नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.
सर्वसामान्य मराठी प्रेक्षकांना मराठी मालिका या सगळ्यात जवळच्या वाटतात. दिवसभराच्या सगळ्या घडामोडी प्राईम टाईम विसरण्यास भाग पाडतो. मालिकेशीच नव्हे तर मालिकेतील व्यक्तिरेखांसोबतही प्रेक्षकांचे भावबंध निर्माण होतात. त्यामुळेच मालिकेबाहेरही प्रेक्षक कलाकारांना फॉलो करतात.
अनेकदा कलाकारांना लाडक्या व्यक्तिरेखांच्या नावानेही संबोधलं जातं. पण एखादा कलाकार प्रसिद्धीच्या शिखरावर असताना मालिकेतून बाहेर पडण्याचा निर्णय घेतो तेव्हा प्रेक्षकाचाही हिरमोड होतो. मराठी मालिकेतील कलाकारही मालिका ऐन भरात असताना मालिकेतून बाहेर पडतात. पाहुयात या यादीत कोणकोण मराठी कलाकार आहेत.
अपुर्वा नेमळेकर (शेवंता) – ‘रात्रीस खेळ चाले’ ही प्रेक्षकांची सगळ्यात लाडकी मालिका. हॉरर, थ्रिलर या मालिकेने शेवंता या व्यक्तिरेखेला हटके ओळख दिली. धुर्त, चाणाक्ष शेवंता अभिनेत्री अपुर्वा नेमळेकरने उत्तम साकारली. पण या मालिकेचा दुसरा सीझन (प्रीक्वेल) सुरु असताना अपुर्वाने मालिका सोडली. अपुर्वाने सेटवर होत असलेलं ट्रोलिंगला कंटाळून मालिका सोडल्याचं शेअर केलं होतं.
वीणा जगताप (आर्या) – ‘आई माझी काळूबाई’ या अलका कुबल यांची निर्मिती असलेल्या या मालिकेला सुरुवातीला अनेक अडचणींचा सामना करावा लागला. या मालिकेत आर्याची भूमिका साकारणारी अभिनेत्री वीणा जगतापनेही मालिकेतून अचानक एक्झिट घेतली. वैयक्तिक कारण देत वीणाने ही मालिका सोडल्याचं सांगितलं.
रसिका धबडगावकर (शनाया) – ट्रोलिंग आणि प्रेम या दोन्हीचा ‘माझ्या नव-याची बायको’ या मालिकेवर वर्षाव झाला. या मालिकेत गॅरी, राधिका, शनाया या व्यक्तिरेखांवर प्रेक्षकांनी प्रेम केलं. पण शनया साकारणारी रसिका या मालिकेतून अचानक बाहेर पडली. अमेरिकेत अभ्यास करायला गेली असल्याने रसिकाने ही मालिका सोडल्याचं चाहत्यांशी शेअर केलं होतं.
दिपाली पानसरे ( संजना ) – ‘आई कुठे काय करते’ या मालिकेत अभिनेत्री दिपाली पानसरे संजनाची भूमिका साकारत होती. पण करोनाकाळात शुटिंग करण्यासाठी कंफर्टेबल नसल्याने मालिकेला रामराम ठोकला.
शिवानी सुर्वे (देवयानी ) – पदार्पणातच सुपरहिट मालिकेत झळकण्याचं भाग्य शिवानी सुर्वेला मिळालं. देवयानी या मध्यवर्ती व्यक्तिरेखेत शिवानी कमालीची लोकप्रिय झाली. पण त्यानंतर सेटवरच्या तिच्या नख-यांना कंटाळून शिवानीला मालिकेतून बाहेरचा रस्ता दाखवण्यात आल्याचं समोर आलं.
किरण ढाणे ( जयडी ) – ‘लागीरं झालं जी’ मालिकेला प्रेक्षकांनी चांगलंच डोक्यावर घेतलं. या मालिकेतील जवळपास सगळ्याच व्यक्तिरेखा प्रेक्षकांच्या खास आवडत्या बनल्या होत्या. या मालिकेत जयडीच्या भूमिकेत दिसलेली किरण ढाणे हिने मात्र मालिका अर्ध्यातच सोडली. अधिक मानधनाची मागणी मान्य न झाल्याने किरणने ही मालिका सोडल्याचं समोर आलं.
सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.
सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा