जंजिरा हा किल्ला महाराष्ट्रातील प्रमुख किल्ल्यांपैकी एक आहे जो एक अभेद्य आणि अजिंक्य किल्ला म्हणून ओळखला जातो. या किल्याचे खास वैशिष्ट्य म्हणजे हा किल्ला आजवर कुणालाही जिंकणे शक्य झाले नाही. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज यांनीही वेळोवेळी प्रयत्न करूनही हा किल्ला त्यांना जिंकणे शक्य झाले नाही, अशातच आज आपण समुद्रामध्ये असणाऱ्या या जंजिरा किल्ल्या बद्दल माहिती जाणून घेणार आहोत..
जंजिरा हा किल्ला महाराष्ट्रातील एक महत्त्वाचा किल्ला आहे. जो महाराष्ट्राच्या रायगड जिल्ह्यातील मुरुड समुद्र किनारपट्टीवर असलेला एक बलाढ्य अभेद्य आणि अजिंक्य किल्ला म्हणून प्रसिद्ध आहे. विशिष्ट म्हणजे जंजिरा किल्ल्याची भक्कम तटबंदीमुळे ओळखला जातो. हा किल्ला अरबी समुद्राच्या मध्यभागी आहे. त्याच्या चारही बाजू पाणी असल्यामुळे हा किल्ला जलदुर्ग प्रकारामध्ये मोडतो. त्याचबरोबर या किल्ल्याच्या आतमध्ये दोन गोड्या पाण्याचे तलाव आहेत. सर्व समुद्राचे खारे पाणी असताना किल्ल्याच्या आत 2 गोड्या पाण्याचे तलाव कसे तयार झाले असतील? याबद्दल खूप विशेष वाटते.
मित्रांनो जंजिरा किल्ला हा 22 एकर क्षेत्रामध्ये विस्तारलेले आहे. 350 वर्षाहून अधिक काळ अजिंक्य राहिलेला आहे ज्याला बांधण्यासाठी साधारणता 22 वर्षे लागली. छत्रपती शिवाजी महाराज आणि छत्रपती संभाजी महाराज, पोर्तुगीज फ्रेंच हा किल्ला जिंकण्यासाठी प्रयत्न केले पण कोणालाही तो जिंकता आलेला नाही, कारण या किल्ल्याचे बांधकाम ही खूपच रचनात्मक पद्धतीने केलेली आहे. जसे की लांबून या किल्ल्याचे प्रवेशद्वार नेमके कोठे आहे? हे लक्षात येत नाही.
तिथपर्यंत पोचणे आधीच्या शत्रूला त्याच्या तोफांचा सामना करावा लागायचा. त्यामुळे सहजरीत्या किल्ल्यावर पोहोचणे सोपे नसल्यामुळे हा किल्ला अजिंक्य राहिला आहे. जंजिरा किल्ल्यापर्यंत पोहोचण्यात पर्यटकांना होडीने प्रवास करून इथपर्यंत पोहोचावे लागते. महाराष्ट्रातील बरेच पर्यटक, इतिहासप्रेमी आवर्जून या किल्ल्याला भेट देण्यासाठी येत असतात. मुंबईपासून हा किल्ला साधारणता 165 किलोमीटर, पुण्यापासून 180 किलोमीटर अंतरावर आहे. आज आपण जंजिरा किल्ल्या बद्दल माहिती जाणून घेतली आहे. जंजिरा किल्ल्याबद्दल सांगितलेली ही माहिती तुम्हाला कशी वाटली ? हे आम्हाला कमेंट करून नक्की कळवा.