेत. आमदार राजेश पवार हे उच्चशिक्षित आहेत. 2014 मध्ये त्यांनी निवडणूक लढवली, परंतु त्यांना त्यामध्ये यश आले नाही. मात्र 2019 मध्ये त्यांनी विधानसभा निवडणुकीत रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया गटातून नारायणगाव संघातून निवडणूक लढवली आणि ते विजयी झाले. राजेश पवार यांची एकूण संपत्ती 191 कोटी पेक्षा जास्त आहे.
◆ तानाजी सावंत : महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदारांच्या यादीमध्ये तानाजी सावंत यांचा सहावा क्रमांक लागतो. तानाजी सावंत हे सोलापूर जिल्ह्यातील एक व्यवसायिक शिवसेनेतील राजकारणी आणि उपनेते आहेत. भूम परंडा विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 2015 मध्ये त्यांनी शिवसेनेचा भगवा झेंडा हाती घेतला. आमदार तानाजी सावंत यांची एकूण संपत्ती 206 कोटीपेक्षा जास्त आहे.
◆अबू आजमी : महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदारांच्या यादीमध्ये अबू आझमी यांचा पाचवा क्रमांक लागतो. हे मुंबईच्या मानखुर्द विधानसभा मतदारसंघाचे समाजवादी पक्षाचे आमदार आहेत. एकाच निवडणुकीमध्ये एका वेळेस दोन जागांवर निवडून आलेले हे महाराष्ट्रातील एकमेव आमदार आहेत. 2009 ते 2024 याचा मानखुर्द शिवाजीनगर या विधानसभेतुन मतदारसंघातून सलग तीन वेळा विजय झाला आहे. आमदार अबू आझमी यांची एकूण संपत्ती ही 209 कोटी इतकी आहे.
◆ विश्वजीत कदम : महाराष्ट्र सर्वात श्रीमंत आमदारांच्या यादीमध्ये विश्वजीत कदम यांचा चौथा क्रमांक लागतो. भारतीय राष्ट्रीय काँग्रेसच्या तिकिटावर कडेगाव विधानसभा मतदारसंघाचे आमदार आहेत. 2019 च्या विधानसभा निवडणुकीत 1 लाख 62 हजार पेक्षा जास्त मतांनी ते निवडून आले होते. आमदार विश्वजीत कदम यांची एकूण संपत्ती ही 216 कोटी पेक्षा जास्त आहे.
◆ संजय चंद्रकांत जगताप : महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदार यांच्या यादीमध्ये संजय चंद्रकांत जगताप यांचा तिसरा क्रमांक लागतो. संजय चंद्रकांत जगताप हे पुरंदर विधानसभा मतदार संघाचे काँग्रेसचे आमदार आहेत. महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीमध्ये 2014 व 2019 मध्ये काँग्रेस पक्षाच्या वतीने अधिकृत उमेदवार म्हणून त्यांनी निवडणूक लढवली. जगताप यांची एकूण संपत्ती ही 245 करोड इतकी आहे.
◆ मंगल प्रभात लोढा : महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदारांच्या यादीमध्ये मंगल प्रभात लोढा यांचा दुसरा क्रमांक लागतो. मंगल प्रभात लोढा हे मलबार हिल विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार आहेत. आमदार मंगल प्रभात लोढा यांची एकूण संपत्ती ही 441 कोटीच्या घरात आहे.
◆ पराग शहा : महाराष्ट्रातील श्रीमंत आमदारांच्या यादीमध्ये पराग शहा यांचा पहिला क्रमांक लागतो. हे घाटकोपर पूर्व विधानसभा मतदारसंघाचे भाजपचे आमदार आहेत. याची एकूण संपत्ती ही 500 कोटींपेक्षा जास्त आहे.
मित्रांनो, 2019 निवडणूक लढवताना प्रत्येक आमदाराने विधानसभेसमोर आपले प्रतिज्ञापत्र सादर केले होते. यामध्ये त्यांच्या संपत्तीची माहिती दिली आहे. महाराष्ट्रातील काही आमदारांची संपत्ती ही या नेत्यापेक्षा जास्त आहे. तर आज आपण महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत 10 आमदारांची माहिती जाणून घेतली आहे. तुमच्या मते महाराष्ट्रातील सर्वात श्रीमंत आमदार कोणता आम्हाला कमेंट करून नक्की कळवा..