मोबाईलद्वारे माहिती अधिकाराचा अर्ज कसा करायचा ? ।। माहितीचा अधिकार अंतर्गत अर्ज केल्यानंतर येणाऱ्या अडचणी आणि माहिती कशी मिळवावी ?

लोकप्रिय शैक्षणिक

आज आपण जी माहिती घेणार आहोत ती महाराष्ट्र सरकारच्या अंतर्गत जी विविध सरकारी कार्यालय येत आहेत त्यांच्याबद्दलचे आहे. सर्वप्रथम तुम्हाला तुमच्या मोबाईल मधील chrome ब्राउजर मध्ये क्लिक करून chrome ब्राउजर ला उघडायचे आहे, हे पेज उघडल्यानंतर तेथे तुम्हाला टाईप करायचे आहे rtionline.maharashtra.gov.in आणि सर्च यावर क्लिक करायचे आहे,

यानंतर तुमच्या पेजवर दिसणाऱ्या साईट पैकी जी पहिली साईट आहे त्यावर क्लिक करायचे आहे त्यानंतर माहिती अधिकार खात्याचे एक पेज आपल्यासमोर उघडेल, त्याच्या उजव्या बाजूला इंग्लिश असा ऑप्शन आपल्याला दिसेल त्यावर क्लिक करून तुम्ही मराठी असे देखील तुमची भाषा निवडू शकता.

मराठी भाषा निवडल्यानंतर जे पुर्ण पेज आहे ते मराठी भाषेमध्ये आलेले तुम्हाला दिसेल, आता या पेज च्या डाव्या बाजूला वर असलेल्या ऑप्शन पैकी अर्ज सादर करा हा ऑप्शन आपल्याला निवडायचा आहे. असे केल्यानंतर तुमच्या पुढे आणखी एक पेज उघडेल या पेजवर खालच्या बाजूला एक चेक बॉक्स दिलेला आहे

जिथे लिहिलेले आहे की मी उपरोक्त मार्गदर्शक सूचना वाचल्या आहेत या बॉक्स समोरील डब्यात तुम्हाला क्लिक करायचे आहे आणि त्याखाली दिलेल्या सबमिट करा या पर्यायावर क्लिक करायचे आहे, आता तुमच्या पुढे एक फॉर्म उघडेल ,हा फॉर्म उघडल्यानंतर तिथे तुम्हाला विभाग असे लिहिलेलं दिसेल,

विभाग च्या पुढे सिलेक्ट केल्यावर तुम्हाला ज्या विभागाअंतर्गत अर्ज करायचा आहे तो विभाग निवडायचा आहे राज्य सरकार अंतर्गत येणारे सर्व विभाग इथे देण्यात आलेले आहेत, त्यानंतर खालील नाव यापुढे तुम्हाला तुमचं संपूर्ण नाव टाकायचे आणि आणि त्याखाली दिलेल्या लिंग या ठिकाणी तुम्हाला पुरुष किंवा स्त्री यापैकी एक पर्याय निवडायचा आहे त्याखाली पत्ता आणि पिन कोड असे दोन पर्याय असतील,

तर पत्ता या पर्याय समोर दिलेल्या तीन ओळीमध्ये तुम्हाला तुमचा पूर्ण पत्ता भरायचा आहे आणि पिनकोड या पर्याय पुढे तुम्हाला तुमचा पिन कोड लिहायचा आहे त्यानंतर खाली दिलेल्या पर्यायांमध्ये तुम्हाला तुमचा जिल्हा, तालुका ,गाव आणि ठिकाण निवडायचे आहे,ठिकाणी या पर्याय पुढे तुम्हाला दोन पर्याय दिसतील,

एक म्हणजे ग्रामीण आणि दुसरा म्हणजे शहरी, तुम्ही जर ग्रामीण भागात राहत असाल तर तुम्हाला ग्रामीण हा पर्याय निवडायचा आहे, त्याखाली शैक्षणिक स्थिती या पर्याय पुढे तुम्हाला साक्षर किंवा निरक्षर या दोनपैकी एक पर्याय निवडायचा आहे, त्यानंतर खाली दिलेल्या पर्यायांमध्ये तुम्हाला तुमच्या मोबाईल नंबर व शक्य असल्यास अतिरिक्त मोबाईल नंबर लिहायचा आहे.

