..म्हणून अजूनही म्हणावी तशी थंडी पडत नाहीये!! जाणून घ्या!!

बातम्या शैक्षणिक

 

यंदाच्या दिवाळीत म्हणावी तशी थंडी पडली नाही असं अनेकांना वाटत असेल. मुंबई-पालघर-रायगड सारख्या किनारी भागांमध्ये तर या दिवसातही तापमान काही वेळा 35 अंशांच्या वर गेले. मुंबई कुलाबा वेधशाळेचे 35.2 अंश सेल्सिअस तर सांताक्लॉज वेधशाळेत 36.5 अंश सेल्सिअस तापमानाची नोंद झाली.
कुलाबा येथे किमान तापमानही 26.2 अंश सेल्सिअस होतं. पालघर, डहाणू, जेऊरमध्ये ही 34 अंशांवर गेला तर महाबळेश्वर आणि नाशिकमध्ये रात्रीचे तापमान 16.7 पर्यंत खाली आलं पण दिवसा नाशिकमध्येही पारा 32 अंशांवर होता. विदर्भात, अमरावतीमध्ये 36 अंश सेल्सियस, अकोल्यात 35.9 अंश सेल्सिअस तर नागपूरमध्ये 30.8 अंश सेल्सिअस कमाल तापमान नोंदवले गेले. त्याच्या पुढचे 5 दिवस हवामान कोरडे राहील असा अंदाज हवामान विभागाने वर्तवला असून कुठल्याही जिल्ह्याला तीव्र हवामान इशारा दिलेला नाही.
एरवी ऑक्टोबर महिन्यात मान्सून माघार घेतल्यावर उष्णता नेहमीच जाणवते, कारण पावसाळा संपला तरी हवेमध्ये बाष्प कायम असतं. पण यावेळी ऑक्टोबर महिना विक्रम मोडले गेल्याचं भारतीय हवामान विभागाने एक नोव्हेंबरच्या पत्रकार परिषदेत जाहीर केलं होतं. ऑक्टोबरमध्ये देशभरात पाऊसही सरासरीपेक्षा जास्त झालाय. आता दुसऱ्या आठवड्यापर्यंत देशात विशेषतः उत्तर आणि पूर्व भारतात तापमान सरासरीपेक्षावर राहील असा अंदाज आहे. त्यामुळे थंडीसाठी यंदा आणखी काही काळ वाट पहावी लागणार असल्याचे सांगितले जात आहे.
दरम्यान पॅसिफिक महासागरातील प्रवाह मागे हटला असला तरी सध्या स्थिती न्यूट्रल आहे आणि डिसेंबरपर्यंत थंडीची स्थिती निर्माण होण्याची शक्यता आहे. यादरम्यान, भारतासह आशियाई देशांमध्ये पाऊस आणि थंडीत जास्त पडते पण सध्या ही स्थिती तयार झालेली नसल्यानं तापमानवर राहते. त्यामुळे काही संशोधकांचा मते, येत्या नोव्हेंबरच्या शेवटच्या आठवड्यात थंडीला सुरुवात होण्याची शक्यता आहे.