या मराठी कलाकारांनी भूमिकेसाठी केला चक्क केसांचा त्याग

मनोरंजन

नमस्कार मित्रांनो न्यूज फीड या मराठी डिजिटल माहिती पोर्टलवर आपले स्वागत आहे. आम्ही आपल्यासाठी रोज नवनवीन माहिती प्रसारित करत असतो. हि माहिती आपल्या पर्यंत पोहोचण्यासाठी आपण आमचे NEWS FEED (न्यूज फीड) हे फेसबुक पेज लाईक करा.

कोणत्याही कलाकारासाठी अभिनय हा एकप्रकारचा परकाया प्रवेश असतो. त्या व्यक्तिरेखेच्या लकबीमध्ये उतरण्यासाठी अनेकदा मेहनत घेताना दिसतात. अशा वेळी त्यांनी व्यक्तिरेखेचा पेहरावही हुबेहुब कॉपी केलेला असतो.

अनेकदा त्यांना यासाठी स्वत:च्या शरीरयष्टीतही बदल करावा लागतो. पण काही कलाकारांनी पुढे जात भूमिकेसाठी केसांच्या त्याग केल्याचंही दिसून येतं. या मराठी कलाकारांनी भूमिकेसाठी टक्कल केलं होतं.

जितेंद्र जोशी – जितेंद्र जोशीने मार्तंड या व्यक्तिरेखेसाठी टक्कल केलं होतं. श्रेयस तळपदेची मुख्य भूमिका असलेला ‘बाजी’ या सिनेमात त्याने नकारात्मक भूमिका साकारली होती. यातील त्याच्या नकारात्मक भूमिकेची चांगलीच चर्चा रंगली होती. पण जितेंद्र ने भूमिकेसाठी टक्कल करण्याची ही पहिलीच वेळ नाही. त्याने 2012 मध्ये ‘संत तुकाराम’ या भूमिकेसाठीही त्याने केसांचा त्याग केला होता.

सुबोध भावे – सुबोध भावेने ‘लोकमान्य एक युगपुरुष’ या सिनेमासाठी केसांचा त्याग केला होता. लोकमान्यांच्या व्यक्तिरेखेत योग्य प्रकारे शिरता यावं यासाठी टक्कल केल्याचं सुबोधने एका मुलाखतीमध्ये शेअरही केलं होतं. यावेळी त्याच्या ‘अ रेनी डे’ आणि ‘मालक’ या सिनेमांचं शुटिंगदेखील सुरु होतं. त्यावेळी त्याने हे सिनेमे विग वापरुन पुर्ण केले होते.

तनुजा – पुरुष कलाकारांनी केसाचा त्याग केल्याची अनेक उदाहरणं तुम्हाला सापडतील. पण याबाबतीत अभिनेत्रीही अजिबात मागे सरताना दिसत नाहीत. ज्येष्ठ अभिनेत्री तनुजा यांनीही ‘पितृऋण’ या सिनेमासाठी केसांचा त्याग केला होता. अभिनेता नितीश भारद्वाज यांनी या सिनेमाचं दिग्दर्शन केलं होतं.

सविता मालपेकर – या यादीत आणखी एका स्त्री अभिनेत्रीचं नाव घ्यावं लागेल. अभिनेत्री सविता मालपेकर यांनीही काकस्पर्शमधील आत्याच्या व्यक्तिरेखेसाठी केसांचा त्याग केला होता. आलवण ल्यालेली आत्याची भूमिका त्यांनी यात साकारली होती.

मधुरा जोशी – फुलाला सुगंध मातीचा या मालिकेत दिसलेली अभिनेत्री मधुरा जोशीनेही मालिकेतील व्यक्तिरेखेसाठी केसांचा त्याग केला आहे. मधुरा पुण्यश्लोक अहिल्या बाई या मालिकेत दिसते आहे. या मालिकेतील रेणूच्या व्यक्तिरेखेसाठी तिने केस कापले आहेत.

चिन्मय मांडलेकर – अभिनेता चिन्मय मांडलेकर यानेही एका भूमिकेसाठी केस कापले होते. चिन्मयने ही भूमिका ‘तू माझा सांगाती’ या मालिकेसाठी केस कापले होते.

सचिन खेडेकर – काकस्पर्श हा प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेला सिनेमा आहे. या सिनेमाच्या कथेने प्रेक्षकांच्या मनात स्थान मिळवलं. या सिनेमात अभिनेता सचिन खेडेकर यांनीही केसांचा त्याग केला होता. या सिनेमात सचिन खेडेकर हरी दादाच्या भूमिकेत दिसले होते.

सूचना: वरील माहिती उपलब्ध माहितीचा अभ्यास करून तसेच वेगवेगळ्या इंटरनेट स्रोतांचा अभ्यास करून प्रदर्शित करण्यात आलेली आहे. सदर माहिती हि सामान्य जनतेमध्ये जागरूकता निर्माण करण्यासाठी प्रदर्शित करण्यात आली आहे या माहितीमध्ये काही त्रुटी आढळ्यास त्यास मानवी चूक मानले जावे. अधिक माहितीसाठी विषयानुरूप त्या क्षेत्रातील जाणकार व्यक्तींचा सल्ला घ्यावा. केवळ या लेखाचा आधार घेऊन केलेल्या कोणत्याही प्रकारच्या कायदेशीर अथवा इतर कार्यवाहीच्या संभाव्य नुकसानीस या लेखाचे लेखक अथवा वेबसाईटशी संबंधित कोणतीही व्यक्ती अथवा कंपनी जबाबदार राहणार नाही याची दखल घ्यावी.

सदर लेख अथवा लेखातील कुठल्याही भागाचे छापील, इलेक्ट्रॉनिक माध्यमात परवानगीशिवाय पुनर्मुद्रण किंवा कुठल्याही सोशल मीडियात कॉपी-पेस्ट करून पुनर्लेखन करण्यास सक्त मनाई आहे. याचे उल्लंघन केल्याचे आढळल्यास कायदेशीर कारवाई करण्यात येईल. लेख आपल्या मित्र, मैत्रिणींना पाठवण्यासाठी उपलब्ध पर्यायांचा वापर करून जरूर शेअर करा.