ऑनलाइन माहितीचा अधिकाराचा अर्ज करण्यासाठी तुमच्याकडे ईमेल आयडी असणे गरजेचे आहे.त्यासाठी दूरध्वनी क्रमांक या ऑप्शन खाली दिलेल्या ईमेल आयडी या रकान्यात तुम्हाला तुमचा ईमेल आयडी लिहायचा आहे तुमच्याकडे जर ईमेल आयडी नसेल तर तुम्हाला ती बनवून घ्यावी लागेल.

त्यानंतर नागरिकत्व या पर्याय पुढील भारतीय हेच राहू द्यायचा आहे आणि त्याखाली दिलेल्या दारिद्र रेषेखालील आहेत का या पर्याया पुढे दारिद्र रेषेखालील असल्यास हो आणि नसल्यास नाही हा पर्याय निवडायचा आहे. त्यानंतर माहिती अधिकाराच्या अर्थाचा मजकूर या पर्याय पुढे दिलेल्या बॉक्समध्ये तुम्हाला जे प्रश्न विचारायचे आहेत ते प्रश्न स्वरूपात दीडशे शब्दात पर्यंत तुम्ही टाकू शकतात त्यासाठी तुम्ही तुमच्या मोबाईलच्या व्हाट्सअप किंवा इतर पर्याय वापरून मराठीमध्ये लिहून घ्या आणि नंतर ते कॉपी करून या बॉक्समध्ये पेस्ट करा,

परंतु जर 150 शब्दांमध्ये तुमचे प्रश्न बसत नसतील तर खाली दिलेल्या सहाय्यक दस्तऐवज या पर्याय पुढे तुम्ही तुमचे प्रश्न pdf स्वरूपात तयार करून ते इथे अपलोड करू शकता. ज्यांच्याकडे कंप्यूटर आहे त्यांच्यासाठी हा पर्याय चांगला आहे नाहीतर दीडशे शब्दात पर्यंत मोबाईल द्वारे तुम्ही वर दिलेल्या बॉक्समध्ये तुमचे प्रश्न मांडू शकतात.

यानंतर संरक्षणार्थ तिथे दिलेला त्याच्या कोड खालील बॉक्समध्ये लिहून submit या पर्यायावर क्लिक करायचे आहे. असे केल्यानंतर तुमच्याकडे पेमेंट करण्यासाठी एक पर्याय येईल, पेमेंट मोड ऑप्शनवर क्लिक करायचे आहे यानंतर ओपन होणाऱ्या पेज वर तुम्ही paytm द्वारे, नेट बँकिंगद्वारे, डेबिट कार्ड किंवा क्रेडिट कार्ड द्वारे, IMPS द्वारे किंवा UPI मोड द्वारे पेमेंट करू शकता.

जर समजा मी PAYTM हा पर्याय निवडला तर तुमच्या पुढे आणखी एक पेज उघडेल या पेजवर तुम्हाला proceed for payment हा पर्याय निवडायचा आहे, त्यानंतर PAYTM या पर्यायाखाली तुम्हाला तुमचा रजिस्टर मोबाईल नंबर टाकायचा आहे आणि नंतर Procced या पर्यायावर क्लिक करायचे आहे

हे केल्यावर तुमच्या रजिस्टर मोबाईल नंबर वर एक ओटीपी येईल तो ओटीपी तुम्हाला दिलेल्या रकान्यात भरायचा आहे आणि verify या पर्यायावर क्लिक करायचे आहे आणि शेवटी pay या पर्यायावर क्लिक करायचे आहे.तर मित्रांनो अशा प्रकारे तुमचा माहिती अधिकाराचा अर्ज हा मोबाईल द्वारे भरून झालेला आहे.

