आज आपण पाहणार आहोत भारतातला सगळ्यात मोठ्या बिझनेस मॅन बद्दल. त्याच्या कडे पैशाचा मोठेपणा नाहीये पण भारतामध्ये दरवर्षी दर महिन्याला तो व्यवसाय करतो. पण त्याचा किती फायदा होतो कोणाला च माहीत नाही. असेही म्हणता येईल की त्याला फायदा होतच नाही. अशा व्यावसायिका बद्दल मी सांगणार किंवा त्याच्या इम्प्रुव्हमेंट बद्दल मी सांगणार आहे. तर मी बोलतोय आपल्या भारतातल्या शेतकऱ्यांबद्दल, आपल्या शेतकऱ्यांबद्दल की त्यांच्याकडे पैसा पाहायला गेलं तर 99 टक्के जणांकडे तर नाहीच.
जो आहे तो व्यवसायीकांकडे आहे. पण यांच्याकडे एकच उत्पन्नाचे साधन असल्या मुळे त्यांच्याकडे जवळ जवळ पैसा नसतोच. कारण एकतर त्यांला वर्षातून एकदा पूरपरिस्थिती ला सामोरं जावं लागतं. तर कधी दुष्काळाला सामोरे जावे लागते. आणि हो आपले आपल्या मीडिया चे लक्ष नको त्या गोष्टींकडे असते. आपण आपल्या शेतकऱ्यांकडे तितकंसं लक्ष देत नाही.
मी लोकांना सांगायचा प्रयत्न करतोय की शेतकरी एकाच इन्कम सोर्स वरती अवलंबून आहे त्याला एक दुसरा सोर्स ऑफ इनकम असणे किती गरजेचे आहे. कारण जोडधंदा असला आणि पाऊस पडला खूप जास्त, पुर आला, खूप जास्त दुष्काळ आला तर त्याला तो दुसरा सोर्स ऑफ इनकम मुळे तग धरू शकतो, आत्महत्येला प्रवृत्त होणार नाही. शेतकऱ्यांना साईड बिझनेस हवा कारण कोणतेही संकट आले तर सगळ्यात जास्त नुकसान शेतकऱ्यांचे होते. यासाठी आपण कोण कोणते साईड बिझनेस आहेत ते पाहणार आहोत.
पारंपरिक शेती न करता, 50 हजार पर्यंत गुंतवणूक करून करता येणारे व्यवसाय :
1)सुगंधी फुलशेती: पन्नास हजार गुंतवून सुगंधी फुलशेती करू शकता. याचा फायदा असा आहे की फक्त एकदाच लागवड करून 4 ते 7 वर्ष उत्पन्न मिळेल. या मध्ये खूप प्रकार आहेत. 12 महिने मागणी असते. आसपास च्या केमिकल बनवणाऱ्या कंपनीत तुम्ही सप्लाय करू शकता.महिन्याला कमीत कमी 50 ते 60 हजाराची विक्री होऊ शकते.
2) रोप वाटीका: अर्ध्या एकरात किंवा 20- 25 गुंठे जमिनीवर स्वतः ची रोपवाटिका सुरू करू शकतो. त्यात रोप विक्री, झाड विक्री, खत, कुंडी बनवून विक्री करू शकतो. यातून वार्षिक 10-12 लाख उत्पन्न मिळू शकते.
3) वनौषधींची शेती: आपल्या महाराष्ट्रमध्ये वनौषधींची शेती खूप कमी प्रमाणात होते. तसे पाहायला गेले तर त्या प्रमाणात आपण खूप पाठीमागे आहोत. पण खरे तर वनौषधींची शेती खूप कमी पाण्यात होते. जवळ पास असणाऱ्या कंपनी ची माहिती मिळवून तिथे सप्लाय करू शकतो.
4) गांधुळ खत विक्री: गांधुळ खताला बारा महिने मागणी असते आणि लाख-दीड लाखाचा बिझनेस प्रोजेक्ट अगदी दोन गुंठे जमीन मध्ये आपण तयार करू शकतो.
5) पान मळा: ठिबक सिंचनावर आपण पान मळा करू शकतो. अगदी दोन-तीन गुंठ्यातला पान मळा महिन्याला 60 ते 70 हजाराचा इनकम देऊ शजतो. पर राज्यात विकून महिना लाख रुपये नफा मिळू शकतो.
6) तेल घाना: ग्रामीण भागात ऑरगॅनिक प्रोडक्शन कडे खूप वळत आहेत. तर आता लाकडी घाणा घेऊन प्रोडक्शन करू शकतो. याची छोटी मशीन मिळते. 20-22 हजारात मिळू शकते. वार्षिक 10-12 लाख उत्पन्न मिळवता येते.
7) अगरबत्ती: सुवासिक, सध्या, डास मारणारी अगरबत्ती बनवून महिना लाख भर रुपये नफा मिळवू शकतो.
8) सेंद्रिय खत: शेतकरी चांगल्या प्रमाणात शेणखत, कंपोस्ट खत, खाटीकखान्यातले खत, लेंडी खत बनवून, चांगले पॅकिंग करून आसपास च्या भागामध्ये विकू शकता किंवा मोठमोठ्या कंपन्यांना supply करू शकता.