मित्रांनो त्यासोबतच आज आपण पाहणार आहोत की माहितीचा अधिकार अंतर्गत अर्ज केल्यानंतर येणाऱ्या अडचणी आणि माहिती कशी मिळवावी याबाबत माहिती: RTI कसा करावा?: तर मित्रांनो आपल्याला राग येतो आणि आपण पण घेतो आणि लिहित बसतो ते लिहिताना कधी विचार करत नाही की मला काय पाहिजे मला काय करायचंय किंवा मी त्याचा कसा वापर करणार आहे याचा आपण विचारच करत नाही आणि मग तुमचा अर्ज कचऱ्याच्या डब्यात जातो.

तर मित्रांनो त्यासाठी तुम्ही शांतपणे बसा आणि विचार करा की तुम्हाला काय पाहिजे, जी माहिती पाहिजे ती माहिती मिळाल्यानंतर तुम्ही काय प्रतिउत्तर देणार आहात, याचा ज्यावेळी तुम्ही विचार करता त्यावेळी तुमच्या डोक्यात प्रश्न निर्माण व्हायला तयार होतात आणि ज्या वेळी प्रश्न निर्माण होतात त्याच वेळी त्याचे उत्तर देखील मिळायला सुरुवात होते

आणि मग त्या प्रकारे तुम्ही माहितीच्या अधिकाराखाली अर्ज करावा कारण की काय होतं की माहितीच्या अधिकाराखाली केलेल्या अर्जामध्ये आपण असेच काहीतरी लिहून देतो आणि मग हे आमच्याकडे नाही किंवा ते आमच्याकडे नाही असे सांगतो, असे केल्यास तुमचा अर्ज गृहीत धरल्या जात नाही त्यामुळे तुमच्या अडचणीवर बसून विचार करा

आणि विचार करायला बसल्यावर ह्याचा विचार करा की आपण हा अर्ज टाकल्यानंतर समोरचा व्यक्ती आपल्याला काय उत्तर देणार आहे, आपण कधीही समोरच्याशी बोलताना मी असं बोलतो आणि मी तस बोलतो तर असं नसतं , कधीकधी आपण चुकतो त्यामुळे स्वतः शी संवाद साधा.

कधीही लढाई करण्याच्या अगोदर मला समोरचा माणूस चुकीचं कसं करू शकतो आणि मी कुठल्या प्रकारे त्याला चुकीचा दाखवू शकतो अशा प्रकारे विचार केल्या शिवाय लढाई चालू करू नका तुम्ही विचार न करता लढाई केली तर तुमची हार निश्चित आहे. तर कुठलेही पत्र लिहिण्याच्या आधी रागाच्या भरात लिहायचे नाही, हवं तर रागाच्याभरात लिहा मी असं करीन तस करी आणि राग कमी झाल्यानंतर त्यावर विचार करा की त्यावर कायदेशीर रित्या काय कारवाई करू शकतो.

माहितीच्या अधिकाराचा अर्ज करण्यासाठी सगळ्यात पहिल्यांदा विचारला जाणारा प्रश्न म्हणजे कुठल्या अधिकाराखाली केलं?आणि का केलं: तर त्यावर उत्तर असे येतात की, तुम्ही प्रश्न करू शकत नाही, अभिलेखावर असलेले फक्त मागावे ,हे सर्वथा चुकीचे उत्तर आहे. त्यामुळे तुम्ही प्रश्न विचारू शकता.

इन्फॉर्मेशन कमिशनच्या प्रमाणे सांगितला आहे कि बहुतांश ग्राहकांना कायद्याची पूर्ण जाण नाही यापेक्षा तुम्ही अर्ज का केला? असं विचारण्यापेक्षा provide the provisions of law, sections and material relied upon by you to take this decision यात तुम्ही तेच विचारताय पण तुम्ही ‘का?’असे जेव्हा विचारतात तेव्हा ते भांडण केल्यासारखं होईल त्यापेक्षा विचारण्याची भाषा बदलून अशाप्रकारे ते विचारा. दुसरी गोष्ट म्हणजे फक्त अभिलेखावर असलेली माहिती तुम्ही बघू शकता,

हे देखील चुकीचा आहे जर कुणी तुम्हाला ही माहिती देण्यास नकार दिला तर section 2f अंतर्गत तुम्ही त्यांना प्रश्न विचारू शकता . section 2A1 नुसार’ माहिती म्हणजे कोणत्याही रूपातली कोणतीही माहिती’ म्हणजेच काय तर तुम्ही प्रश्न विचारू शकत नाही असे त्यात दिलेले नाही तसेच ती माहिती त्याच्या रेकॉर्ड सहित देण्यात यावी असे देखील या सेक्शनमध्ये नमूद आहे, त्यामुळे जर कुणी तुम्हाला माहिती देण्यास नकार दिला तर त्याला या section बद्दल नक्कीच सांगा,

जी माहिती, माहिती अधिकाऱ्याच्या अंतर्गत आहे आणि त्यांच्याकडे उपलब्ध आहे ती माहिती त्यांना द्यावीच लागेल. यानंतर section 4 sub section B यानुसार देखील ते आपल्याला माहिती देण्यास नकार देऊ शकत नाही तसेच त्यामुळे कुठलाही माहिती अधिकारी कुठल्याही परिस्थितीत तुम्हाला माहिती देण्यास नकार देऊ शकत नाही.

त्यानंतर बरेचदा तुम्हाला असं सांगितलं जातं की ही माहिती वेबसाईटवर आहे, स्टेट इन्फॉर्मेशन कमिशन च्या पुस्तकात दिल्याप्रमाणे कलम 4 नुसार ‘ माहिती अधिकाराच्या संकेत वेबसाईट प्रसिद्धी केली जाणे एवढे पुरेसे नाही’याबरोबर त्याचा लाभ घेण्यासाठी आवश्यक अश्या अनेक सुविधा सर्व नागरिकांना उपलब्ध असतातच असे नाही ,नागरिकांनी मागणी केलेली ही माहिती लिखित स्वरूपातही उपलब्ध असली पाहिजे तसेच महानगरपालिका कमिशनने असे सांगितले आहे की तक्रार करणाऱ्या व्यक्तीला चौकशीसाठी बोलवू शकत नाही

तुम्हाला RTI मध्ये चौकशी ला बोलवणार नाही. त्याचप्रमाणे माहिती अधिकारी जेव्हा माहिती देतात तेव्हा त्यामध्ये Section A ,किंवा Section ब प्रमाणे अशा प्रकारे लिहिलेली असते हे चुकीचे आहे त्यांनी आपली जी माहिती आहे ती एकाच तक्यामध्ये परत बनविली पाहिजे मग ती आपल्याला दिली पाहिजे जेणेकरून पहिल्या अपील मध्ये आणि दुसरे अपील मध्ये माहिती घेण सोपं पडतं नाहीतर उत्तर बघणे,RTI बघणे आणि माहिती बघणे यामध्ये खूप वेळ जातो,

तर जर अशाप्रकारे माहिती तुम्हाला दिलेली असेल तर तुम्ही त्यांना कळवू शकता आणि तक्यामध्ये मध्ये माहिती घेऊ शकता.RTI अपिला मध्ये त्यांनी स्वतःचे नाव, ईमेल, आयडी, टेलीफोन नंबर, पत्ता हे दिले पाहिजेत जे की ते देत नाहीत त्यावर देखील तुम्ही तक्रार दाखल करू शकता. त्यानंतर section19(5) नुसार तुम्हीच जशा पद्धतीने माहिती पुरवली आहे त्याच पद्धतीने त्यांना माहिती देणे अनिवार्य आहे तसेच ती माहिती वरिष्ठांना, अधिकाऱ्यांना कळावी अशा पद्धतीने मांडणे गरजेचे आहे,

तसे नसल्यास तुम्हाला अधिकाऱ्यांचे विरुद्ध तक्रार करता येते, त्यानंतर section 41(A)नुसार नागरिकांना हव्या असलेल्या स्वरूपात माहिती पुरवणे अनिवार्य आहे, नंतर section 20 sub section 1 आणि sub section 2 यानुसार हे बंधनकारक आहे. section 7(A) प्रमाणे किंवा चुकीच्या मार्गाने केव्हा section8(A)नाकारून त्यांनी सविस्तर उत्तर देण्यास नकार दिला किंवा चुकीची माहिती दिली तर त्यांच्यावर section 20 प्रमाणे 25 हजाराचा दंड झालाच पाहिजे.