लाख भर गुंतवणूक मध्ये स्वतःचा बिझनेस पर्याय:
1) गूळ निर्मिती: आपल्या कडे सगळी कडे कारखाने असल्या मुळे गुर्हाळा कडे लोक वळत नाहीत. पण आता शेतकऱ्यांनी त्याची सुरुवात केली आहे. आपल्या कडे खूप मोठी बाजारपेठ आहे आणि तेवढी मागणी पण आहे.
2) आटा निर्मिती: सगळ्यात चांगला खूप कमी कालावधी मध्ये चालू होणारा व्यवसाय. छोट्या मशीन पासून सुरुवात करू शकता. अगदी 20 हजार लावून पण सुरू करता येतो. जवळच्या हॉटेल ला मेस ला सप्लाय करून महिना लाख भर रुपये नफा मिळवू शकता.
3) डाळ मिल: याला शासनाचे 70% पर्यंत अनुदान आहे. लाख दीड लाखा पर्यंत मशीन मिळते. होलसेल मध्ये विकून सुध्दा महिना 50 हजार नफा मिळवू शकतो.
4) पशु खाद्य निर्मिती: वेगवेगळे पशुखाद्य बनवण्याच्या मशीन उपलब्ध आहेत. त्यातून 80 ते 90 हजार आपण कमवू शकतो. याला फक्त लायसन्स ची गरज असते. 70% पर्यंत शासकीय अनुदान आहे.
5) बेसन निर्मिती: हॉटेल पासून ते घरा घरात लागणार हा पदार्थ आहे. याची मार्केट मध्ये खूप जास्त गरज आहे. तुम्ही लोकल मार्केट जरी कव्हर केलं तरी महिना 60- 70 हजार नफा मिळू शकतो.
6) काजू प्रोसेस: शासकीय अनुदानातून काजू प्रोसेसिंग च्या मशीन घेऊ शकता. प्रत्येक किलो मागे कमीत कमी 100 ते 150 रुपयांचा फायदा मिळतो. होलसेल विकून 80 हजार नफा मिळू शकतो.
7) मशरूम उद्योग: खूप कमी जागेत अंधार असलेल्या खोलीत आपण उत्पादन घेऊ शकतो. होलसेल विकून 50 हजार नफा मिळू शकतो. 50% पर्यंत शासकीय अनुदान मिळते.
8) फूड प्रोसेसिंग: या मध्ये अनुदानातून मशनरी घेऊन विविध खायचे पदार्थ बनवू शकतो व साईड बाय साईड एखाद्या कंपनी चा वेंडर बनून त्यांच्या क्वालिटी चा माल बनवून देऊन महिन्याला लाख भर रुपये मिळवू शकतो.
दुकान न टाकता, कसं कमवू शकतो: 1) हर्बल प्रॉडक्ट विक्री 2)मनुके व मसाले विक्री 3)देशी तूप किंवा चटणी विक्री 4)मिल्क स्टोरेज युनिट
अनुदान घेऊन थोडा मोठा व्यवसाय कोणता करू शकतो:
1) कृषी पर्यटन: 2 ते 3 एकर जमीन मध्ये काहीतरी वेगळे करायची इच्छा असेल तर कृषी पर्यटन सारखा दुसरा पर्याय नाही. त्याच्यामध्ये काही वेगळे करायची गरज नाही. तुम्ही दैनंदिन जीवनात ज्या गोष्टी गावांमध्ये करतात ना त्या गोष्टी शहरातल्या लोकांला दाखवायांच्या आसतात. त्यांना फक्त गावचे जेवण द्यायचे, गावचे जीवन दाखवायचे, घोडागाडी बैलगाडी असे करायचे. याला शासनाकडून अनुदान मिळते.
2) कुकुट पालन: 100% ते 50% ते 60% कुकुट पालना मध्ये अनुदान मिळते. तुम्ही शेड वगैरे टाकून अगदी 2 गुंठ्यात पण सुरुवात करु शकता किंवा जास्तीत जास्त मोठा पण करू शकता.
3) शेळी पालन: 60 ते 70 हजाराच्या गुंतवणूकी पासून ते 6 – 7 लाखाच्या गुंतवणूकी पर्यंत चांगल्या शेळ्या घेऊन त्यांची ब्रिडिंग करून अगदी 6 महिन्याला प्रॉफिट देणारा हा व्यवसाय आहे.
4) मत्स्य शेती: 20 बाय 20 च्या तळ्यात मत्स्य शेती करू शकता. आठवड्याला 30 ते 40 हजाराचा माल निघतो जर तुम्ही प्रॉपर मॅनेजमेंट केले तर.
5) श्वान संगोपन: चांगल्या ब्रिडिंग ची श्वान ठेवले तर तुम्हाला प्रत्येक श्वाना मागे 20 ते 30 हजाराचा प्रॉफिट मिळू शकतो. फक्त प्रॉपर संगोपन व व्यवस्थित मॅनेजमेंट करण्याची गरज आहे.
6) ठिबक मटेरियल: फक्त ठिबक च नाही तर शेतकऱ्याला लागतात त्या गोष्टींचं मोठं स्टोरेज करू शकता किंवा मोठ्या कंपनी ची डिलरशीप घेऊ शकता.
सूचना: वरील माहिती उबलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.
Hello sir / madam 🙏 very good information thank you for all information 🙏