आता दुसऱ्या आपला मध्ये आपण स्पष्ट लिहायचे आहे कि 30 दिवसांमध्ये तुम्हाला उत्तर मिळाले नाही जे की section 71 प्रमाणे होतं, आम्हाला तक्ता च्या स्वरूपात माहिती दिलेली नाही, त्यामुळे आम्हाला माहिती पाहण्याचा त्रास होते. यानंतर अर्जदारांनी केलेल्या अर्जातील अपिला बद्दल अधिकाऱ्यांना काही प्रश्न असतील किंवा काही कळत नसेल तर अर्ज केल्यापासून पाच दिवसाच्या आत अर्जदाराशी संपर्क साधावा व जी काही माहिती आहे ती घेऊन त्यांना माहिती पुरवावी,

आपल्याकडे काय करतात तर 30 दिवस गप्प बसतात आणि तिसाव्या दिवशी कळलं नाही सांगतात, जे की कायदेशीररीत्या चुकीचे आहे. तुमच्या अपील मध्ये आणि दुसऱ्या अपील मध्ये prayer हा क्लोज टाका की त्यांच्यावर याप्रमाणे ॲक्शन झाली पाहिजे ,सेक्शन 19 8 ड प्रमाणे तुम्हाला पाहिजे असलेली माहिती जर तुम्हाला मिळाली नाही त्यासाठी तुम्हाला मानसिक आणि शारीरिक त्रास झाला तर त्याचा मोबदला मला मिळाला पाहिजे

हे तुम्ही तुमच्या अपील मध्ये आणि दुसरे अपील मध्ये टाकावे या व्यतिरिक्त तुम्ही अधिकाऱ्यांविरुद्ध तक्रार करू शकतो आणि केलेल्या तक्रारीवरुन झालेला कारवाईची नोंद सर्विस बुक मध्ये झाल्यानंतर त्याची एक कॉपी मला देण्यात यावी असे सांगू शकता. तुम्ही जे काय बोलले आहात ,ज्या शंका उपस्थित केल्या आहेत त्या माहिती आयुक्तांनी ऑर्डर मध्ये नोंद करणे गरजेचे आहे.

FAA ने काय काय उत्तर दिलेले आहेत ते देखील नोंद करणे गरजेचे आहे ,PIO ने ऑर्डरला काय काय उत्तर मिळाले त्याची देखील नोंद करावी या दोन्ही वरून त्यांनी काय निष्कर्ष काढला याची देखील त्यामध्ये नोंद करावी आणि हे जर त्यांनी केले नसेल तर आपण माहिती उपायुक्तांच्या विरुद्ध कोर्टामध्ये तक्रार दाखल करू शकता, कारण त्यांनी न्यायालयाच्या कायद्याच्या विरुद्ध ऑर्डर पास केलेली आहे,

त्यामुळे लक्षात ठेवा यांच्याविरुद्ध तक्रार करताना खालील मुद्दे नोंदवायचे आहेत. एक म्हणजे मला कळत नाही म्हणून त्यांनी चुकीचे आदेश दिलेत, दुसरा त्यांना कळतं पण त्यांनी दृष्ट बुद्धीने ते आधीच दिलेले आहे. अशा प्रकारे अधिकाऱ्यांविरुद्ध आपण तक्रार दाखल करू शकतो, आणि आपण भ्रष्ट अधिकाऱ्यांवर दबाव निर्माण करू शकतो. जे आजपर्यंत आपण केले नाही ते यापुढे करूया, या दिवशी प्रत्येक माणूस याप्रकारे भ्रष्ट अधिकार्‍यांविरोधात तक्रार करेल, त्यादिवशी भ्रष्ट पणा कमी होईल.

2 thoughts on “मोबाईलद्वारे माहिती अधिकाराचा अर्ज कसा करायचा ? ।। माहितीचा अधिकार अंतर्गत अर्ज केल्यानंतर येणाऱ्या अडचणी आणि माहिती कशी मिळवावी ?

  1. मलाही काही माहिती हवी आहे

  2. पेमेंट ऑप्शन पासून पुढे जात नाही ऑनलाईन rti फॉर्म

Comments are closed.